ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ashwini:
अश्टम शुभ ग्रह अणि अशुभ अशी वर्गवारि करु नका please.

कुठलेही ग्रह अश्टम मध्ये असताना त्यान्च्य करकत्वाला न्युनत्व येते.

रवी ८ मध्ये : सरकार, सिनीयर्स, वडील विरुद्ध जातात. त्यान्चा पाठिम्बा मिळत नाही.
चन्द्र ८ मध्ये: पीयर्स, पाणि, आइ चा पाठिम्ब मिळत नाहि, mind (nirasha)
शनि : masses विरुद्ध जातात. वाज्पयी २००३/२००४ मध्ये हारले. अश्तम शनि व्रुश्चिकेला. मोदि कसाबसा निवदुन आले.
मन्गळ ८ : sports, driving, blood साठी वाइट.

८ वे स्थान म्य्तुत्यु स्थान पेक्शा म्र्युत्यु वेळची परिस्तिति सान्गते. ह्याचे जास्त समर्पक नाव "पीडा स्थान" आसे आहे. जे ग्रह ८ मध्ये असतात त्यन्च्या करकत्वा प्रमाणे पीडा होते. ते ज्य स्थानाचे मालक आहेत त्याबाबतित थोडे लक्श द्यावे लागते.

पत्रिके मध्ये असतिल तर त्यान्ची अयुश्यभर काळजी घ्यावी लागते. गोचरी ने असतिल तर तेवढा काळ.

८ वा शनि चान्गला असतो एका गोश्टि साथि म्हणजे ७ व्या स्थानसाठी! Happy ७ वे स्थान सुटते त्याच्या पासुन!! Happy

अश्विनी, मिलिंद, लिंबू, मला कळले नाही. अष्टम मृत्युस्थान म्हणजे काय? कुंभ राशीचे करोडो लोक जगात आहेत. त्यामुळे मृत्यूस्थान म्हणजे नेमके काय? तसेच सातवे स्थान कशाचे?

(मला फार वाईट वाटते माझे वडील इतके छान भविष्य बघत असताना मी बेसिक तरी का नाहे शिकले? माझे प्रश्न ऐकून तुम्ही सगळे जाणकार लोक जाम हसत असाल.)

हेच्या हातावर काहीतरी सोडा म्हंजी आत सोडल. >> Lol
नशिब आमच, "ह्येच्या नरड्यात काहीतरी सोडा" अस नाही सुचवलत >> Lol Lol Lol
लिंबु भाउ, तुमचे शनीविषयीचे विवेचन अतिशय पटले... धन्यवाद त्याबद्दल.

सातवे स्थान कशाचे >> सातवे स्थान हे आयुष्याचा जोडीदार, धंदा- व्यवसायातील भागीदार यांच्याशी संबधित असते... तसेच ८ व्या स्थानाचे व्यय स्थान ही होइल (म्हणजे ८ वे स्थानापासून पत्रिका सुरु केली तर ७ वे स्थान बारावे येते)..

माझ्या महितीप्रमाणे जर ६,८,१२ स्थानामधे राहु,केतू,शनी सारखे ग्रह असतील तर ते कधी-कधी चांगली फळ देतात. उदाहरणार्थ.. ६ वे स्थान हे रिपु-शत्रु स्थान असते आणि त्यामधील राहू असेल तर ती व्यक्ती शत्रूंवर प्रभुत्व गाजवते... याबाबत काही अजून माहीती सांगता येइल का ?

अश्विनी,
मी व्याधी/विकार अन रोग यात फरक केला आहे
ज्या व्याधी- जे विकार आयुष्यभराकरता शरिरास चिकटून रहातात, जसे की दमा, मूळव्याध, सान्धेदुखी, अर्धशीशी, (काही बाबतीत कुष्ठरोग), गुप्तरोग इत्यादी, याबाबत मूळ कुन्डलीतील अष्टमस्थानच्या स्थितीवरुन कळते.

रोग म्हणजे ते की जे रोगजन्तू, बाह्य सन्सर्गामुळे होतात जसे की ताप, गोवर, कान्जिण्या व अन्य अनेक तत्कालिक आजार (पण ज्यावर उपाययोजना असू शकते) तसेच आघात, घात्/अपघात, ऑपरेशन्स, जखमा इत्यादी अनेक, असे षष्ठ स्थानावरुन कळू शकतात. याच स्थानावरुन छुपे/उघड शत्रू देखिल बघता येऊ शकतात.

"देवी" हा रोग त्याकाळी कोणत्या एका स्थानावरुन बघितला जायचा की या दोन्ही स्थानान्चा सन्दर्भ घेतला जायचा, हे मला माहीत नाही! पण माझ्या मते, देवी आल्या, ताप भरला, फोड आले, फुटले, नन्तर माणूस बराही झाला, इथवर षष्ठस्थान कार्यरत राहू शकते, मात्र देवीचे वण आयुष्यभराकरता वागवायला लागणे, त्या फोडान्मुळे दृष्टी वा इतर बाबतीत कायमस्वरुपी अपन्गत्व येणे जे आयुष्यभर वागवायला लागते, ते मात्र अष्टमस्थानाशी सम्बन्धित योगान्शी निगडित असते.
मला वाटते की या वरिल देवी रोगाच्या उदाहरणावरून ही सन्कल्पना थोडी स्पष्ट व्हावी.
वि.सू.: वरील विवेचन हे कुन्डलीतील मूळ ग्रहस्थितिस अनुलक्षून केले आहे! येथे ग्रहान्चे गोचर भ्रमण व राशीन्चा "अर्धवट" सम्बन्ध लावणे अपेक्षित नाही!

या व्यतिरिक्त, वर मिलिन्दरावान्नी "अष्टमस्थानाबाबत" नेमके विवेचन केले आहे

कृपया एक लक्षात घ्या, येथिल वाक्ये/शब्दप्रयोग, कथा कादम्बरी वाचल्याप्रमाणे वर वर वाचायच्या बाबी नव्हेत. तसेच, हे वाचून लगेच कुणी आपापली व अन्य कुणाची कुन्डली घेऊन त्यात बघुन घाईघाईत काहीएक नि:ष्कर्षास येवू नये! तसे कुणास करता येऊ नये म्हणूनच विशिष्ट मर्यादेबाहेर, याविषयावरील चर्चा जाहिर फोरमवर करण्यात येत नाही! येथेही केली जाईल असे वाटत नाही.

वरचे सगळे विवेचन वाचुन माहिती तर मिळाली, पण आता आपल्या पत्रिकेत कोण कुठे कसा आहे, कोणावर कसली दृष्टी ठेऊन आहे हे कसे ओळखायचे?

रेसिपीत काय काय असले, म्हणजे काय काय चव मिळते हे कळले, पण आपल्या वाट्याच्या रेसिपीत त्यापैकी कोणकोणते घटक वरच्याने टाकलेत आणि त्यामुळे आपला पदार्थ कसा बनतोय ते कळणार कसे? Happy आणि हे जर कळले तर आपण कदाचित त्यात थोडे बदलही करू शकतो????????

माझे पोस्टल्यावर लिम्बुंचे पोस्ट वाचले.......
पण तरीही उत्सुकता वाटतेच ना.. निदान आपल्या पत्रिकेत कुठे काय आहे ते कळण्याची..

(मिलिंदंने माझ्या पत्रिकेच्या उत्तरात काय लिहिलेय ते परत एकदा वाचते.. ते कोण कुठे आहे ते सगळे अगदी डोक्यावरुन जाते... Happy )

माझ्या मुली ला काळसर्प योग आहे. तीची जन्म वेळ: पहाटे २.३० मि. तारिख: २२/११/२००८ जन्मस्थळ: खामगाव जि. बुलढाणा.
त्यासाठी कुठला उपाय करावा लागेल? पुढच आयुष्य कस असेल? प्लीज, मला उत्तर द्याल का?

नमस्कार,
मी या ग्रूप मधे नुकताच सामिल झालो आहे. मला माझी जन्मवेळ बरोबर आहे का या विषयी मार्गदर्शन कोण करेल काय ?
नावः अमोल केळकर
जन्म दिनांक : ०२/०२/१९७६
गाव : सांगली
वेळ : २१.१३ ( ही वेळ बरोबर आहे की नाही हे पाहिजे आहे )

धन्यवाद
आपला
अमोल केळकर
-------------------------------------------------------------------------
टॅरो कार्ड विषयी माहिती माझ्या या ब्लॉगवर पाहू शकता

>>कृपया एक लक्षात घ्या, येथिल वाक्ये/शब्दप्रयोग, कथा कादम्बरी वाचल्याप्रमाणे वर वर वाचायच्या बाबी नव्हेत. तसेच, हे वाचून लगेच कुणी आपापली व अन्य कुणाची कुन्डली घेऊन त्यात बघुन घाईघाईत काहीएक नि:ष्कर्षास येवू नये! तसे कुणास करता येऊ नये म्हणूनच विशिष्ट मर्यादेबाहेर, याविषयावरील चर्चा जाहिर फोरमवर करण्यात येत नाही! येथेही केली जाईल असे वाटत नाही.<<

फारच छान बोललात लिम्बु भावु तुम्ही. ज्योतिश बद्दल काही लिहिले की त्या अर्थाच्या मागचा अर्थ लावला पाहीजे. नुस्ता वरवरचा अर्थ घेतला तर फार नोठी फसवणुक (actually चुकीची दिशा) होवु शकते. प्रत्येक वाक्याच्या मागची अनुभुतिच फक्त तुम्हाला खरा ज्योतिशि बनवु शकते.

प्रेम ह्या विशयावर ३ तास व्यख्यान झाडले पण actually प्रेमात पडुन त्याची अनुभुती घेतलिच नाही तर कसे होइल तसे.

ज्योतिशा मध्ये गुरु ची द्रुश्टी अतिशय "गेमाड" असते. सगळे equations उलटवुन लावते. तेनव्हा आमच्या वाक्यान्चा अर्थ स्वताहाच्या पत्रिकेशी लावु नये directly.

मिलिंद, लिंबू, अश्विनी,
धन्यवाद. बरीच माहिती मिळाली.
लिंबूभाऊ, तुम्ही सगळ्या ज्योतिष्यविषयक पोस्ट्सला असे डिस्क्लेमर का लावता हो? Happy

अच्छा लिंबू म्हणजे तुम्ही व्याधींच्या अवस्थेनुसार फरक केला आहे. तात्कालिक व्याधी (अ‍ॅक्युट डिसिजेस) आणि चिरकालीन व्याधी (क्रॉनिक डिसिजेस) असं म्हणायचं होतं तुम्हाला. ते ठीक वाटतय. रोग आणि विकार म्हंटल्यावर जरा गोधळ झाला कारण वैद्यकीय दृष्ट्या रोग आणि विकार असा भेदभाव नाही. काही विकार तात्कालिक असतात तर काही चिरकालीन, काही दोन्ही असू शकतात.

बाकी षष्ठस्थानात पापग्रह असले तर शत्रूंवर विजय मिळतो असे माझेही मत आहे.

अश्विनी, तसेच काहीसे Happy
पण याबाबत अजुनही एक सुचते आहे... लागू होतय का पाहू
षष्ठ स्थानातून मिळणारे परिणाम बव्हंशी, व्यक्तिच्या स्वतःच्या षडरिपुन्च्या कारकत्वाने उद्भवतात, असे मानावयास बरीच जागा आहे. सहाव्वे स्थान ते रिपु स्थान असेही म्हणले जाते, बाह्य रिपुन्बरोबरच, व्यक्तिगत षडरिपुन्चा देखिल येथे तत्कालिक सम्बन्ध येत नसावा ना?
विचारान्च्या/रागाच्या तन्द्रित गाडी चालवुन अपघात होणे, सुरीने कापणे, जीभेच्या चोचल्यापोटी खाण्यावरील अनियन्त्रणातुन निरनिराळे आजार उद्भविणे, इतकेच काय बोलता बोलता वा घास खाताना दाताखाली जीभ चावली जाणे वगैरे अनेकानेक लहानमोठी उदाहरणे मिळू शकतील.
याचेउलट, प्राक्तन व प्रारब्ध, याचेतून सन्चयित फलानुसार मिळणार्‍या व्याधी-उपाधी तर अष्टमाशी निगडीत असत नाहीत ना?
मी हे प्रश्न विचारार्थ ठेवले आहेत, याबाबत अजुन मीच नेमक्या सूत्रापर्यन्त पोहोचलो नाहीये!
शिवाय, प्राक्तन अन प्रारब्ध याचा अर्थ लावताना माझा थोडा गोन्धळ होतोय! त्याबाबत जरा उलगडून सान्गितले गेले तर बरे होईल. Happy

>>>>> लिंबूभाऊ, तुम्ही सगळ्या ज्योतिष्यविषयक पोस्ट्सला असे डिस्क्लेमर का लावता हो?
सुपरमॉम, लिखाणातील एखाद्या वाक्य/शब्दरचनेमुळे कायद्याच्या कचाट्यात सापडू नये, वा कुणाला त्याचे निमित्त करुन वाकड्यात शिरता येऊ नये म्हणून ते द्यावेच लागते. शिवाय, याच कारणाने जी तपशीलाची लिमिट, हस्तसामुद्रिकादी ज्योतिषविषयक पुस्तकातूनही पाळली जाते, ती कळतनकळत ओलान्डलेली असल्यास, वाचकाचे हिताकरता ह्या सूचना आवश्यक ठरतात!
याव्यतिरिक्त, अर्धवट्/अपुर्‍या माहितीवरून अपुरा अर्थ लावून, वाचकान्ना चुकीची दिशा मिळू नये हा देखिल उद्देश असतो. एका विशिष्ट पातळीनन्तरची अमर्याद माहिती ही "शेड्युल एच ड्रग्ज" सारखी अस्ते, डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेणे दूरचे, ती ड्रग्ज डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय विकतही मिळत नाहीत!
असो.

मिलिन्दराव, गुरू बद्दल सहमत! Happy
गुरुचे नेमके कारकत्व जर ज्योतिषाला नेमके अवगत नसेल, तर कुन्डलीतील गुरू वरुन वर वर बान्धलेले आडाखे चूकीचेच निघू शकतात. वर शनी कसे कार्य करतो याचे थोडेबहुत विश्लेषण केले आहे, पण गुरू बाबत असे करायचे तर वरच्या दुप्पट होईल, अन तरीही ते अपुरेच वाटेल.

अखी, कालसर्प नामक असा काही योग नसतो असे महाराष्ट्रातील प्रमुख ज्योतिर्विदान्चे मत आहे! या बद्दल ते देत असलेले दाखले पटतात. पण याबाबत माझे अजुनही पूर्ण समाधान झालेले नसल्याने, याबाबत मला काही एक भाष्य करणे अवघड आहे Happy
तुमची मुलगी आत्ताशीक कुठे वर्षाची होते आहे, तेव्हा शक्यतो, (तशीच गम्भिर अडचणीची परिस्थिती नसताना,) ज्योतिष वगैरेच्या नादी लागू नये असे मला वाटते! Happy त्यातुनही, मिलिन्दरावान्नी, ढोबळमानाने काही एक सान्गतले तर उत्तमच!

बाकी, लहान बाळासन्दर्भात, घरातील ज्येष्ठ स्त्रीया, अन्गरोगाव्यतिरिक्त बाबीन्वरती, रुढी-परम्परेप्रमाणे योग्य ते उपाय करतातच, तिथे ज्योतिषाचे काही काम नाही! Happy अन्गारेधुपार्‍यान्ना नावे ठेवली जातात, पण योग्य मार्गदर्शनाखाली ते केले असता बराच उपयोग होतो. Happy

>>>> वेळ : २१.१३ ( ही वेळ बरोबर आहे की नाही हे पाहिजे आहे )
अमोल, वर दिलेल्या माहितीवरून कुन्डली जरी बनवली, तरी तुमच्या केवळ "चालू" नावावरून, कुन्डलीशी कशाचा ताळमेळ घालावा म्हणजे ती बरोबर की चूक ते कळेल? अगदी प्रश्न कुन्डली मान्डली तरी ते अशक्य. तसे "शॉर्टकट" मारणे योग्य ही नव्हे!
सबब, तुमच्या आयुष्यातील आत्यन्तिक महत्वाच्या घटना, बदल, शिक्षण, आई-वडील व भावण्डान्ची माहिती असे काही क्ल्यु मिळाल्यासच दिलेल्या माहिती वरुन बनविलेल्या कुन्डलिशी ते ताडून बघता येऊन वेळेबाबत काही एक निष्कर्ष काढता येईल. अन्यथा, केवळ वर दिलेल्या माहितीवरुन एक कुन्डली बनेल, वेळ बरोबर की चूक हे कळणे (माझ्या लेव्हलच्या ज्योतिषास) सर्वथैव अशक्य!
किन्वा, बनलेल्या कुन्डलीवरून काही एक आडाखे धरुन तसे सूचक प्रश्न तुम्हास विचारुन तुमच्याकडूनच प्रत्यक्षात खरे काय ते तपासुन घ्यावे लागेल, पण हा लाम्बचा मार्ग मला प्रशस्त वाटत नाही! (किम्बहूना, हे म्हणजे, आम्ही अमक्या इतक्या कुन्डल्या देतो, सान्गा त्यातिल कोण मतिमन्द्/कोण हुषार/कोण व्यसनी, अशासारख्या "आव्हान्नासमानही" वाटते Proud जी आव्हाने पेलायची माझी तरी इच्छा नाही!)
तर, शक्य असल्यास, वेळेबाबत घरातील जुन्या जाणत्यान्कडून पुन्हा एकदा खात्री करुन घ्या, तुम्हास वेळेबाबत शन्का नेमकी का येते आहे ते जरा तपशीलात सान्गा, तरी देखिल काम होऊन जाईल Happy

अमोल, लिंबुंचे म्हणणे अगदी बरोबर आहे, तुम्हाला वेळ पडताळून पहायचा अजुन एक मार्ग म्हणजे अगस्ती नाडी केंद्र जे पुण्यात आहे. (हे थोडे विषयांतर आहे ) तिथे तुमच्या ताडपत्री वरुन भविष्य सांगतात..त्यासाठी जन्मतारिख लागते फक्त. पण त्या ताडपत्रीवर तुमची जन्मवेळ आणि पत्रिका पण असते.

http://naadiguruonweb.org/index.html

मिलींदजी/ लिंब्याभाऊ, माझ्या मुलाची माहिती देत आहे
वेळ- दुपारी १.५९
स्थान- सोलापूर
तारिख- २३/१२/२००६
एकंदरीत कल,स्वभाव,शिक्षण,प्रकृती याबद्द्ल प्लीज सांगा.
माझी व पत्नीची जन्मतारिख १४ तर मुलाची २३,बेरीज ५ येते.या संख्येचे काय विशेष आहे?
ही विचारणा मी या बीबीवर ६ व्यांदा आणि शेवटची करीत आहे. धन्यवाद!!!

अमोल, तुम्ही माबोवर फारच नविन दिसताय. Proud तुमच्या profile मधे विचारपूस असा section आहे. तिथे मी message टाकला आहे. असो

ह्या पुस्तकात पुण्याचे पत्ते आहेत. http://www.scribd.com/doc/9915903/-

अमोल केळकर:
तुमचा फोटॉ जर मला पठावला किन्वा मला तुम्ही तुमचे ओर्कुत प्रोफैल (snaps) सान्गितले तर मला तुमची लग्न-राशी guess करता येइल अणि तुमचा जन्मवेळेचा 2 तासाचा period ठरवता येइल. (Can't say for sure, this is a possibility).

akhi:
पत्रिका बघु शकतोच पण तुम्ही माझा काळसर्प योगाचा blog वाचा. http://AstroMNC.Blogspot.com

तुम्हाला तुमच्या प्रश्नान्ची उत्तरे मिळतिलच अणि हनुमान साधना करुन बाळाची काल़जी पण घेता येइल. बाळाला दर्रोज राम्-रक्शा अणि हनुमान स्तोत्र ऐकवले की खुपच फायदा होइल. (काळसर्प असला तर गरज आहे पण नसला तरीही लहान मुलासाठि हे खुपच छान आहे).

आगावु:
साहेब, माफ करा हो. माझ्या blog सध्या आणि office मध्यल्या अशक्य अश्या workload मुळे मला सध्या फक्त २-३ mails बघायला सन्धी मिळते. तुमची query ही एक "good to have" सदरा खालिल असल्यामुळे बघणे झाले नसावे आजुन.

मी एक पुर्ण blog टाकायच्या विचारात आहे ह्य ५, १४, २३ वर्...काम अर्धे झाले आहे.

पण तुमच्या मुलीची पत्रिका नक्कि बघतोच उद्या पर्यन्त. २३ अणि धनु रवी :: expression, ललित कला, लेखन, भाशण, वाद्-विवाद साठी फारच छान आहे २३ - dec हि date.

~मिलिन्द
http://AstroMNC.Blogspot.com
Milind.Chitambar@gmail.com

मला अजुन एक गोश्ट लक्शात आली म्हण्जे की मि "माझा blog" असे म्हणायचो तेन्व्हा मला खर म्हणजे "माझा post" असे म्हणायचे असायचे..पण "माझा blog" असे लिहिल्यमुळे public अजुनच चिडायचे.. Happy मला कळायचे नाही की त्यन्ना असे का वाटते कि --> हा BB माझा आहे असे मला वाटते! Happy

Communicaiton gap ला मराठित exactly काय म्हणायचे? Happy

~मिलिन्द

Pages