ताकातली भेंडी

Submitted by दिनेश. on 8 December, 2015 - 10:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्षझ

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
२ जणांना पुरेल.
अधिक टिपा: 

माहितीचा स्रोत: 
पारंपरीक पदार्थ आहे .
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी दोनदा प्रयत्न केला.......दोन्ही वेळा दही फाटलं.....काय चुकलं असेल?

मी हजारवेळा अतिशय चविष्ट अशी खाल्ली आहे, पण करायला भिती वाटते. दह्यात कणिक साबा घालायच्या नाहीत तसेच घालायच्या आणि तरीही कन्सिस्टन्सी मस्त जमायची.
आता करून बघते दिनेशजी आणि सांगते.

आम्ही थोडा नारळ घालतो दह्यात. मस्त लागते श्रावणात जे मोठे मोठे श्रावण भेंडे येतात त्याची ही भाजी मस्त होते.

दिनेश फोटो मस्त दिसतोय.

छान सलाड दिसतेय... पण भेंssडी त्या तिच्या जागी काहीतरी वेगळे इमॅजिन करावे लागेल .. कारण ताक किंवा कढी जितकी आवडीची तितकीच भेंडी ती नावडीची..

भेंडीचे पेरभर लांबीचे तूकडे करून घ्या आणि ते वार्‍यावर पसरून ठेवा. ( ही कृती आवश्यक आहे. अगदी आदल्या रात्रीही भेंड्या कापल्या तरी चालतील. पसरून कपड्याने झाकून ठेवा. )

हे नेहेमीच्या भेंडीच्या भाजीसाठीही करावे का ?

मी भेंडी नेहमीसारखीच चिरते आणि पॅनला तेलाचा हात पुसून त्यात अगदी थोडे तिखट मीठ लावून भेंडी परतून घेते. आणि मग ताकाच्या कढीसारखीच बाकी कृती. ताकाला बेसन लावून फोडणी घातली की मग वरून परतलेली भेंडी घालायची आणि उकळी येईपर्यंत मंद गॅसवर ठेवायचे. मधून मधून ढवळायचे.
आजवर एकदाही ताक फाटले नाही की भेंडीच्या तारेने घोटाळा केला नाही.

आहाहा मस्तच दिसतंय.

मी तुपाच्या फोडणीत भेंडी परतते मग नंतर बेसन लावलेलं ताक टाकते. ताकातच ठेचा, कोथिंबीर, ओवा,मिरपूड, मीठ, किंचित साखर इ. टाकलेलं असतं. भेंडीची कढीच करते. कोकम नाही टाकत. ह्या पद्धतीने कधीही फुटली (फाटली) नाहीये भाजी, तारही नाही आली भेंडीला.

फोटो मस्त!
मला स्वतःला भेंडी आवडत नाही त्यामुळे मी खात नाही, पण घरातल्या बाकी सदस्यांसाठी करते नेहमी. नीधप म्हणते तसं ताकातल्या भेंडीला चिंच/ आमसूल इत्यादी घालत नाही. भेंडी आदल्या दिवशी रात्री धुवून टोपलीत झाकून ठेवते, म्हणजे सकाळी छान कोरडी झालेली असते. अश्या भेंडीला तार येत नाही.

दिनेशदा, तुम्ही र्‍हस्व उकार नेहमी दीर्घ (जूने, तूकडे इत्यादी) लिहिता आणि दीर्घ ऊकार (वापरु, करु) र्‍हस्व लिहिता Happy

फोटो आवडला.

मीही नेहमीच्या पारंपारिक पद्धतीने ताभे करते.

भेंडी एकवेळ धुवुन रात्रभर ठेवेन पण कुठलीही भाजी चिरुन ती दीर्घकाळ तशीच ठेवणे मला पटत नाही, असे केल्याने जीवनसत्वे उडुन जातात असे जवळजवळ सगळे आहारतज्ज्ञ ओरडुन सांगतात. नेहमीच्या भाज्याही मी कांदा परतत असताना पटापट चिरते.

नेहमीप्रमाणेच मस्त पाककृती आणि फोटो एकदम तोंपासु.....

ही कृती जमलं तर सूत नाहीतर भूत अशी आहे.>>>>>>>> हे वाचून मात्र जरा भीतीच वाटतेय. भेंडीची भाजी आवडते आणि अश्या पध्दतीने करायला सुध्दा आवडेल.

नेहमीची भेंडीची भाजी सकाळी डब्यासाठी बनवायची असेल तर मी रात्री धुवून, पाणी पुर्ण निथळुन, चाळणीत झाकून ठेवते (शक्यतो जिथे रात्री फॅन सुरु असेल त्या खोलीत). सकाळी व्यवस्थित कोरडे होतात. भाजीला तार येत नाही आणि सकाळचा वेळ वाचतो.

साधना, भेंडी बारिक चिरून उघडी ठेवायची नाही आहे, मोठेमोठे तुकडे कापून आणि ते फडक्याने झाकून ठेवून फारसा फरक पडत नाही.

अमी मी पण नेहमी रात्री धुवून चाळणीत भेंडी ठेवते. वरुन झाकण देते. सकाळी बर्‍याच प्रमाणात भेंडी कोरडी झालेली असतात.

दिनेशदा पाककृती एकदम तोपासु आहे. तुम्ही जुन्यमायबोलीबर्वर दिलेली दही भेंडी मी वरचेवर करते. अर्थात नेहमी त्यात काही ना काही बदल करत असते. पण घरात ती भेंडी खुप आवडतात.

मी पण सहसा आंबटचा प्रकार एकच घालते. म्हणजे जर दही असेल तर कोकम किंवा इतर आंबट नाही घालत. कालवणातही जर चिंच असेल तर टोमॅटो नाही घालत. डाळीत टोमॅटो किंवा लिंबू पिळला तर कोकम नाही टाकत.

वा! मस्त आहे कृती. करुन पाहीन.

भेंडी एकवेळ धुवुन रात्रभर ठेवेन पण कुठलीही भाजी चिरुन ती दीर्घकाळ तशीच ठेवणे मला पटत नाही, असे केल्याने जीवनसत्वे उडुन जातात असे जवळजवळ सगळे आहारतज्ज्ञ ओरडुन सांगतात. नेहमीच्या भाज्याही मी कांदा परतत असताना पटापट चिरते.>> ह्याला अनुमोदन. भाज्या खूप पुर्वीच चिरुन ठेवल्यांनी त्यातील अ‍ॅन्टी-ऑस्किडन्ट कमी होते. मी भाज्या निवडून ठेवतो पण चिरुन नाही.

ताकातली भेंडी प्रचंड आवडती. मी पण आमसूल घालत नाही. तुकडे नेहमीच्या भाजीसारखेच करते. वाडग्यात घेवून खात बसायचं.

मी एकदा केली होती ताकातली भेंडी आणि चक्क छान जमली सुद्धा होती.
दिनेश तुमच्या अनेक धाग्यांपैकी या धाग्यावर पहिल्यांदाच मी मला काहीतरी जमल्याचं लिहिलं आहे. Proud

अरे वा,
बर्‍याच लोकांना आवडते कि. ( नाव न घेता प्रतिसाद देतोय Happy )

भेंडी शिजताना जर आंबट पदार्थ घातला तर त्यातले तार काढणारे घटक निष्प्रभ होतात ( संदर्भ : स्वायंपाकघरातील विज्ञान, लेखिका : डॉ. वर्षा जोशी ) मी दही नंतर घातल्याने, भेंडी परतताना कोकम घातले.

भाज्या आधी कापून ठेवू नये हे मलाही मान्य.. पण कुठलीही भाजी ( भोपळ्यासारखी कठीण कवच असलेली सोडली तर ) शेतातून उपटल्यापासून / तोडल्यापासून तिच्यातली जीवनसत्वे थोडीफार नाश पावायला सुरवात होतेच. अर्थात मी फक्त याच भाजीसाठी हे करतो.

दही ताजे आणि घरात विरजलेले असेल तर, बहुदा पिठ लावावे लागत नाही. मी बाजारातून आणले होते. आणि तशीही मला रिस्क घ्यायची नव्हती, कारण भेंडी आणि दही दोन्हीही लगेच मिळाले नसते.

मला ही भाजी कढीसारखी पातळ आवडत नाही. जून भेंडी असेल तर तिचे तूकडे, बिया वगैरे कढीत वापरतो ( सोबत शेवग्याच्या शेंगा, काकडी, मका वगैरे )

आफ्रिकेत मात्र लोकांना भेंडीच्या तारेचे वावडे नाही. ती तशीच उकडून किंवा मटणासोबतही शिजवून खातात.
आणि इथल्या बहुतेक देशांत ती लोकप्रिय आहे ( इथे ओक्रा म्हणतात. )

>>कृती जमलं तर सूत नाहीतर भूत अशी आहे. भेंडीला तार आली किंवा ताक फाटले तर सगळ्याचाच विचका होऊन हातो.<< हसुन मेलो...! Happy

Pages