चालते व्हा ! १०,००० स्टेप्स अ डे चालण्याचे चॅलेंज ( डिसेंबर २०१५)

Submitted by rar on 1 October, 2015 - 00:53

ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात बर्‍याच मायबोलीकरांनी यशस्वीपणे १०,००० स्टेप्स अ डे चालण्याचा उपक्रम पूर्ण केला.
आता डिसेंबर महिन्यासाठी ज्यांना हे चॅलेंज घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी हा धागा Happy
----------------------------------------------------------------------
आपण मालमत्ता, सोनंनाणं, शेयर्स, जमीनी या सगळ्यात इनव्हेस्ट करतो. पण 'हेल्थ ' मधे इनव्हेस्ट करायची सतत टाळाटाळ करतो, किंवा त्यादृष्टीने फारसा विचारही करत नाही. 'चालणं' हा ह्या इनव्हेस्टमेंटसाठी अतिशय 'अंडररेटेड' पण एक सोपा आणि तरीही प्रभावी व्यायाम आहे. ह्यामधे केवळ शरीराला व्यायाम ह्या दृष्टीकोनातून न पाहता, चालण्याने विचारांना, मनाला मिळणारी चालना ह्या दृष्टीने पाहणंही खूप आवश्यक आहे. म्हणूनच 'चालते व्हा' हे आहे ऑक्टोबर महिन्यात रोज १०,००० स्टेप्स चालायचं चॅलेंज ! ह्या चॅलेंजची मजा अशी की हे स्वतःच स्वीकारायचं आणि स्वतःच करून दाखवायच... स्वतःसाठी !

सगळ्यांना १०,००० स्टेप्स दरदिवशी चालणं जमेलच असं नाही. पण काही हरकत नाही. अजिबात निराश होऊ नका, किंवा 'आता नाहीच जमणार ' असं सोडून देऊ नका.
आपण २ लेव्हलला चॅलेंजेस करू शकतो :

लेव्हल १ : १०,००० स्टेप्स/डे
लेव्हल २ : ७५०० स्टेप्स/डे

यापैकी कोणातीही लेव्हल ठरवा आणि महिनाभर रोज तितक्या ठरवलेल्या स्टेप्स 'चालायचं चॅलेंज' स्वीकारा.

१) आपण कोणतं चॅलेंज घेतलंत हे इथे लिहू आणि रोजच्या (किंवा आठव्ड्याच्या) स्टेप्स इथे लिहीत जाऊ.
२) फोनवर काही उपयुक्त अ‍ॅपस आहेत, ज्याने स्टेप्स मोजता येतात. पण अ‍ॅप नसेल तरी काही हरकत नाही.
१०,००० स्टेप्स = ५ माईल्स / ८ किमी.
७५०० स्टेप्स = ३. ७ माईल्स / ६ किमी

साधारण चालण्याच्या वेगानुसार १६ ते २० मिनीटात १ माईल अंतर होते. त्यानुसार साधारण मोजमाप असे -
१०,००० स्टेप्स - दीड तास
७५०० स्टेप्स = १ तास १० मिनीटे

३) एखादा दिवस जमलं नाही, तर आठवड्याच्या उरलेल्या दिवसात थोड थोडं जास्त चालुन 'आठवड्याचं टारगेट" पूर्ण करा.

सप्टेंबर महिन्यात आम्ही काही मायबोलीकरांनी हे चॅलेंज घेतलं होतं आणि आज ते पूर्ण झालं. हे केवळ शारीरीक व्यायामाचं चॅलेंज नसून, ह्यात मानसिक चॅलेंज, किंवा डीटरमिनेशन हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे . महिनाभर एकमेकांना मोटीव्हेट करत चॅलेंज पूर्ण करायला धमाल आली. आता ऑक्टोबर महिन्यासाठी बघूयात किती मायबोलीकर हे चॅलेंज घेताहेत आणि पूर्ण करताहेत ?
चला तर मग... तुम्हीही सहभागी व्हा, आणि इतरांनाही सहभागी करून घ्या... Ready for walk? Ready to take the challenge?
Good Luck and go for it ... Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑक्टोबर १ : १६,६१३
ऑक्टोबर २: १६,४१८
ऑक्टोबर ३ : २८,८३८
ऑक्टोबर ४: २४,७३४
ऑक्टोबर ५: ११,५८७
ऑक्टोबर ६: ११,९३४

०४ ऑक्टोबर : ४६३८ (३.४ किमी)
०५ ऑक्टोबर : ९१०३ (६.७ किमी)
०६ ऑक्टोबर : ५६२३ (४.१ किमी)
०७ ऑक्टोबर : ३८९९ (२.९ किमी )
०८ ऑक्टोबर : ५५१५ (४.० किमी )
०९ ऑक्टोबर : ४६४० (३.४ किमी. आतापर्यंत. पण यात आज फार मोठी भर पडणार नाही. आजही एक रिलीज असल्याने बुड खुर्चीतच राहणार आहे.)

मोठ्या आशेने १०,००० चे ध्येय ठेवले त्याची या आठवड्यात अशी वाट लागली. Sad

गजानन - हे मोजले नसते, तर किमान एवढेही झाले नसते असेही असू शकेल ना?

दुसरे म्हणजे यातील काही कामे अशी होती का की जी चालत फोन वर होउ शकली असती?

गजानन, या महिन्यात नंतर भरून काढता येतंय का ते पाहा. माझेपण रविवार-सोमवार ट्रॅव्हलमुळे (बर)बाद झाले. मी प्रयत्न करणार आहे तो तुटवडा भरून काढण्याचा. प्रेशर नहीं लेनेका. चालत रहनेका. Happy

अमोल, हो मोजले नसते तर थोडा फरक पडला असता. 'थोडा' म्हणालो कारण दिवसभरात अधे मधे सांधे मिळतात ते कमी होते. पण एकूणच जेंव्हा मोजणे सुरू असते तेंव्हा फरक पडतोच. उदा. हापिसात असताना पिण्याच्या पाण्याची संपलेली बाटली भरून येताना मुद्दामच ह्याच मजल्यावर पण इमारतीच्या एक्दम त्या टोकाशी बसणार्‍या सहकार्‍याकडे वाकडी वाट केली जाते. लिफ्ट जास्त वेळ लावत असेल तर जिन्याकडे पावले वळवली जातात. इ. Happy परवा हापिसातून येताना रात्री एटीएमातून पैसे काढायचे होते. पण दिवसभरातील पावले इतकी कमी झाली होती की लाजेखातर घोड्याला अर्ध्या वाटेवरच बांधला आणि एटीएमात चालत गेलो आणि आलो. चालत फोनवर होणारी कामे नव्हती फारशी.

रमड, हो आता पुढच्या आठवड्यात तुटवडा भरून काढायचे ठरवले आहे. मला जानेवारीतल्या मॅरेथॉनसाठीही तयारी सुरू करायची आहे. तीही विकेंडला सुरू करायचा विचार आहे, Happy

७: १०६१५
८: १३१४९

शनिवारी होतील पण आजच होतात की नाही. बहुदा संध्याकाळी जाऊन चालून यावे लागेल.

मी हा धागा फॉलो करतेय. मस्त वाटतंय अपडेट्स वाचून.

माझी सकाळच्या वॉकची रोज ४००० ते ५००० पाउलं होतात. त्यापुढची दिवसभरातली मोजत नाही.

४ ऑक्टो - २३३०
५ ऑक्टो - ४७७
६ ऑक्टो - १०३२७
७ ऑक्टो - १०३७६
८ ऑक्टो - १०४०७
९ ऑक्टो - १२२११

अरे वा!
मी पण सामील. सध्या फिट्बीट वापरतेय. आधिच्या दोन तीन पेडोमिटर पेक्षा जास्त चांगले वाटतेय.

साधारण १२ ते १५ के होतात दिवसाला.

काही मित्र मैत्रिणी आहेत सोबतीला. एकमेकांचे पावले/ मैल बघुन चॅलेंज वाटते. ईथे कोणी असेल तर मेल करा प्लिज.

शनिवारी स्टेट फेअर मध्ये गेलो त्यामुळे भरपूर चालणे झाले. रविवारी कमी होतील असे वाटले होते तरीन१०के जवळ पोचलो त्यामुळे बरे वाटले. आज काल यामुळे तरी संध्याकाळी नुसते काऊच पोटॅटो होऊन बसण्याशिवाय जरा चालणे होतेय!

१०: २५३०४
११: ९७२२

१० ऑक्टोबरः १७७८२ : १३ किमी
११ ऑक्टोबरः १४८११ : १०.८ किमी
१२ ऑक्टोबरः १०३४७ : ७.६ किमी

६३ वर्षे वय असतांना साधारण किती पाऊले कमीम्त कमी कोणी तज्ञ सांगतील का? <<<<<

हे तुम्हाला तुमच्या डॉक्टरना विचारावे लागेल. वयाबरोबर तुमची शारिरीक क्षमता बघून ते सांगू शकतील.. इथे ६०/६५ वर्षांच्या काही माणसाना नियमीत पळताना बघितले आहे, पण म्हणून सगळ्यांना ते जमेल असे नाही..

गोगा +१ >> आमची हाफ ग्रुप ची कोच ७५ वर्षांची आहे. आणि ती नेमाने हाफ मॅरॅथॉन पळत असते. त्यामुळे गोगा म्हणतात त्याप्रमाणे आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन तसा व्यायाम सुरू करावा.

काल शुक्रवारचे टाकायचे राहिले म्हणून ४ दिवसांचे परत टाकतो.

९: १०१७१
१०: २५३०४
११: ९७२२
१२: १४४९०

आजच माबो वर आले खुप दिवसन्नी... आणि हा धागा पाहिला. माझ्या नवर्‍याच्या ऑफिस मधे हा उपक्रम गेले दोन महिने चालु आहे. त्याला २ उपकरणे मिळाली. माझ्या कडे आधी पासुनच होते. पण माझे उपकरण १० मिनिटे आपण थांबलो तर नव्याने काउंट करायला लागते. माझ्या उपकरणात कॅलरी, वेळ, स्टेप्स, किलोमीटर सगळे दिसते.

नवर्‍याच्या उपकरणात फक्त तारीख आणि स्टेप्स दिसतात. मी त्याचे उपकरण लावुन दोन दिवस फिरले तर माझ्या दिवसातुन साधारण १४,००० स्टेप्स होतात. आणि ते दोन्ही दिवस नॉर्मल होते. म्हणजे हेक्टिक दिवशी जास्त होत असणार. माझे बाहेर फिरणेच ६००० स्टेप्स चे होते. बाकी मग घरी, ऑफिस, लेक्चर, मार्केट असे धरुन आरामात ७-८ हजार अवांतर स्टेप्स होतात.

माझे उपकरण कॅलरीज दाखवते. साधारण १ कि.मी. ला ६५ किलो वजनाच्या माणसाच्या ५० कॅलरीज जळतात. गंमत अशी आहे की त्या तुम्ही किती वेगाने जाळता ह्यावर फिटनेस अवलंबुन असतो.

मागे एकदा आहार तज्ञ डॉ. नीतीन पाटणकरांशी बोलताना त्यांनी सांगीतले होते की जो माणुस रोज नीदान ८००० स्टेप्स चालतो त्याला डायबेटीस, ब्लड प्रेशर येवुच शकत नाही. प्रीव्हेंटीव्ह मेडिसीन, किंवा लाइफ स्टाईल चेंजिंग मधे ह्या ८००० स्टेप्स खुपच मदत करतात.

तेंव्हा कीप वॉकिंग......

Pages