चालते व्हा ! १०,००० स्टेप्स अ डे चालण्याचे चॅलेंज ( डिसेंबर २०१५)

Submitted by rar on 1 October, 2015 - 00:53

ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात बर्‍याच मायबोलीकरांनी यशस्वीपणे १०,००० स्टेप्स अ डे चालण्याचा उपक्रम पूर्ण केला.
आता डिसेंबर महिन्यासाठी ज्यांना हे चॅलेंज घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी हा धागा Happy
----------------------------------------------------------------------
आपण मालमत्ता, सोनंनाणं, शेयर्स, जमीनी या सगळ्यात इनव्हेस्ट करतो. पण 'हेल्थ ' मधे इनव्हेस्ट करायची सतत टाळाटाळ करतो, किंवा त्यादृष्टीने फारसा विचारही करत नाही. 'चालणं' हा ह्या इनव्हेस्टमेंटसाठी अतिशय 'अंडररेटेड' पण एक सोपा आणि तरीही प्रभावी व्यायाम आहे. ह्यामधे केवळ शरीराला व्यायाम ह्या दृष्टीकोनातून न पाहता, चालण्याने विचारांना, मनाला मिळणारी चालना ह्या दृष्टीने पाहणंही खूप आवश्यक आहे. म्हणूनच 'चालते व्हा' हे आहे ऑक्टोबर महिन्यात रोज १०,००० स्टेप्स चालायचं चॅलेंज ! ह्या चॅलेंजची मजा अशी की हे स्वतःच स्वीकारायचं आणि स्वतःच करून दाखवायच... स्वतःसाठी !

सगळ्यांना १०,००० स्टेप्स दरदिवशी चालणं जमेलच असं नाही. पण काही हरकत नाही. अजिबात निराश होऊ नका, किंवा 'आता नाहीच जमणार ' असं सोडून देऊ नका.
आपण २ लेव्हलला चॅलेंजेस करू शकतो :

लेव्हल १ : १०,००० स्टेप्स/डे
लेव्हल २ : ७५०० स्टेप्स/डे

यापैकी कोणातीही लेव्हल ठरवा आणि महिनाभर रोज तितक्या ठरवलेल्या स्टेप्स 'चालायचं चॅलेंज' स्वीकारा.

१) आपण कोणतं चॅलेंज घेतलंत हे इथे लिहू आणि रोजच्या (किंवा आठव्ड्याच्या) स्टेप्स इथे लिहीत जाऊ.
२) फोनवर काही उपयुक्त अ‍ॅपस आहेत, ज्याने स्टेप्स मोजता येतात. पण अ‍ॅप नसेल तरी काही हरकत नाही.
१०,००० स्टेप्स = ५ माईल्स / ८ किमी.
७५०० स्टेप्स = ३. ७ माईल्स / ६ किमी

साधारण चालण्याच्या वेगानुसार १६ ते २० मिनीटात १ माईल अंतर होते. त्यानुसार साधारण मोजमाप असे -
१०,००० स्टेप्स - दीड तास
७५०० स्टेप्स = १ तास १० मिनीटे

३) एखादा दिवस जमलं नाही, तर आठवड्याच्या उरलेल्या दिवसात थोड थोडं जास्त चालुन 'आठवड्याचं टारगेट" पूर्ण करा.

सप्टेंबर महिन्यात आम्ही काही मायबोलीकरांनी हे चॅलेंज घेतलं होतं आणि आज ते पूर्ण झालं. हे केवळ शारीरीक व्यायामाचं चॅलेंज नसून, ह्यात मानसिक चॅलेंज, किंवा डीटरमिनेशन हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे . महिनाभर एकमेकांना मोटीव्हेट करत चॅलेंज पूर्ण करायला धमाल आली. आता ऑक्टोबर महिन्यासाठी बघूयात किती मायबोलीकर हे चॅलेंज घेताहेत आणि पूर्ण करताहेत ?
चला तर मग... तुम्हीही सहभागी व्हा, आणि इतरांनाही सहभागी करून घ्या... Ready for walk? Ready to take the challenge?
Good Luck and go for it ... Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेला आठवडा...

७९,९१४ पावले = ३५.३ मैल .... ११४१६ पावले / दिवस...

आता २/३ आठवडे भारतवारी असल्याने काही खरं नाही.. पण परत आल्यावर... Happy

किती दिवसांत? >>> वर्षभरापूर्वी ठरवलं होतं पण मुहूर्त लागेना. त्या दृष्टीने हालचाल मात्र दोन महीन्यांपूर्वी सुरू झाली. मागच्या महीन्यात विशेष काही केलेलं नाही, पण सुरूवात झाली. त्या महीन्यात साडेतीन किलो उतरले. या महीन्यात बाकीचे.

२१ डिसेंबर ते २७ डिसेंबर
स्टेप्स ११७५८५ = १६७९७ / डे
कि. मी. ८३.४२ = ११.९१ कि. मी. / डे

मित्रांनो, जरूर चाला, चालत राहा.

एक मस्त वचन आहे : चालाल तर चालाल !

एका कवितेतील २ ओळी तर खासच :
दोन पाय जगातील सर्वात सुंदर वाहन
इछाशक्ती हेच त्याचे इंधन

माझ्या मैत्रिणीच्या नवर्‍याच्या गुडघ्याचे लिगामेंट्सचे ऑपरेशन झाले.डॉ.नी खूप चालणे हे पण लिगामेंट्स फाट्ण्यास एक कारण सांगितले.(तो नेहमी ५ कि.मी चालायचा) मा.बो.ची डॉक्टर मंडळी यावर योग्य ती मते देतीलच.

धन्यवाद Happy
मी १ तारखेपासून रोज ७५०० पावले चालायचे ठरवले आहे.
कालचा काऊंट : ८०३९

छान .. असेच चालत रहा.. मी सध्या थोडि दिवस एवढे चालू शकत नाहीय.. पण ६००० चालू आहेत.

मी तीन वर्षं चालायला जातोय. बाहेर चालायला तेवढा वेळ काढणं जमत नव्हतं, त्यामुळे दिवसाला सहा हजार , मग साडेसात हजार अशी टारगेट्स ठेवलेली. सध्या सकाळी चार हजार आणि उरलेली साडेतीन हजार कामानिमित्त येता जाता होतात. अ‍ॅक्युपेडो वापरत होतो. ते अनेकदा मध्येच हँग होऊ लागलं होतं
पण इथे लिहायचं कारण म्हणजे myntra वरून त्यांचंच blink go हे फिटनेस बँड घेतलं. त्यामु ळे घरात चाललेलं ही मोजलं जातंय आणि दहा हजार पावलं सहज होताहेत.
त्यांच्या अ‍ॅपवर स्कोअर प्रमाणे आपला रँक दिसतो. पहिल्या तीस जणांची नावं आणि स्कोअर दिसतात.
रोज कोणी ना कोणी २०,०००+ पावलं चाललेलं दिसतं.

Pages