"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ८

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 06:32

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"ही वाट दूर जाते"

झब्बू म्हणून कुठल्याही पायवाटेचा अथवा कच्च्या/पक्क्या रस्त्याचा फोटो देऊ शकता.

way-to-alexandra-palace.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Picture 013.jpg

अडम, पुन्हा चुकलं! बे ऑफ मेक्सिको नाही, गल्फ ऑफ मेक्सिको! :p

हा पुन्हा एकदा स्मोकी माउंटन्सचा... तिथला निसर्ग इतका सुरेख आहे की डोळ्याचं पारणं फिटतं आणि किती फोटो काढू नि किती नको होतं!

IMG_1306.JPG

Cade's Cove
Great Smoky Mountains National Park, TN

100_9401.JPG

दुबईमधल्या अटलांटिस हॉटेलकडे जायचा रस्ता. बराच वेळ आपल्याला वाटते कि आपण त्या कमानीखालून जाणार, पण शेवटी रस्ता एकदम वळतो.

मजा आली सर्वांचे फोटो पाहुन......सुरेख वाटा आहेत एकेक!
मलाही शोधाव्या लागतील आता जुन्या वाटा ! Happy

जाऊ देत तिथे भांडत बसण्यापेक्षा झब्बू देते.. त्या वाटेला जाण्यापेक्षा ही वाट बरी.
Picture_050.jpg

नी, सावंतवाडीमध्येच हा रस्ता आहे. आम्ही सावंतवाडीहून परुळ्याला चाललो होतो. तिथूनच पुढे कुडाळला जाता येते. (MIDC सुद्धा)

>>>>>>हा आकेरी फाट्यावरून वेंगुर्ल्याकडे जातानाचा का रे?
नाही गं. हा आपल्या नॅशनल पार्क मधला रस्ता आहे. कान्हेरी केव्ह्जला जाताना.. Happy

आम्ही सावंतवाडीहून परुळ्याला चाललो होतो.<<
म्हणजे पिंगुळी फाट्याकडे जायचा रस्ता. राउळ महाराजांच्या मठावरून जातो तो..

>>>>>>म्हणजे पिंगुळी फाट्याकडे जायचा रस्ता. राउळ महाराजांच्या मठावरून जातो तो..
अगदी बरोब्बर.. तु गेलीयेस कधी?

Pages