कामाच्या ठिकाणी जेंव्हा एक महिला कर्मचारी एका पुरुष कर्मचार्याविरुद्ध "जवळपास कोणी नसताना स्टेअरिंग अॅट बॉडी पार्ट्स वुईच मेड मी अन्कंफर्टेबल" अशी तक्रार करते, तेंव्हा त्यात तथ्य आहे की सदर महिला कर्मचारी वैयक्तिक द्वेष, असूया, हेवा, टाईमपास/कामचुकारपणा करण्यावर बंधने आणली गेल्यामुळे किंवा इतर काही कारणांसाठी धडा शिकवण्यासाठी सदर आरोप करत आहे, हे कसे ठरवतात? अशा परिस्थितीत खरोखरच जर तो पुरुष दोषी नसेल तर तो हे सिद्ध कसे करू शकतो? की पुरुषाला नेहमीच "तिने तक्रार करण्याइतपत धाडस दाखवले आहे, याचा अर्थ तूच दोषी आहेस" हा न्याय पदरी घेऊन पुढचे परिणामांना आणि पडसादांना तोंड द्यावे लागते? व्यावसायिक पातळीवर अशा तक्रारीतील तथ्य कसे जोखले जाते?
तथ्य तक्रारीतही असू शकते, ही शक्यता नाकारण्याचा अजिबात हेतू नाही. पण अशा तक्रारींमध्ये नेहमीच तथ्य नसते, हीही एक शक्यता आहे आणि त्या शक्यतेबाबत वरील प्रश्नांची उत्तरे / चर्चा वाचायला आवडेल.
इथे "जवळपास कोणी नसताना" असे असल्याने जंगल में मोर नाचा किस ने देखा? या परिस्थितीत कोण खरे? कोण खोटे? हे कसे ठरवतात?
उदय +१ स्वतःचे चारित्र्य
उदय +१
स्वतःचे चारित्र्य निष्कलंक ठेवले तर असे खोटे आरोप झाले तरी त्यावर विश्वास ठेवणारे लोक जास्त असणार नाहीत.
आपले वर्तन चांगले
आपले वर्तन चांगले ठेवावे
न्यूट्रल प्रतिमा असावी
>>>>>+१
'बेनिफिट ऑफ डाऊट्स' फार वाईट
'बेनिफिट ऑफ डाऊट्स' फार वाईट नेहमी घातच होतो किमान वर नमुद केलेल्या धाग्यातल्या प्रश्नाबाबतीत तरी. यासाठी वेळोवेळी काऊंसेलिंग व्हायला हवे. दररोज काम करताना काय काय सहन करावे लागते किंवा कोण कसे वागते यासाठी एक बंद पाकिट तक्रारीची व्यवस्था हवी आणि त्यानंतर योग्य प्रकारे त्याचं काऊंसेलिंग व्हावं म्हणजे नेमकं कुठे पाणी मुरतंय याचा किमान अंदाज येऊ शकतो. मग योग्य ते पुरावे तपासून योग्य ती कारवाई व्हायला हवी.. बर्याच ऑफिसेस मधे काऊंसेलिंग होत असल्याचं माझ्या ऐकिवात आहे.
बाकी तक्रार, न्याय , शिक्षा या सगळ्या मॅनेजेबल गोष्टीच आहेत कि.. नाही का ?
मुळात कंपनीमधील Internal
मुळात कंपनीमधील Internal Complaints Committee ही खूपच trained, skilled and competent असायला हवी. Sexual Harassment of Women at Workplace (Prevention, Prohibition and Redressal) Act, 2013 चा सखोल अभ्यास ह्या कमिटीने केलेला असावा. ह्या कमिटी मधे किती लोक असावेत, त्यात महिला सदस्या किती असाव्यात, एन जी ओ महिला सदस्येचा समावेश ई. बरेच नियम आहेत.
कंपनीने सुद्धा वरचेवर कामगारांचे training घेणे, लैंगिक छ्ळ म्हणजे काय (ह्या कायद्याखाली) हे माहित करून देणे, अशा आणि ईतर बाबी गोष्टी करणे अपेक्षीत आहे. ह्या कायद्याखाली अशा केसेस कशा निवारण करायच्या ह्याची व्यवस्थित नियमावली दिलेली आहे. हा कायदा frivolous complaints दिल्या तर त्याविरुद्ध काय अॅक्शन घेता येईल हे सुद्धा सांगतो. तुमची कंपनी आणि Internal Complaints Committee ह्यावर बर्याच गोष्टी अवलंबून आहेत.
<<<कारण अशा केसेस कायम
<<<कारण अशा केसेस कायम गोपनियच असतात. गोपनियच ठेवतात. >>>
<<<तुम्ही प्रश्न विचारला आहे तो अशी कुठली तरी घटना घडलेली तुमच्या पाहण्यात आहे ( ज्यात पुरुषाचा दोष नाही ) म्हणून का अशीच जनरल विचारणा ? >>>
सुजा, किती विरोधाभास आहे तुमच्या पोस्ट मध्ये!
ज्या अर्थी कुणी तरी तक्रार करतंय त्या अर्थी काही तरी वितुष्ट आहे दोघांमध्ये त्यामुळे एकाच टीममध्ये ठेवून आणखी कॉम्प्लिकेशन वाढवण्यापेक्षा मुलाला दुसर्या टीममध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला असावा. माझ्या मते हे फेयर इनफ आहे. >>> त्या मुलाऐवजी त्या मुलीला दुसर्या टीममध्ये पाठवले असते तर ते फेअर झाले असते. कारण जेंव्हा काहीही कारण नसताना एखाद्याची प्रोजेक्ट्वरून उचलबांगडी होते तेंव्हा कान टवकारले जातातच. लोक अलिप्त राहतात अशी भोळसट समजूत कोणाचीच नसावी. अती चौकस लोक कुठूनही माहिती मिळवतातच. बातमी लीक होतेच. मग त्याचा त्रास त्या मुलाला कशाला? १०० गुन्हेगार सुटले तरी चालेल पण एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये हे कायद्याचे तत्व आहे. इथे तर काहीच सिद्ध झालेले नाही, कसलाच पुरावा नाही. मग त्या तत्वाला मुरड का घातली गेली ?
निव्वळ कुणी एका व्यक्तीने तक्रार केली आहे म्हणुन कारवाई होत नाही असे अनेकांचे म्हणणे आहे. हो, पुराव्याशिवाय त्या पुरुषाला काढून टाकत नाहीत. पण काही तरी कारवाई होतेच - जसे वॉर्निंग देणे, प्रोजेक्ट बदलणे ई. बर्याच पोस्ट मध्ये ते नमुद केले गेले आहेच. मग गजाननने म्हटल्याप्रमाणे -
<<<चूक नसताना एखाद्याकडे संशयाची सुई येईल अशी ऑफिशियल कारवाई करण्यामुळे येणारा मानसिक आणि कौटुंबिक तणाव, मानसिक खच्चीकरण, वैताग, नोकरी जाण्याची आणि दुसरी मिळवताना येणार्या अडचणींची संभाव्यता इ. मुळे एखादा उध्वस्त होऊ शकतो. >>> हे कोणाला जाणवतच नाहीये का?
स्वाती२ चे पटले. गजानन,
स्वाती२ चे पटले.
गजानन, तुमच्या प्रतिसादातुन मलातरी जाणवले की, तो मुलगा दोषी नाही हे तुम्हाला पक्के माहीत आहे आणि ती मुलगीच मुद्दाम करते आहे हे ही.
त्यामुळे स्वाती म्हणतात तसे लक्ष ठेउन पुरावे गोळा करुनच कारवाई केलेली दोन्ही बाजुसाठी बरोबर वाटते. पण वाईट नजरेने पहातो हे सिद्ध करणेही अवघड आहे. अजुन मुलींना तो अनुभव असेल तर शोधावे लागेल.
तसेच समजा एकाचीच चूक असेल तर दोघांनाही ताकीद कशाला?
माधव विरोधाभास काय ते समजले
माधव विरोधाभास काय ते समजले नाही. उलगडून सांगणार का ?
मी गजानन यांना विचारलेल आहे << अशी कुठली तरी घटना घडलेली तुमच्या पाहण्यात आहे ( ज्यात पुरुषाचा दोष नाही ) म्हणून का अशीच जनरल विचारणा ? >>> कदाचित त्यांच्या जवळच्या कलीग च्या बाबतीत /मित्राच्या बाबतीत अशी घटना घडलेली असण्याची शक्यता असावी म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारला आहे कि अशीच एक विचारणा हे मला विचारायचं आहे.कारण अशा प्रकारचा प्रश्न अचानक डोक्यात येण्यामागे बरेचदा अशी घटना ऑफिस मध्ये घडलेली असू शकते. यात विरोधाभास काय ते खरच कळल नाही
इथे "जवळपास कोणी नसताना" असे
इथे "जवळपास कोणी नसताना" असे असल्याने जंगल में मोर नाचा किस ने देखा? या परिस्थितीत कोण खरे? कोण खोटे? हे कसे ठरवतात?>>>>>>
१. ही classic he said, she said ची केस आहे. पण या केस मधे Advantage is for the victim.
२. साधारण एकदा अशी गोष्ट झाल्यावर कोणी तक्रार करत नसतील. जर Repetitive pattern असेल तर तक्रार केली जाते. (Here I am excluding the possibility of a false complaint made out of personal grudge).
३. जे तुम्ही describe केले आहे ते कदाचित इतर व्यक्तींबाबतही घडत असेल. जर त्या व्यक्तीही पुढे आल्या तर ते victim ची बाजु भक्कम व्हायला सहाय्यक होउ शकते.
४. अशा केस मधे साधारण victims या गोष्टी काही जवळच्या colleagues बरोबर शेअर करत असतात आणि त्यांनी अशा काही गोष्टी observe केल्या असण्याची शक्यता आहे.
५.अशा व्यक्तीला दुसर्या टीम मधे पाठवणे किती उपयुक्त आहे कळत नाही कारण ही गोष्ट परत होणार नाहीच याची गॅरंटी नसते.
दोन्ही बाजुंची बाजु ऐकुन कारवाई करणे हे योग्य आहे.
आपल्या कामाच्या ठिकाणी वर्तन कसे असावे हे सुशिक्षित लोकांना सांगायला लागावे यासारखे दुर्दैवी आणखी काय असेल? Common sense is not common हेच खरे.
सुजा, तुम्ही म्हटल्याप्रमाणे
सुजा, तुम्ही म्हटल्याप्रमाणे अशा केसेस कायम गोपनियच असतात, गोपनियच ठेवतात - पण ते फक्त कागदोपत्री.
तुम्ही ज्या प्रमाणे गजाननला अधिक माहिती विचारली तसेच वास्तवातही घडते. लोक खोदून खोदून माहिती काढतात. तेच मला सांगायचे होते. तुमची चूक वगैरे दाखवायचा जराही उद्देश नव्हता. तसे वाटले असल्यास क्षमस्व.
माधव. अरेच्या क्षमस्व काय ?
माधव. अरेच्या क्षमस्व काय ? काहीतरीच. असो
टाळी एका हाताने वाजत नाही आपण
टाळी एका हाताने वाजत नाही
आपण काही केल्याशिवाय कोणी त्रास देत नाही
Pages