Submitted by हर्ट on 22 December, 2015 - 02:40
इथे कुणी नागनाथ इनामदार ह्यांचे "राऊ" हे पुस्तक वाचले आहे का? कसे आहे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे कुणी नागनाथ इनामदार ह्यांचे "राऊ" हे पुस्तक वाचले आहे का? कसे आहे?
आलमगीर' - इनामदारांची अजून एक
आलमगीर' - इनामदारांची अजून एक कादंबरी. औरंगजेबावर आहे.>>> इयत्ता सहावी तुकडी अ मधे असतांना वाचलेली. आता आठवण करून दिल्याबद्दल आभार.
अरेरे... काय इतिहासाची गळचेपी
अरेरे... काय इतिहासाची गळचेपी चालू आहे....
बी, मोडी लिपी मधे ध आणि मा हे खूप सारखे लिहिले जातात, सहजी फसगत होऊ शकते. मोडी लिपीचा अभ्यास कर जरा.
दुसर्या धाग्यावर तू जुनी कागदपत्र स्कॅन करा, त्या कागदपत्रांचे संकलन करा अशा टाईपचे काही सल्ले दिले आहेस. इतिहासकार जरी जुन्या काळावर अभ्यास करत ्सले तरी ते विचारांनी जुनाट नसतात, नाहीत. पेशवा दप्तर अतिशय सुयोग्य पद्धतीने जपलं जातय. अनेक अभ्यासक अजूनही ती कागदपत्र अभ्यासतात. प्रश्न आहे तो आर्थिक मदतीचा. तेव्हा असे सल्ले देण्यापेक्षा तू पुढाकार घेऊन एक मोठा निधी मिळवून दे बरं.
आणि सवाई माधवरावाने आत्महत्या नाही केली तापाच्या ग्लानीत तोल जाऊन ते खाली पडले असं कागदपत्रं सांगतात. त्यांनी आत्महत्या का केली असती? असे गैरसमज का होतात लोकांचे?
किमान अगदी किमान तिसरी ते दहावीची पुस्तकं तरी वाचा इतिहासावर काही ठामपणे लिहिताना ___/\___
अर्थात इतिहासावर कोणीही उठावं अन काहीही जोरकसपणे ठणकावून सांगावं ही आजकाल प्रथाच पडली आहे. तेव्हा असोच... चालू देत.
अर्थात इतिहासावर कोणीही उठावं
अर्थात इतिहासावर कोणीही उठावं अन काहीही जोरकसपणे ठणकावून सांगावं ही आजकाल प्रथाच पडली आहे. तेव्हा असोच. <<
+ १००००
ना. स. इनामदारांची राऊ शाळकरी
ना. स. इनामदारांची राऊ शाळकरी असताना वाचलिये. पण तेच नागनाथ हे आज कळ्ळ. तेंव्हा आवडली होती ती कादंबरी म्हणुन. पण इतिहासासाठी रेफरन्स म्हणुन आता पुन्हा ती वाचली जाईल याची शक्यता शुन्य.
अवल इथे बघ, ध आणि म दोन्ही
अवल इथे बघ, ध आणि म दोन्ही किती वेगळे आहेत. इतके सोपे नाहीच वाटत ध चा मा करणे.
बी आता तुझ्याकडून शिकू की काय
बी आता तुझ्याकडून शिकू की काय मी मोडी
अवल तुला येते का मोडी लिपी?
अवल तुला येते का मोडी लिपी? तेच ध चा मा चे वाक्य वाक्य लिहूण बदल करुन दाखव.
रच्याकने मोडी कशाशी खातात
रच्याकने मोडी कशाशी खातात माहितीतरी आहे का तुला? ती मराठीतली रनिंग लिपी आहे. म आणि मा वेगळा आहे मोडीत
लेखनसीमा.
मला माहिती नाही मोडी लिपी.
मला माहिती नाही मोडी लिपी. इथे अनेकांना मोडी लिपी माहिती नसेल. माझे वडील मोडी लिपितच लिहायचे म्हणून ती कशी दिसते हे माहिती आहे मला. तुला जर मोडी लिपी येत असेल तर तू ध चा मा चे वाक्य लिहून दाखव हे मी कुतुहुल म्हणून लिहिले. त्यात तुझा ईगो दुखवायचा नव्हता. तुला माझा टोन कळलेला दिसत नाही.
अॅडमिन, या भांडणार्यांना
अॅडमिन, या भांडणार्यांना ध(मा)रा आता!
घ्या! मी ही केला ध चा मा!
आत्महत्या की काय असे काहीतरी बहुदा. की तो दुसरा माधवराव? >>>
ह्यात ठणकावून इतिहास सांगितल्याचा आव आल्याचा वाटतोय का, अवल?
किंवा मग
तो दुसरा माधवराव किंवा सवाई माधवराव पेशवे. वयाच्या एकविसाव्या वर्षी आत्महत्या केली. त्यानंतर दुसर्या बाजीरावास पेशवेपद मिळाले.>>
नरेश ह्यांनी माझ्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात असे म्हटले त्याला उद्देशून तुझी ही वरची पोस्ट आहे का?
मला ह्या दोन्ही पोस्टींमध्ये असा काहीच आव वाटत नाहीये. बर्याच ऐतिहासिक घटनांचे कागदोपत्री पुरावे आहेत कुठे? बरेच प्रवाद प्रचलित आहेत. जसे की मस्तानी मूळात नाचणारीण होती की खरेच प्रिंसेस होती? बाजीरावांनी नर्मदेत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असाही एक प्रवाद आहे. मस्तानी बाजीरवांच्या मृत्यू ची बातमी ऐकून हाय खाऊन मेली असेही म्हणाणारे आहेत आणि तिने हिरा खाऊन आत्महत्या केली असेही म्ह्णणारे आहेत.
सोयराबाईंनी शिवाजीराजांना विषप्रयोगाने मारले असाही प्रवाद आहेच की.
आणि दुसर्या माधवरावांबद्दल मीही आत्महत्याच वाचल्याचे मला तरी स्मरते. आणि हे ठणकावून सांगत नाहीये.
माझ्या अत्यल्प स्मृतीला स्मरून लिहितेय.
निंबुडा, अग तू ठणकावलं नाहीच,
निंबुडा, अग तू ठणकावलं नाहीच, शंका व्यक्त केलीस ग
ठणकावणारे वेगळे
बरे बरे
बरे बरे
निंबे, आता येवुदेत एक धागा,
निंबे, आता येवुदेत एक धागा, इतिहासकालिन व्यक्तींचे अंत
हो परवा टीव्हीवर पण दाखवत होते मस्तानीच्या अंताबद्दल कुठेही ठोस माहिती नाहिये कुणी म्हणतात बाजीराव गेल्याची बातमी ऐकुन ती हाय खाऊन गेली. कुणी म्हणातात ती सती गेली. कुणी म्हणतात तिने हिरा चाटला असोच.
हाय खाल्ली/ हिरा खाल्ला... ध
हाय खाल्ली/ हिरा खाल्ला...
ध चा मा इथे ही झालेला असावा ऐतिहासिक दस्तऐवजात

आय मीन 'हाय' चा 'हिरा'
थोडक्यात काहीतरी खाल्ले आणि मृत्यु झाला.
हिरा चाटला
हिरा चाटला
बी, चापेकरांचं 'पेशवाईच्या
बी,
चापेकरांचं 'पेशवाईच्या सावलीत' आणि अ. रा. कुलकर्ण्यांची पुस्तकं वाच. बर्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील.
छान
छान
हिरा खाल्ल्यावर मरण येते का?
हिरा खाल्ल्यावर मरण येते का?
हिरा हा सर्वात कठीण व शार्प
हिरा हा सर्वात कठीण व शार्प पदार्थ असतो (काच कापायला हिरा लागतो). त्याचे पचन होत नाही. तो अन्ननलिका फाडत आत जातो.
असे म्हणतात.
अतिशय सरळ प्रश्नाला उगाच
अतिशय सरळ प्रश्नाला उगाच भांडणाचे वळण लावणा-यांचा आणि प्रश्नकर्त्याला मुर्ख ठरवणा-यांचा निषेध.
ध चा मा करण्यात खाडाखोड कशी लक्षात आली नाही हा अतिशय जेन्युईन प्रश्न आहे. मलाही पडला होता. (म्हणून नव्हे.)
त्यात फक्त मोडी बद्दल माहिती देउन थांबता आले असते.
लोक इतिहासाचा विपर्यासच करतात, जाओ जाके पैले मोडी सिखके आओ टाईप प्रतिक्रीया टाळता आल्या असत्या.
एखादा प्रश्न तुमच्या प्रचंड बुद्धिमत्तेला एवढाच फालतू वाटत असेल तर हे असे आरोप आणि प्रतिक्रीया देण्याचे तरी कष्ट कशाला घेता?
मोडी सोबतच आणखी महत्वाचा मुद्दा आहे की ते पत्र आनंदीबाईंनी स्वतः लिहिले होते ही माहिती. या अशा बारीक सारीक गोष्टी सगळ्यांनाच माहिती असतात असे नाही.
'बिगरी ते म्याट्रिक' हे
'बिगरी ते म्याट्रिक' हे पुलंचे पुस्तक आहे हे मला माहिती नव्हते.
ते माझं अतिशय आवडतं पुस्तक आहे. पुलंनी इतिहासावर फार कमी लिहिलंय पण या पुस्तकात शालेय विद्यार्थ्यांना समजेल असा इतिहास लिहिलाय. याशिवाय नारायणराव पेशव्यांवर त्यांनी लिहिलेला 'नारायण' हा लेख प्रसिध्द आहे. 'बिगरी ते म्याट्रिक' सध्या प्रिंटमध्ये नाहीये बहुधा.
स्पॉक , +१ हो आणखी मला मोडी
स्पॉक , +१
हो आणखी मला मोडी लिपी माहीती आणि तुला नाही म्हणजे तुझी अक्कल कशी कमीच, तु काय मला शिकवणार अशी विधाने उगीच्च.
इतरांना "ठणकावून इतिहास सांगतात म्हणणारे सुद्धा इतकं का ते ठणकवत आहेत इथे? जसे ते काय इतिहासाचे अगदी साक्षिदार होते का दोन चार पुस्तके वाचून?
राहता राहिला प्रश्ण , मुद्दाम्हून खोड्या काढून पोस्टी टाकून, अगदी आमचे विनोद कसे उच्च, तुझा दृष्टीकोण कसा कमी, जे काही फालतु कोट्या करू ते अगदी स्विकारच हा कहर.
एवढा जर समोरच्या माणसाचा दृष्टीकोन स्वतः सारखा उच्च नसेल तर इतर बीबी आहेत न ज्ञान पाजळायला व आपले विचार आणि बुद्धी दाखवायला.
https://en.wikipedia.org/wiki
https://en.wikipedia.org/wiki/Madhavrao_II
इथे विकिपेडिया एन्ट्री नुसार सवाई माधवरावांनी आत्महत्या केली. हे वाचून बहुतेक लोकांचा तसा समज होत आहे
<<हिरा हा सर्वात कठीण व शार्प
<<हिरा हा सर्वात कठीण व शार्प पदार्थ असतो (काच कापायला हिरा लागतो). त्याचे पचन होत नाही. तो अन्ननलिका फाडत आत जातो.असे म्हणतात. >>
-----
हिरा कठीण (one of the hardest known material on the planet) आहे पण शार्प असायला हवा असे नाही.
हिरा (diamond) पोटात गेल्याने हानी होण्याची शक्यता असतेच असेही नाही... खुप मोठा असेल तर चोक होण्याची शक्यता असते. योग्य आकाराचा गिळल्यास बहुतान्श वेळी व्यक्ती सुरक्षीत रहाते असे दिसते... तो पोटात विरघळत नाही, डिग्रेड होत नाही...
६५ % वेळा टोकदार हिरा शरिराला अन्तर्गत हानी पोहोचवत नाही असे एका अभ्यासात दिसते (गुगल बाबा वरुन लिन्क मिळाली).
http://www.businessinsider.com/what-happens-when-you-swallow-a-diamond-2...
अनेक लोकान्नी महागडे हिरे लपवण्यासाठी गिळणे हा उपाय योजला आहे.
http://www.cbc.ca/news/canada/windsor/finding-20k-diamond-man-allegedly-...
ना स इनामदारान्ची राऊ मी ८४
ना स इनामदारान्ची राऊ मी ८४ मधे वाचलेली आहे... छान होती / आहे.
<<हिरा खाल्ल्यावर मरण येते
<<हिरा खाल्ल्यावर मरण येते का?>
---- नाही... (अर्थात आकार पण महत्वाचा आहे)
शेवटी तो कार्बन अॅटम पासुन बनलेला आहे, शरिरात कार्बन घटक आहे.
MSDS diamond गुगलुन बघणे.... प्रत्येक पदार्थाची MSDS सहज उपलब्द आहे.
http://assets.abrasive-tech.com/msds/DIAMOND%20POWDER.pdf
ढेकणासंगे हिरा भंगतो असे
ढेकणासंगे हिरा भंगतो असे लिहीले आहे...म्हणजे काय प्रकार आहे?
लोकहो बिगरी ते मॅट्रीक हे
लोकहो बिगरी ते मॅट्रीक हे स्वतंत्र पुस्तक नव्हे. बहुधा 'हसवणूक' मधे तो लेख आहे.
बिगरी ते मॅट्रीक हे स्वतंत्र
बिगरी ते मॅट्रीक हे स्वतंत्र पुस्तक नव्हे. बहुधा 'हसवणूक' मधे तो लेख आहे >>> हो
>>हिरा खाल्ल्यावर मरण येते
>>हिरा खाल्ल्यावर मरण येते का?<<
एक मौल्यवान वस्तु आपल्या हातुन गहाळ झाल्याच्या धक्क्याने काहिंना मरण आलं असेल...
Pages