दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालचा भाग जरा आधीच दाखवायला हवा होता का? मध्यंतरी एका भागात सुजय - कैवल्य चं वाजलं होतं ते पीयू येणार आणि तिला कोण आणणार यावरुनच ना... त्यानंतरचे काही भाग सोडून अचानक काल हा भाग मधेच आल्यासारखा वाटल. मात्र तसं वाटू नये म्हणून मीनल ने तिच्या प्रेमभंगाचा दाखला कैवल्य ला दिला खरा..

ह्या पियुला कोणता आजार झालाय? आणि असे काय आहे कि तिला अगदी घ्यायला जावे लागणार होते. आजार जर गम्भीर आहे तर ति पुण्यात का राहाते एकटी?अओ:

गुरुवारचा भागपण चांगला झाला, संपायला आली तशी सर्व एपिसोडस रंगत चाललेत, ह्या आठवड्यात बोअर नाही झाले. २० तारखेपर्यंत असेल ही सिरियल.

आजचा भाग पण कसला गोड होता यार! मस्त ... शेवटचे कैवल्य सुजयचे एक्सप्रेशन्स मस्त होते! संपणार तशी अजून रंगत चालली आहे ही सिरीयल!

संपणार तशी अजून रंगत चालली आहे ही सिरीयल!>> करेक्ट!
मला वाटतं संपणार म्हणून 'कधीतरी घेऊया' यासाठी ठेवलेले विषय आता एकामागोमाग एक घेत आहेत. आज अ‍ॅनाच्या डेटिंगबद्दल आहे काहीतरी.

पियू असलेला भाग कधी बकवास झाला आहे असं आठवत नाही >>> + १००

हे अगदीच खरं आहे, पियू किंवा कबीर असलेल्या बऱ्याच भागांचे पटकथा, संवाद मनस्विनी लता रविंद्र हिने लिहिलेले होते, आणि तिने लिहिलेले हे किंवा इतर कुठलेही भाग कधीच इतके बोरिंग झाले नाहीत Happy

संपणार तशी अजून रंगत चालली आहे ही सिरीयल! >>> अगदी अगदी !!

मीपण मिस करणार ह्या सिरीयलला. सध्या ही एकच सिरीयल आवडीने टीव्ही समोर बसून बघत होते. बाकी अशोका नवरा लावतो ती येता जाता बघते. बाकी नाही.

सध्या माजघर अकोल्यात पोचलंय. रेश्माच्या बहिणीच्या लग्नासाठी. राकेश-रेश्मा, आशु-निशा अश्या जोड्या बनून वावरताहेत. काल मीनल धडपडली, केके पाय चोळत असतो, हे पाहून रेश्माची आत्या मीनल-केके अशी जोडी स्वतःहून बनवून टाकते. तो "चोर" श्याम फोटो ग्राफर म्हणून येतो आणि आल्या आल्या सुजा ला राकेश भाऊजी अशी सगळ्यांसमोर हाक मारुन विकेट काढतो..
आगे क्या होगा, जानने के लिए देखीये मंगळवार का एपिसोड.. Happy

कैवल्य आणि मीनलचा फिल्मी सीन, त्यांना बघून आत्याचं गालात हसणं हे पाहून सुजय, आशूचं अनकंट्रोलेबल 'फु ट णं' सगळंच क्लासिक होतं. Lol फॉर अ चेंज, आवडली असती मीनल कैवल्य ची जोडी - माज अॅट इट्स पीक! Proud

खूप धन्यवाद मित.
वाचून असं वाटतयं की खूप धम्माल चालू असणार आहे. शेवटी रेवा चं लग्न दाखवताय तर एकदाचं.!
मला नाही ना जमणार आता ही मालिका पहायला. शेवटचे सर्व भाग मिसणार मी आता..
इथेच अपडेट वाचून समाधान मानेन आता.

हो हो मस्तच चालू आहे. मी मध्येच वेळ काढुन बघते. पण आत्ता खरतर रेग्युलर बघायला च पाहिजे अशा उंचीवर पोहोचलीय सिरियल.

३ डी काॅन्सर्ट २१ फेब ला संध्याकाळी ७ वा. झी वर लागणार आहे. Happy माझ्यासारख्या लाइव्ह पाहू न शकलेल्या इच्छुकांनी लाभ घ्यावा.

हो निधी डोंबिवलीत पण झाला concert पण फक्त college students साठी होता.

मला मीनल-सुजू जोडी आवडते. एकदा त्यांनी सीन केला होताना नवरा-बायको असल्याचा. परफेक्ट वाटलं.

चला ह्या शनिवारपर्यंत बघायची. मग Sad .

खरं म्हणजे कधी कधी वाटतं ह्यांच्या जोड्या आपापसात नको जुळायला. त्यांची मैत्रीच गोड वाटते.

अंजूतै +१
नाहीच जुळणार त्यांच्या जोड्या आणि नकोच जुळायला नाही तर मग पुन्हा एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हो सकते वगैरे गोष्टींना पुन्हा नव्याने अनूमोदन दिल्यासारखं

होना त्यांच्यातली मैत्री एवढ्या सुंदर रीतीने गुंफलीना की बास रे बास. सर्व टीमला hats off.

अगदी २ पिढ्या आधीचे लोक बघत असतील (जुन्या विचाराचे) नीट मालिका तरी त्यांच्यापण मनात नाही येणार की काय बाई मुलं आणि मुली एकत्र राहातायेत.

खरय.

बहुदा ही पहिलीच मालिका अशी असावी जी सुरू झाल्यापासून एखादं कोणीतरी एकदा कधी तरी बोअर होतंय म्हणून कुरकुरलं. बाकी कायमच मस्त राहिलीआणि आता संपतानाही का संपतेय असं वाटतंय

(साराभाई अपवाद ... ती तर कधीच बोअर नाही झाली)

रीया, अन्जू दोघींनाही +१ वरच्या पोस्टसाठी. Happy

concert पण फक्त college students साठी होता. >> हो ना. म्हणूनच मी पण मिसला आमच्याइथे होता तेव्हा.

ही सिरीयल मी तशी पहिले काही एपिसोडस पहिली नव्हती, साधारण महिनाभर. मग एक मैत्रीण म्हणाली, बघ छान आहे. बघायला सुरुवात केली आणि आवडली. सोमवारपासून रात्रीची साडेदहा वेळ चुटपूट लावणार.

कालच्या एपिसोडमधला मला सर्वात जास्त आवडलेला सीन म्हणजे, तो श्याम केतनला विडीओ शुटींग दाखवत Anaaबद्दल सांगतो तेव्हा आशुचे हाव-भाव, टू गुड. नंतर तिला protect करत मध्ये मध्ये डान्स करणं. सर्वात जास्त नेहेमी आशु आवडला. मग सुजय-मीनल. कधी कधी Ana आणि कैवल्य पण रेश्मा अजूनही नाही आवडत.

अन्जू, तुम्ही नक्की काय आणि किती पहाता हे कळतच नाही. सगळ्या बाफांवर सगळे अपडेट्स लिहिता आणि तरी म्हणता हे अजिबात आवडत नाही आणि मी काहीच पहात नाही.. Wink

Lol

पराग, सर्फिंग करते जास्त. डी ३ बघतेय हा. अशोका पण बघते (नवरा बघतो म्हणून), चला हवा येऊद्या बघते. अजून एक DD किसान वर सावित्रीबाई फुले आहे ती आठवड्यातून दोनदा बघते. बाकी नाही हो बघत. होणार सून, का रे दुरावा, माझे पती सौभाग्यवतीवर कुठे आहेत सिरीयल कथानक अपडेट्स माझे. पसंत आहे मुलगी, नांदा सौख्य भरे, अस्मिता पण नाही पाहत. ती कमला मागे एक दोनदा मध्ये लावली तर एक वर्षापूर्वी होती तिथेच अजून ती मालिका घुटमळते. माझ्याकडे पेशन्स नाहीत हो, मालिका सहन करायचे. हा ती मल्हार पण चालू असते घरात, पण मी नाही बघत. हुश्श रिव्ह्यू घेतला. होणार सुन शेवटचा एपि. थोडा बघितला होता.

हा ते मराठी न्यूज channel वर असतात सिरीयल संबधी प्रोग्रॅम्स ते बघते, त्यात कळतं. तिथे सांगतात कुठे काय चालू आहे. पेपरमध्ये कळतं. त्याबद्दल कधी लिहिते इथे तिथे. कारण हे वाचलेलं डोक्यात राहते लक्षात (नको ते Wink ). तशा मिळतील माझ्या पोस्टस सगळीकडे.

कालचा एपिसोड पण मस्त...शाम ला अ‍ॅना समजावत असते तेव्हा क्वीन आणि कॉकटेल चं उदाहरण देते
तेव्हा शाम प्रश्ण विचारतो की " रेश्मा दिपीका की कंगना ? "
त्याला आशु म्हणतो की दोन्ही नाही...कारण दोघी माझ्या बहिणी झालेल्या मला आवडणार नाही...भारी टायमिंग आहे आशु चे
मस्त होता तो सीन...फार फार हसले...

काल रेश्माचं काम फार छान झालं.
राकेश तिच्याजवळ येउन बसतो आणि ती गाण्यावर टाळ्यांचा ताल धरू पहाते तेव्हा आणि राकेश-निशा नाचत असतात तेव्हाचा तिचा अभिनय - फार छान. टचकन पाणी आलं डोळ्यात
फार वाईट वाटतंय मालिका संपणार म्हणून

राकेश-निशा नाचत असतात तेव्हाचा तिचा अभिनय - फार छान>>>+ १
तिला protect करत मध्ये मध्ये डान्स करणं>> +१
रेश्माचे बाबा घोड्यावरुन पडले वगैरे आशुच्या टेपा पण भारी होत्या.

धन्यवाद लोकहो. तुमच्या मुळे इथे वाचून फार बरं वाटतयं.
माझी खूप आवडती सिरीयल आहे ही.
आशू ,अॅना आॅल टाईम फेवरेट..नंतर सुजय अॅंड मिनल..
खूप वाईट वाटतयं ही मालिका बंद होतेय.आणि नेमके शेवटचे सर्व भाग नाही पाहता येणार जमेल तसं नंतर यू ट्यूब वर पाहीन.
पहिली मालिका आहे जी लवकर बंद होतेय आणि मनापासून वाटतयं की बंद होऊ नये. अन्यथा अशा कितीतरी मालिका बंद झाल्या तेव्हा कहीच वाटलं नाही.
ह्या मालिके ने निखळ मनोरंजन केलं,हसवलं,प्रसंगी रडवलं सुध्दा.
हुरहुर वाटतेय खूप.

Pages