How does he prove?

Submitted by गजानन on 22 December, 2015 - 08:31

कामाच्या ठिकाणी जेंव्हा एक महिला कर्मचारी एका पुरुष कर्मचार्‍याविरुद्ध "जवळपास कोणी नसताना स्टेअरिंग अ‍ॅट बॉडी पार्ट्स वुईच मेड मी अन्कंफर्टेबल" अशी तक्रार करते, तेंव्हा त्यात तथ्य आहे की सदर महिला कर्मचारी वैयक्तिक द्वेष, असूया, हेवा, टाईमपास/कामचुकारपणा करण्यावर बंधने आणली गेल्यामुळे किंवा इतर काही कारणांसाठी धडा शिकवण्यासाठी सदर आरोप करत आहे, हे कसे ठरवतात? अशा परिस्थितीत खरोखरच जर तो पुरुष दोषी नसेल तर तो हे सिद्ध कसे करू शकतो? की पुरुषाला नेहमीच "तिने तक्रार करण्याइतपत धाडस दाखवले आहे, याचा अर्थ तूच दोषी आहेस" हा न्याय पदरी घेऊन पुढचे परिणामांना आणि पडसादांना तोंड द्यावे लागते? व्यावसायिक पातळीवर अशा तक्रारीतील तथ्य कसे जोखले जाते?

तथ्य तक्रारीतही असू शकते, ही शक्यता नाकारण्याचा अजिबात हेतू नाही. पण अशा तक्रारींमध्ये नेहमीच तथ्य नसते, हीही एक शक्यता आहे आणि त्या शक्यतेबाबत वरील प्रश्नांची उत्तरे / चर्चा वाचायला आवडेल.

इथे "जवळपास कोणी नसताना" असे असल्याने जंगल में मोर नाचा किस ने देखा? या परिस्थितीत कोण खरे? कोण खोटे? हे कसे ठरवतात?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या ऑफिसात एका पुरुषाने एका महिलेविरुध्द sexual harassment ची तक्रार केली होती. त्याने पुरावा म्हणून तिने पाठवलेले इमेल्स, मेसेजेस दाखवले होते. तिला काढून टाकलं गेलं.
जनरली पुराव्याअभावी काही होत नाही.

अशा केसेसमधे पूर्वी उकळत्या तेलातले नाणे काढायला सांगायचे.
सोरटी सोमनाथला साप येऊन कौल देतो अशीही सोय होती पूर्वी.
अशा ब-याच कसोट्या होत्या, आता लक्षात नाहीत.

सनव, अशा घटना शक्यतो आडबाजूलाच घडतात, असे असताना पुरावे मिळतीलच असे नाही. मग जो घटनेचा बळी असेल (तो किंवा ती) त्याने पुराव्या अभावी गुमान बसावे का? मग दोषाची सुई नेहमी पुरुषाकडेच वळते का?

दीड मायबोलीकर, होय. पण सीसीटीव्हीच्या कव्हरेजलाही मर्यादा येणारच.

कुणीही साक्षीदार नसताना सिद्ध कसे काय होऊ शकते ?
अगदीच लावून धरली केस तर नैसर्गिक न्यायाचं तत्त्वं नेहमी लक्षात घेतलं जातं. तक्रार केली आणि लगेच शिक्षा झाली असं होईल का ?
व्यवस्थापन पण सदर कर्मचा-यांचं रेकॉर्ड पाहील ना ? त्या कर्मचा-याची सवयच असेल तर त्याला बोलावून कबूल करायला लावतील. त्यासाठी वेगवेगळे मार्ग स्विकारतील. पण तो कबूल झालाच नाही तर त्यांना काही करता येणं शक्य नाही. कारवाई झालीच तर मात्र त्याचा न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा राहील.

काही केलंच नसेल तरी वरीलप्रमाणेच.
http://www.academicmatters.ca/2011/10/false-allegations-of-sexual-harass...

http://www.legalanswers.sl.nsw.gov.au/guides/defend_yourself/evidence.html

एक दोन वेळा स्वतः मोबाईल वर चित्रण करा. मोबाईल लांब लपवून. ३-४ वेळा केल्यावर एकमधे तरी खरे काय आहे ते कळेल

ऑफिसमध्ये या गोष्टींत कमालीची गुप्तता बाळगतात त्यामुळे अशा काही तक्रारी कुणी केल्या तरी नक्की काय अ‍ॅक्शन घेतात सांगता येणार नाही पण आमच्या ओळखीतल्या एक जणांच्या रिपोर्टीच्या बाबतीत अशी केस झाली होती. पुरावा नाही आणि फिजिकली हर्ट केलं नाही म्हणून त्या मुलाला वॉर्निंग दिली गेली फक्त. काढून टाकलं नाही. मॅनेजरला सांगून त्याला वेगळ्या टीममध्ये हलवला होता. फेयर इनफ!

सिंडरेला, त्या मुलाने तसे खरेच केले होते का? खरेच काही केले असेल तर आणखी कडक अ‍ॅक्शन घ्यायला हवी होती.

पण जर का त्याने काहीच केले नसेल तर नॉट फेअर इनफ अ‍ॅट ऑल. जी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहचली ती ऑफीस्मध्ये पसरली नसेल का? त्याचा काहीच दोष नसताना?

एनीवे, बाफचा मुद्दा वेगळाच आहे. जर का अशी तक्रार केली तर (आणि त्यात तथ्य नसेल तर) पुरुष काय करू शकतात ?

भारतातले माहीत नाही. अमेरिकेत अशी हरॅसमेण्ट Severe and Pervasive आहे का हे बघितले जाते. एकदा असे बघणे बहुधा यात येणार नाही, पण तिच्या मॅनेजरला असे बदल करावे लागतील ज्यामुळे हे पुन्हा होऊ शकणार नाही. गजानन - पण इथे मॅनेजर किंवा एच आर म्हणून जर तू किंवा तुझ्या ओळखीच्यांपैकी कोणी जबाबदार असेल तर याची दखल घेणे व एच आर ला कळवणे आवश्यक आहे.

सनव, अशा घटना शक्यतो आडबाजूलाच घडतात, असे असताना पुरावे मिळतीलच असे नाही. मग जो घटनेचा बळी असेल (तो किंवा ती) त्याने पुराव्या अभावी गुमान बसावे का? मग दोषाची सुई नेहमी पुरुषाकडेच वळते का?

अनेक वेळा पुराव्याअभावी गप्प बसावं लागतंच. किंवा जयंतने लिहिल्याप्रमाणे हुशारी दाखवून व रिस्क घेऊन मोबाईल चित्रिकरण वगैरे करावं लागतं. अशीही एक केस माहीत आहे जिथे प्रचंड मनस्ताप होऊनही काही करता आले नाही कारण पुरावा शून्य होता.

तक्रार स्त्रीने केली असल्याने काही सिद्ध करायची जबाबदारी तिचीच आहे. काही ठोस पुरावा असल्याशिवाय मॅनेजमेंट कडक किंवा कुठलीही अ‍ॅक्शन घेत नाही. तरीही जर संशय असेल आणि जागा बदलून प्रश्न सुटणार असेल तर तसे केले जाते. अर्थात यात पुरुषाची बदनामी हा फॅक्टर येऊ शकतो. पण माझ्यामते अश्या बाबतीत आपल्या चांगल्या वर्तनाने आपली चांगली इमेज बनवायची जबाबदारी पुरुषांवरच राहणे योग्य.

जी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहचली >>>> मी त्या ऑफिसमध्ये काम करत नव्हते, ओळखीत घडलेली घटना आहे. ज्यानं सांगितली त्यानं सुद्धा चर्चेच्या ओघात आणि त्या मुलाचं नाव न घेता सांगितली.

त्या मुलानं असं केलं किंवा नाही हे सिद्ध करायला काहीच मार्ग नाही. काहीच कारवाई केली नाही तर त्या मुलीवर अन्याय आणि एकदम काढून टाकलं तर त्या मुलावर अन्याय. ज्या अर्थी कुणी तरी तक्रार करतंय त्या अर्थी काही तरी वितुष्ट आहे दोघांमध्ये त्यामुळे एकाच टीममध्ये ठेवून आणखी कॉम्प्लिकेशन वाढवण्यापेक्षा मुलाला दुसर्‍या टीममध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला असावा. माझ्या मते हे फेयर इनफ आहे.

ज्या अर्थी कुणी तरी तक्रार करतंय त्या अर्थी काही तरी वितुष्ट आहे दोघांमध्ये त्यामुळे एकाच टीममध्ये ठेवून आणखी कॉम्प्लिकेशन वाढवण्यापेक्षा मुलाला दुसर्‍या टीममध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला असावा. माझ्या मते हे फेयर इनफ आहे.>> पण कुजबुज स्वरुपात जेव्हा ही गोष्ट पसरेल तेव्हा दोष त्या मुलालाच दिला जाईल किंवा गेला असेलही. पुरावा देण्याची जबाबदारी फिर्यादीची असावी किंवा मॅनेजमेंटने पुरावा गोळा केला पाहिजे. मग ते छपुन रेकॉर्डींग करणे असो वा इतर काही मार्गाने,

Gentlemen should not find himself in the position of being alone with any female collegue just like ladies should not be out of home after 7pm.

Gentlemen should not find himself in the position of being alone with any female collegue just like ladies should be out of home after 7pm.>>>> हे शक्य नाही हो आजच्या काळात. कैक वेळा असे प्रसंग येऊ शकतात, येतातच रादर. स्त्रीला एकटीला टूरवरही जावे लागते पुरुष सहकार्‍याबरोबर.

९ ते ५ हे कल्चर राहिलेच नाही आता.

Now that is problem of the concerned lady. There onus is on the lady to take care of herself. Here I am talking about the onus of the gentlemen about not getting into such a situation in the first place.

In above scenario nothing is actually happened. However, it's not difficult for HR to find if other ladies also feels uncomfortable around this person. The accusation is only about making uncomfortable.

मी जे म्हणतेय ते पुरुष सहकार्‍यालाही लागू होतंच. तेही नाही टाळू शकत प्रत्येक वेळेस असे प्रसंग.
अगदी प्रत्येक वेळेस नाही पण क्वचित असे प्रसंग येऊ शकतातच.

Gentlemen should not find himself in the position of being alone with any female collegue just like ladies should be out of home after 7pm >>> आपल्या घरी ठीक आहे, ऑफिसमधे काका मामा बसलेत कि काय, फिमेल आहे तिथे एकटी, म्हणून कामाला नकार द्यायला ?

Gentlemen should not find himself in the position of being alone with any female collegue just like ladies should be out of home after 7pm >>>

लेडिज शूड बी ऑट ऑफ होम आफ्टर सेव्हन पी एम!
सिरीयसली?
सात नंतर बायकांनी घराच्या बाहेर जायचं?

बर्याच ऑफिस मध्ये अशा घटना घडत असतील आमच्याही ऑफिस मध्ये घडल्या पण पुराव्या अभावी अक्शन घेत नाहीत. शक्यतो. बाईला पटवून दिल जात किव्वा खात्री दिली जाते कि या पुढे तो अस करणार नाही. ताणू नकोस. त्याला शक्यतो लेखी माफी मागायला लाऊन आणि पुन्हा अस करणार नाही अशी त्याच्याकडून लेखी खात्री घेऊन सोडून दिल जात. त्याच करियर बरबाद करत नाहीत किव्वा नसावेत. खर तर या सगळ्या गोपनीय गोष्टी असतात. . त्यामुळे ऐकीव माहितीच लिहिली आहे Happy

या ७ वरून आठवले. आमच्या ऑफिसमध्ये नुकताच नियम झालाय एक्स्ट्रा वर्किंगचा.
पुरुष ९ पर्यंत आणि महिला ७ पर्यंत. त्यापुढे काम नाही करू शकत तुम्ही.

त्याला शक्यतो लेखी माफी मागायला लाऊन आणि पुन्हा अस करणार नाही अशी त्याच्याकडून लेखी खात्री घेऊन सोडून दिल जातं <<<<<<

पुन्हा?? मुळात त्याने असे केलेले नसताना, त्याचे काहीही पुरावे नसताना, त्याने ते केले आहे हे गृहीत धरून, ते त्याला स्वीकारायला लावून, पुन्हा असे करणार नाही (?!!!) हे कबूल करायला लावून, लेखी माफी (!!!) लिहून घेणे इ. मध्ये त्याच्या बाजूने त्याने किती पडते घ्यायचे? शिवाय करिअरच्या रेकॉर्डला ही घटना कायमची चिटकून राहणार ते वेगळेच. का? तर तो पुरुष आहे म्हणून? पुरावे नसतानाही त्याने माफी का मागायची? पण असे वाटतेय की बहुतेक पुरावे नसल्याने आणि तो पुरुष असल्याने यातून मुकाटपणे जाण्याशिवाय आणि पडसाद पचवण्याशिवाय दुसरा काही मार्ग नसावा.

पुरावे नाहीत तर महिला कर्मचारीही दोषी असण्याची तितकीच शक्यता असणार. तिनेही केवळ बदनामीच्या हेतूने तक्रार केली असण्याची शक्यता असणार. मग पुन्हा असे करणार नाही, वगैरे तिच्याकडूनही माफी इ. लिहून घेतली जाते का?

.

गजानन, असं झाल्यास त्या पुरुष कर्मचार्‍याकरताही बरोबर नाहीच. काहीच चूक नसताना आणि निर्दोष असताना त्याने माफी का मागावी? त्या स्त्रीला पुरावे मागावेत हा एकमेव उपाय वाटतो.

पुराव्या शिवाय कारवाई नाही करता येत. तक्रार करणार्‍या व्यक्तीने पुरावे द्यायचे असतात. तसेच चौकशीचा भाग म्हणून मॅनेजमेंट देखील लक्ष ठेवून पुरावे गोळा करते. यासाठी काही काळ द्यावा लागतो. पुरावे नसताना केवळ तो पुरुष आहे म्हणून किंवा ती स्त्री एवढे बोलायचे धाडस करतेय म्हणजे खरेच असणार वगैरे बायस्ड विचारांचा आधार घेत कारवाई करता येत नाही. तो पुरुष आहे तेव्हा त्याने आपण दोषी नाही हे प्रुव करावे असे करता येत नाही. आरोपी स्त्रीने पुरावे सादर केल्यावर त्याचे खंडन म्हणून पुरुषाने त्याच्या बाजूने पुरावे देणे वेगळे. पण पुरावे देण्याची मुख्य जबाबदारी आरोप करणार्‍या व्यक्तीची.

पण अशा केसेस विरळा असतात गजानन. काही क्षेत्रात स्पर्धा, स्कोअर सेटलिंग . इ. तून होते असेल. एक केस पाहण्यात आहे. तिथे त्या महिलेने कपडे अस्ताव्यस्त करून कमिटीकडे तक्रार केली होती. कमिटीत तीन स्त्री अधिकारी, एक युनियनची मुंबई आणि वरीष्ठ अधिकारी चेअरमन.

त्यांनी त्या विभागातल्या सर्वांच्या साक्षी घेतल्या. त्या बसच्या हाताखाली काय केलेल्या सर्वांचे मी घेतले. त्यातून ते महिला कामचुकार असून फायरिंग केली आणि वॉर्निंग लेटर दिलं म्हणून तक्रार केली असावी अशी माहिती उघड झाली. यापूर्वीही तिने महिला कर्मचार्यांजवळ याला धडा शिकव्ते, त्याला सरळ करते अशी धमक्या दिल्या होत्या.

त्यामुळे कमिटीने तिच्या आक्रस्ताळेपणाकडe लक्ष ना देता केस् मागे घ्यायला लावली. तिने कोर्टात जास्तच धमकी देऊन पाहिली, पण नोटीसच्या तारखेच्या नंतर तक्रार आल्याने तुझी केस वीक आहे तेव्हां जर कोर्टाने विरोधात निकाल दिला तर मग आमचा नाईलाज असेल असं सुचवल्यावर बाई शांत झाल्या.

( माफ करा - मोबाईलवरून टाईप करतांना नोटीस चं लॉटरी होणं हे प्रेडीक्शन्स ऑन असल्याने झालेलं. तसंच मधेच नेट गंडलं . पण चेक करताना पोस्ट करा वर क्लिक केल्यामुळे अर्धवट पोस्ट झाली )

आमच्या ऑफिसे मध्ये जी काही घटना घडली तेव्हा त्या बाई कडे पुरावे होते ते तिने दिले होते. म्हणून त्या पुरुषाला माफी मागायला लावली. हि सगळी ऐकीव माहिती .कारण अशा केसेस कायम गोपनियच असतात. गोपनियच ठेवतात. आणि हा जो काही तुम्ही प्रश्न विचारला आहे तो अशी कुठली तरी घटना घडलेली तुमच्या पाहण्यात आहे ( ज्यात पुरुषाचा दोष नाही ) म्हणून का अशीच जनरल विचारणा ?

सुजा, तुझ्या पोस्टमधल्या लागोपाठ आलेल्या वाक्यांवरून असे वाटते की काहीही पुरावे नसताना त्याला "असे पुन्हा करणार नाही." अशी लेखी माफी मागावी लागली.

स्पॉक, सायो, कापोचे, स्वाती, सुजा आणि इथे लिहिणारे सगळे, हो पुराव्याशिवाय कारवाई करणे चुकीचेच. उद्या ऊठसूठ कोणीही कोणाविरुद्धही तक्रार करणार. पुरावा सिद्ध झाल्यावर दोषी व्यक्तिला जेवढी कडक शिक्षा व्हायला हवी त्याच तोलामोलाची शिक्षा खोटे आरोप करणार्‍यांनाही व्हायला हवी. पुरावे नसतील तर आरोप खोटे की खरे हेच सिद्ध झालेले नसल्यामुळे कोणाही एकाला गृहीत धरून माफीनामे लिहून घ्यायची, ताकीद द्यायची गरज नाही. दोन्ही बाजूंना समोरासमोर बोलावून समान ताकीद द्यावी. चूक नसताना एखाद्याकडे संशयाची सुई येईल अशी ऑफिशियल कारवाई करण्यामुळे येणारा मानसिक आणि कौटुंबिक तणाव, मानसिक खच्चीकरण, वैताग, नोकरी जाण्याची आणि दुसरी मिळवताना येणार्‍या अडचणींची संभाव्यता इ. मुळे एखादा उध्वस्त होऊ शकतो.

निव्वळ कुणी एका व्यक्तीने तक्रार केली आहे म्हणुन (पुराव्याशिवाय कारवाई) होत नाही...

एक अन्तर ठेवुन बोलणे, चर्चा करताना चर्चेत केवळ दोनच व्यक्ती आहेत आणि कॅबिन बन्द ठेवावी लागणार आहे अशी परिस्थिती शक्यतो वर टाळणे. email, phone काम आटोपते घेणे. कामाच्या क्षेत्रात शक्यतोवर न्युट्रल प्रतिमा ठेवावी. अशा किमान काळज्या मी घेतो.

Pages