युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पडवळाचा किस दोन मि. मावे करुन घ्यायचा अकेने सांगितल्याप्रमाणे पुढची कृती करायची ... मी पडवळाची केली नाही पण दुधीची अश्याप्रकारे करते .. दुधी आवडत नसणारेही आवडीने खातात...

थोडा जास्त कडीपत्ता १-२ हिरव्या मिरच्या मधून बारीक करून घालायचा . मग वरून अश्विनी ने सांगितलेली फोडणी. दुधीच मी अस करते .
जरा वेगळी चव

नक्की कोणत्या बाफवर विचारावं कळत नाही आहे. युक्त्या पण हव्यात, रेसेप्या पण हव्यात.
हिवाळ्यात मुलांचा शाळेतला डब्बा कसा देता तुम्ही? गेल्यावर्षी पर्यंत जेवण शाळेत मिळत होतं. पण यावर्षी डब्बा देतोय. इतके दिवस तसा उन्हाळा असल्याने डब्बा गरमच हवा असं वाटलं नव्हतं. पण आता थंडीला सुरवात होतेय. दिवाळीनंतर किमान कोमट किंवा नॉर्मल टेंपरेचरला तरी रहावा डब्बा म्ह्णजे थोडाफार संपेल. (आधीच डब्बा संपायचा प्रश्न असतो... आलु /चीझ /पनीर्/पालक /मेथी पराठे, व्हेजी/पनीर रॅप्स, दोसा/इडली/आप्पे/उत्तपा / ग्रील सँडवीच /चीझ-चॉकलेट ग्रील सँडवीच/ कोल्ड सँडवीच /पास्ता याव्यतिरिक्त कोणताच पदार्थ खाल्ला जात नाही डब्ब्यात)
सध्या टप्परवेअरचे कप्पे असलेले डब्बे नेतोय तो शाळेत. पण हिवाळ्यात त्याचा उपयोग होणार नाही. बरं डब्बा दप्तरात ठेवण्याजोगा असावा, नाहीतर शाळेतच विसरला जाईल.

अल्पना च अभिनदन कराव कि स्वतःच सात्वन ते कळत नाहिये, अग पोरगा बरेच ऑप्शन खातोय की आधिच, यातले निम्मे जरी आमच्याकडे मुकाट खाल्ले तरी आज दिवाळी दिवाळी म्हनून नाचु आम्ही,
असो ,तुझ्या प्र्श्नाला बगल द्यायची नाहिये थेर्मोस ब्रॅन्ड चा डबा अ‍ॅमेझॉन वर मिळेल त्यात गरम राहत अन्न बर्‍यापैकी!
मागे मेधाने zojirushi+thermos+lunch+box हा सुचवला होता तो घ्यायच कधिच मनात आहे.

सायो Lol
कोणाचं काय तर कोणाचं काय!

अल्पना, ग्रिल सँडविच डब्यात नेल्यावर खाताना चिवट नाही का होत?

डबा, शब्द असला तरी आम्ही घरी डब्बाच म्हणतो. Proud
मंजू, ग्रील सँडवीच थंड करून मग देते. कितपत चिवट होतं नंतर कोण जाणे, पण तो नेहेमी मागत असतो सँडवीच, त्यामूळे बरं लागत असेल असा माझा अंदाज.
प्राजक्ता, तू पदार्थांची नावं लक्षपुर्वक वाचलीस तर लक्षात येईल, त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त पदार्थांमध्ये चीझ किंवा पनीर आहे. चीझ /पनीर नसेल तर मग बटरचा तुकडा /चीझ क्युब सोब द्यावा लागतो. नवरा म्हणतो याला शेणात चीझ घालून दिलं तर हा ते पण खाईल. Lol

पाच दिवस शाळा, शनिवारी सुट्टी असे धरले तर. दोन डब्बे. रोजचे तर वरील पैकी पदार्थ चिक्कार आहेत की?

एका डब्ब्यात वरील पैकी एक. पदार्थ रोज. दुसृयात काही तरी हाय प्रोटीन
द्यायला हवे. कार्बजच जास्त दिसत आहेत. व्हेजी सलाड, फ्रूट्स, ज्युसेस, उकडलेले अंडे. ग्रिल्ड चिकन देता येइल. सोया बर्गर चेक करा.

दूध + बोर्न विटा, ( लीक प्रूफ बाटलीत ) होल व्हीट मफिन्स, ओट्स डोसा, इडली, चटणी इत्यादि. अ‍ॅपल बनाना सुका मेवा. मस्ट आहे.

अर्थात वैद्यक शास्त्राचा सल्ला जरूर घ्या.

तेलुगु त डब्बू म्हणजे पैसा. त्याची आठ्वण झाली. सायो रॉक्स.

नीरजाचा जो डबा असतो तो माझा ब्रेकफास्ट आणि नवर्‍यासाठी इव्हिनिंग स्नॅक्स डबा असतो, म्हणून विचारतेय. साधं सँडविच सकाळी साडेसातला अ‍ॅल्युमिनिअम फॉईलमध्ये रॅप करून दिलं तर संध्याकाळीसुद्धा व्यवस्थित लागतं. तेच ग्रिल केलं तर काय होईल असा विचार करतेय मी.

माझी एक ऐत्रिण तिच्या मुलीला ज्यात त्यात चीज किसून घालून देते, अगदी गोड शिरा किंवा वरीच्या तांदुळावरही Uhoh

अल्पना, थर्मॉसचे किंवा मिल्टनचे डबे विकत घे. आमचे बाबा जहाजावर ट्रायलला गेले की त्यामधून जेवण भरून नेत (किचन फंक्शनल झालेलं नसेल तर) प्ण तो डबा दप्तरात राहणार नाही. वेगळी पिशवीसकटच न्यावा लागेल.

आमच्याकडे शाळेमध्ये डब्यामधून भात (भाताचे प्रकार), पोळी -भाजी, पुरीभाजी इतकंच आणणं अलाऊड आहे. इतर पदार्थ स्नॅक्स आयटम म्हणून दिले तर चालतात. ते शाळा सुटण्याच्यावेळी मुलांना खाता येतात, पण लंच डब्बा मात्र वरील पदार्थांचाच. ते जास्त (आयांच्या दृश्टीने) सुटसुटीत आणि (मुलांना) पोटभरीचं आहे.

फळांचा एक वेगळा डबा असतो अमा. त्यांना एक फ्रुट ब्रेक मिळतोत्याशिवाय मुख्य पदार्थाव्यतिरिक्त काकडी/गाजर, डाळींबाचे दाणे आणि इतर काही फुटकळ पदार्थ असतातच.
बाकी लेक चिकन /अंडी डब्यात नाही नेणार कधीच. दुध /अंड घरी खाल्लं जातं.

दुसरी पिशवी म्हणजे जरा अवघडच आहे. दर दोन दिवसांनी पाण्याची बाटली शाळेतच रहाते, त्या पिशवीला परत आणायचं लक्षात राहिल की नाही कोण जाणे.

त्या पिशवीला परत आणायचं लक्षात राहिल की नाही कोण जाणे. >>> अल्पना, सवय होते आपोआप मुलाना. माझी लेक मिनी केजी पासुन टिफीन बॅग नेते आहे. सुरवातीला १ - २ वेळा विसरली. आता नाही विसरत. तिच्या शाळेत सगळेचजण वेगळी पिशवी आणतात.

आवडत्या भाजी+पोळीचा रोल, बनफुल अशा नावाची इथेच वाचलेली एक रेस्पी (बनमधे आत बरेच काही घालता येईल.) , सा. खि.+ कोशिम्बीर) , थालीपीठ .

काल तुझी पोस्ट वाचल्या वर काय डोळ्यासमोर आले माहिते का? आमच्या सातवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या वेळेस, तीन पेपर मध्ये दोन ब्रेक्स होते. तर मैत्रिणीची आई, मोठी बास्केट घेउन बाहेर झाडा खालि इंतजार करत बसलेली होती. मुलगी बाहेर आली की तिला व्यवस्थित ग्लासात दूध, फळे, काहे खायला. पेपर कसा गेला वगैरे विचार पूस. मग ती दुसर्‍या पेपर चा अभ्यास करत होती. (१९७७ मध्ये )

तसेच काही लोक्स ताजे गरम अन्न डबा कार मधून ड्रायवर बरोबर पाठवतात लंच च्या वेळेत. ते ही आठवले. हैद्राबादेत काही मुले असा डबा जेवत. ( यू नो बंजारा हिल्स के बच्चे)

ते हॉट केस चे तीन पुडाचे डबे येतात ते मस्त असतात.

आमच्या सातवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या वेळेस, तीन पेपर मध्ये दोन ब्रेक्स होते. तर मैत्रिणीची आई, मोठी बास्केट घेउन बाहेर झाडा खालि इंतजार करत बसलेली होती. <<< हे आमच्या मातेनेदेखील केलं होतं. मी आणि माझे काही मित्रमैत्रीणी यांना पुरेल इतका खाऊ आई घेऊन यायची.

शाळेचं कॉलेजचं गॅदरिंग असलं की आई येताना हमखास सर्व ग्रूपला पुरेल इतकं खायलाप्यायला घेऊन यायची. माझ्या मैत्रीणी गमतीत म्हणायच्या तुला कार्यक्रमात घेतलंय ते तुझी आई येईल म्हणून. Proud

मी पण केलंय हे स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या वेळेस डबा प्रकरण.
लेकीनी ४ ला करू दिल, नंतर ७ वी ला म्हणाली कि तुला चकाटया पिटायच्या असतात महणून येतेस .
बहुतेक ह्याचा धसका घेवून लेकाने आधीच declare केले कि मी परीक्षा देणार नाहीये

वाचते आहे. रोज ऑफिस मध्ये जेवण गरम करून खाताना मुलींची आठवण येते. शाळेतही अन्न गरम करून खाता यावे अशी सोय हवी.
अवांतर, मी जॉब करत नसते तेव्हा मुलींना दुपारचे जेवण ताजे गरम गरम नेऊन देते. सगळ्या शाळेत माहीत आहे आता. अर्थात शाळा अगदी जवळ असल्याने हे शक्य आहे. मोठीला आता आवडत नाही मी डबा घेऊन गेले तर Lol

स्कॉलरशिप पेपर वगइरेला + १.

बाकी डबे विसरणे ही सासरी खानदानी प्रंप्रा आहे. नवरा आणि नणंद दोघांनी मिळून २ डझन डबे (स्टीलचे, डबल डेकरवाले) आणि पाण्याच्या अगणित बाटल्या हरवल्यायत शाळेत असताना. नो अतिशयोक्ती. त्यामुळे आमची बोलकी बाहुली काय करेल कोण जाणे. बहुतेक आमची दोघींची सदा जुगलबंदी असणार. कारण मी डिप्लोमाच्या फर्स्ट इअरला घेतलेला डबा बीई च्या लास्ट सेमपर्यंत नीट वापरला. असो.

एवढे सगळे वाचल्यावर मला प्रश्न पडला आहे की घरी गरमागरम खायला दिलेले तरी मुलं गार व्हायच्या आत खातात का? Uhoh
थंड ठिकाणांची गोष्ट वेगळी असते मान्य आहे, पण बाकीची मुले काय व कशा प्रकारे आणतात डब्यात? इतकी वर्षं शाळा चालली आहे तर डॉक्टरांना, शिक्षकांनाही विचारायला हवे की खरंच आवश्यक आहे का हा खटाटोप. घरी देऊया ना उनउनीत पहिल्या वाफेचा भात आणि तव्यावरची पोळी, Happy
आशीर्वाद आट्याची जाहिरात - ती आई शाळा सुटेतो शाळेबाहेर थांबते आणि घरी गेल्यावर अजिबात न चिडता, न दमता मुलीला गरमगरम पोळी भाजी खाऊ घालते हसत! हेवाच वाटतो मला. आम्हाला घरी गेल्यावर कुलूप उघडावे लागायचे.

आशुडी+१
माझा लेक दिलेले सगळे डबे पहिल्याच लहान सुटीत खाउन संपवायचा . म्हणजे जेवणाच्या तासाभराच्या सुटीत सगळा वेळ फुटबॉल खेळता यायच. डब्याचा ( त्यातल्या गरम थंडपणाच) अन भुकेचा काहीही संबंध नसतो , असा माझा अनुभव Lol

आशू, गरम गरम नाहीच खात ग मुलं. आता गेल्या एप्रिल पासून डबा देतेय मी. उन्हाळा असला तरी डबा थोडीच गरम रहातो. जेवण थंडच होतं पण तितकं थंड चालतंच की. आता जो प्रश्न आहे तो येत्या २०+ दिवसांनंतरचा आहे. भरपुर थंडी पडायला लागेल दिवाळीनंतर. अंगात २-३ लेयर्स घालून जाणार पोरं. साधं पाणी पण फ्रिजातल्या सारखं गार होईल.. फ्रिजमधून काढल्यासारखं गारढोण जेवण तर नाही ना खाणार पोरं. तितकं थंड होतं आता या हवामानात जेवण म्हणून प्रश्न आहे.
(म्हणजे डबा गरम रहावा यापेक्षा गारढोण होवू नये इतकंच. आपल्याकडे आपण सकाळी केलेला फ्रिजबाहेर ठेवलेलं अन्न न गरम करता खाल्लं तर जितपत गरम /थंड असतं तितक तापमान असावं)

अल्पना, तुला गरम डब्यात काय टाईपचं जेवण द्यायचंय माहित नाही कारण जनरली गरम रहाण्याकरता जे थर्मास डबे मिळतात त्याचं तोंड लहान असतं. मी कधीकधी त्यात पास्ता देते. त्याकरता आधी त्यात उकळतं पाणी भरून एक पंधरा वीस मिनिटं झाकण लागून ठेवायचं. मग पाणी ओतून पुसून गरम जेवण भरायचं. लंचपर्यंत वॉर्म रहातं.

सायो +१.

त्या डब्यांमध्ये- पास्ता, भाताचा प्रकार, पोहे, पराठा/पोळी/धिरड्याचा रोल/रॅप्स, आप्पे, उतप्प्याचे रोल किंवा तुकडे (*) , उपमा, शिरा, मऊ शिजवलेली खिचडी, दाटसर सूप, चिकन नगेट्स(**), ऑम्लेट-पोळी रोल असे पदार्थ मी पाठवायचे डे-केअरमध्ये. गरम पाण्याचे लाड केल्यावर सुद्धा पदार्थ खूप गरम नाही पण कोमट राहातात. थंडीच्या दिवसांमध्ये खरंच बरं पडतं थर्मासबॉक्समध्ये जेवण पाठवलेलं.

* उतप्पे आधी जरा कोमट करून मग रोल किंवा तुकडे डब्यात भरायचे नाही तर चिकटतात.
** चिकन नगेट्स नीट कुरमुरीत तळले/भाजले गेले नाहीत तर मऊ पडतात.

पोळी-पराठे असे कोरडे पदार्थ किचन टावेल + फॉइल अशी गुंडाळी करून पाठवायचे म्हणजे डब्याला वाफ आली तरी पदार्थ सॉगी होत नाहीत.

आत्ता एका मैत्रिणीशी बोलताना आठवलं नूडल्स पण गरम राहातात थर्मास बॉक्समध्ये. फक्त शिजवताना तुकडे करून पाण्यात टाकायचे म्हणजे लांबच्यालांब गुंडाळ्यांशी खेळण्यात वेळ जात नाही Proud

Pages