तडका - डिजिटल धोका

Submitted by vishal maske on 27 November, 2015 - 21:51

डिजिटल धोका

व्यवहार डिजिटल होऊन
कॅशलेस ठरू लागले
पैशांऐवजी व्यवहारात
आता आकडेच फिरू लागले

व्यवहारात आकडे फिरवणे
हा डिजिटल झरोका आहे
मात्र या डिजिटल व्यवहारांना
डिजिटलचाच धोका आहे...?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वतःच्या ब्लॉग वर लिहा आणि आठवड्यातुन फक्त एक"च" इथे मायबोली वर टाका. तुमच्या अवलोकनात तुमच्या ब्लॉगचा पत्ता द्या. आठवड्यातुन एकदाच जो तडका इथे टाकाल त्याची प्रतिसादात वाचकांना आवाहन करा तुमचे इतर तडके वाचण्यासाठी तुमच्या ब्लॉगला भेट देण्याचे.

आणि....
धन्यवाद! Proud

माझे तडका हे सदर चालु ठेवावे की बंद करावे << चालु ठेवण्यास हरकत नाही फक्त अधिक बारकाईने, मोजके आणि तपशिलवार लिहलेत तर जास्त योग्य ठरेल. कोणत्याही गोष्टींचा अतिरेक झाला तर ती गोष्ट नकोशी होते.

quantity पेक्षा quality वर फोकस करा. जर तुम्ही दर्जेदार कविता केल्यात तर इथले सभासद नक्कीच दाद देतील.

तुमच्यारोजच्या तडक्याने मला तरी काहीच फरक पडलेला नाही. चालू ठेवा, बंद करा तुमची मर्जी.
पण त्यामुळे त्रास होणार्‍या या मायबोलीकरांची सुटका होईल असं दिसत नाहीये. दुसरे रतीब घालणारे मायबोलीवर जन्मले आहेत.

मामी आणि सायोनाराशी सहमत! ह्याशिवाय आणखी एक मुद्दा:

जागृती घडवून आणायची असेल तर छंदमुक्त कवितेच्या फॉर्ममध्ये लिहिण्यापेक्षा थेट गद्यात आपले म्हणणे मांडा. ते अधिक लवकर पोचते. ही केवळ नम्र सुचवणी. गैरसमज नसावा.

'कविता' ह्या प्रकाराचे मायबोलीवर जे स्थान आहे ते मात्र आहे त्याच लेव्हलला राहील हे पाहणे कोणत्याही सदस्याचे अलिखित कर्तव्य असायला हवे.

विशाल, माझ्यामते तुम्ही तडका चालु ठेवावात. कोणाच्या पोस्ट वर राहोत नाहीतर खाली याचा विचार करण्यात वेळ वाया घालवु नका.तडका ही चांगली कल्पना आहे चांगल्या गोष्टिंसाठी कुणाचि मते जाणुन घेण्याची आवश्यकता वाटत नाही.चला होउन जाउ द्या अजुन एक तडका..

तडका चालू रहावा का? - हो.
तडका चालू रहावा का?- नको.
तडका चालू रहावा का? - काही फरक पडत नाही.

असा कौल काढा.
आम्ही मतदान करतो.

.

तुमच्या वात्रटिका या मुळात वात्रटिका वाटत नाहीत. रोजच्या रोज उठून चालू घडामोडींवर कविता यामुळे त्यात गुणवत्ता राखणे महाकवींना ही जमणारे काम नाही. तुमच्या वात्रटिका सोडून इतर काही रचना पाहता तुम्हाला कविता जमणार नाही असं अजिबात नाही. काही रचना तर सुंदरच होत्या.

रोजच्या रोज उठून सदर चालवायला मुळात त्या पोर्टलने आपली नेमणूक केली आहे का ? प्रतिसादांअभावी बंद करत असाल तर चांगल्या रचनाही मागे पडतात. त्यामुळे नाउमेद होऊन कविता पोस्ट करणे बंद होऊ शकते. त्याला नाईलाज आहे. पण काही काळ थांबल्यास पुन्हा उत्साहाने चांगल्या रचना देता येतील.

तुम्हाला आलेल्या निराशेतून प्रसिद्धीला हपापलेले वगैरे विशेषणं न लावता तडका बंद केला असता तर ठीकच. अन्यथा अधून मधून जेव्हां तुम्हाला एखादी वात्रटिका कविता म्हणून सुचेल तेव्हां पोस्ट करून बघा. चार लोकांना विचारा. त्यासाठी कोण चांगल्या कविता करतो ते पहा. हे न करताच मारा केलात तर आणखी काय होणार ?

जागृतीसाठी वात्रटिका हा कन्सेप्ट इंटरेस्टिंग आहे. तुम्ही ढसाळ आदि व्रिद्रोही कविता वाचल्यात का ? झिणझिण्या आणणा-या कविता आहेत. त्यांनीही रोज लिहीलेले नाही.

मला एकच विचारायचे आहे,
तुम्ही जितके तडके लावलेत (निदान) तितक्याच संख्येने तुम्हाला प्रतिसाद मिळालेत काय.
त्यावरुन ठरवा.
**लोकांना कधी कधी साधं वरण-भात पण खावासा वाटतो हो !

मायबोली वरील माझे चालु घडामोडींवर आधारित तडका हे वात्रटिकांचे सदर बंद करण्याचा विचार आहे,
<<

उशीराने का होईना पण खुपच चांगला निर्णय घेतलात तुम्ही.
अभिनंदन व शुभेच्छा!

एकाच धाग्यात चार ते पाच तडके टाकून आठवड्यातून एकदा एक धागा प्रकाशित करा.
दर दिवसाला एक चार ओळींचा तडका टाकून अनेक धागे काढणे यामुळे लोकं इरिटेट होत् आहेत.हेच सध्या राजेश कुलकर्णींच्या धाग्यांबाबतही चालूये. ते असो
तुमचा कंटेंट चांगला असला तरी त्या चारोळ्या बाळबोध वाटतात. मामीने म्हणलंय तसं- Quality कडे लक्ष द्या.
आणि समाजप्रभोधन करायचं असेल तर ते लोकांनी वाचायला हवं आणि ते साहित्य लोकांनी वाचायला हवं असं वाटत असेल तर त्याचा ओव्हरडोस नको

साहेबांच्या सर्व धाग्यांवर जितके प्रतिसाद आले असतील त्याच्या किमान चौपट प्रतिसाद या एकाच धाग्यावर आले आहे.

बंद करावा असा माझा अभिप्राय आहे.
कारण पहिल्या एक दोन चार वेळेस वाचला गेला, पण रोज यायला लागला म्हणल्यावर अशक्य आहे वाचण.
वाचलाच गेला नाही तर प्रबोधन कैसे साधणार.?

राजेश कुलकर्णी हा धागा वाचत असतील तर त्यांनी देखील यातून स्फूर्ती घ्यावी असे मला वाटते.

प्रामाणिकपणे सांगायचे तर मी १-२ च तडके वाचले होते ते पण मध्यंतरी जो गदारोळ झाला होता त्यावेळी!

काही खास वाटले नाही. वाचलं काय नि नाही वाचलं काय काही फरक पडत नाही अश्या कॅटेगरीतले वाटले.

नुसते र ला ट जुळवून लिहिल्यासारखे वाटले. तसंही इथे कोणी प्रसिद्धीच्या मागे धावतेय असे कधीच वाटले नाही. असो तुम्हाला काय वाटते त्याच्याशी माझे काय देणेघेणे !

मागेदेखील बेफि आदि तज्ञांनी नि सुज्ञांनी सांगितले होतेच! असो.

माफ करा खुपच परखड वाटले असेल तुम्हाला!

तरीही एक पोल काढुन बघा. ऋन्मेष नावाचे सद्गृहस्थ तुम्हाला यात मदत करु शकतील. Happy

मस्केजी,

तुम्हाला जोपर्यंत मा. अ‍ॅडमिन वा मा. वेबमास्तर हे सदर बंद करावयास सांगत नाहीत तोपर्यंत इकडे निगेटिव्ह लिहिणार्‍यांकडे, सदर बंद करा म्हणणार्‍यांकडे बिनधास्त दुर्लक्ष करा. त्यांनी लिहिलेल्या उचकवणार्‍या प्रतिसादांना बिलकुल उत्तर लिहू नका. प्रतिवाद करण्याचा आव आणून तुम्हाला उचकवून तुमचा आयडी बाद करण्याची कला इथल्या तथाकथित तज्ञ अन सूज्ञ लोकांना चांगलीच अवगत आहे. आधीही एका प्रथितयश गझलकारास इथून असेच हुल्लडबाजी करून हाकून लावण्यात आले होते.

वर श्री कापोचे यांनी म्हटल्या प्रमाणे, रोजच्यारोज सामाजिक घडामोडींवर चटपटीत भाष्य करणे हे महाकवींनाही जमणारे नाही. त्यामुळे अधुनमधून सपक रचना झाली तरी वाईट वाटून घेऊ नका. रोजरोज हॉटेलस्टाईल भाजी आपण खात नाही. अ‍ॅसिडीटी होते. घरचे माईल्ड फोडणीचे वरणही रुचकरच लागते. अ‍ॅसिडीटीही होत नाही. नैका? तेव्हा एकादा तडका माइल्ड असला म्हणून काय झालं?

तुम्ही लिहित आहात ते दखलपात्र आहेच आहे. लोक प्रतिसाद लिहित नाहीत म्हणजे वाचत नाहीत असे नव्हे.

उत्तम लिहित आहात. लिहीत रहा.

पुलेशु.

तुमच्यारोजच्या तडक्याने मला तरी काहीच फरक पडलेला नाही. चालू ठेवा, बंद करा तुमची मर्जी. >>>>> ह्याला अनुमोदन.

तुम्हाला जोपर्यंत मा. अ‍ॅडमिन वा मा. वेबमास्तर हे सदर बंद करावयास सांगत नाहीत तोपर्यंत इकडे निगेटिव्ह लिहिणार्‍यांकडे, सदर बंद करा म्हणणार्‍यांकडे बिनधास्त दुर्लक्ष करा. >>>> ह्यालाही अनुमोदन.

तुम्ही सदर चालवण्याचा उद्देश्य लिहिलेला आहेच. तो खरच सफल होतो आहे का ह्याचा हवतर हिशोब मांडून बघा. असेल तर चालू ठेवा, नसेल तर काही बदल करता येतील का ते पहा. एकंदरीत निर्णय तुमचा.

तुम्ही खुश्शाल लिहित रहा हो. कविता म्हणजे कोणाच्या तिर्थरूपांची जहागीर नाही. ज्यांना बाहेर कोणी हिंग लावून विचारत नाही असे काही इथे तुम्हाला नाउमेद करतील. चिकाटी सोडू नका. ज्यांना इंटरेस्ट नाही ते इग्नोर करतील.

छपराट आय डी स्वतःचे स्कोअर सेटल करण्यासाठी ह्याही धाग्यावर अवतरलेले पाहून अपेक्षापूर्ती झाली.

तडका चालू ठेवा म्हणणार्यांपैकी एकाचा पण एकही प्रतिसाद मी कधीच कुठल्याही तडक्यावर पाहिलेला नाहीये Proud
स्कोसे स्कोसे म्हणतात ते हेच की काय

मी भरपूर प्र्टिसाद देतो.

लीहा हो भरपूर.

फक्त तुमचा एकच धागा ठेऊन तिथेच सलग पोस्ट करत रहा... मेल्या कोंबडीची पिसं पडल्यासारखी इथे तिथे टाकू नका.

Pages