कायापालट स्पर्धा "वारी..." प्रवेशिका २ : कोटा चुकलेल्या पिंटकाचा आक्रोश - tanyabedekar

Submitted by संयोजक on 31 August, 2009 - 22:15

प्रवेशिका २ : कोटा चुकलेल्या पिंटकाचा आक्रोश

मूळ कविता : वारी चुकलेल्या वारकर्‍याचा अभंग

मज पिंटकासी | ड्रायडेचा भोग |
बाटलीचा योग | नाही आज ||

ड्रायडेच्या आधी | केला नाही स्टॉक |
आता पश्चात्ताप | वृथा होइ ||

भेटला बेवडा | सभोवती दर्प |
झाला मज हर्ष | स्वर्गाप्रती ||

विचारोनी त्याला | कुठे मिळे माल |
पळालो भरभर | गुत्त्याकडे ||

काळ्या बाजारात | किंमत ती फार |
सोसवेना भार | खिशावरी ||

लोक होती पुढे | पाहतो मी हताश |
बाटली खिशात | घालून जाती ||

केला निश्चयाचा | महामेरु थोर |
मोजले धन थोर | तिच्यासाठी ||

उघडला सोडा | घेतला चखणा |
जाता पहिला घोट | मोक्षप्राप्ती ||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद ! Happy