गुरुत्वीय लहरी

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

१०० वर्षांपुर्वी आईनस्टाईनच्या साधारण सापेक्षतावादाच्या संकल्पनेनी वस्तुमानाच्या स्थित्यंतरामुळे निर्माण होणाऱ्या गुरुत्वीय लहरींचे भाकित केले होते. गेली काही वर्षे Laser Interferometer Gravitational-Wave Observatory (LIGO) या लहरिंच्या शोधामागे आहे. ११ तारखेला वॉशिंग्टन डि सीला खास भरवण्यात येत असलेल्या एका मोठ्या पत्रकार-परिषदेत गुरुत्वीय लहरीसंबंधीची नवी माहिती दिली जाणार आहे (10:30 AM Eastern Standard Time). आंतरजालावर याची Live feed उपलब्ध असेल. संपूर्ण वैज्ञानिक जगताचे लक्ष सध्या त्याकडे वेधले आहे. टेलेस्कोप्स वापरून Gravitational Wave Eventsचा पाठपुरावा करण्यात गेले काही महिने जगभरातील अनेक गट कार्यरत होते. या सर्व गटांवर गोपनियता Memorandum of Understandingद्वारे लादलेली असते. मी ही अशा काही गटांमध्ये आहे. गेले काही आठवडे आंतरजालावर फिरत असलेल्या अफवांबद्दल कोणी काही विचारलं तर उत्तर ठरलेलं असतं - We can neither confirm nor deny it. Caltech आणि MITने काही दशकांपूर्वी LIGOचा प्रस्ताव मांडला होता. IndIGOच्या रुपात भारतदेखील यात सहभागी आहे.

११ तारखेआधी अधिक माहिती येथे मिळवू शकता: https://www.ligo.caltech.edu/

प्रकार: 
शब्दखुणा: 

धन्यवाद माहितीबद्दल Happy
कुतुहल म्हणून विचारतोय, "सर्व गटांवर गोपनियता Memorandum of Understandingद्वारे लादलेली असते. मी ही अशा काही गटांमध्ये आहे. ">>> हे/इथे लिहिणे गोपनीयतेच्या कक्षेबाहेर आहे की आता असे निर्बंध नाहीत?

<<११ तारखेला वॉशिंग्टन डि सीला खास भरवण्यात येत असलेल्या एका मोठ्या पत्रकार-परिषदेत गुरुत्वीय लहरीसंबंधीची नवी माहिती दिली जाणार आहे (10:30 AM Eastern Standard Time). >>
-------- येथे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नक्की बघेन.

हा धागा पाहून आनंद झाला. मी BBC Knowledge Magazine Asia Magazine दर महिन्याला आवडीने वाचतो. ह्या महिन्यात Relativity on trial by Marcus Chown चा सचित्र आणि दीर्घ लेख वाचला. त्यातून ह्या विषयाबद्दल बरीच माहिती मिळाली. हा लेख इथे वाचू शकता : http://marcuschown.com/wp-content/uploads/2015/12/GR100.Focus_.pdf

ह्या मॅगझीनची फेसबुक लिंक इथे आहे: https://www.facebook.com/BBCKnowledgeMagAsia

बी, ती बातमी वेगळी - बायसेपबद्दलची - गुरुत्वीय लहरींचा अप्रत्यक्ष पुरावा मिळाल्याचा दावा करणारी

> गुरेत्व तरंग हे स्पेस-टाइम फॅब्रिकवरील लाटा का?

हो, पण ती अ॓नॉलॉजी तिथेच संपते. लाटा आपल्याला दोन माध्यमांमधील फरकामुळे दिसतात.
त्याऐवजी पोहतांना पाण्यातल्या पाण्यात जोरात पाउ मारल्यावर ज्या लाटा जाणवतात तसं हे जास्त आहे.

प्रेझेन्टेशन भारी.
अमेझिंग. स्पेस टाईम फॅब्रिक मधले कित्येक बिलियन वर्षांपूर्वीचे रिपल २ labs मध्ये शास्त्रज्ञांना दिसले..नाही.. ऐकूही आले. युनिवर्स इज टॉकिंग. ह्याच १०० वर्षांपूर्वी आईन्स्टाईनने प्रेडीक्ट केलेल्या gravitational waves.
अमेझिंग. caltech आणि एम आय टी आणि इतर सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन. आता स्पेस टाईम फॅब्रिक आणि रिपल फक्त फ्रिंज सिरीज मध्ये नाही, प्रत्यक्ष दिसेल Happy

खूप मस्त झाले कॉन्फरन्स. सगळे जण खूप छान बोलले आणि ज्या पद्धतीने हा विषय समजवून सांगितला ती पद्धत फार आवडली. सगळे काही सोपे करुन सांगितले. मजा आली. प्रेक्षकांमधे मी आशिषला शोधत होतो पण प्रत्येकांची फक्त पाठ दिसत होती.

Pages