फक्त डाळीच्या इडल्या

Submitted by माउ on 18 February, 2016 - 13:51

हल्लीच कार्बलेस डाएट सुरू केली आहे...दोन दिवस फळे खाल्ल्या नंतर एकेक भारतीय पदार्थ आठवू लागले आहेत..:)
ईडली-सांबार हा माझा फारच आवडीचा पदार्थ..त्याचे हे almost कार्बलेस वेरिएशन.. करायला अतिशय सोपे, तब्येतीस चांगले आणि चवीला मस्त!

साहित्य-
मूगडाळ- १ वाटी
उडदडाळ- १ वाटी
मेथीदाणे- १ चमचा

मूगडाळ आणि उडद डाळ मेथीदाण्यांसह १:१ प्रमाणात एकत्र भिजत घालावी. साधारण ४-६ तासांनी डाळ भिजल्यावर थोडेसे पाणी घालून मिक्सर मधून काढावी.

रात्रभर हे पीठ भिजत ठेवावे आणि सकाळी नाश्त्याला नेहमीप्रमाणेच मस्त ईडल्या कराव्यात किंवा गरम गरम दोसे करून दाण्याच्या चटणीसोबत खायला द्यावेत!

भरपेट आणि हेल्दी नाश्ता होतो!

* मेथीदाणे घालून चव अधिक वाढते
* तांदूळ नसल्यामुळे ईडली किंवा डोश्याची चव फारशी बदलत नाही..
* उडदडाळी मुळे पीठ मस्त फुलून येते..

अजून कार्बलेस रेसीपीज करून बघत आहे...:)

IMG_6766.JPG
स्त्रोत- इंटरनेट

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, फोटो छान आहे .. इडल्यांनां छान जाळी पडलेली दिसत आहे .. Happy

पण ह्याला कार्बलेस म्हणता येईल का? डाळीं मध्येही भरपूर कार्ब्ज् असतात (ना) ..

फोटो छान आहे. सध्या फक्त मुगडाळ एके मुगडाळ आहे पण उडीद्डाळीवर आले की करून पाहीन.

माऊ डाळी लेस कार्ब वगैरे काही नाही आहे. नुसतं गुगल केलंस कार्ब्ज इन बॉइल्ड लेन्टिल्स तर १ कप = ४० ग्रॅ. वगैरे. हे जनरलाइज्ड आहे पण तरी आकडा लेसकार्बच्या जवळ नाही आहे. फक्त डाळीमध्ये कार्ब्जसहित प्रोटीन असतं हा एक फायदा. बाकी तुझा डाएटिशियन तुला मार्गदर्शन करेलच. चेक करून तुला किती कार्ब्ज अलाऊड त्याप्रमाणे अ‍ॅडजस्ट कर. Happy

मस्त आहे. मूगडाळ असूनही पिवळसर न होता, रिनमध्ये धुतल्यागत शुभ्र आहे की!!!

तांदूळ चवीपेक्षाही कॉस्ट कंट्रोलसाठी घालत असावे. डाळीपेक्षा तांदूळ निम्म्याने (जवळपास) स्वस्त पडतो.

एक शंका - उडदाची डाळ मुगाला एकास एक घेऊन गार झालेल्या इडल्या दडदडीत नाही ना होणार?
(फोटॉत छान दिसतायत, आणि खाल्ल्यायत तुम्ही म्हणजे होत नसणार. पण माझे डोसे चिवट झाले चुकून उ दा जास्त झाली तेव्हा. म्हणू विचारून घेतेय. कृ गै न.)

मस्त आहे. मूगडाळ असूनही पिवळसर न होता, रिनमध्ये धुतल्यागत शुभ्र आहे की!!!>> हाहा!!

एक शंका - उडदाची डाळ मुगाला एकास एक घेऊन गार झालेल्या इडल्या दडदडीत नाही ना होणार?>>
माझ्या तरी नाही झाल्या...