आमच्याकडचा गणपती

Submitted by संयोजक on 19 August, 2009 - 15:57

गणपती बाप्पा ssss मोरया!
मंगलमूर्ती ssss मोरया!

श्रावण सुरू झाला की तुम्हा-आम्हाला सगळ्यात मोठे वेध लागतात ते आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे .. लहान मुलांपासून ते अगदी वडीलधार्‍या मंडळींपर्यंत, समाजातल्या कुठल्याही स्तरांतल्या व्यक्तीला गणपती बाप्पा हे सगळ्यात लाडकं दैवत वाटतं .. गणेशोत्सवातल्या ह्या दीड किंवा पाच किंवा दहा किंवा काही काही ठिकाणी एकवीस दिवसांतला क्षणन् क्षण भारावून टाकणारा असतो .. गेली कित्येक वर्षं आपण गणेशोत्सव साजरा करतोय पण तरीही दरवर्षीचा गणेशोत्सव नेहमीच एक नविन अनुभूती देऊन जातो ..

आदल्या दिवशी रात्री उशीरापर्यंत जागून केलेली आरास असो वा गणेशचतुर्थीच्या दिवशीचं ताला-वाद्यातलं आगमन असो, प्रतिष्ठापना असो, पहिली आरती असो, उकडीच्या मोदकांचा नैवेद्य असो, बाप्पाजवळ बसून केलेलं प्रसाद वाटण्याचं काम असो, रोजच्या आरत्या, रात्र रात्र जागून सादर केलेले किंवा आस्वाद घेतलेले कार्यक्रम असोत आणि अगदी महाआरती आणि 'निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी ..' म्हणत दरवर्षी दिलेला भावपूर्ण निरोप असो... दरवर्षीचा गणेशोत्सव एक सुखद, प्रफुल्लित करणारा आणि नव्याने पुन्हा वर्षभर वाट बघायला लावणारा एक अनोखा सोहळा असतो !!

तेव्हा तुमच्या मनातल्या, घरातल्या, कॉलनीतल्या, आळीतल्या, देशातल्या, विदेशातल्या लाडक्या गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हां-आम्हां सगळ्यांना घडवून आणा .. लिखीत, छायाचित्रीत, ध्वनीमुद्रीत अगदी कसल्याही स्वरुपात ..

तसेच, घरी किंवा कॉलनीत, तुम्ही कार्यरत असलेल्या गणेश मंडळांकडून केल्या जाणार्‍या सामाजिक उपक्रमांबद्दल माहिती दिलीत तर उत्तमच!
उदा. एखादे गणेश मंडळ निर्माल्याची विल्हेवाट लावताना पर्यावरणाचे भान ठेवून काम करत असेल तर त्यापासून मायबोलीकरांना आणि इतरांनाही प्रेरणा घेणे शक्य होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या घरी, ब्लूमिंगटन मधे बसवलेला हा गणपती,
DSC00070.JPG

सोबत गौरी आणी फराळाचे साहित्य..
DSC00068.JPG

आपला प्रतिसाद कळवा.

इथे कोलंबियात गौरी गणपती बसवले होते. रात्री जागून सजावट, रोज सकाळ संध्याकाळ आरत्या, मंत्रपुष्प, अथर्वशीर्ष, श्रीसूक्त, प्रार्थना, रविवारी पहिल्या दिवशी २१ आवर्तने आणि दुधाचा अभिषेक, रोजचे प्रसाद, गौरी जेवण आणि मग सातव्या दिवशी विसर्जन.

मंगलमूर्ती
P1010030.JPG

गौरी
P1010030.JPG

गौरी गणपती
P1010030.JPG

गौरी जेवणाचा नैवेद्य
P1010030.JPG

सहा दिवसांतले हातावरचे प्रसादः
उकडीचे मोदक, रताळ्याचा कीस, (रिकोटा चीज पासून बनवलेले) खव्याचे मोदक, साताळलेली डाळ, गोडाचा शिरा, तिखटमिठाचे दाणे, रव्याचे लाडू, ढोकळा, खमंग काकडी, विविध प्रकारची फळे.

गणपती बाप्पा मोरया!

उत्सवाचे सगळे फोटो इथे पाहाता येतील -
गणेशोत्सव फोटो

सगळ्यांचेच गणपती छान आहेत.

गौरीपण काय सुरेख दिसतायत. छान नटल्या आहेत माहेरवाशिणी.

माझ्या साऊथ इंडियन मैत्रिणीकडे गौर आणि गणपती एका दिवशी येतात.

कर्नाटकमधे काही लोकांकडे हरतालीके दिवशी गौरी येतात आणि आईची आठवण आली म्हणून दुसरे दिवशी लगेच गणपती येतात. त्यामुळे त्यांच्याकडे एकच गौर असते. आपल्याकडे जसा गौर-गणपती जातो त्याच दिवशी मग दोघेही बरोबर जातात. त्यामुळे त्यांच्याकडे गौरीचे प्रस्थ बरेच असते. रोज गोडाचा नैवेद्य, आपल्यासारखीच गौरी जेवतात त्या दिवशी पुरणाची पोळी, संध्याकाळी हळदी-कुंकु असते.

माझी एक मैत्रिण अतिशय सुरेख आरास करते. दरवर्षी जरीची नविन साडी गौरीसाठी, धान्याची रांगोळी असे बरेच काही असते. रोजची चढावू आरास अप्रतिम दिसते सगळेच.

या घरच्या महालक्ष्मी. (९ वर्षं झाली प्रत्यक्ष बघून. Sad कधी न कधी पुन्हा उपस्थित राहू शकेन अशी आशा आहे.)

mini-IMG_0072.JPG

आमच्याकडचा गणपती
Ganpati-2009 008.jpg

आमच्याकडच्या महालक्ष्मी
Ganpati-2009 003.jpg

गौरी,गणपती ,नेवैद्य्,आरास...सर्व सर्व सुंदर !!
बाप्पा मोरया !!

सगळ्यांकडचे गणपति एकदमच छान छान आहेत. मला पण आमच्या कडच्या गणपतिचा फोटो इथे टाकायचा आहे. पण कसा तो कळतच नाहि.

मित्रहो, सारेच गणपती ,गौरी, नेवैद्य्,आरास...सुंदर आहे.
mogara.ketaki,
१ - प्रथम "माझे सदस्यत्व" मध्ये जा. नंतर "खाजगी जागा" आहे तिथे click करुन photo upload कर.

२ - पुढे, "प्रतिसाद" च्या खाली "मजकूरात image किंवा link द्या." मधे "image" ला click करुन photo प्रतिसाद म्हणुन देता येतील.

होते आहे का work out ते सांग !!!

हा माझ्या भावाने 'ग्लास पेंटिगने' काढलेला गणपती

DSC015501.JPG

(flash ऑफ न केल्याने फोटो तितकासा चांगला नाहि आलाय,जमल्यास दुसरा टाकेल.)

हा आहे आमच्या घरचा गणपति. शेवाळ, मर्गज (moss) चि सजावट असते नेहमि. मुर्ति पण सेमच असते दर वर्षी
Picture 116.jpg
हा अजुन एक फोटो
Picture 269.jpg
आणि हा आहे नेवेद्य
Picture 228.jpg
बाप्पा चे आवडिचे मोदक
Picture 293.jpg

Pages