आज रविवार साजरा करायचा म्हणून काल मटण मॅरिनेट करत ठेवले आणि आज नेहमीचा कोल्हापुरी मसाला करणार इतक्यात मागे पाहिलेली ही रेसिपी आठवली, त्यावेळी बघून आवडली होती. आज करूनही पाहिली, मस्त झणझणीत प्रकार आहे (विदर्भ वगळता इतर लोकांच्या तिखटाच्या व्याख्येनुसार, वैदर्भीयांना तिखट न लागल्यास कंपनी जबाबदार नाही )
साहित्य:
अर्धा किलो मटण
गरम मसाले:
सात आठ हिरवे वेलदोडे, सात आठ काळी मिरीदाणे, एक इंच दालचिनी, चार पाच लवंगा
पावडर मसाले:
प्रत्येकी एक टे स्पून धणे, जिरे, बडीशेप पावडर
हिरव्या मसाल्यासाठी:
एक वाटी कोथिंबीर,पाऊण वाटी ताजा पुदिना, एक वाटी खोवलेले ओले खोबरे, दोन-तीन हिरव्या मिरच्या, एक टे स्पू ताजी आले लसूण पेस्ट
इतर:
तमालपत्र, कढीलिंब 8-10 पाने, हळद पाव चमचा, एक मोठा कांदा बारीक चिरून, एक वाटी दही, तेल, मीठ
कृती:
लिटरभर पाणी उकळून घ्या, त्यात गरम मसाल्यातील सर्व मसाले अर्धे घाला, तमालपत्र आणि मीठ घालून मटणही घाला. मंद आंचेवर पंधरा ते वीस मिनिटे शिजू द्या - 50-60 टक्के शिजेल इतपत.
(मी आधी दुसरी पाकृ करणार होतो म्हणून मटणाला तिखट, हळद, थोडे मसाले लावून मॅरिनेट केल्याने स्टॉकला रंग आलाय पण या कृतीसाठी त्याची गरज नाही)
हिरव्या मसाल्याचे जिन्नस आणि राहिलेले गरम मसाले थोड्या पाण्यासोबत मिक्सरमधून बारीक वाटून घ्या
मटणाचा स्टॉक आणि तुकडे वेगळे करा, स्टॉक मधून खडे मसाले काढून टाका
पातेल्यात दोन टे स्पू तेल गरम करा, कढीलिंब घाला, हळद आणि कांदा घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परता.
हिरवा मसाला आणि पावडर मसाले घालून थोडे तेल सुटेपर्यंत परता, मटण घालून आणखी तीन चार मिनिटे परता.
मटण स्टॉक घाला, मिश्रण नीट मिसळून मीठ चवीनुसार घाला आणि मटण पूर्ण शिजेपर्यंत झाकण ठेवून मंद आंचेवर शिजवा.
मटण शिजले याची खात्री करून दही घाला, मिसळून आणखी तीन चार मिनिटे शिजवा, दही फाटू देऊ नका.
साध्या भातासोबत मस्त लागते
स्रोत : यू ट्यूब
पाककृतीचे धागे "सार्वजनिक"
पाककृतीचे धागे "सार्वजनिक" करायचा ऑप्शन बंद करा हो.
नुसता जीव जळवण्याचा प्रकार चालू असतो.
हिरव्या मसाल्यातले मटण लय भारी लागते
नाय नाय, ये ना चॉलबे. माह्या
नाय नाय, ये ना चॉलबे. माह्या जीव अज्याबात जळत नाय कारण म्या शाकाहारी हाय.:खोखो:
टाका हो टाका. सार्वजनिकच करा, म्हणजे आम्हा घासफुसवाल्याना पण पहायला मिळेल. मग आम्ही त्या ग्रेव्हीत चिकन , मटना ऐवजी बटाटे, वाटाणे असले पदार्थ टाकण्याचे उपद्व्याप करु.:फिदी:
पाकृ चान्गली आहे, फोटो पण मस्ते! जे नुसते भाताडे ( भातच खूप आवडणारे) आहेत, त्याना बरय वन डिश मिल.
मस्त प्रकार आहे.. ग्रीन
मस्त प्रकार आहे.. ग्रीन मसाल्यातले मटण आपल्याकडे फारसे प्रचलित नाही. लालभडक रंग आणि वर तेलाचा तवंग, हि चविष्ठ मटणाची व्याख्या
ग्रीन कलर खूप मस्त आलाय ..
ग्रीन कलर खूप मस्त आलाय .. त्याकडे बघून घासफूस फील येत नसून झणझणीतपणाच जाणवतोय
अरे बाबा, आम्हा शाकाहार्याना
अरे बाबा, आम्हा शाकाहार्याना घासफुसवाले म्हणतात. यात कोथिम्बीर आणी पुदिना आहे म्हणून नाय म्हणल मी तसे. कधी समजल या मुलाला.:अरेरे:
मस्तं दिसतेय. पण मटण खात
मस्तं दिसतेय.
पण मटण खात नसल्याने चिकन वापरून करून बघेन.
अर्थात पुदिन्याची चव मटणाला जशी एनरिच करते तितकी चिकनला करत नाही हे ही ऐकून आहेच.
तरीपण बटाटे/पनीर घालण्यापेक्षा चिकन बरं लागेल असं वाटतंय.
नुसती कलेजी वापरून केले तरी
नुसती कलेजी वापरून केले तरी अतिशय उत्तम होईल
मस्त पाकृ! >>पुदिन्याची चव
मस्त पाकृ!
>>पुदिन्याची चव मटणाला जशी एनरिच करते तितकी चिकनला करत नाही हे ही ऐकून आहेच.>>
साती, मी चिकनचा एक प्रकार करते त्यात कोथिंबीर वापरत नाही, पुदीना वापरते. मस्त चव येते! मसाल्यात फक्त पुदीना वापरणार असल्यास चिरुन पाव कप आणि सोबत कोथिंबीर असेल तर प्रमाण कोथिंबीरीच्या निम्मे ठेवले की छान स्वाद येतो.
ओक्के. धन्यवाद स्वाती २.
ओक्के. धन्यवाद स्वाती २. लवकरात लवकर ट्राय करून बघते.
दिसाइला मस्त दिसतेय शाकहारी
दिसाइला मस्त दिसतेय शाकहारी लोकान्चा जळफ़ळाट
पनीर चे केले तर स्टोक वगैरे कसे मिलणार वेज स्टोक घालावा लागेल बहुतेक
वावावा झकास! नुसत फोटोवरच
वावावा झकास! नुसत फोटोवरच समाधान, कारण आम्ही हॉटेली मटनवाले
सही दिसतय .. एक
सही दिसतय .. एक नंबर..
हाकानाका..
विदर्भवाल्यांनी तिखटजाळ हिरव्या मिरच्या टाकाव्या न ग्रीन पेश्टीत
मी आज फिश करी केली होती.. चुम्मेश्वरी झाली होती..
वाटल फटू काढून टाकावा पण मंग म्हणलं जाऊ दे न लेका..का दाखवाच रोज रोज लोकाईले.. मिसल सर्वांनी.. असो.. तुमाले म्हणून सांगतो, लयच टेश्टी झाली होती
वॉव.. वन मोर ऑस्सम रेस्पी
वॉव.. वन मोर ऑस्सम रेस्पी फ्रॉम अमेय.. खूप तोंपासु होतंय..
ऊफ.. कधी मिळायला लागेल इथे मटन.. लँब नाही आवडत इंडियन ग्रेवीत..
टीना चुम्मेश्वरी हा शब्द अफाट
टीना
चुम्मेश्वरी हा शब्द अफाट आहे
अमेय मस्त रेसीपी ...
अमेय मस्त रेसीपी ...
मस्त फोटो! पण खाण्याच्या
मस्त फोटो! पण खाण्याच्या बाबतीत रॉंगंनंबर!
मी फ्लॉवर घालून करणार ही करी.
वाढलेल्या ताटाचा फोटो जबरी
वाढलेल्या ताटाचा फोटो जबरी आहे. बघुन एक आवंढा आलाच घश्यात. म्हणजे लाळेचा.
अमेय तुमच्या रेसिपी मस्त असतात आणि फोटोपण.
वॉव ! मस्त !
वॉव ! मस्त !
रश्मी अहो माझ्या पोस्टमध्ये
रश्मी अहो माझ्या पोस्टमध्ये वापरलेला घासफूस शब्द तुमच्या पोस्टमधून उचलला नव्हता. मी सुद्धा तो शब्द वापरतो, माझी स्वतंत्र पोस्ट होती.
पुरुषांना बायकांईतके रंगाच्या शेड समजत नाही, पण ग्रीन कलर बाबत वेज ग्रीन आणि नॉनवेज ग्रीन अश्या दोन शेड मला कळतात, त्यापैकी हा दुसर्यातील वाटतोय ईतकेच म्हणायचे होते. त्यामुळे मी शुद्ध मांसाहारी असूनही हा हा हिरवा रंग खाऊ शकतो.
मस्त रे अमेय. पण मी फ्लॉवर
मस्त रे अमेय. पण मी फ्लॉवर किंवा पनीर घालुन करणार
दिसतंय छान कलरफुल. अमेयसाहेब
दिसतंय छान कलरफुल.
अमेयसाहेब जरा वेजवाल्यांसाठी ऑप्शन लिवा की, काय काय घालू शकतो.
खूप तोंपासु होतंय..
खूप तोंपासु होतंय.. +१११११११११
मार्गशिष संपल्या संपल्या करण्यात येईल
जबरी! वर्षाची सुरुवात तर
जबरी! वर्षाची सुरुवात तर मस्तच झालीये
चुम्मेश्वरी आवडलीये
अमेयसाहेब जरा वेजवाल्यांसाठी
अमेयसाहेब जरा वेजवाल्यांसाठी ऑप्शन लिवा की, काय काय घालू शकतो. >>> वेजवाल्यांनी काहीही घातलं तरी 'ती' टेस्ट येऊच शकत नाही. मी मटणाचे तुकडे नाही खात जास्त पण रस्सा.. आहाहा! कितीही ओरपु शकते. मटणाच्या रश्याला ऑप्शन फक्त खेकड्यांचा झणझणीत रस्सा.
घासपुसवाल्यांनो एकदा ट्राय तर करा म्हंजे तुम्हाला कळेल तुम्ही काय मिसताय ते ( आगावुपणा वाटत असेल तर आधीच क्षमस्व)
अरे बाबा ऋन्मेष, ते मी
अरे बाबा ऋन्मेष, ते मी गमतीनेच लिहील होत. सो, डोन्ट टेक मनावर.
निल्सन
निल्सन
मस्त रेसिपी अमेय. धा पैकी धा
मस्त रेसिपी अमेय. धा पैकी धा !
ज्यांना व्हेज करायची असेल त्यांनी सोया चंक्स घाला
मस्तय रेसिपी. पुढच्या मुंबै
मस्तय रेसिपी. पुढच्या मुंबै भेटीत पार्सल घेऊन येणे
मस्त.
मस्त.
लहानपणी आमच्या एका बंगाली
लहानपणी आमच्या एका बंगाली भाडेकरूकडे दर रविवारी मटन बनत असे. त्या मावशी किमान १ बटाटा घालून हिरव्या रंगाचं मटन करीत असत. बटाट्याच्या भाजीत इंटरेस्टिंग चवीचं काहीतरी असतं इतकी ओळख त्यावेळी मटनाची झालेली होती.
ग्रीन ग्रेव्हीतलं मटन ती आठवण ताजी करील असं वाटतंय. फोटो तोंपासू आहेत, पण मटणाचं पथ्य आहे. वर्षातून ४ वेळा
तेव्हा नेस्क्ट टाईम बनेल तेव्हा असं करायचा प्रयत्न करीन.
Pages