Go Green with 'Nilgiri Mutton'

Submitted by अमेय२८०८०७ on 3 January, 2016 - 06:14

आज रविवार साजरा करायचा म्हणून काल मटण मॅरिनेट करत ठेवले आणि आज नेहमीचा कोल्हापुरी मसाला करणार इतक्यात मागे पाहिलेली ही रेसिपी आठवली, त्यावेळी बघून आवडली होती. आज करूनही पाहिली, मस्त झणझणीत प्रकार आहे (विदर्भ वगळता इतर लोकांच्या तिखटाच्या व्याख्येनुसार, वैदर्भीयांना तिखट न लागल्यास कंपनी जबाबदार नाही Wink )

साहित्य:
अर्धा किलो मटण

गरम मसाले:
सात आठ हिरवे वेलदोडे, सात आठ काळी मिरीदाणे, एक इंच दालचिनी, चार पाच लवंगा

पावडर मसाले:
प्रत्येकी एक टे स्पून धणे, जिरे, बडीशेप पावडर

हिरव्या मसाल्यासाठी:
एक वाटी कोथिंबीर,पाऊण वाटी ताजा पुदिना, एक वाटी खोवलेले ओले खोबरे, दोन-तीन हिरव्या मिरच्या, एक टे स्पू ताजी आले लसूण पेस्ट

इतर:
तमालपत्र, कढीलिंब 8-10 पाने, हळद पाव चमचा, एक मोठा कांदा बारीक चिरून, एक वाटी दही, तेल, मीठ

कृती:
लिटरभर पाणी उकळून घ्या, त्यात गरम मसाल्यातील सर्व मसाले अर्धे घाला, तमालपत्र आणि मीठ घालून मटणही घाला. मंद आंचेवर पंधरा ते वीस मिनिटे शिजू द्या - 50-60 टक्के शिजेल इतपत.

(मी आधी दुसरी पाकृ करणार होतो म्हणून मटणाला तिखट, हळद, थोडे मसाले लावून मॅरिनेट केल्याने स्टॉकला रंग आलाय पण या कृतीसाठी त्याची गरज नाही)
gm1.jpg

हिरव्या मसाल्याचे जिन्नस आणि राहिलेले गरम मसाले थोड्या पाण्यासोबत मिक्सरमधून बारीक वाटून घ्या
gm2.jpg

मटणाचा स्टॉक आणि तुकडे वेगळे करा, स्टॉक मधून खडे मसाले काढून टाका

पातेल्यात दोन टे स्पू तेल गरम करा, कढीलिंब घाला, हळद आणि कांदा घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परता.
हिरवा मसाला आणि पावडर मसाले घालून थोडे तेल सुटेपर्यंत परता, मटण घालून आणखी तीन चार मिनिटे परता.

मटण स्टॉक घाला, मिश्रण नीट मिसळून मीठ चवीनुसार घाला आणि मटण पूर्ण शिजेपर्यंत झाकण ठेवून मंद आंचेवर शिजवा.
मटण शिजले याची खात्री करून दही घाला, मिसळून आणखी तीन चार मिनिटे शिजवा, दही फाटू देऊ नका.
gm4.jpg

साध्या भातासोबत मस्त लागते
gm6.jpg

स्रोत : यू ट्यूब

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोया चंक्स, हम्म्म. नाही आवडत. असो. मश्रूम्सपण नाही आवडत (हे माझ्या डोक्यात मश्रुम्सपण आले). त्यामुळे ते बटाटा, पनीर, मटार, फ्लॉवर घालून कोणी केलं तर लिहारे, कसं लागतं. मग विचार करू.

मस्त वाटतेय रेसिपी. फोटोपण मस्त आलेत. लिस्टवर ठेवली आहे.

या कृतीचं नाव फार विचारपूर्वक ठेवलंय असं उगाच वाटलं Wink

>>मी आधी दुसरी पाकृ करणार होतो म्हणून

हे फार्फार आवडलं. आमच्या घरात असले उद्योग नेहमी होत असतात त्यातून काहीवेळा आप्ल्याच हटके रेस्पि तयार होतात फक्त त्या बिगिनर्स लकप्रमाणे तेव्हाच चांगल्या लागतात (हे बहुतेक फक्त आमच्याच बाबतीत) Proud

पाककृती आणि फोटो दोन्ही फार आवडले.

आत्तापर्यंत तुमच्या गावच्या मराठा दरबारचा मसाला वापरून मटण/चिकन करी करत होते. तो संपला. आणि वेळेवर ही रेस्पी सापडली. धन्यवाद!

हा मसाला..

hirava-mutton-masala-maayboli-1.png

कोल्हापुरात मिळतात. पुण्यात खाऊवाले वैद्य की पाटणकर आहेत तिथे मिळतात हे मसाले. त्यांचीच चिंचवडला शाखा आहे तिथे मिळतील. ठाण्यात हनुमान की तत्सम दुकानात आणि गोखले रोडवर आणखी एक खाऊ, इन्स्टन्ट इडल्या-बिडल्यांची पिठं मिळणारं दुकान आहे तिथे पण.

मुंबैतल बोला की सिंड्रेलाताय.
ऑनलाइन बघते मी. किंवा अपना बाजारात.

Pages