दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाह्यला कालचा भाग. काय कळ्ळच नाय. ती रडक्या चेहेर्‍याची हिरॉईन आधी साडी नेसली होती, मग मध्येच फ्लॅशबॅकात घुसली आणी ड्रेस घालुन आली. जरा वेन्धळीच वाटली. काही सीन ओढुन ताणुन आणल्यागत वाटले.

आमच्याकडे ही बघणार आहेत की नाही कल्पना नाही...
पण,
दिल दोस्ती दुनियादारी
तिन्ही जिव्हाळ्याचे शब्द!

काल ते नवर्‍याचा फोन आलेला तेवढ्यावरुनच मी प्रेडिक्ट केलेलं कि हिच्या नवर्‍याला हिला मुंबईला नेण्यात इंटरेस्ट नाही म्हणजे त्याचं दुसरीकडे लफडं असणार आणि तसंच निघालं. अगदीच प्रेडिक्टेबल आणि फास्ट. आता लगेच पुढ्च्या एपि. मध्ये ती डोक्याला खोक पडून रक्त येतांना दाखवली आहे म्हणजे:

१. नवरा तिला हाकलतो आणि ती दर दर की ठोकरे खात असतांना पडते आणि तिला लागते. ते बघुन ह्या रुमीजपैकी ती मुलगी हिला घेऊन यांच्या रुमवर येते आणि तिथुन पुढे ह्या सगळ्यांनी तिचे सांत्वन करणे, मग तिचे यांच्यात मिसळणे, मग पुढे प्रत्येकाचे लाईफ उलगडत जाणे, पुढच्या गमतीजमती.. इ.

२. तिच नवर्‍याशी भांडून बाहेर पडते आणि पुढे सगळे वरच्यासारखेच.

आणि या कोणत्याही केस मध्ये आपल्या आईवडीलांना आणि बहिणिच्या ठरलेल्या लग्नाला धक्का बसु नये म्हणून ती अकोल्याला कोणाला काही कळवणार नाही इ.इ.

मालिका संपता संपता यांच्यापैकीच कोणीतरी एक हिच्या प्रेमात पडून हिचा सुखी संसार वगैरे.

असो....

तरीदेखील मला पहिला भागतरी आवडला. सगळे तरुण लोक्स असल्याने आणि फ्रेश चेहरे असल्याने मालिकाही फ्रेश वाटतेय. रुममेट्स आणि त्यांच्यासोबत केलेली धमाल हा बर्‍याचजणांच्या मनाचा एक सुखद कप्पा असतो/ असेल, तो या मालिकेच्या रुपाने उघडेल अशी आशा आहे.

काल रेल्वेतला प्रसंगही टिपी होता पण तिचे त्यांना घाबरणे अगदीच बोर झाले. तरीदेखील मालिका रोज बघण्याचे सध्यातरी ठरवले आहे. बघुयात.

>>>बस्के - मला वरचे "१" वाचू तेच वाटले. तरी किमान देशीकरण चांगले असेल, संवाद चांगले असतील तर बघवेल.
व्हॉ.अ. वरचे ज्योकच असतील तर काय????

आधीही तशी नक्कल हिंदीत होउन गेली आहे. बहुतेक झी वरच...

दुसरी एक बाबाजी अाणि भारती आचरेकरांची मुलगी>>>>>अग दोघान्चे कसे लग्न लावलेस तू?:अओ: ती भारती आचरेकर नाही, आरती अन्कलीकर ( गायिका) आणी बाबाजी ( उदय टिकेकर ) ची मुलगी आहे, स्वानन्दी टिकेकर.

.

.

रश्मी + १ .
थोडक्यात आता मराठी मालिकांमध्ये पण पुढच्या पिढ्या येऊ घातल्यात तर ( हिंदी सिनेमासारख्या ) Happy

कालच्या भागात ती रुमी (तिचं नाव काय अजुन सांगितलेलं नाहीये) ती घेऊन येते घरी तिला.

आता घरच्यांची (इतर रुमीजची) रिअ‍ॅक्शन काय आहे ते आज दाखवतील.

कालच्या भागात तिचे पडणे आणि तिला लागणे, रुमीच्या रिअ‍ॅक्शन्स इ. अगदी करुण-बिरुण पद्धतीने सादर न करता थोड्या विनोदी अंगाने गेला ते बरं वाटलं.

आजचा भाग रडु होणार असा डौट आहे. Sad

मी पाहिले झी च्या वेबसाईटवर दोन्ही भाग.
सखी गोखले थोडीथोडी सुचित्रा सेनसारखी वाटली दिसायला आणि बोलण्याची पद्धत सो कु सिनियरसारखी. स्वानंदी टिकेकर किती आईसारखी दिसते. नाव नसतं सांगितलं तरी लगेच ओळखलं असतं.
त्या दोघींचं अ‍ॅक्टिंग आवडलं मला ( आत्तातरी )

दाढीवाला पुष्कराज चिरपुटकर यमुनानगर निगडीचा - नाटकात करीयर करायच म्हणुन आई - वडीलांना पटवुन मुंबईत स्ट्रगल करत होता. च्या मारी रिअल स्टोरी दिसते.

संग्राम सरदेशमुखला सुध्दा ( कुर्यात सदा टिंगलम १००० प्रयोग ) या सिरीयल मधे रोल मिळालेला दिसला.

या सहा कलाकारांबद्दल चला हवा येऊ द्या मध्ये मिळालेल्या माहितीनुसार..
२ स्टार किड्स(शुभांगी गोखल्यांची मुलगी तीच ती रडूबाई, उदय टिकेकर -आरती अंकलीकर टिकेकरांची मुलगी)
२ ट्रेन्ड कलाकार (१ ललित कलाकेंद्र आणि १ एनएसडी)
२ रॉ कलाकार(दाढीवाला आणि बेडकाच्या डोळ्याचा)

२ रॉ कलाकार(दाढीवाला आणि बेडकाच्या डोळ्याचा)>>>>>>> तेच दोघे जास्त उठुन दिसणार बहुदा मालिकेत.

त्या गैरसमजग्रस्त पकाऊ मूर्ख कौटुंबिक मालिकांपेक्षा जरा बरी वाटली ही मालिका. दिवसभराच्या कटकटीतून रात्री साडेदहाला हा डोकं बाजूला ठेवून करायचा हलकाफुलका आरामव्यायाम. तो झाला की लगेच रागीट म्हाळसा डोळे विस्फारत यायच्या आत टीव्ही बंद करून गुडूप व्हायचं.

त्या गैरसमजग्रस्त पकाऊ मूर्ख कौटुंबिक मालिकांपेक्षा जरा बरी वाटली ही मालिका. दिवसभराच्या कटकटीतून रात्री साडेदहाला हा डोकं बाजूला ठेवून करायचा हलकाफुलका आरामव्यायाम.
>>
+ कितीही!

रागीट म्हाळसा ोळे विस्फारत यायच्या आत >> Rofl

२ रॉ कलाकार(दाढीवाला आणि बेडकाच्या डोळ्याचा) -> बेडकाच्या डोळ्याचा म्हणजे अमेय वाघ.. तो अजिबातच रॉ नाहीये.. आणि दाढीवाला म्हणजे पुष्कराज चिरपुटकर.. तो पण बहुतेक रॉ नाहीये.. आधी कुठेतरी काम केलेलं आहे दोघांनीही.

मला याचा प्रोमो आवडला होत. कसला भन्गार आहे सुजयचा शर्ट, हा हा हा! टिपीकल वाक्य रिया च्या पिढीचे ( तरुण लोकान्चे, आम्ही म्हातारे चाळिशीतले.:फिदी:)

२ रॉ कलाकार(दाढीवाला आणि बेडकाच्या डोळ्याचा) -> बेडकाच्या डोळ्याचा म्हणजे अमेय वाघ.. तो अजिबातच रॉ नाहीये.. >> हो हो त्याला नाटकामध्ये पाहिलाय.. पण काम मस्तच करतो.

Amey wagh played rani mukherjee's brother in Ayya.he also ably hosted a cookery cut reality show for etv marathi

Pages