डाव असा हरता येतो का

Submitted by वैवकु रीटर्न्स on 31 January, 2016 - 02:29

फाउल 'वापरता' येतो का
डाव असा हरता येतो का

अवघे अस्तित्वच गुंतवतो
तो क्षण विंचरता येतो का

मूड बिघडला आहे माझा
तुला ठीक करता येतो का

चित्र काढणे अवघड नाही
रंग 'तुझा' भरता येतो का

ध्यास तसा धरला आहे मी
पण विठ्ठल धरता येतो का

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली