माझ्या वाईट सवयी ३ - शिवीगाळ

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 December, 2015 - 12:28

शिवी म्हणजे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त संतापाच्या भावना व्यक्त करणारे शब्द ...
अशी काहीशी शिवीची व्याख्या ऐकली होती..
बस्स तिलाच खोटे ठरवायचो आम्ही..

जसं ठेच लागल्यावर पटकन तोंडातून अई निघते, जसे कोणी आपल्याला हाक मारल्यावर पटकन आपण ओ देतो, बस्स तसेच .. मित्राला हाक मारताना किंवा त्याच्या हाकेला ओ देताना पटकन तोंडातून शिवी निघायची. मित्रांमध्ये होणार्‍या संभाषणातील दर वाक्यामध्ये, दर दुसर्‍याही नाही तर दर वाक्यामध्ये, एखादी शिवी मोठ्या खुबीने कुठेतरी पेरलेली असायची. क्रिकेट खेळताना मात्र नेमके उलटे व्हायचे.. अर्रंरर म्हणजे शिव्यांशिवाय बोलायचो असे नाही, तर नुसत्या शिव्या, नुसत्या शिव्याच दिल्या जायच्या.. आणि त्या शिव्यांमध्येच काही शब्द मोठ्या खुबीने पेरून संवाद साधला जायचा.

यात कुठेही राग, संताप, समोरच्याबद्दल द्वेष या भावना दूरदूरपर्यंत नसायच्या. किंबहुना मैत्रीची लेवल या शिव्यांवरून ठरवली जायची. ना कोणी त्या शिव्यांचा शब्दश: अर्थ घ्यायचा, ना शोधायला जायचा. अर्थात, जेव्हा या वापरायला सुरुवात केली तेव्हा कैक शिव्यांचा अर्थही माहीत नव्हता.

तर या शिवीगाळ प्रकरणात मी साधारण दहाव्या वर्षी फॉर्मला आलो. ईयत्ता चौथी पास होत प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत सरकलो आणि तिथले वारे लागले म्हणू शकता. तिथे आम्ही पाचवी ग्रेडवाले ज्युनिअर आणि आम्हाला धंद्याला लावणारे सहावी ते दहावी सारेच सिनिअर. मी त्यांच्यातच जास्त रमायचो. कारण कुठलाही दुर्गुण समवयीन मित्रांच्या आधी उचलायचा गुण माझ्या अंगी मी बाणवला होता. त्यामुळे आमच्या वर्गात मी ‘गुरू’ आणि ‘महागुरू’ या दोन नावांनी ओळखलो जायचो. शिव्याच नाही तर लैंगिक शिक्षण (जे तेव्हा शालेय अभ्यासक्रमात मिळायचे नाही) मी मोठ्या मुलांकडून घेत माझ्या वयाच्या मुलांमध्ये वाटायचो. हे देखील या पदव्यांमागचे एक कारण होते. मग काय, या इमेजला जपायला भरमसाठ शिव्यांचा सर्रास अन सुलभतेने वापर करणे भागच होते. इथे सुलभता फार महत्वाची. कारण आव आणून शिव्या दिल्यासारखे मी कधीच केले नाही. त्या सहज यायच्या. अर्थात यामागे आमच्या बिल्डींगमधील वातावरणाचाही हात होताच.

वासरात लंगडी गाय शहाणी आणि काशीबाईंपेक्षा देखणी मस्तानी. या न्यायाने मी बिल्डींगमधील एक, किंबहुना एकमेव हुशार मुलगा म्हणून गणला जायचो. जो मुलगा हुशार आहे तो वाया गेलेला नाही या समीकरणानुसार सभ्य मुलगा म्हणूनही ओळखला जायचो. ‘रुनम्या सोबत आहे’ म्हणत माझे नाव घेतल्यास एखाद्याला घरून पिकनिकसाठी परवानगी मिळावी या पठडीतली माझी इमेज होती. आणि ती तशी परवानगी खरोखरच मिळायची म्हणून माझे मित्रही माझी ती फेक इमेज आपापल्या घरी जपायचे. यामागे आमच्या घरचे वातावरणही कारणीभूत होतेच. मी कसाही असलो तरी आमचे घर संस्कारी होते आणि ते बिल्डींगमध्ये सर्वांना माहीत होते.

तर या घरच्या संस्कारांबद्दल सांगायचे झाल्यास, लहानपणी माझ्या तोंडात "च्याईला" हा शिवीसद्रुश्य शब्द बसला होता. घरी सुद्धा सहजच तोंडात यायचा आणि आल्या आल्या एक थोबाडीत पडायची. एक दिवस मी पुढची पायरी गाठली आणि तोंडातून "साल्या" हा शब्द बाहेर काढला. तो देखील थेट माझ्या काकांसाठी वापरला. बस त्यादिवशी थोबाडीत न पडता माझे थोबाडच फोडले गेले. दुधाचे सारे दात एकाच दिवशी पडले. एक तो दिवस आणि एक आजचा दिवस. पुन्हा कधी घरच्यांसमोर तोंडातून अपशब्द बाहेर नाही आला. घरातच नव्हे तर बाहेरही कधी थोरामोठ्यांसमोर वा मुलींसमोर तो नाही आला. जसे शिव्या सहज तोंडातून बाहेर पडायच्या तसेच हे नियंत्रण देखील ईतकी वर्षे सहजच जमले. त्यामुळेच आज ऑफिसला व्हाईट कॉलर सोफेस्टीकेटेड ईमेज मिरवताना हा गुण कामी येतोय.

पण एक अपवादात्मक किस्सा मात्र आहे जो कायम आठवणीत कोरला गेलाय ..

शाळेतील गोष्ट आहे. दहावीच्या वर्षाची. शारीरीक शिक्षणाचा तास चालू होता. वर्गातल्या वर्गात उंच उडीची परीक्षा चालू होती. एकेक जण हातात खडू घेत भिंतीजवळ जात उंच उडी मारायचा, हातातल्या खडूने निशाण बनवायचा आणि मग त्या आधारे उडी मोजली जायची. माझी उडी मारून झाली होती. ईतरांच्या थोड्याफार बघितल्या आणि मग त्यातील रस संपला तसे मी आपल्याच विचारांत रमलो. ईतक्यात वर्गात अचानक गोंगाट सुरू झाला. कोणीतरी अफाट उंच उडी मारली होती. मी माझ्या तंद्रीतून खडबडून जागे होत चौकशी केली तसे सुशांतने अमुक तमुक उंचीची उडी मारली असे समजले. आकडा खरेच खतरनाक होता. त्यामुळे अबब असे उद्गारवाचक शब्द तोंडातून निघतात तश्या अर्थाची एक शिवी बाहेर पडली. गंमत म्हणजे माझ्या दुर्दैवाने तेव्हाच अचानक सारा वर्ग शांत झाला. माझी शिवी वर्गात खणखणीतपणे दुमदुमली. आणि पुन्हा एकदा शांत झालेल्या वर्गात हास्याचे स्फोट गडगडले. पुढच्याच बाकावर बसलेलो असल्याने बाईंच्या कानापर्यंत नक्कीच ही शिवी पोहोचली असणारच. पण त्यांनी तसे न दाखवता, मुलांनाच प्रतिप्रश्न केला की काय म्हणाला हा रुनम्या. अर्थात कोणी सांगितले नाहीच. बाईंनीही न ताणता मला शिक्षा म्हणून बाकावर उभे केले. याचा एकच फायदा झाला, तो म्हणजे पुढील उंच उडीचा कार्यक्रम मला मान फारशी वरखाली न करता बघता आला.

तर आजही शाळाकॉलेजमधील ज्या अवली कारनाम्यांसाठी मी मित्रांना आठवतो, त्या आठवणीत हा किस्साही जोडला गेला.

शिव्यांमध्ये मातृभाषा फार महत्व राखून असते. मलाही मराठीतच जमायच्या. राष्ट्रभाषेतील शिव्यांमध्ये ती मजा नाही यायची. ईंग्लिश तर कधी जमल्याच नाहीत. नाही म्हणायला ईंग्रजी आद्याक्षर एफ पासून सूरू होणारा दोन अक्षरी शब्द मध्यंतरी तोंडात बसला होता. उगाच शायनिंग मारल्यासारखे वापरायचो. एकदोनदा गर्लफ्रेंडसमोर वापरला आणि तिनेही थोबडावून तो सोडवला.

या शिवीगाळीचा जो काही थोडाबहुत अहंकार मनी वसला होता तो हॉस्टेलमधील काही उडाणटप्पू उत्तरभारतीय मुलांसमोर गळाला. आपल्याकडे व्याकरणाचे संस्कार पाळत संधी समास करत शिव्या दिल्या जातात. ज्यांचा थेट अर्थ पोहोचत नाही, पोहोचलाच तरी भिडत नाही. त्यांच्या शिव्या मात्र फोड केलेल्या असायच्या. ज्या ऐकायलाही किळसवाण्या वाटायच्या. देणे तर दूरची गोष्ट.
असो, तर त्यांच्याशी मी कॉम्पिटीशन करायला गेलो नाही हे एक चांगलेच झाले.

आज माझ्या गर्लफ्रेंडला किंवा ऑफिसमधील कलीग्जना मी सांगतो की मी असा आहे वा असा होतो. शिव्यांचे नुसते अर्थच माहीती आहेत असे नसून सफाईतपणे शिवीगाळही करू शकतो. तर त्यांना हे खोटे वाटते. पण मग त्यांचा विश्वास बसावा म्हणून दोनचार सॅंपल शिव्या देण्याचा मोह मी देखील आवरतो.
कारण आज त्या शिव्या खटकतात. शिव्यांच्या या बाजारात आईबहिणींचा उद्धार केला जातो हे खटकते. कारण आज त्या सवयीने सहज येत नसल्याने त्या तोंडात यायच्या आधी त्यांचा अर्थ डोक्यात येतो आणि मग शब्द अडखळतात.

पण या उद्धारावरून आठवले. तीर्थरूपांचा उद्धार करण्याचीही एक पद्धत होती. दहापैकी चार जणांना तरी चिडवायचे नाव म्हणून त्याच्या वडीलांचे नाव असायचे. त्यातही कोणाच्या वडीलांचे नाव शंकर, दिगंबर, पांडुरंग असे धार्मिक असेल तर हमखास त्याच नावाने हाक मारली जायची. लॉजिक शोधायला जाऊ नका पण असे व्हायचे. यातही सोयीनुसार दिगंबरचे दिग्या आणि पांडुरंगचे फक्त पांडू व्हायचे. ज्या कोणाच्या वडीलांचे नाव प्रकाश असेल त्याला तर आयुष्यभरासाठी पक्या हे टोपणनावच पडायचे. माझ्या शाळा, कॉलेज आणि बिल्डींगमधील तीन विविध ग्रूप्समध्ये असे तीन पक्या होते. आणि मी त्यांना पक्या सोडून आजवर कुठलीही दुसरी हाक मारली नाही. याचाही एक किस्सा आहे. विषय निघालाच आहे तर सांगतो,

कॉलेजात असतानाची गोष्ट. सिनेमाचा की अभ्यासाचा प्लान बनत होता. फोनाफोनी चालू होती. सगळ्यांकडेच मोबाईल नसायचा. कोणाचा असला तरी लागेलच याची खात्री नव्हती. तर पक्या म्हणूनच ओळखल्या जाणार्‍या एका मित्राचा मोबाईल लागत नव्हता. त्याच्या घरचा नंबर होता म्हणून मी लॅण्डलाईन फिरवला. समोरून त्याच्या आईने फोन उचलला. मी सवयीनेच उच्चारलो, "पक्या आहे का?.."
ती माऊली थोडावेळ गोंधळली. मग म्हणाली, नाही ते आता ऑफिसला गेलेत. आपण कोण? मी फोन कट!

किस्से बाय किस्से आठवले तर बरेच निघतील, पण तुर्तास एवढेच .. कारण सध्या संस्कारक्षम लोकांमध्ये वावरतोय, फार काही लिहिल्यास हा फेकतोय असा भ्रम लोकांमध्ये निर्माण होतो. त्यामुळे ते किस्से माझ्या आत्मचरीत्रासाठी राखून ठेवतो. सध्या माझ्यातील वाईट सवय, दुर्गुण क्रमांक तीन अधोरेखित करायला ईतके पुरेसे ठरावे.

लेख विस्कळीत झालाय खरा, पण आठवणी अश्याच बाहेर येऊ द्यावात. मी माझ्यावर कधी संस्कार करायच्या भानगडीत पडलो नाही, तर लेखावर का करावे Happy

बस्स आपलाच,

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोनाली धन्यवाद,
शिव्यांची गरज असते असा अर्थ काढू नका, तर जिथे दिल्या जातात त्यांना शिव्या म्हणून बघितले जात नाहीत असा अर्थ घ्या. अर्थात हे त्याचे समर्थन नाही देत आहे.

बाकी आत्मचरीत्र थोर पुरुषांनी, सेलिब्रेटींनी, यशस्वी लोकांनीच लिहावे असा नियम तर नाही. माझ्यासारख्या सामान्य माणसालाही त्याच्या आयुष्यात कित्येक चढऊतारांचा सामना करावा लागतो, रोजच्या जगण्यात झगडावे लागते, कित्येक रोमहर्षक प्रसंगानी अन सनसनाटी घटनांनी आपलेही आयुष्य सजले असते.. बस तेच कधीतरी लिहून काढले की झाले आत्मचरीत्र .

बाकी आत्मचरीत्र थोर पुरुषांनी, सेलिब्रेटींनी, यशस्वी लोकांनीच लिहावे असा नियम तर नाही. माझ्यासारख्या सामान्य माणसालाही त्याच्या आयुष्यात कित्येक चढऊतारांचा सामना करावा लागतो, रोजच्या जगण्यात झगडावे लागते, कित्येक रोमहर्षक प्रसंगानी अन सनसनाटी घटनांनी आपलेही आयुष्य सजले असते.. बस तेच कधीतरी लिहून काढले की झाले आत्मचरीत्र .>>>अगदी पटले. म्हणूनच 'व्वा!!' म्हटले मी. उपरोधाने नव्हते लिहिले ते.

ऋन्मेऽऽष तुमचे शारीरीक वय २०१५ मध्ये २५ वर्षे होते (संदर्भः- http://www.maayboli.com/node/52264) ते आता २०१६ मध्ये घसरून २२ कसे झाले? बौद्धिक / मानसिक वय घसरणे तुमच्याबाबत समजुन घेता येईल पण शारिरीक वय ते कसे काय घसरवले?

Thanks Nidhiiji

एकटा? वह अकेला सौ सौ मायबोलीकर्सके बराबर हाय. तसेही ज्यांचे शारिरीक वय २५++ असुनही मानसिक / बौद्धिक वय १० असते अशा प्रादेशिक मनोरुग्णालयातल्या व्यक्तिंना आवरायला कित्येक कर्मचार्‍यांचा फौजफाटाही पुरेसा होत नाही.

ऋन्मेऽऽष तुमचे शारीरीक वय २०१५ मध्ये २५ वर्षे होते (संदर्भः- http://www.maayboli.com/node/52264) ते आता २०१६ मध्ये घसरून २२ कसे झाले?
>>>

मी मायबोलीचा शाहीद आफ्रिदी आहे Happy

बाकी तुम्ही जी लिंक उत्खनून पकडली आहे, ते जबरी ..

ऋन्मेष २५ चं २२ कसं झालं पण?

पुढच्या धाग्याचे नाव 'वाईट सवय- खोटं बोलणं' (नवीन भाषेत फेकंफाक, लपेटणे) तर नाहीयेना ;). हलके घे.

अन्जू तुम्ही सिक्रेटी फोडा आणि वर हलके घ्या बोला Happy

बादशाह,
आफ्रिदीचे वय बरेच काळापर्यंत १७ च होते, मग बरेच काळापर्यंत १९ च होते, मग बरेच काळापर्यंत २३ च होते, वगैरे वगैरे ... अश्या आख्यायिका आहेत. खरे खोटे अल्लाह जाणे.

शिव्यांचा विषय आणि जब वी मेट मधला तो प्रसंग कसा कोणाला आठवला नाही ज्यात करिना कपूर आपल्या बॉफ्रेला शिव्या घालते आणि मग तिला मोकळं मोकळं वाटू लागत Proud Lol
शिव्यांचा असाही उपयोग होतो हे तेव्हा समजलं Wink कॉलेजात असताना निकालले अपनी भडास असा वाक्यप्रचार प्रचलित होता . त्यात बरेचसे सिनियर्स शिव्या वगैरे सरार्स वापरत . अर्थात त्या शिव्या आणि नंतर ऐकलेल्या , सिनेमात पाहिलेल्या शिव्यात जमीन आस्मानच फरक होता .
आमच्या कोकणात रांडेचा हा शब्द सरार्स वापरला जातो. मला स्वतःला ऑकवर्ड वाटलेलं पहिल्यांदा ऐकलं तेव्हा . सो कोण कुठे कन्फर्टेबल असेल त्यावरून इम्पॅक्ट ठरत असावा

बाकी शिव्यांचा विषयावरून www.misalpav.com/node/11148 या लेखाची आठवण झाली

शाळेत प्रमेय सिध्द करताना असेच सिध्द करतात. क्ष जर य सारखा असेल आणि क हा क्ष सारख्या कोनात वळत असेल तर य आणि क हे सारखे आहे हे सिध्द होते.
रुन्मेश सुध्दा मन मोक़ळे करण्याकरीता शिव्या देतो बाकी त्याचे मन गंगेसारखे स्वच्छ निर्मळ आहे. जसे करिनाचे आहे Wink

जाई @ करीना, जब वुई मेट.. अरे हो की रे..
आणि हिट शॉट होता तो. कोणालाही आवडतोही आणि पटतोही.

बाकी आमचेही कोकणच .. आणि ईयत्ता सातवीत मी पहिल्यांदा स्टे साठी कोकणवारी केली तेव्हा मी सुद्धा उडालेलोच. अगदी आपण शहरातले खूप मोठे टपोरी आहोत हा अहंकार गळून गेलेला जेव्हा आज्जी आजोबा लोकांच्या तोंडून आपल्या आईसमोर असताना बिनधास्त बेधडक या शिव्या ऐकलेल्या...

अरे काल परवाचा प्रसंग!
मी गाडीवरून ऑफिसला चाललेले तर एका नालायक कार्ट्याने मला डॅश दिली. मॅड प्लेजर चालवत होता समोरच्या डिक्कीवर पाय ठेवून आणि मला कट मारून चाललेला. कट फसला आणि मला धक्का लागला आणि मी पडले Sad
माझी गाडी स्लो होती म्हणून मला फारसं लागलं नाही आणि कुठे सकाळी सकाळी वर्षाच्या शेवटच्या दिवशी वाद घाला म्हणून मी दुर्लक्ष करून शांतपणे पुढे निघाले तर तो मुलगा मलाच शिव्या द्यायला लागला.
गाडी नीट चालवता येत नाही का वगैरे वगैरे म्हणत होता तोपर्यंत मी पण लक्ष दिलं नाही म्हणून तो आणखीनच उचकला आणि डायरेक्ट शिव्यांवर घसरला.
मी शांत शब्दात त्याला सांगितलं की गाडी बाजुला घे. त्याला वाटलं हिरोच झाला आता तो. आमच्यात जरा बाचाबाची झाली तशी त्याने पुन्हा एक शिवी दिली आणि माझी सटकली. तो दमत नाही तोपर्यंत शिव्या घातल्या त्याला भरे बाजार में Wink तशी जनता जमा होईला सुरुवात झाली. एक काका मला म्हणाले "तू तरी जाऊ देत ना बाळा. अशा भर रस्त्यात शिव्या देऊ नयेत". तशा एक काकू म्हणाल्या "तिला काय बोलताय या भ**ला बोला ना आणि मग जनताही मला सपोर्ट करायला लागली तसा तो मुलगा टरकला. आणि सॉरी बिरी म्हणून निघून गेला.
पहिल्यांना मला मनापासून मी भोसरीत लहानाची मोठी झाले याचा अभिमान वाटला Proud

अर्थात मला ओळखणार्‍या बर्‍याच जणांनी 'तू आणी शिव्या????? काय माकडा,बावळता,इडियटा वगैरे म्हणाली असशील' अशी प्रतिक्रिया दिलीये. त्यांना मी फक्त एक स्माईल दिली Wink

@ऋन्मेऽऽष: "बोट " दाखवणे, किन्वा विशिष्ट अंग विक्षेप करणे हि शिव्यांची पहिली पायरी आहे कि नंतरची?
खुलासे वार लिहिल्यास अजुन उत्तम. Proud

रीया Rofl भारीच.
जाई, रांडेच्या वरून आठवलं. बाबांची आत्या कोकणात रहायची. ती आमच्याकडे आली असताना, घरात एक उंदीर शिरला. तर आत्याबाई हातात मिळेल ती काठी घेऊन त्याच्या मागे, हाताने आणि तोंडाने मारा चालू. तो बाथरूम मध्ये शिरला, आमची आजी म्हणाली आता त्या उंदराच आणि बाथरूम मध्यल्या बाटल्यांचं काही खरं नाही. तसचं झालं.
तर संध्याकाळी वर राहणारे आजोबा सांगत होते, त्याची नात त्यांना विचारात होती, की रांडेच्या म्हणजे काय? उंदराला रांडेच्या का म्हणतात? एकदम हहपुवा.

वस्त्रहरण नाटकामध्ये मच्छिंद्र (च्यायला हा शब्द टायपताच येईना) कांबळी कित्येक वेळा "मायझंया" शब्द वापरायचे. कोणालाही काही आक्षेप असलेल्याचे माझ्या पाहण्यात नाही.

कोकणात ? ही जगप्रसिध्द शिवी कोल्हापुरची आहे. चौका चौकात गल्लो गल्लीत तुम्हाला फिरताना सहज ऐकाला मिळेल

माझ्यामते रांडेच्या ही शिवी कोकण कोल्हापूर दोन्हीकडे वापरली जाते. कोल्हापूरात रांगडेपणा असतो तर कोकणात गोडवा.

रीया.. भारी..
तू काय काय शिव्या दिल्या असशील तुलाच ठाऊक.. मात्र तुझा आवेश इमॅजिन करू शकतो Happy

मायझंया आणि भैनिकxxऱ्या हि भेंचोx आणि मादxxx ची मालवणी रूपं आहेत. अगदी सर्रास वापरले जातात. आई-वडील स्वतःच्या मुलाला सुद्धा देतात.

चूxया आणि भोxxच्या या शिव्यांचे अर्थ अर्ध्याधिक जणांना माहीतच नसतात. शिव्या देताना काहीच वाटायचं नाही पण जेंव्हा अर्थ कळला तेंव्हा बधिरच झालो.

Pages