गुरुत्वीय लहरी

Posted
2 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
2 वर्ष ago
Time to
read
1’

१०० वर्षांपुर्वी आईनस्टाईनच्या साधारण सापेक्षतावादाच्या संकल्पनेनी वस्तुमानाच्या स्थित्यंतरामुळे निर्माण होणाऱ्या गुरुत्वीय लहरींचे भाकित केले होते. गेली काही वर्षे Laser Interferometer Gravitational-Wave Observatory (LIGO) या लहरिंच्या शोधामागे आहे. ११ तारखेला वॉशिंग्टन डि सीला खास भरवण्यात येत असलेल्या एका मोठ्या पत्रकार-परिषदेत गुरुत्वीय लहरीसंबंधीची नवी माहिती दिली जाणार आहे (10:30 AM Eastern Standard Time). आंतरजालावर याची Live feed उपलब्ध असेल. संपूर्ण वैज्ञानिक जगताचे लक्ष सध्या त्याकडे वेधले आहे. टेलेस्कोप्स वापरून Gravitational Wave Eventsचा पाठपुरावा करण्यात गेले काही महिने जगभरातील अनेक गट कार्यरत होते. या सर्व गटांवर गोपनियता Memorandum of Understandingद्वारे लादलेली असते. मी ही अशा काही गटांमध्ये आहे. गेले काही आठवडे आंतरजालावर फिरत असलेल्या अफवांबद्दल कोणी काही विचारलं तर उत्तर ठरलेलं असतं - We can neither confirm nor deny it. Caltech आणि MITने काही दशकांपूर्वी LIGOचा प्रस्ताव मांडला होता. IndIGOच्या रुपात भारतदेखील यात सहभागी आहे.

११ तारखेआधी अधिक माहिती येथे मिळवू शकता: https://www.ligo.caltech.edu/

प्रकार: 
शब्दखुणा: 

यानंतर तरी LIGO India project ला गती मिळेल अशी आशा करायला हरकत नसावी.
गेली ३ वर्षे हा प्रोजेक्ट PMO office मध्येच रखडल्याचे ऐकुन आहे.

IUCCA, RRCAT - Inodre आणि IPR- Gandhinagar या संस्थांचा यात समावेश असणार आहे.

भारतात या प्रोजेक्ट साठी अद्याप स्थळ निश्चित झालेले नाही.

चिमण, या GW-only detection मध्ये माझा सहभाग नव्हता.
EM follow-up मध्ये आहे. ते detections पण पुढेमागे येतील.

Rai Weiss will give a colloquium about LIGO’s gravitational wave discovery at the National Science Foundation today, at 1PM Eastern Standard Time; 10AM California time. It will be streamed at

https://www.youtube.com/user/VideosatNSF/live

and afterward will presumably be archived on YouTube.

आशिष, अभिनंदन. तुला वेळ मिळेल तेव्हा सोप्या शब्दांत ग्रॅव्हिटी वेव्ह बद्दल लिहावंस अशी विनंती आहे.

काही प्रश्न आहेत - वेळ मिळेल तेव्हा उत्तरे दिलीत तरी चालतील -
१. सोर्स नक्की कसा केला ? ( उदा - एक-दोन बिलिअन प्रकाशवर्षे दूरवरचे कशावरून?) वेगवेगळ्या दिशेवरून येणार्या गुरुत्वीय लहरी एक्मेकाना निगेटही करत असतील?
२. कितीही सूक्श्म असेल तरी आधी हे डितेक्ट का झाले नाही? चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीवर येणार्या लाटा हे गुरुत्वीय लहरींचे प्रमाण होवु शकले असते का?

अजून काही प्रश्न आहेत. पण आधी वाचतो आणि मग विचारतो.

खुलासेवार नंतर लिहीन

वेगवेगळ्या वस्तुमानाच्या मर्जर्सच्या लाखो टेम्प्लेट्स त्यांच्याकडे होत्या. त्या वापरून छोट्य एररबारसहीत नेमकं वस्तुमान काढता येतं, अंतरपण.

अशा अनेक लहरी मिळून बॅक्ग्राऊंड सिग्नल तयार होऊ शकतो पण कृष्णविवरांचे असे मिलन त्यावरही उठून दिसेल. आधी असं काही दिसलं नाही कारण आपल्या डिटेक्टर्सची तितकी कुवत नव्हती. आता दिसलेलं स्ट्रेन १०^-२० आहे - म्हणजे एका प्रोटॉनच्या आकाराचा हजारावा भाग. तितकी किरकोळ हालचाल आपण मोजू शकलो आहोत.

पृथ्विवर येणार्‍या लाटा साध्याच ...

Pages