दहशतवादाचे कूळ आणि मूळ

Submitted by उडन खटोला on 15 November, 2015 - 22:41

परवाच्या पॅरिस बॉम्बस्फोटानंतर बातम्या बघत असताना मनात विचार आला की ,आज सद्दाम हुसेन असता ,तर आयसीस किंवा तालिबानी आतंक्यांचा त्रास इतका वाढला असता का?

थोडा विचार केल्यावर असे उत्तर सापडले की नक्कीच नाही. सद्दाम हुसेन अमेरिकेच्या दृष्टीने कितीही वाईट/क्रूर इत्यादि असला तरी प्रत्यक्षात त्याने इराकला एक समर्थ अन बलशाली राष्ट्र बनवले होते . तो लोकप्रिय नेता होता आणि त्याने इराकमधील अंतर्गत बंडाळी आणि बाह्य हितशत्रूंचा बीमोड व्यवस्थित करून इराकी जनतेला सुखाचे दिवस दाखवलेले होते. त्याच्या काळात भारताशीही बगदाद चे चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते...

असे असताना , त्याला कुवेत वर आक्रमण करण्याची दुर्बुद्धि सुचली आणि तेलाच्या राजकारणात स्वार्थ साधण्यासाठी टपलेली अमेरिका ताबडतोब इराकवर तुटून पडली ... बरे त्यातून इराकी सैन्याला माघारी ढकळल्यावर अमेरिकेचे काम संपलेले असताना सूडबुद्धीने "सद्दाम हा क्रूरकर्मा हुकूमशहा असून त्याच्याकडे बायोकेमिकल वेपन्स आहेत " असा कांगावा अमेरिकेने जगभर केला (जो की नंतर खोटा असल्याचे उघड झाले !कारण टी जैवरासायनिक शस्त्रे कधीच सापडली नाहीत , ब्रिटिश मंत्र्यांनी याची कबुली दिलेली आहे)

तर येनकेन प्रकारेण सद्दाम ला शत्रू ठरवून अमेरिकेने त्याला संपवले... त्यासाठी साम,दाम ,दंड ,भेद सगळे उपाय केले . बंडखोर अतिरेकी संघटनांना पैसा आणि शस्त्रे पुरवली. ( जे अमेरिकेने तालिबानसोबत आधी अफघणिस्तान मध्ये देखील केलेले होते , रशियन फौजांविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेनेच तालिबान ला पैसा आणि शस्त्रे पुरवली होती ) हाच प्रकार सीरिया /लिबिया आणि अन्य ठिकाणी देखील केला ... पण आपले ईप्सित साध्य झाल्यावर इराकची पुनर्बांधणी करून त्या देशात सुव्यवस्थित शासनव्यवस्था अन शांतता नांदेल याची जबाबदारी घेण्याचे मात्र अमेरिका टाळत आली आहे. म्हणजे आधी अतिरेक्यांच्या साथीने देश बेचिराख करायचा अन मग हात वर करायचे ! ही हरामखोरी अमेरिका नेहमीच करीत आलेली आहे . म्हणूनच मी मागे तृतीय विश्वायुद्धासंबंधीच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे अमेरिकेचे दहशतवाद -विरोधी युद्ध बेगडी आहे आणि त्यांचे हेतु शुद्ध नाहीत .

आज इराक /सीरिय व अन्य भागात अमेरिकेच्या पैशानेच उभे राहिलेल्या अतिरेक्यांची सुधारित आवृत्ती म्हणून "आयसीस" उभे राहिले असून हा दहशतवादाचा भस्मासुर थांबवणे आता महाकर्मकठीण बनले आहे... पण या दहशतवादाचे मूळ आणि कूळ शोधू गेल्यास ते अमेरिकेच्या फसलेल्या अन चुकीच्या विदेश नीतीत अन युद्धखोरीत आहे हे स्पष्ट दिसून येणे... आणि म्हणूनच अमेरिकेपेक्षा रशियाची दहशतवाद -विरोधी मोहीम अधिक विश्वासार्ह वाटते .... !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मते, स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान व भारत दोनही देश राज्यकारभाराबाबत संभ्रमित अवस्थेत होते, पण तुलनेत पाक जास्त संभ्रमात होता. भारतात संस्थानिक/व इंग्रजांची प्रशासकीय व्यवस्था व तिथे काम करण्यास आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होते. व बहुसंख्य सामान्य जन उगाच आंदोलने/लढे/विध्वंस करणे अशा कम्युनिस्ट्/डाव्या विचारांच्या आहारी गेलेली नव्हती, आहे त्यात समाधान मानणारी होती. शिवाय महत्वाचे म्हणजे, आज जरी नेहेरुंचे "समाजवादी" धोरणाची आपण चिरफाड करीत असलो तरी पन्नास साठच्या दशकात त्या धोरणांनीच निदान एक एकहाती दिशा तरी मिळत गेली जे पाकिस्तानात घडले नाही व स्वअस्तित्व दाखविणे/अहंकार/बिनडोकपणा या कारणाने तसेच धर्माधारित फाळणीमुळे गोंधळलेल्या पाकिंनी निव्वळ भारताशी पक्षी हिंदुस्थानशी/हिंदु धर्माशी दुष्मनी या एकाच भ्रामक तत्वाला धरुन देश चालविणे पत्करले.
नेहरुंचा समाजवाद आदर्श नक्कीच होता, पण त्याच्या अंमलबजावणीकरता पुरेसे "आदर्श" मनुष्यबळ, जोवर स्वातंत्र्योपूर्व काळातील लोक ८०च्या दशकापर्यंत नोकरीत जिवंत होते तोवरच राहिले. किंबहुना ७०चे दशकापासुनच, नंतरची भ्रष्टाचारि भरताड वाढू लागली, व त्याचसुमारास "पेट्या/थैल्या" पोहोचवुन मतांचि बेगमी करुन निवडणूका जिंकायचे तंत्र राजकारण्यांनी आत्मसात केल्यावर त्यास लागणार्‍या पैक्याच्या तरतुदी करता राजकारणी व प्रशासन यांची भ्रष्ट अभद्र युति निर्माण झाली, तिचे परिणाम आज २०१५ मधे पराकोटीला पोहोचले आहेत.
पाकिस्तानात बंव्हशी लष्करशाही असल्याने व अन्य उतमातांमुळे/स्थानिक अस्मितेच्या प्रश्नांमुळे व मुळातच "लुटारु/हडपण्याच्या" वृत्ती मुळे तसेच एक धर्मावर आधारित आख्खा देश विना कष्टाने विना रक्त सांडवता फुकटचा मिळाल्याने त्याचि जी वाट लागणे अपेक्षित होते तसेच झाले.
काही रचनात्मक करावयाचे, (भले त्यात चुका होतिल) तर आधीची शेकडो वर्षांची सामाजिक/धार्मिक/आर्थिक/राजकीय पूर्वपिठिका लागते, ती जशी फाळणीच्या उर्वरित हिंदुस्थानात होती, तशी धर्मावर आधारित निर्माण झालेल्या व लष्कराच्या ताब्यात गेलेल्या पाकिस्तानात तेव्हा नव्हतीच, आजही नाही.

कापोचे, धन्यवाद.
मला तुमच्या सारखे वैश्विक नेटवरील संदर्भ देऊन सांगता येणार नाही. पण कळत्या वयापासुन आजवरच्या विचारमंथनातुन जे नि:ष्कर्ष व व्यक्तिंची परिस्थितीसापेक्ष/वैचारिकतेसापेक्ष अपरिहार्यता जाणवत गेल्यावर उरते ते केवळ ते सत्य स्विकारणे. प्रत्यक्षात व्यवहारात अशी "सत्ये" नाकारण्याकडे/त्यावर नानाविध बुरखे चढविण्याकडे कल असतो, वा ती देखिल अपरिहार्यता असते. सध्याचा मध्यपूर्वेतील अस्तित्वातील दहशतवाद हा धर्माधारीतच आहे असे सत्य कोणीच उघडपणे मांडणार नाही, तर त्यावर काहीना काही मुखलेप चढवतीलच, कारण सध्याचि ती अपरिहार्यता आहे.
लक्षात घ्या, की कृरपणा हा निव्वळ आयसीस वा लादेन इतकेच करीत नव्हते तर श्रीलंकेतही दोनही बाजुंनी कृरता अवलंबिली गेली, तशी ती व्हिएटनाम व अन्य पौर्वात्य देशातही बघायला मिळाली. तरी तिस "धर्माधारित क्रुरता" असे संबोधण्याची गरज तेव्हाही व आत्ताहि पडली नाही.
आयसिसच्या किम्वा लादेन वगैरेंच्या उदयाबाबत काही जण अन्यदेश//धर्म याम्ना दोषी धरताहेत. पण तो वाळून तोंड खुपसण्याचा प्रकार आहे. कसा? लक्षात घ्या, बामियान मधिल बुद्ध मूर्ति फोडल्यानंतर जगभरात किती हिंसक प्रतिक्रिया उमटल्या जेव्हा की (भारत सोडून द्या...) चीन/जपान्सहित बहुतेक पौर्वात्य देश बुद्ध धर्मावर विश्वास ठेवतात, मानतात.
समजा तुमच्या खिशात पैका नाही, खायला अन्न नाही, अन मुंबैच्या झगमगाटी रस्त्यांवरुन जाताना, भुकेपोटी वा कंगालपणापोटी तुम्ही कितीवेळा चोरी केलीत? कितीवेळा दुसर्‍यांच्या काचा फोडल्यात? तर नाही. तसे होणे शक्य नाही, तुम्ही तसे केले नसेलच कारण पुन्हा तुमच्यावरील पिढीजात व जन्मजात व अनुवंशिक व सामाजिक संस्कारांचा भाग तसे न करण्याचे कारण म्हणुन असतोच असतो.
पण जिथे, "आजच्या आपल्या परिस्थितीला" ते अमके तमके तेव्हडेच कारणीभूत आहेत, व त्यांना धडा शिकवा/संपवा ही शिकवण असते तिथे अशा विचारांच्या अनुयायांकडून विध्वंसाशिवाय काही घडत नाहि.
हीच रीत पाकिस्तानने गेली सर्व वर्षे भारताविरुद्ध त्यांच्या जनतेला भडकवुन लक्ष वेधण्यास वापरली.
हीच खेळी डावे/कम्युनिस्टांनी त्यांच्या उदयकाळात रशियात्/चीनमधे वापरली व सध्या भारतात ब्रिगेडीं/अन्यांमार्फत वापरताहेत.
लक्षात घ्या की गोव्यावरील्/अन्य प्रदेशांवरील राज्य टिकविण्याकरता आणि धर्मसत्ता स्थापित करुन प्रसार करण्यास काही शे वर्षांपूर्वीची ख्रिश्चनधर्मिय सत्ताधार्‍यांची जी ",मागास व क्रुर" वृत्ती/प्रवृत्ती आणि कृति होती, (जी कालौघात बर्‍यापैकी सुधारली) त्या अवस्थेत आजचे मुस्लिमधर्मिय आहेत असे माझे मत.

कापोचे, बघिरा, मला वाटले होते की माझ्या आधीच्या पोस्ट वर नेहेमीप्रमाणे "अस्थानि/चुकीची/असंबद्ध" असे शेरे पडतील की काय... Proud

लिंबुजी
आपल्या वयामुळे जी परिस्थिती आपण अनुभवली ती कॉमनच असणार ना ? तेव्हढ्यापुरती सहमती आहे. बाकी विचारधारेनुसार विश्लेषण वेगवेगळं असणारच. हे पटवूनच घ्या असा तुमचा आग्रह आढळला नाही.

>>>> हे पटवूनच घ्या असा तुमचा आग्रह आढळला नाही <<<<
अगदी बरोबर कापोचे, कारण मूलतः पेशाने ज्योतिषी असल्याने एखाद्याने "पटवुन घेणे/न घेणे" त्या त्या व्यक्तिसापेक्ष कुंडलीवरती अवलंबुन असते, व त्यामुळे कुणावरच कसलाच आग्रह करणे अयोग्य/निरुपयोगी हे ज्ञात आहे.
जो तो आपापल्या कुवतीनुसार प्रारब्ध/प्राक्तनानुसार घटना समजुन घेईल/घटना घडवेल/घडत्या घटनेत सहभागी असेल, हे सुनिश्चित असते. अर्थात या "ज्योतिषीय" मताशी (वा अंधश्रद्धेशिही Wink ) तुम्ही वा कुणी सहमत असेल्/असावेच असेही माझे मत नाही. Happy
हे थोडेसे कसे आहे माहित आहे का? की समजा रस्त्यात चारचाकी/दुचाकीचा अपघात झाला, तर आजुबाजुचे पब्लिक सरसहा कसलाही विचारही न करता अगदी चुक दुचाकीवाल्याची असली तरी चारचाकीवाल्यालाच दोषी ठरवुन, इतकेच नव्हे तर पोलिसांची वाटही न बघता, स्वतःच कायदा हातात घेऊन, व स्वता:तील कृरतेची खुमखुमी जिरवण्याकरता त्या चारचाकीच्या चालकास बदडून काढतात, बदडून काढण्यामधे स्वतःचेही हात धुवुन घेतात, व नंतर इतरांनाही ती मर्दुमुकी सांगत रहातात, ना त्याम्च्या त्याचा पश्चा:ताप असतो ना खेद/खंत.
आता चारचाकीवाल्याचे नशिब चाम्गले असेल, तर अन तरच, त्यावेळच्या गर्दीत एखाद दोनजण तरि त्यास वाचविणारे उपलब्ध असतात, व ते ताकदिने/युक्तिवादाने/बळजबरीने/हुकमीपणे गर्दीला आवाक्यात घेऊन त्या एकल्या चालकास मारहाण/दुखामारहाण/दुखापतीपासन वाचवितात.
समुहाच्या याच मानसिकतेचा परिपूर्ण अभ्यास करुन बहुसंख्य राजकिय विचारप्रणालिची लोक समुहाच्या या सामुहिक विध्वंसक ताकदीचा आपल्याला हवा तसा वापर करुन घेताना दिसतात, व यात कम्युनिस्ट सुटले नाहीत की कॉन्गी सुटले नाहीत की कोणत्याही धर्माचे नेतेही. मग मध्यपूर्वेतील मुस्लिम धर्म याला अपवाद कसा असेल/? तो नाहीच्चे, शिवाय राकॉच्या वळचणिखाली आश्रयाला आलेले ब्रिगेडी/नक्षलीही याला अपवाद नाहीच्चेत.
फरक पडतो तो इतकाच, की या विध्वंसाला हिंसेला जेव्हा "धर्माज्ञा/जिहाद" म्हणून ग्लोरिफाय केले जाते वा लाल पुस्तकातील नियम म्हणून अंमलात आणले जाते.
जेव्हा जेव्हा असे होते, तेव्हा क्रियेला प्रतिक्रिया या न्यायाने यास एकतर सपशेल शरणागतीने उत्तर मिळते वा प्रखर विरोधाने.
सध्याच्या हिंदुस्थानातील परिस्थिती "अशा प्रतिक्रियात्मक प्रखर विरोधावरच" "असहिष्णू" म्हणून शिक्का मारण्यार्‍यांच्या बाह्य/प्रदर्शनात्मक चलतीची आहे.
असो.
या माझ्या मतांशी कोणी सहमत असेल अशी अपेक्षा नाही. सहमत व्हावेच अशी सक्तिही नाही. निव्वळ मत मांडले असे.

>>>> चला आता अस्थानी म्हणायला हरकत नाही लिंब्याच्या पोस्टला. <<<<
कान्द्या, धाग्याचा विशय आहे "दहशतवादाचे कूळ व मूळ"
अर्थात त्याला धरुनच असे कूळ काय किती "फॉर्म्समधे" असु शकते, व मानवी मनात दहशतवाद करण्याचे "मूळ" कसे रुजत जाते याचे निव्वळ एक लहानसे उदाहरण वर चारचाकी/दुचाकीच्या अपघातानिमित्तने दिले व त्यावेळच्या अपघातामुळे निर्माण झालेल्या समुहाच्या मानसिकते सारखीच मानसिकता, अशा घटना मुद्दाम घडवुन / विचार पसरवुन जे कोणी करु पहाते त्याकडे दिशादिग्दर्शन केले इतकेच. Happy

पाकिस्तानची भांडवलशाहीने वाट लावली असा एकंदरीत सूर जाणवला. ह्याबद्दल अजून माहिती / रेफरंस दिल्यास आभारी राहील.

७०चे दशकापासुनच, नंतरची भ्रष्टाचारि भरताड वाढू लागली, व त्याचसुमारास "पेट्या/थैल्या" पोहोचवुन मतांचि बेगमी करुन निवडणूका जिंकायचे तंत्र

>>

ह्यास कारणीभूत इंदिरा गांधींचे स्वकेंद्रित नेतृत्व आणि राज्यांमध्ये आपल्याच मर्जीतले नेते असले पाहिजे असा हेका कारणीभूत होता असे ऐकले आहे.

>>> पाकिस्तानची भांडवलशाहीने वाट लावली असा एकंदरीत सूर जाणवला. ह्याबद्दल अजून माहिती / रेफरंस दिल्यास आभारी राहील. <<<<
मला शन्का आहे या मुद्याबद्दल.
आलेले परकीय भांडवल, नेमक्या त्याच कारणाकरता वापरले गेले वा नाही यामुळे वाट लागली असे म्हणता येईल.
हिच तर्‍हा भारताचीही आहे, फक्त परकी भांडवला ऐवजी, सरकारी योजनेतील पैका, सुरवातीच्या काळात नेमका किती योजनेपर्यंतच पोहोचला, किती झिरपला यावर प्रगती अवलंबुन होती, आहे. आता तर भारतात परकी भांडवल्/खाजगी उद्योगांमधेही "झिरपणे" सुरू झाले आहे. हे बघता भारत तिसरी महासत्ता होणे वगैरे गाजराच्या पुन्ग्याच ठरुन, प्रत्यक्षात आहे नाही ती अन्नसुरक्षाही नाहिशी होऊन अंदाधुंदी माजण्याच्या कडेवर भारत ऑलरेडी पोहोचलेला आहे असे माझे मत.

@ वैद्य

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेबद्दल आपण माहीती द्यावी असे सुचवत आहे.
( दहशतवादाचं मू़ळ या विषयावर चर्चा चालू असताना भारतात सीआयए च्या कारवाया , भारताचं रशियाकडे झुकणं या संदर्भाने भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल अवांतर चर्चा करावी लागत असताना जर बंदीस्त अर्थव्यवस्थेत देशी उद्योगांना संरक्षण मिळालं नसतं तर .... म्हणून पाकिस्तानचं काय झालं हे उदाहरण दिलेलं आहे. त्यासाठी पाकिस्टानच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा करणे आवाक्याबाहेरचे वाटते. शंका असल्यास उदाहरणे देऊन मुद्दा स्पष्ट केला तर आभारी राहीन ).

>>>> भारताचं रशियाकडे झुकणं या संदर्भाने भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल अवांतर चर्चा करावी लागत असताना जर बंदीस्त अर्थव्यवस्थेत देशी उद्योगांना संरक्षण मिळालं नसतं तर .... म्हणून पाकिस्तानचं काय झालं हे उदाहरण दिलेलं आहे. <<<<
बाकी सगळे बरोबर आहे, पण या व्यवस्थेत नंतर जे "लायसन राज" आले व विशिष्ट उद्योगांचे समोर "देशी स्पर्धाही" उभी राहु नये ही काळजी घेतली गेली, ती अनाकलनीय व घातक होती असे माझे मत. विषयांतर आहे. सबब. पुढे चला.

घ्या, मला काही माहिती नाही म्हणून मी संदर्भ मागितला तर मलाच सांगताय की शोधा Wink असो.

दहशतवादाचं मू़ळ या विषयावर चर्चा चालू असताना भारतात सीआयए च्या कारवाया , भारताचं रशियाकडे झुकणं या संदर्भाने भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल अवांतर चर्चा करावी लागत असताना जर बंदीस्त अर्थव्यवस्थेत देशी उद्योगांना संरक्षण मिळालं नसतं तर .... म्हणून पाकिस्तानचं काय झालं हे उदाहरण दिलेलं आहे
>>

हे असंय होय, मग ठीके.

अमेरिका, ब्रिटन भारतास स्वातंत्र्यानंतर अनुकूल होते आणि अमेरिका इतर मदत करण्यासही तयार होती (पक्षी अण्वस्त्र तंत्रज्ञान आणि इतर सामुग्री) पण आपण नकार दिल्याने ते पाकिस्तानकडे झुकले आणि मग नाईलाजास्तव आपल्याला रशियाकडे झुकावे लागले (ह्याचा संदर्भ देतो, हाताशी नाहीये Wink )

बाकी, अमेरिकेच्या चुकीच्या धोरणामुळे दहशतवाद फोफावला हे तिसऱ्या देशाच्या लोकांनी ओरडण्यात काय राम नाही. तीच आणि तिच्या अलाईजच ती आणि नाटो बघून घेतील. बळी तो कान पिळी ह्या न्यायाने जग चालते हे कैकदा सिद्ध झालेय. आज आयसीस जास्त ताकदवान ठरली तर ती इराण, इराक, सिरीया, सौदीमध्ये हैदोस घालेल.

सामान्य लोकं काय मरतच आलीयेत सुरुवातीपासून.

जालीय अनुभव असा आहे की आशय ध्यानात न घेता चुकतोय कुठे, कुठे कचाट्यात धरता येईल अशी मोर्चेबांधणी करण्यात काही लोक अत्यंत तरबेज असतात. मुख्य मुद्द्यावर कष्ट घेतलेले असताना त्याबद्दल अवाक्षर ही न उच्चारता खिंडीत बोलावून चूक करायला भाग पाडणे आणि स्मायल्ल्या टाकणे हे त्यांचे जीवित कार्य असते. चूक सापडली नाही तरी कांमाला लावण्याचा आनंद असतोच. अर्थात कुणी ओढवून घेणार नाही ही नम्र अपेक्षा आहेच.

आंतरराष्ट्रीय घडामोडींची चर्चा करताना अथवा अभ्यास करताना अलिप्त / तटस्थ राहून घडामोडींकडे बघावे लागते. माझ्या आधीच्या प्रतिसादात "जिहाद" असा स्पष्ट उल्लेख करून देखील शेंडेनक्षत्र यांनी सगळा प्रतिसाद नीट न वाचतात बिल फाडायला सुरुवात केली. असो त्यांना अलिप्त राहता येत नसेल इतरांनी रहावे.
शेंडेनक्षत्रांनी युरोप मधून इसिस मधे किती तरुणांची भरती झाली अथवा तरुणांचा ओढा आहे आणि भारतातून कितींची भरती झाली अथवा ओढा आहे याची माहीती करून घ्यावी. त्यांना त्यांची उत्तरे आपोआप मिळतील. नाहीतर मी आहेच सांगायला.

हा विडिओ इसिसच्या उदयाबद्द्ल तर नाही, पण इसिस इतकी मोठी का झाली, ह्यावर प्रकाश टाकतो. मस्ट वॉच.

https://www.facebook.com/UniversalFreePress/videos/1109286879117550/

बाकी दहशतवादात अर्थव्यवस्था अन तिचे कार्यकारण भाव ह्याची चर्चा का व्हावी हे अजूनही कळले नाही. त्या चर्चेतून तसे काहीही सिद्ध होत नाही. (दहशतवाद आणि अमेरिका वगैरे विषयाशी अन मुळ पोस्टशी निगडीत)

इराक मध्ये अमेरिका शिरली हे वाईटच. पण त्यामुळे सद्दामने जे चालवले होते ते खूप चांगले होते असे नाही. तो देखील माणसे मारणाराच होता. हे लक्षात घ्यायला पाहिजे.

दहशदवाद निव्वळ भितीवर फोफावत नाही त्यामागे अर्थव्यवस्था देखील तितकीच महत्वाची ठरते. दाउद मागे भक्कम अर्थव्यवस्था उभी आहे म्हणून तो आज तिथे आहे. नाहीतर मुंबईतील गवळी नाईक मंचेकर सगळीच भितीच्या जोरावर दाऊद झाली असती

केदार, मान्य आहे की सद्दामने कुर्दिश आणी बाकी लोकान्वर अत्याचार केले. पण ते त्या भागापुरतेच मर्यादीत होते. सद्दामची महत्वाकान्क्षा निदान ओसामा सारखी तरी नव्हती. त्यातुन त्याचे इराणशी असलेले शत्रुत्व त्याला सजा देऊनच गेले असते. पण त्याच्याकडे रासायनीक जिवास्त्रे आहेत असा खोटा प्रचार करुन तेलासाठी अमेरीकेचा तिथला शिरकाव बरेच सान्गुन जातो. अमेरीकेला काहीच अधिकार नव्हता सद्दामला मारण्याचा. स्वतः ते कोणते धुतल्या तान्दळातले होते? ओसामाला प्रोत्साहन यानीच दिले, त्यातुनच अल कायदा, तालीबान, हिजाबुदीन सारख्या सन्घटना फोफावल्या. पाकड्याना मदत करणार्‍यानी निदान सद्दामला तरी मारायला नको होते.

आपल्यासारख्या सामान्य जणांच्या घोडचुका प्रखर तेजाने झळाळणार्या सर्वज्ञानि महापुरुषाने दाखवून द्याव्यात यापेक्षा भाग्य ते काय असावे? आपण सर्वसामान्यांनी आपसात चर्चा चालू ठेवावे हेच बरें .

अमेरिकेला दोषी ठरवताय ... ठरवा जरूर! पण आयसीस अमेरिका सोडून यझदी अल्पसंख्यांकांची का कत्तल करत सुटलीय? त्याच उत्तर कोणाच्या वसाहतवादावरून देणार आपण सर्व लोक?

Pages