समुद्रकाठ - "इम्प्रेशनिस्ट स्टाईल" म्हणे!! :)

Submitted by maitreyee on 3 September, 2009 - 10:20

समुद्रकाठचा देखावा.
--आर्यक, वय १०

तसा आर्यक ला फार चित्रकलेचा षौक नाही . पण नुकतेच इम्प्रेशनिस्ट स्टाईल बद्दल समजलेय (की नुस्तं ऐकलंय?!), अन व्हॅन गॉफची चित्रं (फक्त)पाहिलीयत काही !! या आधारावर काढलेलं हे चित्र. त्याचं म्हणणं आहे की हा इम्प्रेशनिस्ट स्टाईल सनसेट आहे!! व्हॅन गॉफ ची चित्रं कळली कितपत ते नाही माहित पण नुकतीच पाहिल्याचा प्रभाव रंगाच्या वापरावर दिसतो आहे Happy

aryakpicgif.gif

माझी मदत - स्कॅन करून इमेज ला ती एक बारिक बॉर्डर टाकणे इतकीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे काय पिढी आहे ही. इमिटेशन मोने, इमिटेशन व्हॅन- ऐकत नाही राव.

जबरी प्रयत्न आहे. आर्यकला हे काढावेसे वाटले यातच काय ते आलं. Happy

छानच. मैत्रेयी, अग नुसतं गुगलकरून बघितस तरी किती साम्य दिसतय बघ स्टाईलमध्ये. मुलांकदून आपल्यालाही किती शिकायला मिळत.

रच्याकने, ते गो किंवा खाकरून गो (डच उच्चार).

फार फार देखणं चित्र!

वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षी हे निरिक्षण आणि अशी कलाकृती! मैत्रेयी, तुझं पिल्लु खूप बुध्दीमान आहे!

झकास!

!!!काय कलाकार मुलं आहेत!! अप्रतिम आलंय. .त्याची समज आणि प्रेझेंटेशन दोन्हीची दाद द्यावी तितकी कमी!

माझा अतिशय आवडता कलाकार.. त्याची स्टारी नाईट, व्हीटफिल्ड विथ क्रोज तर माझी प्रचंड आवडती चित्र आहेत..

>>रच्याकने, गॉग ना ?
त्याचा डच उच्चार तर पूर्ण वेगळा आहे. अ‍ॅमस्टरडॅममध्ये म्युझियम बघायला जायचं होतं तेव्हा व्हॅन गो विचारलं तर त्या माणसाला कळलंच नाही. मग शेवटी ते "फन ख्गो" आहे असं मला बजावून सांगून वदवून घेतलं त्यानी Happy

DJ च्या पोस्टवरून लक्षात आलं, सगळ्या मराठी वाचता न येणार्‍या पोरांच्या एन्ट्रीज वर मिंग्रजी किंवा इन्ग्रजीतून प्रतिक्रिया द्यायला हव्या होत्या आपण , त्यांना वाचता तरी आल्या असत्या!

Happy
>>हाहा खाली तो उंट आहे की साप कुणास ठाउक! विचारते त्याला
तळ्याची पार्श्वभूमी बघता, लॉकनेस मॉन्स्टरही असू शकेल. Proud Happy

Pages