पार्ल्यातले पार्लेकर

Submitted by शर्मिला फडके on 13 April, 2013 - 10:53

मुंबईच्या विले पार्ले उपनगरात रहाणार्‍या स्थानिक, आजी-माजी पार्लेकरांना किंवा पार्ल्याबद्दल जिव्हाळा असणार्‍यांना गप्पा मारण्याकरता, पार्ल्यात होणार्‍या घडामोडींबद्दल बोलण्याकरता हा धागा.

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नालायक किरू...
हमारा मजाक उडानेवालो इसका बदला लिया जायेगा...
:प्रतिशोध प्रतिशोध प्रतिशोध असे नाचणारी बाहुली:

Wink

विजय स्टोर्स पार्ले यांचे फराळ आयटम्स कसे असतात? मला इथे बंगलोरला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण चव चांगली असते का? एखाद-दुसराच पदार्थ चविष्ट असला तरी सांगा. धन्यवाद.

डेक्कन च्या बस स्टॅण्ड समोर जी दुकाने आहेत त्या मॉल सारख्या इमारतीत तेथे बघितल्याचे आठवते.

बाकी मोची आईसक्रीम मिळाले तर जरूर खा. मस्त असते. वेगळाच प्रकार आहे.

नी, पुण्यात कँपात वेस्ट एन्ड / दोराबजी समोर तो कुठला मॉल आहे, तिथे पण आहे मोचीचं दुकान. व्हरायटीपण असते बर्‍यापैकी. भारतवारीत एकदा तरी चक्कर असते.

शर्मिला, हो बिग बझारच्या कॉम्प्लेक्समधेच.

अंजली, मोची तिथे आहे ते माहितीये. पण महिन्या दोन महिन्यातून एखादी पुणे चक्कर त्यात कॅम्पमधे चक्कर मारायला वेळ मिळणे वगैरे बघता मला पार्ल्यातून वर्सोव्याला इन्फिनिटीमधे जाणे जास्त सोपे होते.
आता तर काय पार्ल्यातच आले. भाजी-लायब्ररीसाठी आठवड्यातून दोन चकरा होतातच मार्केटात. त्यामुळे सोपे झाले.

मोचीमधे व्हरायटी वगैरे असण्यापेक्षा माझा प्रचंड पाय मावेल असे, कम्फर्टेबल आणि तरीही सलवारसूट/ साडी वगैरेवर बरे जातील असे सॅण्डल्स तिथेच मिळतात.

ह्या मोची ब्रँड बद्दल विसरलेच होते ..

मला वाटलं पार्ले इस्ट मध्ये जवळपास कोणी मोची/चांभार नव्हता म्हणून हे नविन (सॉफिस्टिकेटेड?) दुकान बघून नी ला आनंद झालाय .. Lol

सशल Lol

मंजुडी किंवा इतर कोणी ठाण्याचे आहेत का?

ठाण्याला शासकीय ग्रंथोत्सव भरला आहे आजपासून छत्रपती शिवाजी मैदानामधे ते नेमकं कोणतं? आर्य क्रिडा मंडळाचं ग्राउन्ड का?

नाही. तलावपाळीच्या समोरचं असेल. तो क्लॉक टॉवर आहे ते, जांभळी नाका भाजी मार्केटच्या आधीचं.
आर्य क्रीडा मंडळाच्या मैदानाच नाव आनंद दिघे वगैरे असावं, त्याचं दहन झाल्यापासून.

आनंद दिघ्यांवर अंतिम संस्कार त्या गावदेवी मैदानात केले होते? हैला! मला माहितीच नव्हतं हे.

तिथलं मार्केट आता पूर्ण उठवून नव्या इमारतीत स्थलांतरीत केले आहे. त्यामुळे गावदेवीचं मैदान आता पूर्ण मोकळं झालं आहे. तिथे आता प्रदर्शनं/ महोत्सव वगैरे भरवतात.
रच्याकने, त्याचं नाव गावदेवी मैदानच आहे.

अरे व्वा, पार्ल्याचा धागा वर आला... जुने दिवस आठवले..... वा वा... Happy
(पण हे क्काय? खादाडीच्या महोत्सवा ऐवजी ग्रन्थोत्सवांच्या कसल्या चर्चा करता? Wink )

खादाडी वरुन आठवले. पार्ल्यात लोकमान्य सेवा संघामधे खाद्यजत्रा आहे ६-७ फेब. ला.

अर्थात याची हाईपच जास्त. शिवाय पदार्थ अगदीच चतकोर आकाराच्या प्लेटवर दीडपट किमतीमधे देतात. काही एक्झॉटीक पदार्थ घरगुती स्टाईलने बनवलेले असतात. सांदण वगैरेसारखे हल्ली घरी न बनवले जाणारे पदार्थ खायला ठीक आहे.

दिघेंचे अंत्यसंस्कार बहुतेक खारकर आळी जवळच्या पोलिस स्कूल जवळच्या मैदानात झाले होते.

शिवाजी मैदान - जांभळी नाका

हो, अंत्यसंस्कार खारकर आळी जवळच्या मैदानातच म्हणतोय, पोलीस कमिशनर ऑफिसच्या इथलं.
त्यालाही मला वाटायचं आर्य क्रीडा मंडळ म्हणतात, त्याच्या प्रवेशद्वाराच्या कमानीवर 'आर्य क्रीडा मंडळ' असं लिहिलेलंही आठवतंय. आय मे बी रॉंग.
गावदेवी मैदान जिकडे ती डेकोरेटिव्ह 'आर्य क्रीडा मंडळ' पाटी लावलेली इमारत आहे ते न्हवतो म्हणत.

सामाजिक उपक्रम २०१६ तर्फे सर्वांना नमस्कार!

आपली छोटीशी मदत देखील काही जणांना मोलाची ठरू शकते. आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी येथे आपला सहभाग जरूर नोंदवा - http://www.maayboli.com/node/57984

SamajikUpakram2016.jpg