चालते व्हा ! १०,००० स्टेप्स अ डे चालण्याचे चॅलेंज ( डिसेंबर २०१५)

Submitted by rar on 1 October, 2015 - 00:53

ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात बर्‍याच मायबोलीकरांनी यशस्वीपणे १०,००० स्टेप्स अ डे चालण्याचा उपक्रम पूर्ण केला.
आता डिसेंबर महिन्यासाठी ज्यांना हे चॅलेंज घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी हा धागा Happy
----------------------------------------------------------------------
आपण मालमत्ता, सोनंनाणं, शेयर्स, जमीनी या सगळ्यात इनव्हेस्ट करतो. पण 'हेल्थ ' मधे इनव्हेस्ट करायची सतत टाळाटाळ करतो, किंवा त्यादृष्टीने फारसा विचारही करत नाही. 'चालणं' हा ह्या इनव्हेस्टमेंटसाठी अतिशय 'अंडररेटेड' पण एक सोपा आणि तरीही प्रभावी व्यायाम आहे. ह्यामधे केवळ शरीराला व्यायाम ह्या दृष्टीकोनातून न पाहता, चालण्याने विचारांना, मनाला मिळणारी चालना ह्या दृष्टीने पाहणंही खूप आवश्यक आहे. म्हणूनच 'चालते व्हा' हे आहे ऑक्टोबर महिन्यात रोज १०,००० स्टेप्स चालायचं चॅलेंज ! ह्या चॅलेंजची मजा अशी की हे स्वतःच स्वीकारायचं आणि स्वतःच करून दाखवायच... स्वतःसाठी !

सगळ्यांना १०,००० स्टेप्स दरदिवशी चालणं जमेलच असं नाही. पण काही हरकत नाही. अजिबात निराश होऊ नका, किंवा 'आता नाहीच जमणार ' असं सोडून देऊ नका.
आपण २ लेव्हलला चॅलेंजेस करू शकतो :

लेव्हल १ : १०,००० स्टेप्स/डे
लेव्हल २ : ७५०० स्टेप्स/डे

यापैकी कोणातीही लेव्हल ठरवा आणि महिनाभर रोज तितक्या ठरवलेल्या स्टेप्स 'चालायचं चॅलेंज' स्वीकारा.

१) आपण कोणतं चॅलेंज घेतलंत हे इथे लिहू आणि रोजच्या (किंवा आठव्ड्याच्या) स्टेप्स इथे लिहीत जाऊ.
२) फोनवर काही उपयुक्त अ‍ॅपस आहेत, ज्याने स्टेप्स मोजता येतात. पण अ‍ॅप नसेल तरी काही हरकत नाही.
१०,००० स्टेप्स = ५ माईल्स / ८ किमी.
७५०० स्टेप्स = ३. ७ माईल्स / ६ किमी

साधारण चालण्याच्या वेगानुसार १६ ते २० मिनीटात १ माईल अंतर होते. त्यानुसार साधारण मोजमाप असे -
१०,००० स्टेप्स - दीड तास
७५०० स्टेप्स = १ तास १० मिनीटे

३) एखादा दिवस जमलं नाही, तर आठवड्याच्या उरलेल्या दिवसात थोड थोडं जास्त चालुन 'आठवड्याचं टारगेट" पूर्ण करा.

सप्टेंबर महिन्यात आम्ही काही मायबोलीकरांनी हे चॅलेंज घेतलं होतं आणि आज ते पूर्ण झालं. हे केवळ शारीरीक व्यायामाचं चॅलेंज नसून, ह्यात मानसिक चॅलेंज, किंवा डीटरमिनेशन हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे . महिनाभर एकमेकांना मोटीव्हेट करत चॅलेंज पूर्ण करायला धमाल आली. आता ऑक्टोबर महिन्यासाठी बघूयात किती मायबोलीकर हे चॅलेंज घेताहेत आणि पूर्ण करताहेत ?
चला तर मग... तुम्हीही सहभागी व्हा, आणि इतरांनाही सहभागी करून घ्या... Ready for walk? Ready to take the challenge?
Good Luck and go for it ... Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हार्ट रेट मॉनिटर ४००० रू पासून पुढेला पण मिळतो. पण HRM पावले मोजत नाही. जायंटच्या शोरूम मध्ये आहे.

अमेरिकेत फक्त HRMअगदी चांगल्या कंपनीचा ( गार्मिन, वूहू) $६० च्या आत मिळतो. पण इथे येईपर्यंत महाग होतो. अ‍ॅमेझॉन वर वुहू टिकर १३५०० ला आहे आणि अमेरिकेत $५९.

आणि जर लाईव्ह हार्ट रेट नको असेल तर कधीतरी मोजायला अ‍ॅन्डॉइड आणि अ‍ॅपलला हार्ट रेट मॉनिटर अ‍ॅप आहे. मी अगदी सकाळचा (झोपेतून उठतानाचा, रेस्टिंग HR) ह्या अ‍ॅपने घेतो. आणि सायकलिंग करताना गार्मिन बंडल. (म्हणजे मराठी बंडल नाही. Wink )

तुम्ही कुठली अ‍ॅक्टिव्हिटी HRM ने मॉनिटर करणार आहात? धावने?

दिवस १ - 8844 स्टेप्स. रस्ता चुकला, म्हणून १००० एक स्टेप वाढल्या :D.
मस्त वाटलं, गारबेज डे च्या आधीची रात्र होती जिकडे फिरलो तिकडे, त्यामुळे मस्त गारबेज बघत फिरलो. एकदम फ्रेश वाटतंय.

माझ काही तुमच्यासारखे नाही हो... जमेल तितके करीत रहायचे इतकेच.
काल अ‍ॅप घेतल्यावर सांजच्याला लिंबीच्या माहेरी जाऊन आलो, ते रेकॉर्ड केले.
लिंबीचे माहेर म्हणजे माझे सासर फक्त १,१४५ पावले दूर आहे (जाऊन येऊन २,२९०) हा साक्षात्कार झाला Proud

walking Screenshot_2015-10-01.JPG

असले अ‍ॅप फोनवर सतत चालु ठेवले तर प्रचंड बॅटरी खातात.
आयफोन ६ मधलं हेल्थ प्रकरण बंद केलं तर बॅटरी बराच वेळ चालते.

साती, अश्या अ‍ॅप्स मधे जीपीएस असेल आणि ते चालू ठेवलं असेल तर नक्कीच बॅटरी लवकर संपते. माझ्याकडे पेडोमीटर नावाचं अ‍ॅप आहे त्याला हा प्रॉब्लेम नाही येत आहे.

साती, आरेम्डी, तपासायला हवय हे. कारण काल रात्री चार्जिंगला लावलेला फोन आज पहाटे पाच वाजता गजर झाल्यावर फुल चार्जिंग बघुन बाजुला केला, तर ८ वाजेस्तोवर सर्व बॅटरी ड्रेन झालेली. Sad
जीपीएस वगैरे चालू नव्हते, शिवाय ते गुगलफिट अ‍ॅप स्वतःच सांगते की गरज असेल तेव्हाच जीपीएस्/वायफाय वापरणार Uhoh अन तरीही बॅटरी झप्पकिनी उतरली.
आता हा अ‍ॅपचा दोष आहे की माझ्या फोनचा काय कि..

फूटस्टेप्स नावाचे एक App आहे. दुसरी दोन ट्राय केल्यानंतर गेल्या दीडेक वर्षापासून मी ते वापरतोय. फोन लॉक केला किंवा फोनवर दुसरे काही काम चालू असले तरी हे बॅकग्राऊंडला चालू राहते. सध्याची चाललेली पावलं, कॅलर्‍या, सरासरी वेग, अंतर इ. एका दृष्टीक्षेपात दिसतात. मध्यरात्री आपोआप रीसेट होते. मागचा डेटा साठवून ठेवते. चालायचे की पळायचे, किमी की मैल, हे सेट करता येते. ठराविक अंतर चालून झाल्यावर अलर्ट इ. चांगले गूण आहेत.

मीही दर दिवशी दहा हजार पावलांचे लक्ष ठेवतोय.

>>>> फोन लॉक केला किंवा फोनवर दुसरे काही काम चालू असले तरी हे बॅकग्राऊंडला चालू राहते. <<<<
म्हणजे मी क्यान्टीनला जरी गेलो तरी ती पावलेही मोजलि जातिल असेच ना?

अ‍ॅप लावुन, चालते झाले, आणि तब्येत ठीक झाली की

दर्द ए दिल , दर्द ए जिगर
सबकुछ भगाया अ‍ॅप ने

असे म्हणावे.

>>>> फूटस्टेप्स नावाचे एक App आहे. <<<<
गजाभौ, अहो सर्च ला ढीगभर अ‍ॅप्स येताहेत समान नावांची, नेमके कोणत्या कंपनिचे, काय नावाचे घेऊ?

हे पेडोमीटर्स आणि अ‍ॅप्स पण भयंकर इनॅक्युरेट असतात. नुस्ते हलले की २५ एक स्टेप्स अ‍ॅड करतात. त्यामुळे प्रत्यक्ष १०-२० पावले चालले तरी रीडिंग मात्र भरमसाठ दाखवतात. यावर काय उपाय ? कुणी अ‍ॅक्युरसी टेस्ट केली आहे का ? त्यातल्या त्यात अ‍ॅक्युरेट कोणते अ‍ॅप अथवा डिव्हाइस आहे ते मलाच हवे आहे! माझ्याकडे आयफोन ६ आहे.

खर की काय मैत्रेयी?
पण मी काल ना गुगल फिट वापरताना, एकीकडे मनात पावले मोजत होतो, व त्याच्या जवळपासच आकडा आला ना हे बघितले तर बरोबर वाटला आकडा.
बाकीच्यांचे अनुभव काय आहेत?

मै, फिटबिट बर्‍यापैकी अचूक वाटायचे. ड्रायविंग करताना कधीकधी थोड्याफार स्टेप्स टाकते असे वाटायचे पण जास्त नाही.

मोबाइल फोन हातात धरुन वर खाली करत लाहिलं तर, स्टेप्स मोजल्या जातात.
काही फोन्सना नुसत वर खाली न करता सोबत मागे पुढे केलं तर स्टेप्स मोजल्या जातात.
फोन खिशात ठेवुन खड्डे असलेल्या रस्त्यावरुन बाईक ने गेलात तर स्टेप्स वाढलेल्या दिसतात.

पण खिशात ठेवुन चाललं तर स्टेप्स साधारण जेवढ्या घेउ तेवढ्या दाखवतात.
तेव्हा दिवसभराच्या स्टेप्स फोन वर बघण्यापेक्षा, वॉकिंगला जाताना, आधी केवढ्या स्टेप्स आहेत त्याची नोंद करुन घ्यावी म्हणजे किती स्टेप्स चाललो हे नक्की कळेल.

Garmin Vivofit वापरतो.. आणि हात हालवून वगैरे प्रयोग करून झालेत. त्याने पावलांचा आकडा वाढत नाहीय.
आणि बर्‍याचदा पावलं मोजून त्यावर दाखवलेला आकडा बरोबर आहे ही नाही हे ही तपासून पाहिलं.
१००० पावलात ८/१० पावलांचा फरक पडतो. आणि हे घड्याळासारखे हातात असल्याने २४ तास वापरता येतं आणि फोनची बॅटरी पण संपत नाही.. (१३५३६)

मी पेडॉमीटर वापरतो.
५००० पाऊले गुणिले ५ दिवस म्हणजे आठवड्यात ४५ मिनिटात २० कि मी होतात.
आता मी कमी केली आहेत. रोज ४००० करतो.
कमी करण्याचे कारण गुडघे दुखतात.
बाकी २ दिवस व्यायाम.
सुरुवातीस १०००० पाउले जरा जास्त वाटते.
मी वरील उपक्रम २० वर्षेकरत आहे.
अर्थात पेडॉमीटर ही रिसेंट घटना !!!!

मला चालायला आवडतं
वडगाव बुद्रुकच्या हायवे ब्रीजपासून ते गणेश कला क्रीडा मंच एवढ चालत जाते , आणि तिथून सिक्स सीटर ने घरी
अ‍ॅप नाहीये त्यामुळे नक्की सांगता येणार नाही पण मला वाटत १०,००० स्टेप नक्कीच होत असतील

मी साधा पेडोमिटर वापरते. अ‍ॅंथमवाल्यानी फुकट वाटले. स्ट्राइड लेंथ सेट केली त्यानुसार २००० स्टेप्सना १ मैलापेक्षा कमी अंतर होते. थोड्या हालचालीने स्टेप्स वाढत नाहित. व्यवस्थित चालले तरच स्टेप्स मोजल्या जातात.

मी ही लेव्हल १ ला.
मी सॅमसंगचे अ‍ॅप (S Health) वापरते. माझ्या रोज १०००० + स्टेप्स होतात. आता त्याच अ‍ॅप मधल्या बाकीच्या ही काही गोष्टी वापरायला सुरुवात केली आहे. ह्या अ‍ॅप मध्ये मॅन्युअली walking, running, cycling, hiking, sports, sleep, food, water intake, weight, blood glucose , blood pressure, caffeine इत्यादी गोष्टींचीही नोंद ठेवता येते. Walking, running, cycling, hiking, sports ह्या गोष्टींचे ड्युरेशन. उरलेल्या इतर गोष्टींची प्रमाणानुसार नोंद वगैरे. तुम्हाला नंतर समरी, ट्रेंड्स वगैरे छान दिसतात. मी स्टेप्स बरोबर वॉटर इंटेक, आणि स्पोर्ट्स (ह्यात मी योगासनांची वेळ नोंदवते) ह्याकरता हे अ‍ॅप वापरते.

आज ८१०० पावलं Pacer वर नोंदवल्या गेली. त्यात १०% त्रुटी गृहित धरल्यास ७२९०.
अजुन बाहेर जाणार आहे, तेव्हा ७५०० होतीलच.

मी मे महिन्यापासून हे करतेय. त्याआधी ५-६००० पावलं करायचे. एस५ चं shealth अतिशय चांगलं अँप वाटतंय. मला बँटरीचा प्रशन आला नाही. आमच्याकडे बाहेर चालायचं हवामान आहे तोवर मी करेन हे माहित आहे. खरी कसोटी नंतर आहे कारण जिममध्ये सलग दोन तीन माइल्स नंतर बोअर होतं Happy

चला चालुया Happy

Pages