चालते व्हा ! १०,००० स्टेप्स अ डे चालण्याचे चॅलेंज ( डिसेंबर २०१५)

Submitted by rar on 1 October, 2015 - 00:53

ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात बर्‍याच मायबोलीकरांनी यशस्वीपणे १०,००० स्टेप्स अ डे चालण्याचा उपक्रम पूर्ण केला.
आता डिसेंबर महिन्यासाठी ज्यांना हे चॅलेंज घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी हा धागा Happy
----------------------------------------------------------------------
आपण मालमत्ता, सोनंनाणं, शेयर्स, जमीनी या सगळ्यात इनव्हेस्ट करतो. पण 'हेल्थ ' मधे इनव्हेस्ट करायची सतत टाळाटाळ करतो, किंवा त्यादृष्टीने फारसा विचारही करत नाही. 'चालणं' हा ह्या इनव्हेस्टमेंटसाठी अतिशय 'अंडररेटेड' पण एक सोपा आणि तरीही प्रभावी व्यायाम आहे. ह्यामधे केवळ शरीराला व्यायाम ह्या दृष्टीकोनातून न पाहता, चालण्याने विचारांना, मनाला मिळणारी चालना ह्या दृष्टीने पाहणंही खूप आवश्यक आहे. म्हणूनच 'चालते व्हा' हे आहे ऑक्टोबर महिन्यात रोज १०,००० स्टेप्स चालायचं चॅलेंज ! ह्या चॅलेंजची मजा अशी की हे स्वतःच स्वीकारायचं आणि स्वतःच करून दाखवायच... स्वतःसाठी !

सगळ्यांना १०,००० स्टेप्स दरदिवशी चालणं जमेलच असं नाही. पण काही हरकत नाही. अजिबात निराश होऊ नका, किंवा 'आता नाहीच जमणार ' असं सोडून देऊ नका.
आपण २ लेव्हलला चॅलेंजेस करू शकतो :

लेव्हल १ : १०,००० स्टेप्स/डे
लेव्हल २ : ७५०० स्टेप्स/डे

यापैकी कोणातीही लेव्हल ठरवा आणि महिनाभर रोज तितक्या ठरवलेल्या स्टेप्स 'चालायचं चॅलेंज' स्वीकारा.

१) आपण कोणतं चॅलेंज घेतलंत हे इथे लिहू आणि रोजच्या (किंवा आठव्ड्याच्या) स्टेप्स इथे लिहीत जाऊ.
२) फोनवर काही उपयुक्त अ‍ॅपस आहेत, ज्याने स्टेप्स मोजता येतात. पण अ‍ॅप नसेल तरी काही हरकत नाही.
१०,००० स्टेप्स = ५ माईल्स / ८ किमी.
७५०० स्टेप्स = ३. ७ माईल्स / ६ किमी

साधारण चालण्याच्या वेगानुसार १६ ते २० मिनीटात १ माईल अंतर होते. त्यानुसार साधारण मोजमाप असे -
१०,००० स्टेप्स - दीड तास
७५०० स्टेप्स = १ तास १० मिनीटे

३) एखादा दिवस जमलं नाही, तर आठवड्याच्या उरलेल्या दिवसात थोड थोडं जास्त चालुन 'आठवड्याचं टारगेट" पूर्ण करा.

सप्टेंबर महिन्यात आम्ही काही मायबोलीकरांनी हे चॅलेंज घेतलं होतं आणि आज ते पूर्ण झालं. हे केवळ शारीरीक व्यायामाचं चॅलेंज नसून, ह्यात मानसिक चॅलेंज, किंवा डीटरमिनेशन हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे . महिनाभर एकमेकांना मोटीव्हेट करत चॅलेंज पूर्ण करायला धमाल आली. आता ऑक्टोबर महिन्यासाठी बघूयात किती मायबोलीकर हे चॅलेंज घेताहेत आणि पूर्ण करताहेत ?
चला तर मग... तुम्हीही सहभागी व्हा, आणि इतरांनाही सहभागी करून घ्या... Ready for walk? Ready to take the challenge?
Good Luck and go for it ... Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इलिपटिकल वर कसे मोजायचे स्टेपस ?
काल मी ४. ५ मैल ४०० कलरी जाळून तासभर केला. बरोबर मोबाईल ठेवला होता स्टेपस मोजयला .
जेमतेम ५१०० झालया. त्यामुळे १०००० प्रकरण फार वाटतंय. किंवा बरोबर मोजले जात नाहीये . काय वाटत?

बरोबर मोजले जात नाहीये <<<< हेच उत्तर बरोबर आहे...
चालताना होणार्‍या विशिष्ट हालचाली इलिपटिकल वर होणार नाहीत... त्यामुळे पावले मोजता येणार नाहीत.
एकदा मैल भर चालून पावलं मोजा मोबाईलवर... आणि मग त्याप्रमाणे ४.५ मैल म्हणजे किती हा हिशेब करा.
म्हणजे २००० पावलं म्हणजे १ मैल असे असेल तर तुम्ही ९००० पावलं चालला आहात असे धरावे लागेल.
.
.
'चालते व्हा' ... = 'इलिपटिकलते व्हा' नाही ना Proud

(प्रयत्न सुत्य आहेच.. तुम्ही कोणत्या प्रकारचा व्यायाम करता यापेक्षा तो भरपूर करता याला महत्व आहे...

गोगा बरोबर म्हणत आहेत. कमी मोजली जात आहेत. कदाचीत इलिप्टीकल वर बरोबर मोजली जात नसतील मोबाईल वर. शेवटी प्रत्येक यंत्राची मोजमापाची पद्धत वेगळी असते.

माझ्या बघण्यात तर काही बँड्स जर तुम्ही ग्रोसरी कार्ट ढकलत असाल तर ते सुद्धा मोजत नाहीत. त्यामुळे कॉस्टको सारख्या ठिकाणी होणारे दोन एक हजार विसरून जा.

१०००० हे पूर्ण दिवसातल्या स्टेप्स आहेत हे परत एकदा नमूद करू इच्छीतो. त्यामुळे जर तुम्ही एका वेळेस ४.५ मैल करता तर पूर्ण दिवस मिळून नक्कीच १०००० स्टेप्स होतील तुमच्या.

प्रयत्न सुत्य आहेच.. तुम्ही कोणत्या प्रकारचा व्यायाम करता यापेक्षा तो भरपूर करता याला महत्व आहे... >> आणि किती रेग्युलरली करता... सातत्य अतिशय महत्वाचं आहे.

धनी व गोगा, धन्यवाद . तुमच्या उत्तरामुळे हुरूप आला . नाहीतर मी १०००० आकड्याची धास्तीच घेतली होती .

वजनांच्या बाबतीत परत बरीच मते आहेत. मला वाटतं की Upper Body साठी त्याची गरज आहे.
तुम्ही माबोवर केदारने उघडलेला बातमी फलक वाचावा.
त्यावर, जिममधे न जाता आणि काहीही उपकरणे विकत न घेता, वजनाचे व्यायाम सांगितलेले/चर्चिलेले आहेत.

http://www.maayboli.com/node/55942

आज चालायला सुट्टी घेतली.

(म्हणजे चालाण्यासाठी सुट्टी घेतली असे नसून चालणे या क्रियेत खाडा झाला. Happy )

ऑक्टोबर १५: १३८९९
ऑक्टोबर १६: १४४४५
ऑक्टोबर १७: १०३२१
ऑक्टोबर १८: ८९३६
ऑक्टोबर १९: ११,५३८
ऑक्टोबर २०: १५,६८६
ऑक्टोबर २१: १३,८९६
एकुण: ८८,७२१

ऑक्टोबर
१२ - १०,८७१
१३ - १०,०५४
१४ - १२, ९८२
१५ - ११,२५१
१६ - १४,७७४
१७ - १०,१७३
१८ - १०,६३९
१९ - १६, ९३७
२० - ११, ९०५
२१ - १६, ५७४

माझे मोटो - ए वरील अ‍ॅप पेड्~ओमीटर आहे.
मग १०००० पावले बरोबर येण्यासाठी ......
माझ्या सॉफ्ट्वेअरचे कॅलिब्रेशन असे केले.
१००० पावले मोजून चालओ आणि इन्स्ट्रुमेंट मध्ये किती दिसली ते पाहिले.ते जुळले पाहिजे नाही तर मग समस्या आहे. ती सेन्सिटिव्हीटी ची ~ अ‍ॅडजस्तमेंट करून बरोबर करता येते.
नंतर गाडीने अंतर मोजले मग प्रत्यक्ष चाललो / अंतर जुळले नाही तर पावलांची लांबी अ‍ॅडजस्ट केली.
अशा प्रकारे पावले वि. अंतर मॅच केले.
मग योग्य वजन एंटर केले.
आता कॅलरी चा हिशेब बरोबर आहे.

गुगल फिट तसे बरोबर मोजते, पण एकदा दुचाकीने हळूच ओव्हर ब्रिज चढून इंदिरा कॉलेज मुंबई पुणे हायवे वर आल्यावर त्याने मी ६ किमी बाईकींग केले असे दाखवले:) सेन्सेटिव्हीटी कमी केली तर पावलं मोजत नाही. (गुगल करुन पाहिल्यावर असे कळले की काही हँडसेट पेडोमीटर ला लो प्रायोरीटी देतात आणि किपॅड लॉक केल्यावर मोजणे कधीकधी बंद होते.)
चोर चोराची पावलं ओळखत असल्याने मला त्यांच्या सॉफ्ट्वेअर मधे पावलं रिफ्रेश करण्याची युक्ती माहित आहे. वेट परत सेट केले किंवा टारगेट किमी बदलले(तेच परत टायपून सेव्ह केले) की त्यांचे आतले रिफ्रेश बोलावले जाऊन नवी पावले नंबरात दिसायला लागतात.

१९ ऑक्टो - १०२९५
२० ऑक्टो - ११०७८
२१ ऑक्टो - १२३०९
२२ ऑक्टो - १२८५५
२३ ऑक्टो - १०३५२
२४ ऑक्टो - ११३०८
२५ ऑक्टो - ११२४२

ऑक्टोबर -
२२ : १२,२१९
२३ : ११,५१७
२४ : ११,६३२
२५ : १०, ५२०
२६ : १८, ४७७
२७ : १३, १६४

लोकहो, ऑक्टोबर संपत आलाय, पुढच्या ३ दिवसात जो काय थोडाफार चालण्याचा बॅकलॉग राहिला असेल तर तो भरून काढा Happy

नोव्हेंबर्‍साठी कोणाला (भारतातल्या लोकांना खास करून किंवा जिथे थंडी, स्नो नाही अश्या भागात राहणार्‍यांनी) १०,००० स्टेप्स अ डे कंटीन्यू ठेवायचं असेल तर चालू ठेवा चालणं. Happy

सर्व चालता आहात तर किती कोणाचे वजन कमी झाले ते हि लिहा ना.. <<< मी एप्रिल पासुन नियमीत चालतो आहे... १२ पाऊण्ड कमी..

आम्ही ४ मैलांवर पोचलो.
आठवड्यातून ४ वेळा ५० मि. मध्ये ४ मैल होताय्त. हे बाकीच्या चालण्याव्यतिरिक्त. मस्त वाटतेय.

माझा ओव्हरऑल फिटनेस बराच चांगला आहे. वजन पण नीट कंट्रोल मधे. माझं इतर एक्सरसाईझ, हायकिंग, रनिंग, सायकलींग, खेळणं पण चालू असतं. त्यामुळे चालण्यामुळे वजन कमी झालं असं डायरेक्ट नाही सांगता येणार. पण मी एप्रिल पासून १०,००० दर महिन्याला चालतीये. त्यामुळे लेग्स मस्त टोन्ड झाले आहेत, आणि एकूणच बॉडी फॉर्म पण सॉलीड मेंटेन्ड स्टेट मधे आहे. Happy
मला चालण्याचा फायदा म्हणजे फीलींग पीसफूल अ‍ॅट माईंड. शांतपणे विचार करायला स्वतःचा असा डेडीकेटेड वेळ मिळतो. कधी कधी ऑडीयो बुक्स ऐकून होतात. आय जस्ट फील गुड व्हेन आय वॉक. एक्सरसाईज इज लाईक मेडीटेशन फॉर मी Happy

५० मि. मध्ये ४ मैल होताय्त >>>> ५० मिनिटात ४ मैल.. १२.५ मिनिटात मैल.. तुम्ही पळता का?
वेग जास्त आहे म्हणुन विचारले..

तुम्ही केव्हा वेळ काढता चालायला? काही रुटीन केलं आहे का?
कारण इतके चालायला १ ते १.५ तास लागतो . त्यामुळे मला रोज जमत नहि. काही टिप्स असतील तर सांगा .

<<
५० मि. मध्ये ४ मैल होताय्त >>>> ५० मिनिटात ४ मैल.. १२.५ मिनिटात मैल.. तुम्ही पळता का?
वेग जास्त आहे म्हणुन विचारले..

>>
हो! चालते होता होता धावते झालो हा मोठा फायदा! टारगेट १० मि. १मैल करायचे आणि मग मैल वाढवत न्यायचे आहेत.

Pages