दहशतवादाचे कूळ आणि मूळ

Submitted by उडन खटोला on 15 November, 2015 - 22:41

परवाच्या पॅरिस बॉम्बस्फोटानंतर बातम्या बघत असताना मनात विचार आला की ,आज सद्दाम हुसेन असता ,तर आयसीस किंवा तालिबानी आतंक्यांचा त्रास इतका वाढला असता का?

थोडा विचार केल्यावर असे उत्तर सापडले की नक्कीच नाही. सद्दाम हुसेन अमेरिकेच्या दृष्टीने कितीही वाईट/क्रूर इत्यादि असला तरी प्रत्यक्षात त्याने इराकला एक समर्थ अन बलशाली राष्ट्र बनवले होते . तो लोकप्रिय नेता होता आणि त्याने इराकमधील अंतर्गत बंडाळी आणि बाह्य हितशत्रूंचा बीमोड व्यवस्थित करून इराकी जनतेला सुखाचे दिवस दाखवलेले होते. त्याच्या काळात भारताशीही बगदाद चे चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते...

असे असताना , त्याला कुवेत वर आक्रमण करण्याची दुर्बुद्धि सुचली आणि तेलाच्या राजकारणात स्वार्थ साधण्यासाठी टपलेली अमेरिका ताबडतोब इराकवर तुटून पडली ... बरे त्यातून इराकी सैन्याला माघारी ढकळल्यावर अमेरिकेचे काम संपलेले असताना सूडबुद्धीने "सद्दाम हा क्रूरकर्मा हुकूमशहा असून त्याच्याकडे बायोकेमिकल वेपन्स आहेत " असा कांगावा अमेरिकेने जगभर केला (जो की नंतर खोटा असल्याचे उघड झाले !कारण टी जैवरासायनिक शस्त्रे कधीच सापडली नाहीत , ब्रिटिश मंत्र्यांनी याची कबुली दिलेली आहे)

तर येनकेन प्रकारेण सद्दाम ला शत्रू ठरवून अमेरिकेने त्याला संपवले... त्यासाठी साम,दाम ,दंड ,भेद सगळे उपाय केले . बंडखोर अतिरेकी संघटनांना पैसा आणि शस्त्रे पुरवली. ( जे अमेरिकेने तालिबानसोबत आधी अफघणिस्तान मध्ये देखील केलेले होते , रशियन फौजांविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेनेच तालिबान ला पैसा आणि शस्त्रे पुरवली होती ) हाच प्रकार सीरिया /लिबिया आणि अन्य ठिकाणी देखील केला ... पण आपले ईप्सित साध्य झाल्यावर इराकची पुनर्बांधणी करून त्या देशात सुव्यवस्थित शासनव्यवस्था अन शांतता नांदेल याची जबाबदारी घेण्याचे मात्र अमेरिका टाळत आली आहे. म्हणजे आधी अतिरेक्यांच्या साथीने देश बेचिराख करायचा अन मग हात वर करायचे ! ही हरामखोरी अमेरिका नेहमीच करीत आलेली आहे . म्हणूनच मी मागे तृतीय विश्वायुद्धासंबंधीच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे अमेरिकेचे दहशतवाद -विरोधी युद्ध बेगडी आहे आणि त्यांचे हेतु शुद्ध नाहीत .

आज इराक /सीरिय व अन्य भागात अमेरिकेच्या पैशानेच उभे राहिलेल्या अतिरेक्यांची सुधारित आवृत्ती म्हणून "आयसीस" उभे राहिले असून हा दहशतवादाचा भस्मासुर थांबवणे आता महाकर्मकठीण बनले आहे... पण या दहशतवादाचे मूळ आणि कूळ शोधू गेल्यास ते अमेरिकेच्या फसलेल्या अन चुकीच्या विदेश नीतीत अन युद्धखोरीत आहे हे स्पष्ट दिसून येणे... आणि म्हणूनच अमेरिकेपेक्षा रशियाची दहशतवाद -विरोधी मोहीम अधिक विश्वासार्ह वाटते .... !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उडन खटोलाजी ठरवून राहिलेत की .. ....

. पण या दहशतवादाचे मूळ आणि कूळ शोधू गेल्यास ते अमेरिकेच्या फसलेल्या अन चुकीच्या विदेश नीतीत अन युद्धखोरीत आहे हे स्पष्ट दिसून येणे

उडन खटोलाजी ठरवून राहिलेत की >>> त्यांनी ठरवलं आणि तुम्ही मान्य केलं का ?

इथे दिलेल्या लिंक्स पाहील्यात कि नाही ?
कि ते वॉशिंग्टन पोस्ट, द गार्डीयन, पुतिन हे पण इसिसचेच लोक आहेत ?

वैद्य, आम्ही पूर्णपणे अमेरीकेला दोषी ठरवलेले नाहीये. पण झालेल्या चूकान्मधून अमेरीकेने किमान शहाणपण घेऊन, जुने वैर अथवा स्पर्धा विसरुन रशिया सारख्या देशाला सहकार्य करावे हीच अपेक्षा आहे. कारण इसिसचा हा भस्मासूर वाढत चाललाय.

सक्रिय, भारतातुन इसिसमध्ये जाणार्‍यान्ची सन्ख्या नगण्य आहे हे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. तरीही औरन्गाबाद, यवतमाळ, कल्याण सारख्या शहरान्मधून यान्चे नाव पुढे येत आहे. अर्थात मुस्लिम समाजाला इसिसचा फोलपणा लक्षात आला की निदान भारतात तरी याला प्रतीसाद मिळणार नाही हे खरे.

चुकीची माहीती पसरवून बरंच काही साध्य करता येतं हे भारतात अनुभवता येतंच आहे. याच माहीतीचा पाया ज्यावर आहे तो म्हणजे "त्यांचा" कडवेपणा ! त्याला बाधा आली कि काहींची चिडचिड होणं स्वाभाविक आहे.

ज्यांना साधारणपणे स्लीपर सेल म्हटलं जातं ते नाराज लोक असतात, अन्यायाचे बळी किंवा अशा समजुतीत असतात. अशांना चुकीची माहीती देऊन त्यांचा वापर करून घेता येऊ शकतो. त्यासाठी एखादं मिलिटन्ट संघटन उभं करण्याला अमेरिका आजवर मदत करत आलेली आहे. जर अशा प्रकारचं लष्करी संघटन अस्तित्वात नसतं तर दहशतवाद उग्र स्वरुपात उभा राहीला असता का ?

पाकिस्तानबाबत

पाकिस्तानचा खूप जास्त अभ्यास नाही केलेला. पण भारताबरोबरची पाकची वाटचाल पाहण्यात आलेली आहे. वेळोवेळी आलेले वृत्तपत्रातले लेख ही मत बनण्यातली शिदोरी आहे. थोडे फार विश्लेषकांचे लेख चाळले आहेत. अ‍ॅकॅडेमिया वर काहींचे लेख आहेत. पण त्यावरून विश्लेषण करता यावं इतकी पारायणं झालेली नाहीत हे एक आणि सपोर्टिव्ह वाचनाशिवावायते शक्य नाही हे दुसरं.

त्यामुळं तुटपुंज्या वाचनातून, सहप्रवासातून जे मत झालंय ते मांडलंय.

पहिल्या दशकात पाकिस्तानची जीडीपी सहा टक्के होती. दरडोई उत्पन्न आशियायी देशांपेक्षा जास्त होतं. दुस-या दशकात ते याच दरम्यान राहीलं. उत्पादनांची निर्यात समाधानकारक राहीली. पण युद्धानंतर परकीय गुंतवणूक काढून घेतली गेल्यानंतर अर्थव्यवस्था नाजूक झाली.

असे उल्लेख काय दर्शवतात ?

कि पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला परकीय गुंतवणुकीमुळे सूज आली होती. आपल्याकडे १९५० च्या दरम्यान आणि १९९१ साली यावर भरपूर चर्चा झाल्या आहेत. परकीय गुंतवणुकीला बहुतेकांचा विरोध राहीलेला आहे. परकीय गुंतवणुकीमुळे जे व्यवहार होतात त्यात मिळणा-या लाभांमुळे एक लॉबी त्याच्या बाजूने असते. परकीय गुंतवणूक येऊच नये असं नाही. पण स्वदेशी उद्योग पांगळे होतील अशा प्रकारे रान मोकळं असू नये हे आपण पाहीलं. आपल्याकडे परदेशी बनावटीच्या वस्तू मिळत नसत. मागवायच्या म्हटल्या तरी शुल्क अवाढव्य असल्याने स्वदेशी वस्तूंशिवाय पर्याय नव्हता. लायसेन्स राज मुळे ठराविक घराण्यांचा फायदा झाला हे म्हणणं बरोबर आहे. पण त्यांच्यावर अवलंबून असलेले लघु उद्योग, कुटीरोद्योग पण जगले. अर्थात या उद्योगांनी बँकांना बुडवल्याने तूट वाढत गेली. पण तोपर्यंत भारतातला उद्योग हा जागतिक स्पर्धेत झेप घेण्याच्या ताकदीचा झालेला होता,

पाकमधे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारुपाला आलेल्या स्वदेशी उद्योगसमूहांची पाचा नावं ठाऊक आहेत का ? दरडॉइ उत्पन्नात पाकमधल्या सव्वीस घराण्यांचा हिस्सा मोलाचा आहे. युद्धामु़ळे आधीच नाजूक असलेल्या पाकच्या अर्थव्यवस्थेला संरक्षणावर खर्च करावा लागला. उपखंडात शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू व्हावी हे अमेरिकेचे नियोजन होते. त्यासाठी पाकला कर्जाच्या विळख्यात अडकवण्याच्या युक्तीला पाकचे लबाड राज्यकर्ते जाणीवपूर्वक बळी पडत गेले. अमेरिकेकडून मिळणारा पैसा आणि पाठिंबा या जोरावर ते उन्मत्त होत गेले. या राजकारणाला शह देण्यासाठी इंदिरा गांधींनी रशियाला जवळ केलं. याबाबत मतभिन्नता असेल.

पण दहशतवाद आणि अर्थव्यवस्था यांचा काय संबंध असा सवाल विचारण्याआधी हे माहीत करून घेतलं तर बरं राहील. १९९० नंतर अर्थव्यवस्थेचा फज्जा उडाल्यानंतर तर पाकिस्तान पूर्णपणे ब्रिटन, अमेरिकेकडून जाहीर होणा-या मदतीवर अवलंबून असतो. मुलभूत प्रश्नांवरून जनतेचं लक्ष इतरत्र हटवण्यासाठी भारताप्रमाणेच तिथेही काश्मीर प्रश्न इ. वर जनमत भडकवण्यात येतं. काश्मीरचा बदला घेऊच असं वर्षानुवर्षे पटवत राहील्याने आणि समोरासमोरच्या युद्धात पराभव ठरलेला असल्याने छुप्या युद्धाचे डावपेच १९९० च्या नंतर पाकने आखले.

त्याला भारतातील धार्मिक ध्रुवीकरणाने खतपाणी घातलं.

उत्पादनांची निर्यात समाधानकारक राहीली. पण युद्धानंतर परकीय गुंतवणूक काढून घेतली गेल्यानंतर अर्थव्यवस्था नाजूक झाली. असे उल्लेख काय दर्शवतात ? कि पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला परकीय गुंतवणुकीमुळे सूज आली होती.

>>

वाचतोय Happy

१९९२ नंतर भारतात काय झाल अचानक? एकदम भारतिय अर्थव्यवस्था परदेशी उद्योगांना खुली करावी लागली?

पण दहशतवाद आणि अर्थव्यवस्था यांचा काय संबंध असा सवाल विचारण्याआधी हे माहीत करून घेतलं तर बरं राहील. >>

कुठली अर्थव्यवस्था असली म्हणजे दहशतवादी निर्माण होत नाही? मिश्र, (भारत) बंदिस्त ( रशीया) की खुली (अमेरिका)

इसिस, अल कैदा, तालिबान पाक मध्ये निर्माण झाले आहेत का? ते कुठल्या अर्थव्यवस्थेच्या प्रकारात निर्माण झाले? धर्मवेडी लोकं पाक मध्ये आहेत कारण ते धर्माधारित राष्ट्र आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेशी (लायसन्स राज ते १९९१) पाक मधील दहशतावादाशी तुलना कशी होऊ शकते? बजाज स्कुटर ते टाटा ते लायसन्स राज अन त्याचा संबंध ह्या बाफशी काय आहे?

तुम्ही वर जे लिहिलं आहे. ( सवाल विचारण्याआधी हे माहीत करून घेतलं तर बरं राहील) ते ऑलरेडी माहिती आहे. तरीही प्रश्न पडला आहे. तुम्ही व्यवस्थित (म्हणजे विशेषनं न देता) उत्तर दिले तर माहिती होईलही. म्हणूनच तर विचारतो आहे ना?

रच्याकने तुम्हाला मिश्र अर्थव्यवस्थेमुळे झालेले फायदे/ नुकसान, भारतात असलेली गरिबी आणि तिचे प्रत्येक दशकातील स्वरूप ह्यावरचे अर्थशास्त्रावरचे रिसर्च पेपर वाचायला दिले असते, पण विषय तो नाही. म्हणूनच लिहितो आहे. विषय दहशतवाद आहे. मिश्र अर्थव्यवस्था नाही.

अरेच्चा.

अहो मी प्रश्न तुम्हाला विचारला आहे. तुम्ही विषयाशी संबंध आहा असे लिहिताय ना? मग दोन्हीकडून मीच कसे लिहू.? बरं विषय काय आहे? दहशतवाद की अर्थव्यवस्था, तेणेप्रमाणे प्रतिसाद देता येईल. एक नक्की करा.

केदार

तुमच्या पहिल्या प्रतिसादाचा टोन असा आहे कि, काय मूर्खपणा चाललाय इथे ?
तर तो आम्हाला विनयपूर्वक मान्य आहे. संतांनी शिकवलंय की थोर ज्ञानी, युगपुरूष् यांनी सांगितलेलं ऐकावं. पाकिस्तानबाबत विवेचन करण्याची आवश्यकता नव्हती. ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना ते अवांतर उत्तर दिलं आहे. मात्र पाकिस्तानने दहशतवाद केव्हां पाळण्यास सुरूवात केली हे डॉन मधे एका मालिकेत दिलेलं आहे. तुम्ही तुमची न वळणारी मतं मांडू शकताच की ! आम्ही अज्ञ लोक आपसात चर्चा करू, आपल्यासारख्या थोरामोठ्यांचे (आग्रहाचे) म्हणणे मान्य करत राहू.

<<याच माहीतीचा पाया ज्यावर आहे तो म्हणजे "त्यांचा" कडवेपणा ! त्याला बाधा आली कि काहींची चिडचिड होणं स्वाभाविक आहे.>>

पॅरिस मधे झली ती निव्वळ चिडचिड होती अस म्हणायच आहे का?

अरेच्च्चा वाला प्रतिसाद नाहक आहे. तो आपणास उद्देशून नाही हे आपल्या विलक्षण तीक्ष्ण बुद्धीस एव्हांना जाणवलेच असेल.

केदार अर्थव्यवस्थेत अमेरिकेने कश्या काड्या केल्या आणि कशे दहशतवादी फोफावले हा विषय आहे.

युरो, ती त्यांच्यामते ध्रुवीकरण झालेल्या (भारतातल्या) लोकांची चीड चीड होय.

त्यांनी ते कोट कुठून घेतलंय, कुठे जोडलंय, मूळ संदर्भ काय हे कळल्याशिवाय कसं काय बोटावं ?
लग्नपत्रितेलं वाक्य उचलून उठामणा मधे टाकलेलं आहे का हे पहावं लागेल ना ?

रच्याकने तुम्हाला मिश्र अर्थव्यवस्थेमुळे झालेले फायदे/ नुकसान, भारतात असलेली गरिबी आणि तिचे प्रत्येक दशकातील स्वरूप ह्यावरचे अर्थशास्त्रावरचे रिसर्च पेपर वाचायला दिले असते, >>

चालेल . मेल मधून द्या. नाहीतर वेगळा बाफ काढावा. विनयपूर्वक वाचन केले जाईल.

तुमच्या पहिल्या प्रतिसादाचा टोन असा आहे कि, काय मूर्खपणा चाललाय इथे ? >>

अर्थव्यवस्थेचा दहशतवादाशी काही संबंध नाही हे एक स्टेटमेंट आहे, तुम्हाला मूर्खात काढणे नाही. ह्याला तुमच्या मुद्द्याचा विरोध असे म्हणतात, कारण चर्चेत मुद्द्यांचा विरोध केला जातो, माणसांचा नाही. त्यामुळे तुम्ही कुणाचे कितवे अवतार आहात हे माहिती असूनही चर्चा केली.

आणि मी विचारलेला प्रश्न चूक नाही. तो संबंध नाही असे म्हणले ते तुम्हाला आवडले नाही.

तुम्हाला वाटले ना , बस्स !
या निवाड्यावर पुढे चर्चा नाही महोदय ! आधीच मान्य केले आहे. आपण म्हणाल ते !!

बाकि
चाचरत चाचरत सुचवावेसे वाटते की धाग्याचा विषय काय ते आम्ही आपणास का सुचवावे ? आपणच आपल्या अधिकारात ठरवून त्यावर आपल्याला वेळ मिळाल्यास आणि इच्छा झाल्यास दोन शब्द लिहून सर्वांस अपकृत केल्यास चामड्याचे जोडे..... हुप हुप

Lol तुमचे विशेषणं देणं काही संपत नाही बुवा. तुम्ही देत जा बरं करमणूक होते. Proud

मी इसिसबद्दल एक व्हिडिओ विषयाशी सबंधीत दिला आहे. तो नाही पाहिला का?

हं आता दुसरे द्या. आजचे मनोरंजन अजून संपले नाही.

केदार अर्थव्यवस्थेत अमेरिकेने कश्या काड्या केल्या आणि कशे दहशतवादी फोफावले हा विषय आहे. >>

इसिस, तालिबान आणि अल कैदा ह्या ज्या देशात निर्माण झाल्या तेथील राजकिय परिस्थिती काय होती? तिथे पैसा देऊन फुगवटा आणला, अन मग अर्थव्यवस्था खराब झाली असे म्हणायचे आहे का? अल कैदाला कसे पैसे मिळाले, आणि इसिसला कसे हत्यार मिळाले ह्यावर खूप सारं मटेरियल उपलब्ध आहे.

अमेरिका फक्त पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेस हातभार लावते, ही लोकं जिथे निर्माण झाली, त्या सौदी अरेबिया, इराण, इराक, मध्ये नाही. अमेरिकेने त्यांना त्यांच्या शत्रू सोबत लढायला पैसा अन शस्त्र दिली त्यामुळे अल कैदा टाईप लोकं निर्माण झाली. हे म्हणणे उचित आहे.

दोन युद्ध (रशियाचे अफगाण मध्ये असणे) आणि अमेरिकेचे इराक आक्रमण हे कारणीभूत आहेत. अर्थव्यवस्था नाही.

असं लिहीलंय का लोकांनी ? बरं.
निकाल मान्य. आम्हाला वाटत होतं की अमेरिका भारतात का काड्या करत होतआ, पाकिस्तानचं महत्व काय यासाठी अर्थव्यवस्था आली असावी कथेत. पण आता अपील नाही.

असं लिहीलंय का लोकांनी ? बरं.
निकाल मान्य. >> Proud परत एक तुच्छ दर्शवणारी पोस्ट - वा वा आज माझी मजा आहे.

प्रत्येक देशात प्रगत देश काडी करत असतात त्यात नाविन्य काय आहे? महासत्ता व्हायचे म्हणल्यावर हे ओघाने यायलाच पाहिजे. त्यात दुमत का? तेच तर फारएन्डने पण लिहिले आहे. तो तो देश स्वतःचा स्वार्थ तर पाहणाराच.

-

कळावे लोभ असाच असावा.

इथपर्यंत झालेल्या चर्चेचा (एका बाजूचा) ल सा वि यथाशक्य काढण्याचा प्रयत्न करतो.

(१) सध्याच्या दशतवादाचं मूळ हे ब-यापैकी अमेरिकेच्या प्रत्येक देशाबाबतची धोरणांमधे आहे.
(२) आखाता मधे टोळ्या होत्या आणि आपसात धुसफूस जरी असली तरी सध्याच्या लष्करी संघटनांचं स्वरूप येण्याला नाटो राष्ट्रांचं धोरण अवलंबून आहे.
(३) आखातातली अमेरिकेची धोरणं ही आखाती तेल उत्पादक राष्ट्रांची एकजूट होऊन तेलाच्या किंमतींचं नियंत्रण पूर्णपणे त्यांच्या हाती असू नये यासाठी होतं.
(४) त्यासाठी पूर्वी इराणला मदत केली. नंतर इराणमधे धार्मिक क्रांती झाल्यावर इराकमधे सद्दाम हुसेन ला हाताशी धरलं.
(५) इराणने अमेरिकेच्या कागाळ्या जगासमोर आणण्यासाठी ओलीस प्रकरण केलं होतं. पण मीडीयाच्या प्रभावी वापराने अमेरिकेने इराणला आततायी राष्ट्र म्हनून प्रोजेक्ट करण्यात यश मिळवलं.
(६) इराकने प्रगती साधत अमेरिकेचं वर्चस्व झुगारून द्यायला सुरूवात केल्यानंतर सद्दाम ला संपवण्यासाठी बुश प्रशासनाने आधी १९९१ नंतर १९९९ ला ज्यु. बुश यांनी कारवाया केल्या. क्लिंटन यांच्या काळात त्यांचे हितसंबंध गुंतलेले नसल्याने इराकशी युद्ध झाले नव्हते,
(७) अफगाणिस्तानात घुसलेल्या रशियन फौजा पुढे आखातातील साम्राज्याला धोका पोहोचवू शकतात यासाठी तालिबान आणि नंतर अल कैदाची निर्मिती सीआयए ने केली.
(८) या दोन्ही संघटना भस्मासुरासारख्या उलटल्या . कदाचित अल बगदादीच्या सहाय्याने वरचढ होऊ पाहणारा ओसामाला संपवून तालिबानचा वापर चालूच ठेवायचा इरादा असू शकतो.
(९) पाकिस्तानचे सामरीक महत्व हे भौगोलिक दृष्ट्या आहे पण अमेरिकेने भारताकडे मैत्रीचा हात दिला होता असं काहींचं म्हणणं आहे. पण भारताच्या धोरणात साम्राज्यवादाला स्थान नव्हतं. ते का याची विस्तृत चर्चा झालेली आहे.
(१०) पाकिस्तानचं अमेरिकेवर अवलंबून असणं हे अर्थव्यवस्थेच्या पाडावानंतर कसं होत गेलं याचा उहापोह करण्ञाचा प्रयत्न झाला आहे. शस्त्रास्त स्पर्धा आणि वादाचे मुद्दे पेटत ठेवून दोन राष्ट्रांमधे संघर्षात्मक वातावरण ठेवण्याचा फायदा उचलता येऊ शकतो यामागे कुणाचा हात असावा हे विचारात घेण्याचा प्रयत्न झालेला आहे.
(११) काश्मीर मधला दहशतवाद हा पाकच्या अंतर्गत प्रश्नां नंतर सुरू झालेला आहे. पाकने स्वतःचा वापर का करू दिला याची कारणे शोधण्याचा येथे पर्यत्न करण्यात आलेला आहे,
(१२) इथे कुणी निबंध लिहीत नसल्याने अथवा रिसर्च पेपर सादर करत नसल्याने चर्चेच्या ओघात जशी माहीती पुढे येईल त्या क्रमाने ती आलेली आहे. या संबंधाने काही नियम असतील तर त्याची जाणकारांनी माहीती द्यावी. म्हणजे पुढे सदस्य नियमाप्रमाणे चर्चा करतील.

सध्या अल्पविराम.

केदार महाराज

आम्ही आपले सर्व निवाडे विनातक्रार मान्य करीत असतांना आपणास वेगळेच भास का व्हावेत बरें ? आम्ही मोठ्या विनयपूर्वक आपल्या सर्व निकालपत्रांचा स्विकार केलेला आहे.
आपणास याउप्पर कुठली तोषीस व्हावी हे न समजलेला अज्ञ बाहुला

आम्ही आपल्या आज्ञेबाहेर नाही. आपले निकाल शिरसावंद्यच आहेत. फक्त अज्ञ बालके आपसात चर्चा करीत असताना आपण त्याकडे मोठ्या मनाने दुर्लक्ष करावे ही आपल्या चरणी णम्र विणंती.

<<इराणने अमेरिकेच्या कागाळ्या जगासमोर आणण्यासाठी ओलीस प्रकरण केलं होतं. पण मीडीयाच्या प्रभावी वापराने अमेरिकेने इराणला आततायी राष्ट्र म्हनून प्रोजेक्ट करण्यात यश मिळवलं.>>

इराणमधे झालेल्या राज्यक्रांती बद्द्ल आहे का?

हा मुद्दा समजला नाही.

Pages