ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rmk:
मला बघावे लागेल, पुस्तक वाचतान्ना मला जी मिळाली त्याची बेरीज ७ होत्ति, पण ह्य नव्या महिती नुसार सुद्धा बेरिज ९ असेल तरीहि charity, spirtuality शी सम्बन्ध येतोच ९ च्या life path चा.

On second thoughts: ह्या अत्मचरित्रामध्ये त्याना बर्याच वेळा राग आल्याचे लिहिले आहे/ तेन्व्हा पुर्ण बेरीज ९ असण्याची मोठि शक्यता आहे! Happy

I will check on this. As b-date is 5 which is the same as my memory. I guess I might be wrong about 7 as total addition.

मला वाटते योगानन्द ह्यान्चे पस्थान ७ तारखेलाच झाले?

कहीतरि असेच (miscellaneous):
मध्यन्तरी ह्या BB ला 1 प्रश्ण होता -- खरा ज्योतिशी कसा ओळखावा अणि ज्योतिशावर विश्वास आहे का? ह्या विशयावरची माझी मते मी आज/उद्या ताकेन इथे.

ता.क. माझा gravity वर विश्वास नाहिये पण मी उडी मारली कि खालिच पडतो! Happy विश्वास नाहिये म्हणुन वरती नाही जात!

मराठि मध्ये लिहिले की अक्शर चान्गले येते ! Happy

admin/webmaster साहेबः तुम्ही जर हा BB परत सगळ्ञन्च्सठि open केला तर अम्ही नीट वागु! Happy पण ती तमची मर्जी/अधिकार आहे (your decision/prerogative).

ज्योतिषी कसा असतो, याचे (मला भावलेले) दोन प्रकार मी "उडवल्या गेलेल्या" पोस्ट मधे मान्डले होते
एक गणिती व अभ्यासू ज्योतिषी जो गृहितके/बुद्धि/तर्क/गणित/शास्त्र याला आधार धरूनच पूर्वानुमान व्यक्त करतो
तर दुसरा, निव्वळ विशिष्ट ग्रहयोगान्मुळे, भविष्यवर्तविण्यासदृष काही जन्मजात उपजत शक्ति घेऊन आलेला (ज्याचे योग कुन्डलीत अत्यन्त स्पष्टपणे दिसतात)!
मिलिन्दराव, तुम्ही करणार असलेल्या विवेचनात वरील दोन प्रकारान्मधे कसे कसे ग्रहयोग असू शकतात ते देखिल सान्गाल का?

ज्योतिशी:
(१) नेपच्युन प्रधान ज्योतिशी हे intuition ने जास्त काम करतात. ७ चा जन्म अनि पुर्ण बेरिज ७ अणि नेपच्युन चन्द्र युति असेल तर बघायलाच नको. अर्थात त्यान्ना चान्गले तर्क येत असतिल तर चान्गलेच असते. ह्यान्चे बरेच ग्रह मोक्श त्रिकोणात असतात. (४ - ८ - १२ स्थाने).

५ वे स्थान म्हत्वाचे आहे : logic building बुध महत्वाचा आहे ३, ५, ११ मध्ये उपयोगि होतो ज्योतिशाला. रवी सुद्ध जर ५ ९ मध्ये असेल तर मस्तच.

>>ता.क. माझा gavity वर विश्वास नाहिये पण मी उडी मारली कि खालिच पडतो!
इथे gavity हे चुकिचे स्पेलिंग लिहिण्यापेक्षा गुरुत्वाकर्षण हा मराठी शब्द लिहिला असता तर मजा आली असती.

नेपच्युन प्रधान ज्योतिशी हे intuition ने जास्त काम करतात >> हे पटले.. पण मला असे वाटते कि ज्योतिषी होण्यासाठीच नेपच्यून हा प्रबळ असणे आवश्यकच आहे.. त्याजोडीला बुध चांगला असेल तर भविष्यकथन करण्यात त्यांचा हातखंडा असतो.. नुसते ज्योतिष कळणे आणि ते योग्य रीतिने सांगता येणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत...

पण काहीवेळेला बर्‍याच लोकाना सूचक स्वप्ने पडतात.. भविष्यातील गोष्टी आधीच समजतात.. त्यांच्या पत्रिकेत गुरु - नेपच्यून -चंद्र यांचे शुभयोग असतात.. साधारणतः ३,९,५ स्थानाशी निगडित..

मिलिंद, कुंभ राशीला शनी अष्टमात येतोय असे काही ठिकाणी वाचले. अडीच वर्षे जपून राहा वगैरे वगैरे.

म्हणजे नेमके काय? कुंभेचा राशीस्वामी शनी असूनही त्रास देतो का?

>>>> नुसते ज्योतिष कळणे आणि ते योग्य रीतिने सांगता येणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत...
अगदी बरोबर केदार Happy सान्गता येणे ही स्वतन्त्र "कला" वा "कौशल्य" आहे
मिलिन्दराव, इन्ट्युशनचे (अन्तःप्रेरणा वा अन्तर्ज्ञान?) ग्रहयोग पटतात/जाणवतात Happy
(किम्बहुना मीच त्याच योगातील असल्याने, पण माझे सगळे ज्योतिषी मित्र मात्र जाणकार, अभ्यासू, हुषार असल्याने यातिल फरक आम्हांस तीव्रतेने जाणवायचा! माझ्याबाबतित चन्द्र प्रथमात, चन्द्र नेपच्युन नवपन्चम, रवि बुध शुक्र नेपच्युन पन्चमात, गुरु नवमात अशी भन्नाट स्थिती आहे, तर जातकास हवेत उडवू पहात असलेल्या या स्थितीस जमिनीवर आणायचे काम, अष्टमातील शनि, केतू व द्वितियातील मन्गळ राहू, इमाने इतबारे करत अस्तात Proud असो.)
बुद्धी वा तर्कास बुध ग्रह चान्गला ना, पण तो अस्ती नसावा/वक्रि नसावा असे काही आहे का? तसेच, तो रवीच्या पुढे वा मागे असणे यानेही फरक पडतो ना?

बाकि सर्व ग्रहयोग कितीही चान्गले असले तरी एकमेव चन्द्र जरी बिघडलेला असेल तर सगळेच पाण्यात जाते! इतर कोणते ग्रह बिघडले तरि त्यान्चे परिणाम दीर्घकालात मोजक्या घटनात दिसून येतात. चन्द्राच्या तुलनेत घटनान्ची वारंवारिता, पुन्हःपुन्हा होण्याच्या सन्धि कमि असतात. यामुळेच हिन्दू पद्धतीत चन्द्रराशी प्रधान मानून गोचरीचे भ्रमणावरून ज्योतिष वर्तवतात का? की यास काही अन्य कारणेही आहेत?

काहीवेळेला बर्‍याच लोकाना सूचक स्वप्ने पडतात.. भविष्यातील गोष्टी आधीच समजतात..
>> हे माझ्या बाबतीत नक्कीच होते. खास करून माझ्या लहान भावाला आणि वडिलाना काही धोका असेल तर मला स्वप्नात दिसतेच.

नन्दिनी, (पुरावे अर्थातच मागणार नाही, Wink पण) एखादे ठोस उदाहरण शब्दात व्यक्त करता येईल का?
केवळ भाऊ (त्रुतिय स्थान) व वडील (दशमस्थान) यान्चे बद्दल दिसत असेल तर लग्न कुन्डली व चन्द्र कुन्डली यातिल या स्थानान्चा/भावेशान्चा अन चन्द्राचा सम्बन्ध अभ्यासला पाहिजे! विशिष्ठ व्यक्तीबाबतच (जास्तकरुन) कळणे, ही एक विचारान्ना वेगळीच दिशा आहे. Happy अभ्यास केला पाहिजे याचा
भविष्यात कधीतरी बघितलीजाणारी ठिकाणे/घटना स्वप्नात आधीच दिसणे याचि असन्ख्य उदाहरणे सामान्य लोकान्नी देखिल अनुभवलेली अस्तात! मी देखिल यास अपवाद नाही!

लिंब्या, चार वर्षापूर्वी वडलाचा अपघात झाला होता आणि त्याच्या मेंदूला मार लागलेला. त्यावेळेला आयसीयु मधे ते झोपलेले आणी बँडेज बांधलेले मला जसेच्या तसे स्वप्नात दिसले होते. दुसर्‍या दिवशी मी माझ्या रूममेट्सना स्वप्न सांगितले होते. मला स्वप्न पडले ११ जानेवरीला. अपघात झाला १५ जानेवारीला दुपारी साडेबाराला.

साडेसाती म्हणजे नक्की काय? या प्रश्नाची मला खूप वेगवेगळी उत्तरं मिळाली आहेत. तुम्ही नीट विश्लेषण करून सांगू शकाल काय? माझी पत्रिकेप्रमाणे रास कर्क आहे. माझी एक मैत्रिण सांगते की माझी साडेसाती १० सप्टेंबर ला संपतेय... म्हणजे नक्की काय? Uhoh

लिंबुभौ योग जबरदस्त आहेत... ते ग्रह कोणत्या राशीत आहेत ते पण महत्वाचे.. जसे नेपच्युन ग्रह जलराशीत असेल तर त्याचा परिणाम जास्त चांगला होतो...

नंदिनी Sad आपल्याला वाईट संकेतच दिसतात कि काही शुभ घटना पण सूचित होतात ? त्याचबरोबर बर्‍याच वेळेला काही ठराविक काळानंतर अशी स्वप्ने - संकेत जास्त पडणे चालू होते....याचे कारण काही विशिष्ट ग्रहांच्या दशा-अंतर्दशा त्यावेळी परिणाम करत असतात..आणि जेव्हा त्या दशा संपतात तसे ते संकेत मिळणे कमी पण होते..

ओह, नन्दिनी! धक्कादायकच, नाही?
सेम केस माझ्या बाबतीत थोरल्या भावाबद्दल झाली होती, अन मी तर ते स्वप्न प्रत्यक्ष भावालाच सान्गितले होते. त्यास स्कॅनिन्ग मशिनमधे आडवे फिरवताना तो कण्हत होता, अन मी वाकुन बघतोय असे दिसले होते, ते मशिन कसले आहे ते कळले नव्हते तेव्हा. पण प्रत्यक्षा दहा/बारा दिवसातच जेव्हा घटना घडली, तेव्हा माझ्या अन्गावर शहार उमटली होती!
अशा इतरही अनेक घटना आहेत! असो
आता वरील घटनेच्या अनुषन्गाने तुझी कुन्डली त्या योगान्करता बघितलीच पाहिजे, नाही का?
तू एक बरे केलेस, निदान रुममेट्स ना सान्गितलेस तरी, अन्यथा असे अनुभव सान्गणार्‍याला लोक वेड्यातच काढतात!

केदार, माझ्या अनुभव व माहितीनुसार, केवळ वाईटच सन्केत मिळतात असे नाही! शुभ सन्केतही मिळतात, प्रत्यक्ष मन्दिरे, मूर्ति, परिसर दिसतो... वगैरे वगैरे!
या वाईट वा शुभ सन्केतांच्या स्वप्नान्व्यतिरिक्त, भितीदायक स्वप्ने हा पूर्णतः वेगळा विषय आहे! दचकुन जाग येणे, झोपेत ओरडत उठणे वगैरे बाबी यातच मोडतात!
मात्र मला त्यात फारशी गती नाही की कोणत्या ग्रहयोगान्तर्गत असे होते!

दक्षिणा, साडेसातीबद्दल इथे आधी भरपुर लिहून झालय, तरीही, आता तुझा प्रश्न मात्र केदार्/मिलिन्दरावान्कडेच सोपवतो! Happy
(मी कलटी मारतोय)

लिंबु माझ्या माहितीनुसार या सर्वाचा कारक ग्रह हा नेपच्युनच आहे.. फक्त त्याचे इतर ग्रहाशी शुभ्-अशुभ योग त्या त्या पद्धतीने परिणाम करतात..

नेपच्युन चे कारकत्व गूढतेशी जास्त संबंधित आहे... त्यात मग सर्व प्रकार आले.. स्वप्ने, जादू-टोणा, वाचासिद्धी, ज्योतिष वैगेरे.. त्याचबरोबर काही वेळेला एखाद्या रोगाचे निदान होत नाही, किंवा निदान चूकते.. अश्या वेळी पण पत्रिकेत नेपच्युन बिघडलेला असतो

नेपच्युन बिघडला असेल तर वाइट स्वप्ने पडणे, झोपेत चालणे, भीती वाटणे, वेड लागणे इ प्रकार होतात..

तसेच त्याचे गुरु शी शुभयोग धार्मिक बाबतीत चांगले असतात.. बर्‍याच संत महापुरुषांच्या पत्रिकेत गुरु-नेपच्युन्-चंद्रा चे शुभ योग आहेत.. बुधाशी शुभयोग, वायुराशीतील शुभयोग वाचासिद्धी देतो.

दक्षिणा साडेसातीबद्दल मला असलेली माहिती याप्रमाणे..

प्रत्येक ग्रह बारा राशींमधे फिरत असतो... त्यात शनी ग्रहाला एका राशीत २.५ वर्षे असतो (तो जर मधे कुठे वक्री किंवा स्तंभित झाला नाही तर)

पण त्याचे परिणाम मात्र जेव्हा शनी आपल्या मागच्या राशीत प्रवेश करतो तेव्हापासूनच जाणवायला सुरुवात होते आणि जोपर्यंत तो पुढ्च्या राशीतले भ्रमण संपवत नाही.. तो पर्यंत ते जाणवतात असा समज आहे.. आणि हा संपूर्ण काळ ७.५ वर्षे असतो...म्हणजेच साडेसाती

तुला जे सांगितलेले आहे ते बरोबर आहे कारण सप्टेंबर मधे शनी कन्या राशीत प्रवेश करतोय..
म्हणजे कर्क राशीवाल्याना ... जेव्हा शनीने मिथुन राशीत प्रवेश केला तेव्हाच साडेसाती चालू झाली..
आणि आता कन्या राशीत प्रवेश केल्यावर ती पूर्णपणे संपेल.. सिंह राशीला अजुन २.५ वर्षे आहे, कन्या राशीला अजून ५ वर्षे, आणी तूळेला अजून पुढची ७.५ वर्षे..

मिलिंद, माझी जन्मतारखेची बेरीज ९ आणि पूर्ण बेरीज जर ७ येत असेल तर ह्याबाबत काय म्हणता येईल?

तुला जे सांगितलेले आहे ते बरोबर आहे कारण सप्टेंबर मधे शनी कन्या राशीत प्रवेश करतोय..
>>>> केदार , म्हणजे कन्या राशीला साडेसाती सुरु होणार का? आणि व्रुश्चिक राशीला साडेसाती कधीपासून सुरू होते ?

कन्या राशीची पहिली २.५ वर्षे झाली.. आता अजुन ५ वर्षे आहे.. वृश्चिक राशीला अजून २.५ वर्षानी साडेसाती सुरु होइल (जेव्हा शनी तूळेत जाइल तेव्हा..)

मेष्...वृषभ...मिथुन...कर्क...सिंह्व...कन्या...तुळ्...वृश्चिक्...धनु...मकर्...कुम्भ...मीन
.१.....२.......३.......४.......५.......६.......७.......८.......९.....१०......११....१२..

शनी आत्ता सिंहेला आहे, तो सप्टेम्बर मधे कन्येला जाईल!
जोवर तो सिंह राशीत आहे तो वर कर्क्-सिंह्-कन्या या राशीन्ना साडेसाती
तो पुढील राशीत म्हणजे कन्येत गेल्यावर सिंह्-कन्या-तुळ राशीस साडेसाती
सोप्प अस लक्षात घ्या की शनी ज्या राशीत अस्तो त्याच्या मागिल,त्या राशीस, व पुढील राशीस साडेसाती असते Happy
नूतन, वरील उदाहरणावरुन हे समजते की कन्या राशीला साडेसाती सुरू झालेलीच आहे, व सप्टेम्बर पर्यन्त पहिली अडिचकी सम्पुन मधली अडिचकी सुरू होत्ये
अजुन अडिच वर्षानन्तर वृश्चिकेला साडेसाती सुरू होईल जेव्हा शनी कन्येतून तूळ राशीत प्रवेश करेल!

अर्थात, साडेसातीबद्दल हे सर्व विचारताना हे देखिल लक्षात असुद्यात की, साडेसाती म्हणजे काही महाभितीदायक वगैरे असे काही नसते, मात्र शनी जातकाचे गर्वहरण करतोच करतो, कित्येकदा जातकास कल्पनाही नस्ते की आपण या या बाबतित गर्विष्ठ आहोत, अहन्कारी आहोत, मीपणा जपणारे आहोत, त्या सर्व बाबीन्मध्ये शनी जातकास जमिनीवर आणून ठेवतो! Happy अन खरे तर ते आपल्या "हिताचेच" अस्ते
तेव्हा येथिल कुणाही वाचकाने, साडेसातीची अवास्तव भिती बाळगू नये असे सान्गावेसे वाटते, मात्र त्याचबरोबर, आत्यन्तिक गर्विष्ठता/ मी पणा/ अहन्कार्/ स्वार्थीवृत्ती/ हुकुमशाही/ मी म्हणेन तेच खरे/ दम्भ वगैरे देखिल बाळगू नये हे सान्गणे न लगे! हे असे काही अस्तित्वात असल्यास या ना त्या प्रकारे साडेसातीच्या काळात याबद्दलचा भ्रमनिरास व्हायला वेळ लागत नाही.
जी लोक, मूलतःच नम्र, विनयशील, सद्गुणी, दुसर्‍यान्चे अहित न चिन्तणारी, स्वतःव्यतिरिक्त इतरान्चा (निसर्गासहित) आदर करणारी, इश्वरास/जगन्नियन्त्यास स्मरुन रहाणारी, अशी असतील, त्यास साडेसातीचा त्रास जाणवतही नाही असे कैक बाबतीत बघण्यात येते.

सर्वसामान्य लोकांस, कुन्डलितील मूळ चन्द्राच्या मागे, चन्द्रावरुन, व पुढील घरातुन शनिचे भ्रमण म्हणजेच साडेसाती हे ठाऊक असते, व नव्व्याण्णव टक्के वेळेस साडेसाती म्हणजे चन्द्रराशीसम्बन्धातील भ्रमण हाच अर्थ घेतला जातो.
पट्टिचा ज्योतिषी मात्र, व्यय/प्रथम/द्वितिय स्थानान्व्यतिरिक्तचे शनिचे गोचर भ्रमणही विचारात घेतो अशा अर्थाने की त्या त्या स्थानान्च्या भावासम्बन्धी साडेसाती सुरू आहे/वा नाही. यावर जाणकार अधिक प्रकाश टाकू शकतील!

याव्यतिरिक्त, वयाच्या कितव्या वर्षात साडेसातीचा कालखण्ड आहे, ती पहिली, दुसरी वा तिसरी साडेसाती आहे, कोणत्या राशीला अन्य कोणत्या ग्रहयोगान्मध्ये आहे, याचाही बराच विचार सूक्ष्मात बघताना करावा लागतो

एक नक्की की साडेसातीत तावुनसुलाखून निघालेली व्यक्ति सहसा अधिक म्याच्युअर्ड व सौम्य बनते! जीवनाकडे बघण्याचा विशाल-सर्वसमावेशक दृष्टिकोन लाभतो. आयुष्यात कल्पनादेखिल केली नसेल, अशी बरीवाईट्/लहानसहान वा महान कार्ये हातून होतात, भरपुर शारिरीक्/मानसिक कष्ट घडतात, अन्तिमतः ज्यान्ची परिणीती प्रगल्भ अनुभवसिद्धीतच होते! अर्थात, व्यक्तिव्यक्तीच्या कुन्डलीनुसारच्या प्राप्त परिस्थितीप्रमाणे याची व्याप्ती अनेकानेक क्षेत्रात कमीअधिक प्रमाणात असू शकते!
साडेसातीच्याच कालखण्डात, "सत्शील" जातक, पुढील आयुष्यास उपयोगी शिदोरी देखिल जमा करू शकतो, पुढील आयुष्याची पायाभरणी करू शकतो. याबाबत शनी जसे/जेवढे/ज्याप्रकारे देऊ करतो तेवढे अन्य कुठलाही ग्रह "अशाप्रकारे" देऊ करत नाही.

तेव्हा, साडेसातीची भिती न बाळगता, "स्वतःस सुधरावयाची एक उत्कृष्ट सन्धी" म्हणून या कालखन्डास सामोरे जाणे हेच उत्तम Happy

लिंबु.. छान माहिती आणि विवेचन..

शनीबाबत विचार करताना सगळ्यात महत्वाचे म्हणजे... मूळ कुंडलीत तो कसा आहे ह्याला महत्व आहे..
जर मूळ कुंडलीत शनी उच्चीचा किंवा स्वराशीत शुभयोगात असेल तर विशेष त्रास होत नाही , त्याचबरोबर शनी चे राश्यांतर झाले की साडेसाती पेक्षा मूळ पत्रिकेनुसार त्याची ३ री,१० वी आणि ७ वी दृष्टी कुठल्या स्थानांवर पडते आहे ते पहाणे पण जास्त गरजेचे आहे..

मिलिंदभौंची मते जाणुन घ्यायला आवडेल यावरती..

nutanj - जन्मतारखेची पूर्ण बेरीज अशी करायची. उदा. माझी जन्मतारीखः २७ मे १९८२
२+७+५+१+९+८+२=३४ ३+४=

लिंबूभौ.. बरोबर का?

मन्क्या, बरोबर
फक्त एक फरक..... ११ व २२ हे आकडे दिनान्क्/महिन्याकरता आले असता पूर्ण धरायचे, म्हणजे १+१ किन्वा २+२ असे करायचे नाही कारण हे "मास्टर" आकडे आहेत (म्हन्जे काय ते एमएनसीना विचारा)
या बीबीवर असलेली आधीची पाने देखिल तपासा Happy माहिती मिळेल

Pages