"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ८

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 06:32

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"ही वाट दूर जाते"

झब्बू म्हणून कुठल्याही पायवाटेचा अथवा कच्च्या/पक्क्या रस्त्याचा फोटो देऊ शकता.

way-to-alexandra-palace.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> फ्रेंच लोकांना सांग.. जगांत भारत आणि भारतांत कोकणांइतकं काहीच सुंदर नाही..
जरुर सांगेन पण भारतात परत आल्यावर!

क्ष, पावसांतलं महाबळेश्वर, मस्तच!

हा वरंधा घाट,

वा वरंधा... खास असतो पावसाळ्यात.
किरू, परूळ्याला शूट झालं होतं श्वासचं. त्यामुळे तो सगळा भाग खूप फिरलेय मी.

क्ष, हे घे, भजी पॉइंट... भज्यांसकट...
उजवीकडे रस्तापण दिसतोय त्यामुळे फोटो चालेल... (झब्बू नं. ९ मधेपण टाकु शकटो मी हा फोटो!!)

अर्रे सही ! ती मस्त गरम गरम कांदा भजी आणि चहा! पावसाळ्यात घाटात गाडी चालवून वर्णन करु न शकणार्‍या अवस्थेत तिथे पोहोचलो की अजूनच झकास वाटायचा! Proud

बरं ही अजून एक .. पॉईंट रीज कॅलिफोर्निया

DSC05622_1.JPG

क्ष च्या फोटोवरून आठवलं कुणाकडे हरीहरेश्वरच्या उतरत्या पायर्‍यांचा फोटो आहे का? माझ्याकडचे सापडत नाहीयेत/ पुण्याला राह्यले असावेत.
असाच खोल खोल भोवळ आणणारा उतार आहे तिथेही.

हा ऑस्ट्रेलिआ च्या पार्लियामेंट हाऊस कडे जाणारा रस्ता...

Picture 042a.jpg

.

Pages