किन्वा सलाद आणी वोडका जेली शॉट्स

Submitted by वर्षू. on 17 January, 2016 - 10:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

किन्वा सलाद , समर लंच करता करता एकदम आयडिअल आहे. पोटभरून खाल्लं तरी जडपणा येत नाही.
१) किन्वा १ कप
२) २ कप पाणी
३) १/२ टेबलस्पून लसूण - अगदी बारीक चिरून
४) १ मिडियम कांदा
५) एक मोठा टोमॅटो
६) एक लहान काकडी
७) एक लहान गाजर
८) १/२ कप मक्या चे शिजलेले दाणे
९) कोथिंबीर
१०) पुदिन्याची ताजी पाने.
११) मीठ
१२) मिरपूड
१३) १/२ टेबलस्पून बाल्सामिक विनीगर किंवा ताज्या लिंबाचा रस - स्वादानुसार.
१४) १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल.

क्रमवार पाककृती: 

१) २ कप पाणी उकळत ठेवा. उकळी आली कि किन्वा अ‍ॅड करा. गॅस कमी करून, झाकण ठेवून १५,२० मिनिटे किन्वा शिजवून घ्या. शिजल्यावर गॅस बंद करा. फोर्क ने किन्वा, फ्लफ करून घ्या. फ्रिज मधे गार करायला ठेवा.
२) कांदा, काकडी,गाजर्,टोमॅटो,कोथिंबीर्,पुदिना बारीक चिरून घ्या.
३) गार झालेल्या किन्वात सगळ्या भाज्या, मक्याचे दाणे नीट मिसलून घ्या.
४) आता मीठ, काळी मिरी पूड, बाल्सामिक विनिगर् किंवा लिंबाचा रस ,ऑलिव्ह ऑईल एकत्र करून सलाद वर
हे ड्रेसिंग ओता. हलक्या हाताने नीट मिक्स करा.

संडे लंच / ब्रंच इज रेडी.. बरोबर होम मेड वोडका जेली शॉट्स - अल्टीमेट !!!!

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांकरता.. पोटभरीचे होईल (बहुतेक)
अधिक टिपा: 

१) लेट्यूस , कोवळा पालक इ. भाज्या ही अ‍ॅड करता येतील.
२) मी लिंबाचा रस वापरलाय आंबटपणा करता. बाल्सामिक जर्रासे गोड असते चवीला म्हणून मेरे लिये नो नो.
३) चेरी टोमॅटो आणी बाअरीक चिरलेला पार्सले फॉर डेकोर
४) होम मेड जेली शॉट्स.. प्राईस ऑन रिक्वेस्ट.. ओह सॉर्री रेसिपी ऑन रिक्वेस्ट Wink Proud

माहितीचा स्रोत: 
नेट आणी स्वतः चे प्रयोग / उद्योग!!
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किन्वा माझ्या मुलाने us वरुन अणला होता पण त्याचे काय करायचे त्याला पण माहित नव्हते व मलापण माहित नव्हते त्याच्या gf ne माझ्यासाठी घेऊन दिला होता.
खुप दिवस घरात पडुन होता.मग एकदा भातासारखा शिजवला.पण खास काही आवडला नाही मग कबुतरांना टाकला त्यांनीही खाल्ला नाही चिमन्यांना टाकला त्यांनी पण खाल्ला नाही बाहेर देशातले धान्य खाऊन माहित नसल्यामुळे त्यांना आवड्ले नसणार .

आता मुलाला पुढच्या वेळेस घेऊन यायला सांगते आणि असा सलाद बनवते.

मस्त दिसतंय सॅलड !

सकुरा Lol किन्वाची साबुदाणा खिचडीही मस्त होते. ती खिचडीपेक्षा भगरीसारखी जास्त लागते असं मला वाटतं पण रेसिपी उत्तमच लागते एवढे नक्की.

किन्वा सलाड वगैरे माझ्यासाठी फार फ्यान्सीश्म्यान्सी प्रकरण आहे. कुणी बनवून दिलं तर खाईन बापडी.
दिसतंय मस्त.

जेली शॉटस मी सांगेन लवकरच. सोप्पंय प्रकरण. Happy

च्च, काय साकुरा. किन्वा किती महाग मिळतो माहितेय का तुम्हांला?
वर्षू, सॅलड मस्त दिसतंय. करून बघेन नक्कीच. किन्वा मला आणखीन दोन पद्धतीने खायला आवडतो. कसा ते मायबोलीवर लिहिलं असावं कुठेतरी.

च्च..च्च..च्च.... सकुरा... ऊप्स... किन्वा चक्क कबुतर,चिमण्यांना .. आई ग्गं.. Lol

सायो, बरोबरे तुझं.. कोशर फूड्स मधे काहीच्याबाहे किमती असतात,पण लकीली इथे प्राईस स्मार्ट मधे अगदी रिझनेबल प्राईस मधे मिळतोय सध्यातरी.. बहुतेक स्टॉक आम्हीच उचलला असेल हीही..

नी.. सोप्पंय हे परकरण... फ्यान्शीब्यान्शी अजिबात नाही..

नी तेरी भी जेली शॉट्स ची रेस्पी टाक पाहू इथे..

मैने अब्बीच अपलोड की मेरी वाली

ओह.. नी.. लेके आती तेरे लिये किन्वा.. डेफिनेटली भगर किंवा साबुदाण्या ने किन्वा ला सब्स्टिट्यूट नाही येणार करता .. हीही

काय असते हे किन्वा? रव्यासारखे धान्य का कडधान्य?
मी किंवा (or) समजून शीर्षक वाचले आणि असे काय अर्धवट लिहिलेय म्हणून गोंधळून गेलेलो .. Happy

छान प्रकार आणि फोटोही सुंदर.

किन्वा, अजून फार नाही मिळत भारतात. मुंबईला गोदरेज नॅचरल्स फूड मधे मिळाले होते मला.