नागनाथ इनामदार ह्यांचे "राऊ"

Submitted by हर्ट on 22 December, 2015 - 02:40

इथे कुणी नागनाथ इनामदार ह्यांचे "राऊ" हे पुस्तक वाचले आहे का? कसे आहे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नागनाथ इनामदारांची राऊ आणि झुंज ही दोन पुस्तके वाचली आहेत. दोन्ही ऐतिहासिक कादंबर्‍या आहेत आणि लेखनशैली छान आहे.

राऊ नावाची दोन पुस्तक आहेत हे माहीत नव्हतं .>>
बी ने असं कुठे म्हटलंय! Uhoh

बी, मी वाचलीये राऊ. शालेय जीवनात ऐतिहासिक कादंबर्‍यांमधला फँटॅसिझम फार आवडत असे. त्या काळात वाचलेली कादंबरी आहे.

ना.सं. इनामदारांचे नाव नागनाथ आहे हे आधी माहीत नव्हते.

झुंज कादंबरी कुणावर आहे. वाचलीय मी ही बहुदा.

सदाशिवरावभाऊंच्या पत्नी पार्वतीबाई ह्यांच्या आयुष्याव्ररही एक कादंबरी आहे ना. इनामदारांचीच आहे का!

झुंज कादंबरी कुणावर आहे. >>>>> यशवंतराव होळकर
>>
नाही वाचलीय ही कादंबरी.

सदाशिवरावभाऊंच्या पत्नी पार्वतीबाई ह्यांच्या आयुष्याव्ररही एक कादंबरी आहे ना. इनामदारांचीच आहे का!>>>
शिकस्त! कादंबरीचे नाव आता आठवले. ना. इनामदारांचीच आहे !

'आलमगीर' - इनामदारांची अजून एक कादंबरी. औरंगजेबावर आहे.

शालेय जीवनात ऐतिहासिक कादंबर्‍यांमधला फँटॅसिझम फार आवडत असे. >> +१
मी पण शाळेत असतांना वाचलीये राऊ. तेव्हा आवडली. आता परत वाचली तर आवडेलच असं नाही.

ओह ! मला वाटलं ना स आणि नागनाथ वेगवेगळे लेखक आहेत का .
ना स इनामदारांची राऊ वाचली आहे

ऐतिहासिक कादंबरी म्हणून आणि बाजीराव बद्दल माहिती म्हणून वाचायला चांगली आहे. पण तो जसाच्या तसा इतिहास नाही हे धान्यात असु द्या.

सेना > +१११११११

इतिहासात डोकावताना काही व्यक्ती-पात्रे, वंशावळ, घटना, लढाई, करार -तहनामे त्यांची कलमे हे बऱ्याच वेळा इतकं सुटसुटीत नसतं. अश्यावेळी त्या त्या प्रकारावर कथा-कादंबरी/पोवाडा/लघुकाव्य/नाटक असेल तर तुलनात्मक दृष्ट्या काही पात्र आणि त्यांची पार्श्वभूमी लक्षात रहाते हि जमेची बाजू. म्हणून ह्यातून येईल तोच खरा इतिहास नव्हे.

बाकी 'बिगरी ते म्याट्रिक' मध्ये पु. लं. नी हा घोळ इतिहासातील शिवाजी आणि नाटकातील शिवाजी हा फरक खूपच मिश्किलपणे मांडला आहे

ना. सं. इनामदारांची 'मंत्रावेगळा' हि दुसऱ्या बाजीराव पेशवा ह्यांच्या वर आधारित अजून एक कादंबरी.

दुसरा बाजीराव पेशवा हा खूप कमी वयात वारला ना. आत्महत्या की काय असे काहीतरी बहुदा. की तो दुसरा माधवराव?

दुसरा बाजीराव पेशवा हा खूप कमी वयात वारला ना. आत्महत्या की काय असे काहीतरी बहुदा. की तो दुसरा माधवराव?>>>> तो दुसरा माधवराव किंवा सवाई माधवराव पेशवे. वयाच्या एकविसाव्या वर्षी आत्महत्या केली. त्यानंतर दुसर्‍या बाजीरावास पेशवेपद मिळाले.

@ बी : 'बिगरी ते म्याट्रिक' >> हे मी त्यांच्या कथाकथन मध्ये ऐकला आहे, ते कोणत्या पुस्तकाचा भाग आहे आहे माहित नाही Sad

@ निंबुडा : दुसऱ्या बाजीरावांचा मृत्यू १८५० नंतर झाला.

अधिक माहिती 'सेनापती' देतीलच Happy

इथेच एक विचारतो आनंदीबाईंनी ध चा मा केला. ह्याला धरुन आणा चे ह्याला मारुन आणा करताना खोडाखोड दिसली नाही का वाचणार्‍यांना Happy ते जुने पत्र आहे का अजून कुठे Happy

बी, ते पत्र आनंदीबाईंनीच लिहिले ना... त्यांना धरून आणा लिहायला सांगितले ते त्यांनी मारुन आणा असेच लिहिले. खाडाखोड कुठे झाली यात. Happy

(मी त्यावेळी उपस्थित नव्हते, कुठेतरी वाचलयं त्यावरुन सांगतेय.. तु होतीस का तिथे? असे कोणी विचारायच्या आत खुलासा करतेय. Happy )

हो आनंदीबाईंनीच केला पण राघोबादादांनी त्यांना तोंडी सांगितलं आणि पत्र लिहिताना / सांगताना आनंदीबाईंनी तो बदल केला. असे मी कुठेतरी वाचलंय. लिहिलेल्या पत्रात खाडाखोड झाली असेल तर लगेच कळलं असतं की.

आनंदीबाईंनी खास दूत पाठवून या कार्यासाठी जर्मनीहून खोडरबर मागवले होते. उत्तम प्रतीच्या अश्या त्या मौल्यवान रबरामुळे खोडाखोड दिसून आली नाही. पुढे या रबराचे बरेच तुकडे झाले. आमच्या एका इतिहासप्रेमी स्नेह्यांकडे याचा एक छोटा तुकडा जतन केलेला आहे.

स्टे अवे प्लीज! >>> Uhoh याचं प्रयोजन समजलं नाही. तुला जसे प्रश्न पडतात तशीच आम्हाला उत्तरं पडतात.

याचं प्रयोजन समजलं नाही. तुला जसे प्रश्न पडतात तशीच आम्हाला उत्तरं पडतात.>>

ह्याच प्रयोजन इतकच मी माझ्या लिखानाशी निगडीत तू बोलता कामा नये. मी तुझ्याशी बोलतो का? नाही ना!!! तुझ्या लिखाणावर माझी कधी प्रतिक्रिया असते का? नाही ना!!! कारण मला तू आवडत नाहीस आणि त्रासदायक व्यक्ती वाटते म्हणून मी तुझ्यासारख्या अवांछित लोकांना माझ्यापासून दुर ठेवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या लिखाणावर जी काही उत्तरे तुला पडतात ती तू लिहित जाऊ नकोस. मी जर तुला शिवागाळ केला तर माझे नाव अ‍ॅडमिन पर्यंत जाईन. पण त्यांना हे कळणार नाही की विषय कुठुन सुरु झाला. मी तुला एकवेळ नाही अनेकदा सांगितले आहे की माझ्या लिखाणावर तुझी प्रतिक्रिया नको पण तू ऐकत नाहीस. होप तुला आता स्टे अवे म्हणजे काय हे कळले असेल.

अ‍ॅडमिन प्लीज मामीला दोन शब्दात समजवून सांगता येईल का? धन्यवाद.

ह्याच प्रयोजन इतकच मी माझ्या लिखानाशी निगडीत तू बोलता कामा नये. मी तुझ्याशी बोलतो का? नाही ना!!! तुझ्या लिखाणावर माझी कधी प्रतिक्रिया असते का? नाही ना!!! कारण मला तू आवडत नाहीस आणि त्रासदायक व्यक्ती वाटते म्हणून मी तुझ्यासारख्या अवांछित लोकांना माझ्यापासून दुर ठेवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या लिखाणावर जी काही उत्तरे तुला पडतात ती तू लिहित जाऊ नकोस. मी जर तुला शिवागाळ केला तर माझे नाव अ‍ॅडमिन पर्यंत जाईन. पण त्यांना हे कळणार नाही की विषय कुठुन सुरु झाला. मी तुला एकवेळ नाही अनेकदा सांगितले आहे की माझ्या लिखाणावर तुझी प्रतिक्रिया नको पण तू ऐकत नाहीस. होप तुला आता स्टे अवे म्हणजे काय हे कळले असेल.

>>> च्च च्च च्च च्च! असले जाचक नियम करण्यापेक्षा जरा लाईटली घेतलंस ना तरी तुझ्या दृष्टीकोनात खूप फरक पडेल आणि अशी अकारण चिडचिड होणार नाही.

पटलं तर बघ.

च्च च्च च्च च्च! असले जाचक नियम करण्यापेक्षा जरा लाईटली घेतलंस ना तरी तुझ्या दृष्टीकोनात खूप फरक पडेल आणि अशी अकारण चिडचिड होणार नाही.

पटलं तर बघ.
>>

मामी, तू माझ्याविरुद्ध जी तक्रार केलीस त्याचे हे उत्तर आले आहे माझ्या विपुत http://www.maayboli.com/user/65/guestbook आणि परत अशी विपु मला नको म्हणून मी असे जाचक नियम केले आहे. सो प्लीज..

11 December, 2015 - 01:36
बी,

प्रतिसाद देताना भाषा जपून वापरा. तुमच्याबद्दल अनेक तक्रारी आलेल्या आहेत. पुन्हा तक्रार आलई तर सदस्य्त्व स्थगीत करण्यात येईल.

मी तक्रार केली हे कशावरून बी? एडमिननी सांगितलं की मी तक्रार केलेली नाही तर माझी माफी मागणार का? कारण मी तक्रार केलेली नाही. पण ते तुला पटणार नाही.

Pages