चालते व्हा ! १०,००० स्टेप्स अ डे चालण्याचे चॅलेंज ( डिसेंबर २०१५)

Submitted by rar on 1 October, 2015 - 00:53

ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात बर्‍याच मायबोलीकरांनी यशस्वीपणे १०,००० स्टेप्स अ डे चालण्याचा उपक्रम पूर्ण केला.
आता डिसेंबर महिन्यासाठी ज्यांना हे चॅलेंज घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी हा धागा Happy
----------------------------------------------------------------------
आपण मालमत्ता, सोनंनाणं, शेयर्स, जमीनी या सगळ्यात इनव्हेस्ट करतो. पण 'हेल्थ ' मधे इनव्हेस्ट करायची सतत टाळाटाळ करतो, किंवा त्यादृष्टीने फारसा विचारही करत नाही. 'चालणं' हा ह्या इनव्हेस्टमेंटसाठी अतिशय 'अंडररेटेड' पण एक सोपा आणि तरीही प्रभावी व्यायाम आहे. ह्यामधे केवळ शरीराला व्यायाम ह्या दृष्टीकोनातून न पाहता, चालण्याने विचारांना, मनाला मिळणारी चालना ह्या दृष्टीने पाहणंही खूप आवश्यक आहे. म्हणूनच 'चालते व्हा' हे आहे ऑक्टोबर महिन्यात रोज १०,००० स्टेप्स चालायचं चॅलेंज ! ह्या चॅलेंजची मजा अशी की हे स्वतःच स्वीकारायचं आणि स्वतःच करून दाखवायच... स्वतःसाठी !

सगळ्यांना १०,००० स्टेप्स दरदिवशी चालणं जमेलच असं नाही. पण काही हरकत नाही. अजिबात निराश होऊ नका, किंवा 'आता नाहीच जमणार ' असं सोडून देऊ नका.
आपण २ लेव्हलला चॅलेंजेस करू शकतो :

लेव्हल १ : १०,००० स्टेप्स/डे
लेव्हल २ : ७५०० स्टेप्स/डे

यापैकी कोणातीही लेव्हल ठरवा आणि महिनाभर रोज तितक्या ठरवलेल्या स्टेप्स 'चालायचं चॅलेंज' स्वीकारा.

१) आपण कोणतं चॅलेंज घेतलंत हे इथे लिहू आणि रोजच्या (किंवा आठव्ड्याच्या) स्टेप्स इथे लिहीत जाऊ.
२) फोनवर काही उपयुक्त अ‍ॅपस आहेत, ज्याने स्टेप्स मोजता येतात. पण अ‍ॅप नसेल तरी काही हरकत नाही.
१०,००० स्टेप्स = ५ माईल्स / ८ किमी.
७५०० स्टेप्स = ३. ७ माईल्स / ६ किमी

साधारण चालण्याच्या वेगानुसार १६ ते २० मिनीटात १ माईल अंतर होते. त्यानुसार साधारण मोजमाप असे -
१०,००० स्टेप्स - दीड तास
७५०० स्टेप्स = १ तास १० मिनीटे

३) एखादा दिवस जमलं नाही, तर आठवड्याच्या उरलेल्या दिवसात थोड थोडं जास्त चालुन 'आठवड्याचं टारगेट" पूर्ण करा.

सप्टेंबर महिन्यात आम्ही काही मायबोलीकरांनी हे चॅलेंज घेतलं होतं आणि आज ते पूर्ण झालं. हे केवळ शारीरीक व्यायामाचं चॅलेंज नसून, ह्यात मानसिक चॅलेंज, किंवा डीटरमिनेशन हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे . महिनाभर एकमेकांना मोटीव्हेट करत चॅलेंज पूर्ण करायला धमाल आली. आता ऑक्टोबर महिन्यासाठी बघूयात किती मायबोलीकर हे चॅलेंज घेताहेत आणि पूर्ण करताहेत ?
चला तर मग... तुम्हीही सहभागी व्हा, आणि इतरांनाही सहभागी करून घ्या... Ready for walk? Ready to take the challenge?
Good Luck and go for it ... Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकीचे बहुतेक गुप्त व्यायाम करत असावेत... त्यामुळे इथे कुणी दिसत नाही...

पण माझा आठवडा...

८६,४२७ पावले = ३८.३ मैल .... १२३४६ पावले/दिवस...
परत हवामान मस्त झाले आहे.. तेव्हा..

डिसेंबर पहीला आठवडा ४९ किमी = ८७५० स्टेप्स/डे
डिसेंबर दुसरा आठवडा ५५ किमी = ९८२० स्टेप्स/डे
सद्ध्या चालण्यासाठी लवकर ऊठणे ही एक शिक्षा वाटते..

गोगा, तुम्ही इतके चालता तर आता दिसेनासे व्हायला आला असाल Light 1

माझी आठवड्यातून चार दिवस रोज अंदाजे ९००० पावलं होतायत. उरलेल्या ३ दिवसांची मोजत नाही. अशी अवस्था असल्याने इथे काही लिहीत नाही.

december 7th to 13th
total steps 98184
14026 per day.

total distance - 73.86 kms (10.55 kms per day).

आज 8000. बरोब्बर सव्वा तासभर
आत्ता जेवणानंतर उरलेले २००० पूर्ण झाले. रात्री थोडे होईल.

तुम्ही इतके चालता तर आता दिसेनासे व्हायला आला असाल <<< अजून आहे तसाच आहे.. उलट (चालण्याचा) अभिमान वाटल्याने मूठभर मांस दिवसेंदिवस चढते आहे... Proud
..
सतिश, कापोचे, विक्रमसिंह, अश्विनी, मध्या... चालते व्हा (च) Happy

केश्विनी - व्हेरी गुड.
फेसबुक, मायबोलीवरचा वेळ इकडे वापरला तर अवघड नाही.

गोष्टीगावाचे, चालते व्हा असा आदेश देऊनही धन्यवाद म्हणतो, चांगल्या सल्ल्याबद्दल चालते व्हा !

काल चाललो. ४५ मिनिटे. संध्याकाळी भर रहदारीच्या वेळेत. धुराचा त्रास झाला. वेळ बदलायला पाहिजे. Happy

विकीकाका, सकाळी सहा साडेसहाला निघा घरातून Happy

कापोचे, थँक्स Happy आता हे नियमित जमू दे. फेबुवर मी सकाळी १०-१५ मिनिटं आणि संध्याकाळी १० मिनिटंच असते. माबो जेव्हा बघते तेव्हा मी चालू शकेन अश्या ठिकाणी नसते. त्यामुळे तो चालण्यामध्ये तो व्यत्यय नाही. मला सकाळी ८ वाजता घरातून निघावं लागतं आणि परत घरी यायला अंधार होतो. तरी स्टेशन ते घर असा अर्धातास चालणे ठेवले आहे. ऑटो करत नाही. लंच टायमाला जमेल तेवढे चालते. दिवसभरात कमितकमी १ तास चालणे होतेय.

आज सकाळी ८००० पावलं झाली.
दिवसभर दोन हजारहून जास्त पावलं झाली. रात्री पुन्हा चालणे झाले.

एक शंका आहे. सलग दहा हजार पावलं चालणे आणि जेवणानंतर रमत गमत चाललेली पावलं धरून दहा हजार पावलं एकूण असा हिशेब धरणे..या दोन्हीचा परिणाम एकच असेल का ? (जेवणानंतर चालणे हवेच, पण ते या चॅलेंजमधे धरावे का ? )

माझे बर्‍याच काळापासून अपडेट्स द्यायचे राहिले आहेत

नोव्हेंबर - चॅलेंज कम्पिटेड विथ ११,३०० स्टेप्स अ‍ॅव्ह रेज/डे

डिसेंबर मधेही चालणे चालू आहे. आमच्याकडे गेले १५ दिवस सतत पाऊस. तरीही चालणे चालू आहे, जशी विंडो मिळतीये पावसातून तसे. चॅलेंज पूर्ण होईल असे वाटते Happy

सगळ्या जुन्या चालणार्‍यांना हाय, आणि नवीन जॉइन झालेल्यांना - कीप वॉकींग Happy

जेवणानंतर चालणे हवेच, पण ते या चॅलेंजमधे धरावे का ? <<<< मी दिवसभराची धरतो. व्यायाम म्हणून चाललेली.. शतपावली म्हणून चाललेली, घरातल्या घरात चाललेली....... सगळी.
पण एक गोष्ट लक्षात येते.... व्यायामासाठी वेगाच चाललेली पावले ही यात जास्त असायला हवीत. तरच त्याचा उपयोग जास्त होतो.. (Active Calories) साठी. रमतगमत चालल्याने तेवढा उपयोग होत नाही. यापूर्वी इथे वेगावर चर्चा झाली होती. तासाला ३ १/२ मैल पेक्षा जास्त वेग असेल तर त्या व्यायामाचा काही उपयोग होतो.

सलग दहा हजार पावले चालायला भरपूर रिकामा वेळ असावा लागेल, जो मला तरी शक्य वाटत नाही.

ब्रिस्क वॉकिंग बद्दल अभय बंग यांच्या पुस्तकात चांगली माहीती आहे.
गेले दोन दिवस ते जाणवलं देखील. मात्र जेवणानंतर बसून राहण्यापेक्षा थोडंसं चाललेलं चांगलं.

नोव्हेंबर २९ - डिसेंबर ५ ७७१२९ पावले , ११०१८ सरासरी दिवसाला
डिसेंबर ६ - डिसेंबर १२ ७१६४० पावले , १०२३४ सरासरी दिवसाला

रनकीपर हे बेष्ट अ‍ॅप आहे जीपीएस बेस्ड असल्याने अ‍ॅक्युरेट वाटतेय. ब्याटरी जळतेय पण....

गेले २ महिने जेव्हा जेव्हा लॉगईन केल, तेव्हा तेव्हा हा बाफ बघतीये , पण लिहायला जमल नाही.

माझे रोजच अ‍ॅव्हरेज १०,००० पावले चालण होतच. आठवड्यात ३ वेळा ६.५ के जॉगींग , १ दिवस १० के, उरलेले ३ दिवस ब्रिस्क वॉक आणि शतपावली मिळून सहज होतात.

आता नियमीत पणे लिहीन.

व्वाव.छानच धनश्री !
रविवारी सिंहगड चढण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या रविवारी उशिरा गेल्याने अर्ध्यातून परतावं लागलं. पण त्याची भरपाई आल्यानंतर आमच्य इमारतीचे ११ मजले चढून केली.

गेल्या रविवारी एक पन्नाशीच्या पुढचे गृहस्थ सकाळवाजता, साडेनऊ वाजता सायकलवरून सिंहगड उतरताना भेटले होते. म्हणजे सहाच्या ही आधी त्यांनी घाट चढायला सुरूवात केली असणार. खडकवासल्याला सिंहगड कडे जाणा-या सायकलस्वारांचा जथा पहाटे पाच पासून दिसतो.

डिसेंबर तिसरा आठवडा ५७ किमी = १०१८० स्टेप्स/डे
या आठवड्यात प्रथमच लेव्हल १ : १०,००० स्टेप्स/डे चॅलेंज साध्य झाले..

Pages