तडका - डिजिटल धोका

Submitted by vishal maske on 27 November, 2015 - 21:51

डिजिटल धोका

व्यवहार डिजिटल होऊन
कॅशलेस ठरू लागले
पैशांऐवजी व्यवहारात
आता आकडेच फिरू लागले

व्यवहारात आकडे फिरवणे
हा डिजिटल झरोका आहे
मात्र या डिजिटल व्यवहारांना
डिजिटलचाच धोका आहे...?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता या सदरात असल्याने मी आतापर्यंत कुठलाच तडका वाचला नव्हता.बंद करणेबाबत अशा मथळ्याने उघडला.काही मागचे तडके वाचले.आपण सर्व इथे लिहिण्यासाठीच येतो.पोटदुखी वगैरे काही नसते.
माझे मत: संपादनाची सोय वापरून एकाच धाग्यात अधूनमधून कविता टाकत रहा.तीन चार महिन्यांनी काढा नवीन धागा.वाचक वाचत नसतील तर आपण काय करणार?

आठवड्यातुन एकदा हे सदर चालू ठेवावे. रोज नवा धागा काढणे योग्य वाटत नाही. आणि तडका सोडून ईतर विषयांवरही लिहावे.

माझे तडका हे सदर चालु ठेवावे की बंद करावे यावर आपणास काय वाटते ते आपण कमेंट मध्ये लिहून कळवावे,
त्यानंतर एकुण चर्चेचा विचार करून तडका हे सदर चालु ठेवायचे की बंद करायचे यावर निर्णय घेतला जाईल

>>>> अत्यंत स्तुत्य उपक्रम! अभिनंदन, तुम्ही समजुतदार असल्याचा हा पुरावा आहे. कमेंटांवर योग्य विचार करालच.

(ईतरांनीही(गरजुंनी) असे धागे काढून मतनोंदणी घ्यावी असे वाटते)

तडका चालू ठेवा म्हणणार्यांपैकी एकाचा पण एकही प्रतिसाद मी कधीच कुठल्याही तडक्यावर पाहिलेला नाहीये फिदीफिदी
स्कोसे स्कोसे म्हणतात ते हेच की काय
<<

तडका बंद करा म्हणणार्‍यांचा पाहिलाय का?

खालील प्रश्न आणि पर्याय घेऊन पोल काढा -

प्रश्न - तडका तुम्ही वाचता का आणि तो तुम्हाला आवडतो का?

१) कधीच नाही वाचत. त्यामुळे आवडायचा न आवडायचा प्रश्नच नाही.
२) कधीतरी वाचतो - बरेचदा आवडतो.
३) कधीतरी वाचतो - क्वचितच आवडतो.
४) वरचेवर वाचतो - आवडतो

यावरून मग काय निष्कर्श अनुमान काढायचे ते नंतर स्वताच्या मनाने काढा,
मात्र तडका चालू ठेवू? की बंद करू? असा थेट प्रश्न विचारणारा पोल काढू नका. ते ठरवायचा अधिकार ईतरांना देऊ नका.
किंबहुना कोणीही हा अधिकार लोकांना देऊ नये.
सल्ला आणि सूचना काय फुकट असतात, लोकं देतात काहीही. पण जेव्हा आपल्या घरची चूल पेटत नाही तेव्हा कोणी जेवण घेऊन येत नाही.

विशाल मस्के..

तुमचे बरेचसे तडके पाहिले. जर शक्य असेल तर वर कोणीतरी म्हटले आहे त्याप्रमाणे सगळे तडके एकाच धाग्यात टाकून त्यातच अपडेट करत गेलात तर फार उत्तम होईल. तुम्ही तडके टाकावेत वा टाकू नये हे मी सांगू शकत नाही. पण तुमच्या अवलोकनात (प्रोफाईलमध्ये) १५ पाने भरून तुमचे तडके आहेत ज्यावर सगळ्या मिळूनही तेवढ्या प्रतिक्रिया नाहीत जेवढ्या या धाग्यावर आहेत. तुम्ही जर प्रसिद्धीसाठी इ. हपापलेले नसाल आणि तुम्हाला धागे खाली गेल्याचेही काही वाईट नसेल तर काय हरकत आहे?

याने खालील टेक्निकल फायदे होऊ शकतात.

१. ज्यांना तुम्हाला फॉलो करायचे आहे त्यांना तुमचे सगळे लिखाण एकत्र वाचायला मिळेल.
२. एकाच धाग्यावर सगळे लिखाण आणि त्यावरील प्रतिक्रिया इत्यादी राहिल.
३. तुमच्या कोणत्या जुन्या धाग्यावर कोणी प्रतिक्रिया दिली आणि तुमच्या लक्षात यायच्या आत तो धागा खाली गेला तर तुमचे लिखाण कोणालातरी आवडते आहे ही फॅक्ट तुमच्याच लक्षात येणार नाही.
४. तुम्ही जर नवीन तडका प्रतिक्रियांमध्ये टाकत गेलात तर प्रतिसादांचा आकडा जास्त दिसेल आणि मायबोलीवर नवीन येणारी व्यक्ती कोणत्याही पुर्वग्रहाशिवाय ते आवर्जून वाचेल. त्यामानाने अज्जिबात प्रतिसाद नसणारा धागा पहिल्या पानावर दिसूनही जरा नजरेआड होऊ शकतो (हेमावै निरीक्षण).
५.इतर सर्व प्रतिसाद नसणारे किंवा अत्यल्प असणारे तडका धागे डिलीट करून एकच महातडका धागा चालू ठेवलात तर खात्रीने तुम्हाला जास्त वाचने/ प्रतिसाद मिळतील. आणि तुमचा समाज प्रबोधनाचा हेतु काही अंशी का होईना पण सफल होईल.

पटत असेल तर बघा. तुम्हाला हवे असल्यास तुमचे सगळे तडके एका धाग्यात एकत्र करायला आम्ही सगळे नक्की मदत करू.

Pages