दहशतवादाचे कूळ आणि मूळ

Submitted by उडन खटोला on 15 November, 2015 - 22:41

परवाच्या पॅरिस बॉम्बस्फोटानंतर बातम्या बघत असताना मनात विचार आला की ,आज सद्दाम हुसेन असता ,तर आयसीस किंवा तालिबानी आतंक्यांचा त्रास इतका वाढला असता का?

थोडा विचार केल्यावर असे उत्तर सापडले की नक्कीच नाही. सद्दाम हुसेन अमेरिकेच्या दृष्टीने कितीही वाईट/क्रूर इत्यादि असला तरी प्रत्यक्षात त्याने इराकला एक समर्थ अन बलशाली राष्ट्र बनवले होते . तो लोकप्रिय नेता होता आणि त्याने इराकमधील अंतर्गत बंडाळी आणि बाह्य हितशत्रूंचा बीमोड व्यवस्थित करून इराकी जनतेला सुखाचे दिवस दाखवलेले होते. त्याच्या काळात भारताशीही बगदाद चे चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते...

असे असताना , त्याला कुवेत वर आक्रमण करण्याची दुर्बुद्धि सुचली आणि तेलाच्या राजकारणात स्वार्थ साधण्यासाठी टपलेली अमेरिका ताबडतोब इराकवर तुटून पडली ... बरे त्यातून इराकी सैन्याला माघारी ढकळल्यावर अमेरिकेचे काम संपलेले असताना सूडबुद्धीने "सद्दाम हा क्रूरकर्मा हुकूमशहा असून त्याच्याकडे बायोकेमिकल वेपन्स आहेत " असा कांगावा अमेरिकेने जगभर केला (जो की नंतर खोटा असल्याचे उघड झाले !कारण टी जैवरासायनिक शस्त्रे कधीच सापडली नाहीत , ब्रिटिश मंत्र्यांनी याची कबुली दिलेली आहे)

तर येनकेन प्रकारेण सद्दाम ला शत्रू ठरवून अमेरिकेने त्याला संपवले... त्यासाठी साम,दाम ,दंड ,भेद सगळे उपाय केले . बंडखोर अतिरेकी संघटनांना पैसा आणि शस्त्रे पुरवली. ( जे अमेरिकेने तालिबानसोबत आधी अफघणिस्तान मध्ये देखील केलेले होते , रशियन फौजांविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेनेच तालिबान ला पैसा आणि शस्त्रे पुरवली होती ) हाच प्रकार सीरिया /लिबिया आणि अन्य ठिकाणी देखील केला ... पण आपले ईप्सित साध्य झाल्यावर इराकची पुनर्बांधणी करून त्या देशात सुव्यवस्थित शासनव्यवस्था अन शांतता नांदेल याची जबाबदारी घेण्याचे मात्र अमेरिका टाळत आली आहे. म्हणजे आधी अतिरेक्यांच्या साथीने देश बेचिराख करायचा अन मग हात वर करायचे ! ही हरामखोरी अमेरिका नेहमीच करीत आलेली आहे . म्हणूनच मी मागे तृतीय विश्वायुद्धासंबंधीच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे अमेरिकेचे दहशतवाद -विरोधी युद्ध बेगडी आहे आणि त्यांचे हेतु शुद्ध नाहीत .

आज इराक /सीरिय व अन्य भागात अमेरिकेच्या पैशानेच उभे राहिलेल्या अतिरेक्यांची सुधारित आवृत्ती म्हणून "आयसीस" उभे राहिले असून हा दहशतवादाचा भस्मासुर थांबवणे आता महाकर्मकठीण बनले आहे... पण या दहशतवादाचे मूळ आणि कूळ शोधू गेल्यास ते अमेरिकेच्या फसलेल्या अन चुकीच्या विदेश नीतीत अन युद्धखोरीत आहे हे स्पष्ट दिसून येणे... आणि म्हणूनच अमेरिकेपेक्षा रशियाची दहशतवाद -विरोधी मोहीम अधिक विश्वासार्ह वाटते .... !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हिएतनाम मध्ये तोन्डघशी पडुनसुद्धा अमेरीकेने धडा घेतला नाही यात काय ते समाजावे. वरुन तालीबान्यान्चा भस्मासूर आहेच. पण आता कोणालाच दोष देण्यात अर्थ नाही. आता चान्गलेच झटके बसलेत याना. हे युरोपीय आता तरी सुधारतील असे उगाच वाटत आहे.

आजचा सकाळचा अग्रलेख वाचा.

<<<<<<‘इसिस’चा उदय नेमका कशामुळे झाला, याचाही आता लागोपाठ होणाऱ्या या हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर गांभीर्याने विचार करायची वेळ आली आहे. ‘इसिस’चे भूत नेमके कशामुळे उभे राहिले, याचा विचार करताना ‘अल कायदा’ची आठवण होणे स्वाभाविक आहे. अमेरिकेनेच सोव्हिएत संघराज्याच्या विरोधात असलेल्या कोणालाही जवळ करण्याचे धोरण स्वीकारले. त्यातूनच ओसामा बिन लादेनसारखे भस्मासुर निर्माण झाले. आताही ‘इसिस’बाबत अमेरिकेचे धोरण नि:संदिग्ध आहे, असे म्हणता येत नाही. सीरियातील असाद सरकारच्या विरोधातील बंडखोरांना अमेरिकेची रसद आहे आणि इसिसही असाद सरकारच्या विरोधात शस्त्र परजून उभे आहे; तर रशिया उघडपणे असादच्या बाजूने इसिसच्या विरोधात लढत आहे. या पार्श्‍वभूमीवर पोप फ्रान्सिस यांनी फ्रान्सवरील हल्ल्याचा निषेध करताना ‘तिसऱ्या महायुद्धा’चे संकट सूचित केले आहे. ते टाळायचे असेल तर अमेरिका, फ्रान्स आणि रशिया या नव्या ‘दोस्त राष्ट्रां’ना आपल्या धोरणांचा फेरविचार करावा लागणार आहे. पॅरिसवरील हल्ल्याचा हाच धडा आहे.>>>>

यात अमेरिकेचा जो काय दोष आहे तो नाकारायचा प्रश्नच नाही. पण रशिया/चीन हे ही स्वतःला महासत्ताच समजणारे आहेत. त्यांनाही यात स्वतःच्या देशाच्या इंटरेस्ट पेक्षा इतर कशाचेही महत्त्व नाही. त्यांचे इतिहास काही अमेरिकेपेक्षा चांगले आहेत असेही नाही. अमेरिका/ब्रिटन हे निदान लोकशाही असलेले, खुले विचारस्वातंत्र्य, सरकारला बहुतांश निर्णय काही काळांनंतर का होईना पण पब्लिक ला खुले करण्याचे बंधन असलेले कायदे असणारे देश आहेत. किंबहुना तसल्या कायद्यांमुळेच अमेरिकेबद्दलच्या अनेक गोष्टी जनतेला माहीत झाल्या आहेत. ही वरची टीका खुद्द अमेरिकेत असंख्य लोक करतात. इव्हन सध्याच्या २०१६ च्या निवडणुकीतही इराकवरचा हल्ला हा एक सतत निघणारा मुद्दा आहे.

रशिया/चीन ला कागदपत्रे खुली करणे, नागरिकांकडून होणारी प्रखर टीका असल्या भानगडींना तोंड द्यावे लागत नाही. मुळात ते आंतरराष्ट्रीय राजकारणात काय करत आहेत याचा पत्ता कोणालाही लागत नाही.

मला अमेरिका, ब्रिटन पेक्षा रशिया, चीन सारखे देश प्रचंड धोकादायक वाटतात. वेळ पडली तर हे देश अमेरिकेपेक्षा वेगळे राजकारण करतील अशी शक्यता नाही - कारण कोणतीही महासत्ता जगातील सर्व गोष्टींच्या नाड्या आपल्या हातात असाव्यात असेच सतत वागते. त्यात जे लोक स्वतःच्या देशातील लोकांना घाउक मधे मारायला कमी करत नाहीत ते दुसर्‍या देशांच्या लोकांच्या शिक्षण, पुनर्वसन वगैरेंची चिंता करतील अशी शक्यता अजिबात नाही.

यात अमेरिकेने जे काही केले त्याचा दोष त्यांच्याकडे आहेच, पण आंतरराष्ट्रीय राजकारणात खुले वातावरण असलेल्या देश तसे नसलेल्या देशांपेक्षा कधीही चांगले. पूर्वी जर्मन, जपान पेक्षा ब्रिटिश बरे म्हणत, तसेच.

काश्मीरातुन हिंदु दशहतवादाने पळवुन लावला गेला. पाकिस्थानातुन अल्पसंख्यांक असलेला हिंदु भारतात आला ही सुध्दा दहशतवादी कृती आहे असे मला वाटते.

जिहाद हा शब्द याची प्रेरणा आहे. सारे जग दारे इस्लाम करण्याची धर्माची धर्म आज्ञा . अनेक रानटी टोळ्यांशी संघर्ष टाळण्यासाठी त्यांना मुस्लीम करुन घेणे हा उद्देश बाजुला जाऊन जग जिंकण्याची सुप्त मनोकामना त्यामागे आहे. सारे जग दारे इस्लाम करुन खलिफाचे राज्य प्रस्थापीत केले म्हणजे इतर धर्मांचा विरोध उरणार नाही हा आत्ताचा विचार.

मुस्लीम विचारवंत सुध्दा एकदा संपुर्ण जग खलिफाच्या अमलाखाली आल्याने मानवातील संघर्ष संपेल का ? यावर काय म्हणतात हे ऐकायला मी उत्सुक आहे.

रशियाचे आता जे तूकडे झालेले आहेत त्यामूळे फार मोठा प्रश्न असा झाला आहे कि, विभाजनापूर्वी रशियाकडे जे अण्वस्त्रांचे , जैविक आणि रासायनिक अस्त्रांचे साठे होते ते आता कुठे आहेत, कुणाच्या ताब्यात आहेत आणि त्याचा व्यापार झाला का याबद्दल कुणालाच माहिती नाही. आणि आता युद्ध झालेच तर ( नको होऊ दे ) तर त्यांचा वापर होणे टाळता येणार नाही.

फारेंड, नितीनचंद्र , सहमत!

दिनेश,
नन-लुगर अ‍ॅक्ट (Cooperative Threat Reduction (CTR) Program) अंतर्गत याबाबत काम सुरु आहे. १९९१ चा हा अ‍ॅक्ट. आमच्या राज्याचे सेनेटर लुगर कोस्पॉन्सर होते. CTR अंतर्गत फंडींग आणि एक्सपर्टाइज पुरवले जाते. २००५ मधे तेव्हाचे नवे नवे सेनेटर ओबामा यांनी देखील सेनेटर लुगर बरोबर याबाबत काम केले होते.

फारेन्ड, खालच्या प्रश्नाना उत्तर आहे का?

अमेरिका/ब्रिटन हे निदान लोकशाही असलेले, खुले विचारस्वातंत्र्य, सरकारला बहुतांश निर्णय काही काळांनंतर का होईना पण पब्लिक ला खुले करण्याचे बंधन असलेले कायदे असणारे देश आहेत.>>>>> जर हे देश लोकशाही स्वातन्त्र्याला एवढे मानतात, तर वेळोवेळी दहशतवादाचा जन्मदाता पाकीस्तान याला सर्व प्रकारची मदत का करत असतात? अमेरीकेला पाकड्यान्ची सर्व प्रकारची गळचेपी करणे सहज शक्य आहे, तरी ते या भस्मासूराला मदत का करतात? इथे लष्करी तळ ठोकुन कुणावर वचक मिळवायचा आहे? तालिबान्यान्वर? की चीनी लष्करावर? की पाकड्यान्च्या नापाक मनसुब्यावर?

मला अमेरिका, ब्रिटन पेक्षा रशिया, चीन सारखे देश प्रचंड धोकादायक वाटतात. >>>>> यातला चीन तर धोकादायक आहेच आहे. रशिया त्यामानाने बरा. चीनी पिचपिचे कधी कुणाचा घात करतील हे त्याना पण स्वतःला पण समजणार नाही, इतके हे विश्वासघातकी, पाठीत खन्जीर खुपसणारे लोक आहेत.

१९७९ त सुरु झालेले रशीया अफगाणीस्तान युद्ध , त्याआधीचा प्रो रशीया वाला कुप यासगळ्यामुळे पुढे मुजाहिदीनना अमेरीका आणि इतर देशांकडून मदत तसे मुस्लीम राष्ट्राकडून मदत हे सगळे झाले. त्यातच ओसामा सारखे भस्मासूर निर्माण झाले. त्यामुळे रशीयाची भलावण नकोच.

रशियाची भलावण करायची नाहीच स्वाती. पण मध्यन्तरी झालेल्या अतीरेकी हल्ल्या नन्तर रशियाला थोडे तरी झटके बसलेत. वरुन चेचेन्या आणी उझबेकीस्तानचा प्रश्न आहेच. पण चीन कधीच सुधरणार नाही हे नक्की. भारताला जेवढा त्रास देता येईल तेवढ्या प्रमाणाबाहेर देत आहेच. डायरेक्ट युद्धापेक्षा एकेक प्रदेश गिळन्कृत करायचा डाव खेळत आहे. त्यातुन भारताचे शत्रु ते आपले मित्र या नात्याने पाकी आणी नेपाळला पण मदत करतोय.

चीनलाही त्यांचा स्वतःचा इस्लामवाला प्रॉब्लेम आहे. नेपाळ आणि पाकिस्तान या देशांची लोकेशन इतकी स्ट्रॅटेजिक आहे की त्यांना मदत (?) करायला व तिथे एक पाय रोवायला सगळ्यांनाच हवे आहे.

रश्मी, पाक ला मदत करण्याचे कारण म्हणजे त्यांचे अफगाणिस्तान मधल्या अतिरेक्यांबद्दलच्या माहितीकरता पाक वर अवलंबून असणे. अमेरिकेचा तो सेल्फ-इंटरेस्ट आहे - आणि आमच्याशिवाय तुम्हाला ती मिळू शकत नाही असे चित्र पाक च्या राजकारण्यांनी यशस्वीरीत्या उभे करणे. तसे म्हंटले तर सौदी अरेबियाशीही अमेरिकेचे संबंध आहेतच. याचे कारण म्हणजे जागतिक दहशतवाद टार्गेट आहे असे जरी वरकरणी अमेरिका म्हंटली, तरी स्वतःच्या हितसंबंधांच्या आड येणारा दहशतवाद - हेच त्यांचे प्राधान्य आहे. कोणत्याही देशाचे असेच असेल. जगातील कोणत्याही देशाकडून अशा बाबतीत "तात्त्विक" पातळीवर कन्सिस्टंसी असणे प्रॅक्टिकल नाही.

रशियाने जी कारवाई सीरीयामधे केली ती गंभीर होती. त्यामुळं इसीसचं कंबरडं मोडलं. अमेरिका आणि इतर राष्ट्रांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यावर अमेरिकेने लगेचच गेल्या वर्षी पडलेल्या मलेशियाच्या विमानाचा व्हिडीओ प्रकाशित केला आणि ते रशियाने पाडलंय असा अप्रत्यक्ष दावा केला. या व्हिडीओचा मुहूर्त पाहता सीरीया आणि इराक मधे जे काही चालू आहे त्याबद्दल शंका निर्माण होते.

इसीसचा इतिहास अद्याप जगाला नीट माहीत नाही. ओसामाचा इतिहास माहीत आहेच. तालिबानचा इतिहास वेगळा नाही.

पॅरीसमधील हल्ल्याने इसीसचा सर्वात मोठा शत्रू हा रशिया नसून फ्रान्स आणि दोस्त राष्ट्रे आहेत असा संदेश गेला आहे. अमेरीकेतील ट्विन टॉवर वरच्या हल्ल्यांमुळे ओसामा अमेरीकेचा सर्वात मोठा शत्रू असल्याचा संदेश सर्वत्र गेला होता.

इसिस आणि द डार्क नाईट या चित्रपट मधला "जोकर" यांच्यात काहीच फरक नाही. विध्वंस आणि दहशत हे दोनच उद्देशांवर इसिस उभा आहे. इस्लामचा प्रचार करणे मुस्लिम राष्ट्र मुस्लिमांचा न्याय इ. मुद्दे धांदात खोटे आहे तो एक मुखवटा आहे जो ओढणे इसिसच्या नेतृत्वाला भाग आहे. कारण फंडींग इसिसला मिळणारी मुख्य मदत ही तेल व्यापाराच्या माध्यमातुन येते. यावर नियंत्रण करणे अरब देशांना मनात आले तर सहज शक्य आहे परंतु ते तसे करत नाही कारण जिहाद अप्रत्यक्षपणे पाश्चिमात्य देशांवर अंकुश लावण्यासाठी ओसामा नंतर कोणीतरी हवे होते. इसिसच्या माध्यमातून जर ते होत असेल तर इसिसला बॅकअप देणारे जिहादच्या नावाखाली हे देखील करतील.

बाकिचे नंतर Happy

गार्डीयनने Now the truth emerges: how the US fuelled the rise of Isis in Syria and Iraq हा लेख लिहीलेला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांमधे अमेरिकेवर दोषारोप ठेवण्यात आलेले आहेत.

अमेरीकेला हे सर्व करण्याचं कारण म्हणजे तेल उत्पादक राष्ट्रं एकत्र आली तर तेलाच्या किंमतीवरचं नियंत्रण त्यांच्या हाती जाईल ही वाटत असलेली भीती हे एक कारण. बुश पिता पुत्रांच्या गल्फ राष्ट्रांमधे तेलाच्या कंपन्या आहेत. इराक युद्धाचं हे एक कारण होतं.

रशियाचा प्रभाव वाढणे हे कारण आहेच, पण अमेरीकन आणि ब्रिटीश तेल कंपन्यांचे इंटरेस्ट जपणे हे मुख्य कारण आहे.

अमेरिकन मल्टीनॅशनल्सची राष्ट्रीय धोरणातील लुडबूड यावर ऑक्युपाय आंदोलनाने चांगलाच प्रकाश पाडलेला आहे. विकीलिक्सनेही काही गोष्टी बाहेर आणलेल्या आहेत. अर्थात आता गुप्त काही राहीलेलं नाही. इराक युद्धानंतर बरंचसं लिहीलं गेलंय.

असे काही घडले की जगातील तमाम उदारमतवादी बुद्धीवादी लोकांना इस्लामचा ह्यात दोष कसा नाही हे सांगण्याची प्रचंड घाई होते. आणि हे पुन्हा पुन्हा पुन्हा सांगावे लागते. हिंदू वा ख्रिस्ती लोकांनी असे काही केले तर थेट त्या धर्माला नावानिशी दोष दिला जातो. अशा असहिष्णू विचारांचे मूळ मनुस्मृतीत, गीतेत वा बायबलमधेच कसे आहे हे सांगताना बुद्धीवादी कचरत नाहीत पण इथेच कच का खाल्ली जाते?
कधीतरी असे का म्हणवत नाही की इस्लामच्या कडवेपणाचाही ह्या अतिरेकी घटनांमागे हात आहे. अमेरिका आणि अन्य पश्चिमी राष्ट्रांप्रमाणे ह्याही प्रकाराचे त्यामागे योगदान आहे. अरब देशातला वहाबी विचार हा अत्यंत ताठर, जुनाट आणि असहिष्णू आहे. सौदी अरेबिया सारखा अमेरिका मित्रदेश ह्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कर्ता आहे. नुकतेच ह्या देशाने असे जाहीर केले की नास्तिक हे कायद्यानुसार दहशतवादी समजले जातील ! आयसिस सारखे नग ह्या सौदीच्या इस्लामच्या वरचढ आपला इस्लाम आहे हे दाखवायला पहातात. आणि तसे वागतात.

कधीतरी इस्लाम धर्मातील दोष हा विषय ऐरणीवर आलाच पाहिजे नाहीतर नुसती वरवरची मलमपट्टी करून मुख्य रोग बरा होणार नाही.
आयसिसचा इस्लामी विचारांशी संबंध नाही हे सतत म्हणणे ढोंगीपणाचे वा निव्वळ ऐकायला बरे वाटते म्हणून (पोलिटिकली करेक्ट) . खरोखरच ज्या कुराणातील वचनांचा आधार घेऊन आयसिस आपली कृत्ये करत आहे त्या वचनांत काय लिहिले आहे? त्याचा आयसिसने लावलेला अर्थ हा पूर्ण चुकीचा आहे की त्या मूळ विधानातील संदिग्धता आहे आणि त्यामुळे असा घातक अर्थही लावला जाऊ शकतो आहे हे कुणी शोधले आहे का? निव्वळ रंगसफेदी करुन सामान्यांच्या डोळ्यात धुळ फेकता येईल पण अतिरेकी निर्माण होणे थांबेल का?

The Insidious Relationship between Washington and ISIS: The Evidence
http://www.globalresearch.ca/the-relationship-between-washington-and-isi...

America Created Al-Qaeda and the ISIS Terror Group
http://www.globalresearch.ca/america-created-al-qaeda-and-the-isis-terro...

America's Allies Are Funding ISIS
http://www.thedailybeast.com/articles/2014/06/14/america-s-allies-are-fu...

Putin Just Exposed Obama's Connection To ISIS
http://qpolitical.com/putin-just-exposed-obamas-connection-to-isis-watch...

How the US Helped ISIS Grow Into a Monster
http://www.motherjones.com/politics/2014/08/how-us-helped-isis-grow-mons...

Newly-Declassified U.S. Government Documents: The West Supported the Creation of ISIS
http://www.washingtonsblog.com/2015/05/newly-declassified-u-s-government...

ISIS : A CIA Creation to Justify War Abroad and Repression at Home
http://vigilantcitizen.com/vigilantreport/isis-cia-creation-justify-war-...

शेंडेनक्षत्र
हे म्हणजे हिंदुत्ववादी संघटना मनु:स्मृतीचा आधार घेऊन भारतात कारवाया करतात असं काहीतरी म्हणण्यासारखं झालं. बरं असं काही म्हटलं की लागलीच जातीयवादी, अमूकद्वेष्ट्ये, देशद्रोही इत्यादी इत्यादी.

लोकांनी आम्ही सांगू तेच बोलायला हवं. हो हो, कुराणातील वचनांचा आधार घेऊनच त्यांनी डर्टी बाँबचं तंत्रज्ञान हस्तगत केलंय. कुराणातील वचनांचा आधार घेऊनच रशियन फौजांवर आधुनिक शस्त्रास्त्रं डागली होती. अगदी खरं बोलताय बघा.

मला असा मी असामी मधला दत्तोबा कदम आठवला. 'जोशी शेट, ओ जोशी शेट, आता ही अमेरिकेची आणी रशियेची मजा बघा पुढल्या सहा महिन्यात. आता अनुयुद्ध टाळन्याचा येकच उपाय' ....... 'आता अणुयुद्ध टाळण्याचा एकमेव उपाय ठाऊक असलेला हा दत्तोबा कदम, हा आमच्या बेनसन जॉनसन कंपनीत चपराशाचं काम का करतो?' Happy

जिथे बहुसंख्य मेंबर्स एकमेकांना फक्त आय-डी ने ओळखतात, अशा एका सोशल, सांस्कृतीक वेबसाईट वर उकलू शकेल ईतकं आंतरराष्ट्रीय राजकारण सुलभ असेल, असं मला तरी वाटत नाही.

आलोच आहे, तर आपली पण एक पिंक टाकून जातो. मागे एकदा वाचनात आलं होतं की आशिया मधे रशिया आणी चायना वर अंकुश ठेवण्यासाठी अमेरिकेला एका मित्राची गरज होती आणी त्यासाठी भारतापुढे मैत्रीचा हात केला होता. पण सोशलिस्ट भारतीय राजकारण्यांना कॅपिटलिस्ट अमेरिकेपेक्षा कम्यूनिस्ट रशिया जास्त जवळचा वाटला. म्हणून अमेरिकेने तोच हात पाकिस्तान कडे वळवला. ख.खो.दे.जा.

फेरफटका :D. खरे आहे. हे राजकारण सुलभ नाही हे नक्कीच. पण बरीच नवीन माहिती मिळते.

अमेरिकेच्या पुढे केलेल्या हाता बद्दल मी ही तसेच ऐकले/वाचले आहे. पाक ची उपयुक्तता कळायच्या आधी, दुसर्‍या महायुद्धाच्या काळात अमेरिका भारताला अनुकूल होती. त्याचे कारण म्हणजे लोकशाही, आणि तोपर्यंत पाकचे काही विशेष महत्त्व नव्हते त्याच्या दृष्टीने, म्हणून. हे ही खरे की तत्कालीन भारतीय नेतृत्व अमेरिकेला ब्रिटिशांच्या चष्म्यातून पाहायचे - ब्रिटिश लोक अमेरिकेला अनकल्चर्ड, उर्मट समजत, तसे लंडन मधे शिक्षण घेतलेले आपले बहुसंख्य नेतेही समजत, बहुधा ते ही एक कारण असेल अमेरिकेविषयीच्या उदासीनतेचे.

१९४१ चा अटलांटिक करार भारतासारख्या देशाला लागू करण्याबाबत चर्चिल वर दबाव टाकला होता रूझवेल्ट ने. तसेच नंतर १९४८ मधे पूछ व गिलगिट भारताला मिळावे, म्हणूनही. दोन्ही वेळेस ब्रिटिश मुत्सद्द्यांनी त्यांचे मत वळवले. भारताच्या हिताविरोधी अ‍ॅक्टिव्ह भूमिका अमेरिकेने पहिल्यांदा घेतली असावी ती निक्सन-किसींजर काळात जेव्हा बांगला देश निर्मितीचे युद्ध झाले होते. इंदिरा गांधी त्यांना पुरून उरल्या.

मला पहिल्यांदा ते या पुस्तकात (खालच्या लिन्क वर माहिती आहे) वाचायला मिळाले. नंतर कुतूहल वाढल्याने ब्रिटिश एम्पायर वर इतर अनेक पुस्तके व व्हिडीओज बघितले, आणि त्यातून याला पुष्टीच मिळाली आहे. यातील ठराविक शब्द (पूछ, गिलगिट, अटलांटिक चार्टर, युनो मीटिंग्ज) घेउन सर्च केले तरी साधारण अशीच माहिती मिळेल.
http://www.maayboli.com/node/30185

माझ्या मते भारताने रशियाच्या जवळ जाण्याचं मुख्य कारण सामरिक नसून अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे. भारताची तत्कालीन सामाजिक परिस्थिती पाहता भांडवलशाहीसाठी देश तयार नव्हता. यासाठी समाजवादी मॉडेल तयार केलं गेलं. अमेरीकेला लोकशाहीशी काही देणं घेणं आहे असं वाटत नाही. नाहीतर भारताच्या अलिप्त राष्ट्र चळवळीला अमेरीकेने पाठिंबा द्यायला हवा होता.

मात्र ताबडतोब झालेल्या युद्धामधे अमेरीकेने भारताविरुद्ध पाकिस्तानला मदत केल्याने भारताने रशियाशी लष्करी करार केले. बांगलादेश युद्धादरम्यान अमेरीकेच्या सेव्हन्थ फ्लिट ला रशियाच्या दबावाने माघारी जावं लागल्याचं सर्वश्रुत आहेच.

जिथे आपला फायदा तिथे मैत्री हे अमेरीकेचं धोरण आहे.

Pages