Submitted by हर्ट on 22 December, 2015 - 02:40
इथे कुणी नागनाथ इनामदार ह्यांचे "राऊ" हे पुस्तक वाचले आहे का? कसे आहे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे कुणी नागनाथ इनामदार ह्यांचे "राऊ" हे पुस्तक वाचले आहे का? कसे आहे?
हिरेच्या हिरे गिळून
हिरेच्या हिरे गिळून स्वानुभवातून लिहीताय का लोक्स

हिरेच्या हिरे गिळून
हिरेच्या हिरे गिळून स्वानुभवातून >>> म्हणजे सगळेच 'चमचम करता है ये नशीला बदन' वाले की काय?
बी, चापेकरांचं 'पेशवाईच्या
बी,
चापेकरांचं 'पेशवाईच्या सावलीत' आणि अ. रा. कुलकर्ण्यांची पुस्तकं वाच. बर्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील.>>
चिन्मय धन्यवाद. ही दोन्ही पुस्तके मिळवून नक्की वाचेन.
झंपी आणि स्पॉक धन्यवाद.
कित्येक जुन्या हिंदी
कित्येक जुन्या हिंदी चित्रपटात हिरोईन अंगठीतील हिरा गिळून अगदी सायनाईड खालल्यासारखी तात्काळ मृत्युमुखी पडल्याचे पाहिलेय. एवढा मोठा हिरा मी अजून प्रत्यक्ष पाहिला नाही, त्यामुळे खखोदेजा.
विकीवर जे असते ते कोणीही लिहू शकतो. अधिकारी व्यक्तीनेच ते लिहावे हे बंधन नाही.
वर अवलने ' त्यांनी आत्महत्या केली हा समज बळावला' हे लिहिलेय. पेशव्यांचे दप्तर पुण्यात अजूनही आहे, ज्यांना पाहायचे, अभ्यासायचे ते अजूनही करू शकतात हेही लिहिलेय. ती स्वतः पुण्यात इतिहासाची प्राध्यापिका म्हणून कार्यरत असल्याने, आणि मुळात इतिहासाबद्दल प्रेम असल्याने, तिने ते दप्तर पाहिल्याचीही शक्यता आहे.
इतिहासाबद्दल जनात जे प्रवाद असतात त्यापेक्षा मूळ इतिहास खूप वेगळा असतो, हेही वेळोवेळी सिद्ध झाले आहे.
हो एकदा तरी पुणे
हो एकदा तरी पुणे अर्काईव्हसमधे भेट द्यायचीच आहे. इथे एक चित्र बघायला मिळाले. इतके जुने कागदपत्र इतके वर्ष आहेत त्याचे काहीतरी व्हायला हवे असे मनापासून वाटते आहे. आपण माबोकरांनी निधी गोळा करुन काहीतरी करायला हवे असे वाटते आहे.
http://www.mid-day.com/articles/rare-manuscripts-to-be-digitalised-by-ar...
नक्कीच, निधी गोळा करण्याचा
नक्कीच, निधी गोळा करण्याचा विचार पुढे न्या.
इथे ह्या लिंक वर बाजीराव
इथे ह्या लिंक वर बाजीराव पेशव्यांचे हस्ताक्षर बघायला मिळेल. मोडी लिपी बघून सुवाच्छ हस्ताक्षर हा प्रकार तेंव्हा नसावाच असे वाटते
https://www.google.com.sg/imgres?imgurl=https://jaivyaswrites.files.word...
साधना नक्की अशा उपक्रमामधे
साधना नक्की अशा उपक्रमामधे क्रियाशील सहभाग घ्यायला माझी खूप तयारी असते. मी दप्तरात गेलोच तर चौकशी करेन निधीबद्दल.
बी, पुण्याचं आर्काइव्ह हे
बी,
पुण्याचं आर्काइव्ह हे शासनाच्या अखत्यारीत येतं. पेशवाईतले सुमारे चाळीस हजार रुमाल तिथे आहेत. इंडेक्सिंग आणि डिजिटायझेशनचं काम सध्या सुरू आहे, पण कामाची गती अतिशय धीमी आहे. इंडेक्सिंगचं काम २००० साली सुरू झालं होतं, पण अजून १०%सुद्धा काम झालेलं नाही. निधीची कमतरता ही खूप नंतरची बाब झाली, मुळात तज्ज्ञ अभ्यासकांची वानवा आहे.
बी, मोडी लिपी तुमचे वडील
बी, मोडी लिपी तुमचे वडील जाणत असे तुम्ही म्हणताय आणि तरीही मोडी सुवाच्य नाही म्हणताय. अहो मोडीचे प्रयोजन काय होते ते तरी समजून घ्या. मोडी हि मराठीच, फक्त जलद लिहिता यावी म्हणून फेरफार केले गेले. एवढी जलद कि दोन वाक्यातल्या वा शब्दातल्या विरामासाठीही हात थांबायला नको अशी हिची रचना. तेव्हा जशी लिहित होते तशीच आजही लिहितात. आजही मोडी शिकवली जाते.
अशा लिपीत ध चा मा करणे किती सोपे वा कठीण हे तिची खंडित बाराखडी पाहून कळणार नाही.
कुठल्याही प्रतिसादाला प्रतिसाद देताना थोडे थांबून विचार करा, थोडा वेळ जाऊद्या. मग तुमच्याकडून असे प्रतिसाद दिले जाणार नाहीत ज्यामुळे तुमचे नाव माबोवर गाजते. वर अवलला मोडी बद्दल तुम्ही जे लिहिलेत ते मोडीची पूर्ण माहिती असती तर लिहिले नसते. तिला मोडी येते हे माहीत असते तर लिहिले नसते. पण इथे कोणीच स्वतःचा बायोडाटा प्रत्येक वेळी सांगत बसत नाही, त्यामुळे कोणालाही तुला काय माहीत अमुक तमुक विषयी हा प्रश्न विचारण्यापूर्वी आपल्याला किती माहीत आहे हे चाचपून पाहा.
अर्थात हा फुकटचा सल्ला आहे, आवडला नाही तर सोडून द्या.
बी, तुला इथे काही मोडीतली
बी,
तुला इथे काही मोडीतली कागदपत्रं पाहायला मिळतील - http://vkrajwade.com/
प्रतिसादातला सुवाच्छ हा शब्द
प्रतिसादातला सुवाच्छ हा शब्द बाजीरावांनी वाचला तर आजच्या काळात शुद्ध मराठी हा प्रकारच नसावा असे त्याचे मत होईल.
साधनाशी सहमत!
साधनाशी सहमत!
चिन्मय धन्यवाद. वाद वगैरे
चिन्मय धन्यवाद. वाद वगैरे बाजूला ठेवून त्यात न पडून तू जसे लिहितो उत्तरे देतो मत मांडतोस हा तुझ्यातला गुण प्रशंसनीय आहे.
साधना, काल जसा अवलला माझा टोन कळला नव्हता तसा तुलाही आज माझा टोन कळला नाही. मोडी लिपी शिकायची जर इथे संधी असती तर मी पहिला नंबर लावला असता. माझे वडील मोडी लिपित लिहायचे पण तेंव्हा मी खूप अजाण होतो ती लिपी तेंव्हा शिकली नाही. आता म्हणूनच शिकावीसी वाटते. अशी ही माझी ईच्छा असताना मी मोडी लिपीवर टिका कसा काय करणार.
आणि मोडी लिपी आणि आपली देवनागरी लिपी ह्यात नक्कीच फरक आहे. देवनागरी कर्स्यूमधे लिहिली की तिची मोडी लिपी होते असे नाही.
चिन्मय ती वरची लिंक अगदी
चिन्मय ती वरची लिंक अगदी अभ्यासू आहे. धन्यवाद.
विकु
विकु
सुबक + स्वच्छ = सुवाच्छ.
सुबक + स्वच्छ = सुवाच्छ.
थंडीचे दिवस आहेत, झाली असेल
थंडीचे दिवस आहेत, झाली असेल सर्दी आणि आली असेल की बोर्डला शिंक म्हणून सुवाच्य चे सुवाच्छ झाले असेल. तुम्ही पण किती कुटाणा करता राव!
इथे कुणी नागनाथ इनामदार
इथे कुणी नागनाथ इनामदार ह्यांचे "राऊ" हे पुस्तक वाचले आहे का? कसे आहे? >>>>>
बी - तुम्ही सापनाथ इनामदार ह्यांचे "काऊ" हे पुस्तक वाचले आहे का? कसे आहे? माबो वर एक "काऊ" होता पूर्वी, त्याच्या जीवनावर आहे का?
टोचा
टोचा
सापनाथ>>> काऊ>>>
सापनाथ>>> काऊ>>>
अरे काय हा गोंधळ !
अरे काय हा गोंधळ !
मी जे वाचले आहे ते नारायण
मी जे वाचले आहे ते नारायण रावास धरावे असे होते
ध चा मा
नारायण रावास मा रावे
हे जास्त सयुक्तिक वाटते ( धरुन आणावे किंवा मा रुन आणावे या पेक्षा)
चिन्मय ती वरची लिंक अगदी
चिन्मय ती वरची लिंक अगदी अभ्यासू आहे. धन्यवाद.
>>
हो ना ती लिंक रोज खूप खूप अभ्यास करते. अभ्यासूच आहे मुळ्ळी ती.
प्रत्येक खेपेला एकालाच
प्रत्येक खेपेला एकालाच टार्गेट केलं पाहिजे का?
जसे सगळे बीला सल्ले देत असतात तसे त्याच्यावर सतत घसराणार्यांनापण का दिले जात नाहीत?
झंपी, पोस्ट आवडली.
झंपीच्या पोस्ट्स नॉर्मली
झंपीच्या पोस्ट्स नॉर्मली इंटेलिजंट असतात. इथली फार नाही जमलेली.
Pages