Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुग्धा स्वानंदी छान गायली की
मुग्धा स्वानंदी छान गायली की ग >>> मला तर सगळेच कम्प्लीट बेसुर वाटले. अन्जु बाकीच्यांकडुन मी अपेक्षाच केली नव्हती, पण स्वानंदीकडुन मला अपेक्षा होत्या..
Majh Kuni aikatach nahiye,,,
Majh Kuni aikatach nahiye,,,

स्वानंदीने गायलेली गाणी नाही
स्वानंदीने गायलेली गाणी नाही लक्षात राहीली माझ्या, मी आठवायचा प्रयत्न करतेय. पण ती गायली छान. मलातरी आवडलं.
मुळात या लोकांना गायला कशाला
मुळात या लोकांना गायला कशाला लावायचं ..? ते काय प्रोफेशनल सिंगर नाहीत...
असो..
ओह..ती जुईली जोगळेकर होती का...? केस बीस पिंगा केल्यासारखे उडवुन काय नाचत होती...अज्जीबात बरं दिसत नव्हतं ते...... तरी कालपासुन मी विचार करतेय की हीला कुठे पाहिलय...मला ती तेव्हा सुद्धा आवडली नव्हती जेव्हा ती सारेगम ची विनर झालेली.....
अरे लोकांनो त्यांच्या
अरे लोकांनो त्यांच्या सगळ्यांचाच आवाज बसलेला तुमच्या लक्षात नाही आला कआ?
मला तर सुजय आणि मिनल बोलताना पण त्यांचा आवाज बसलेला जाणवत होता.
बरं ते भडक कपड्यांबाबत - आपल्याला खटकलं कारण आपण टिव्हीवर बघत होतोत. माझ्या बहिणीने हा कार्येक्रम लाईव्ह पामाझ्यातिला उलट तेच कपडे (खुप लांबूनही व्यवस्थीत दिसत असल्याने ) आवडले.
रिया बसलेला आवाज होता तरी मला
रिया बसलेला आवाज होता तरी मला त्या दोघांचा आवडला मग एरवी किती छान गायलं असतं मीनल सुजयने.
पुणे सकाळच्या कालच्या अंकात
पुणे सकाळच्या कालच्या अंकात मनस्विनी लता रविंद्रचा ह्या मालिकेबद्दलचा लेख वाचला. खूप छान लिहिलं आहे तिने.
ही मालिका 'फ्रेंड्स'वर आधारीत आहेत असे आरोप झाले त्याबद्द्ल तिने चांगलं लिहिलं आहे.
मला त्यान्चा कालचा रॉक
मला त्यान्चा कालचा रॉक कॉन्सर्ट अजीबात नाही आवडला. अगदी ओढुन ताणुन आणलेला किन्वा दिदोदु च्या निम्मीत्ताने त्यान्ची लोकप्रियता कॅश करण्यासाठी केलेला वाटला. एक धड गाणे नाही. त्या शृती भावेचे व्हायोलीन वादन सोडले तर काहीच आवडले नाही. तो गन्धार का कोण तो? काय विशेष गायला? त्यापेक्षा नव्या बाटलीत जूनी व्हिस्की ओतली असती तरी चालले असते.
रिया बसलेला आवाज होता तरी मला
रिया बसलेला आवाज होता तरी मला त्या दोघांचा आवडला मग एरवी किती छान गायलं असतं मीनल सुजयने.
>>
हो तेच म्हणतेय. त्यामुळे माफी देऊन टाक त्यांना
मंजुडी, लिंक देतेस का प्लिज?
ही घे..
ही घे..
रिया (कोणाला माफी, मीनल-सुजय
रिया
(कोणाला माफी, मीनल-सुजय आवडले की मला, मी कुठे त्यांच्याविरुद्ध लिहिलं). बाकी सगळ्यांनी अत्याचार केले. रोहितचं एक गाणं आवडलं, कैवल्यचं पण एक आवडलं, बाकी नाही. त्या ज्युईलीनेतर फारच असह्य अत्याचार केले. जाऊदे मी मग जास्त लक्ष न देता भाजी निवडत बसले. स्टार प्रवाहवर भातुकली चित्रपट बघायला हवा होता की काय असं वाटलं. दुपारी तो थोडा बघितला बरा वाटला. असो माजघराच्या प्रेमापोटी आणि डोंबिवलीत झाला म्हणून बघितला प्रोग्रॅम.
रश्मी हो, श्रुती भावेचे वायोलिन वादन छान झालं.
अगं अंज्तैअ, म्हणजे अपटू मारक
अगं अंज्तैअ, म्हणजे अपटू मारक न गायलेल्यांना माफ करून टाका असं मी (बाकीच्यांना) सांगतेय.
मंजू, थँक्स
आता वाचते.
रश्मी हा खास दिदोदु चा शेवटचा एपिसोड म्हणून कॉन्सर्ट नाही दाखवला. तो त्यांचा कॉमन नेहमीचा प्रत्येक कॉलेजात(फक्त गावाचं नाव बदलून) सादर केला जबदलून)कॉन्सर्ट आहे आणि इतर वेळेला मस्तच होतो तो. काल सगळ्यांचेच आवाज गेल्याने आणि आपण टिव्हीवर बघत असल्यामुळे आपल्याला तृटी जाणवल्या.
त्या तिथल्या लाईव्ह पब्लिकला नेहमीच ऑसम वाटतो हा कॉन्सर्ट
स्वानंदीने ते एक सायबु गाणं
स्वानंदीने ते एक सायबु गाणं गायलं (नैनोको धीरे धीरे असं काहीतरी होतं), मला आवडलं. ह्या गाण्याचे नीट बोल मला आठवत नाहीयेत. हे मी पहिल्यांदा ऐकलं. ही पोस्ट kally ह्यांच्यासाठी.
स्वानंदीने ओरे मनवा तू तो
स्वानंदीने
ओरे मनवा तू तो बावरा है ( वेक अप सिद )
फिर ले आया दिल मजबूर क्या कीजे ( बर्फी )
ही दोन गाणीही गायली होती .
रीया, अग माहीती आहे ते. कारण
रीया, अग माहीती आहे ते. कारण मला वाटत मागे नासिक मग औरन्गाबाद की डोम्बिवली अशा शहरान्मध्ये त्यानी कार्यक्रम केले आहेत. शेवटचा शनीवारचा एपिसोड मी पाहीला.
मनाली thanx, मला आठवतंच
मनाली thanx, मला आठवतंच नव्हती.
रश्मी बाकी ठिकाणचे प्रोग्रॅम कधी दाखवले. बहुतेक नाही दाखवलेत. हा एकच दाखवला आमच्या गावातला.
thanku thanku thanku anju n
thanku thanku thanku anju n manali
.
.
he barfi madhale gane mala
he barfi madhale gane mala faar aavadle ek tar tyachya lyrics mule n dusare mhanje tya performance madhalya kabir chya asnyamule
<<thanku thanku thanku anju n
<<thanku thanku thanku anju n manali>>
हे काय फक्त थॅंक्स ?

कमीत कमी एक गरम चहा तरी हवाच , ही गाणी आठवताना डोक्याला किती शीण झाला माझ्या .....;)
मनाली ते कोलावरी, कोलावरी डी
मनाली
ते कोलावरी, कोलावरी डी टाईप वाटले.
ghari ye,, chaha sobat
ghari ye,, chaha sobat biscuit Khari tos pan dete
लास्ट एपिसोड कुठे पाहता येईल
लास्ट एपिसोड कुठे पाहता येईल ?
http://www.zeemarathi.com/sho
http://www.zeemarathi.com/shows/dil-dosti-duniyadaari/video/dil-dosti-du...
क्षण हे सोनेरी आठवणी
क्षण हे सोनेरी आठवणी चंदेरी
जगणे सुंदर हे वेचुया चला
गाणे मैत्रीचे रंगीत नात्याचे
पडता मी सावरा चला
रडता मी आवरा मला
नसता तू दे होश साथिया
असता तू बेहोष साथिया
घडले ते विसरून जाऊया
स्वप्न नवी हि बिनधास पाहूया
चढू दे यारीची आगळी नशा
ढळला तोल तरी शोधूया दिशा
जीवास लाभली साथ हि तुझी
जगणे झाले जल्लोष साथिया
मला आवडलं, सापडलं म्हणून इथे टाकलं
nice mala Hi avdle pan
nice mala Hi avdle pan aikayala kuthun download karu sang
३डी रॉक कॉन्सर्ट लिंक देता
३डी रॉक कॉन्सर्ट लिंक देता का? online मिळत नाहीये...
रिया, मस्तच आहे.
रिया, मस्तच आहे.
मला शेवटचे काही भाग पहायचे
मला शेवटचे काही भाग पहायचे आहेत, मी मिसले ते... स्पेशली कबीरच लग्न झालयं हे मिनल कळत तो भाग... पण तू नळीवर ( युट्यूब) काही मिनिटांचेच भाग दिसत आहेत.. संपूर्ण, एकसलग भाग कुठे मिळतील पहायला??? लिंक वगैरे...?
http://www.zeemarathi.com/vid
http://www.zeemarathi.com/videos
Pages