युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गिटस चे गुलाब जाम करताना आतमधे पाक मुरत नाही. रसरशीत गुलाबजाम होण्यासाठि काय करावे?>> मिक्स पावडर चा गोळा करताना त्यात १-२ चमचे भिजवलेला रवा घालावा तसेच हलक्या हाताने थोडे थोडे दुध टाकत मिक्स करावे. हलक्या हातानेच गोळे करावे. मंद आचेवर सतत ढवळत तळावेत, एकसारखा रंग येतो. तळलेले गुलाबजाम जरासे थंड झाले की मग गरम पाकात टाकावेत.

मिक्स् चे एवढे लाड पुरवण्यापेक्षा मग डायरेक्ट खव्याचे गुलाब्जाम का करू नयेत?

गुलाबजामुन करताना त्याच्या आत २-४ दाणे साखरेचे भरावेत आणि पाक गरमच असावा. गरम पाक नीट शोषला जातो तसेच आत भरलेली साखरही विरघळते त्यामुळे तो गुठळीसारखा भाग दिसत नाही.

Till last month, I never tried doing khava-gulab jam (or using ready-mix). Last month my mother-in-law taught me how to make it. And now I wonder why and how Gulabjam mix are in market and doing business. I used milky mist brand khava packets from supermarket. For 400 gms khava only 2-3 spoon maida, mixed it in food processor. Rolled in round shape, fried, soaked it in sugar syrup and done.

राजसी , खवा सगळ्यांनाच सहजा सहजी मिळण शक्य नसतं. दुसरं म्हणजे घरात पॅकेट असेल तर ऐनवेळी करायला सोपं जात.
तेजू अगदी हलक्या हाताने पीठ मळुन गोळे केलेत तर आत गुठळी रहाणार नाही. इन्स्टंटच तेच आहे, जास्त मळल कि गुलाबजाम हमखास बिघडतात.

इन्स्टंटच तेच आहे, जास्त मळल कि गुलाबजाम हमखास बिघडतात.>> अगदी अगदी! उसगावात पहिल्यादा गिटस चे गुलाबजाम करताना कायच्या काय कन्चे झाले होते! पाक-बिक तर शिरलाच नाही आत,..

मी तर बावळटसारखं त्या पाकिटावरचं वाचून तुपात तळायला घेतले होते Proud नंतर कुणीतरी सांगितल्यामुळे अक्कल आली. पण आजकाल चितळ्यांचं पाकिट आणून फ्रीजमध्ये ठेवतो. इतकं जपून वापरते की घरातलेगुलाबजामप्रेमी वैतागतात Lol

गिट्स चा ऐवजी चितळ्यांचे गुलाब जामून मिक्स घ्या >>>>> १०००००००००००० अनुमोदन .
हल्ली गिटस आणतच नाही .

आजपर्यंत रेडिमिक्सचे गुलाबजाम कधीच केले नाहियेत. ठाण्यात गुलाबजामाचा हरियाली खवा मिळत असल्याने सणासुदीला भरपूर पाहुणे असले तरी खव्याचेच केले गेले. रेडिमिक्स आणि खव्याच्या गुलाबजामच्या चवीत फरक असतो. अर्थात आयत्या वेळी लागल्यास करण्यासाठी चितळे पाकिट बेस्ट असावे. नुकतेच गणपतीत चितळे पाकिटाचे गुलाबजाम एका माबोकरणीकडे खाल्ले. गिट्सपेक्षा नक्कीच चांगले लागले.

बरे, घोळ झालेला आहे. वाटीभर बदामांमध्ये लेकीनं दोन तीन वाट्या पाणी घालून ठेवलंय. (हे कृत्य सकाळी कधीतरी केले असावे. माझ्या उघडकीस आता आलेले आहे)

तर, या भिजवलेल्या बदामांचे काय करता येईल. (हलवा आणि खीर हे दोन ऑप्शन नेटवर वाचले. तेवढा सुगरणपणा माझ्यत नाहीये) सोपे सुटसुटीत काहीतरी सांगा. टिकाऊ पदार्थ सांगितल्यास उत्तमच होइल. धन्यवाद.

ठाणे स्टेशनच्या खंडेलवालची कहाणी ठाऊक आहे ना? त्याच्याकडचे खव्याबिव्याचे पदार्थ खायच्या-घ्यायच्या आधी विचार करा.

हो काही वर्षांपुर्वी त्यांच्या खव्यातली गडबड कळली होती. पण नंतर असं कळलं होतं की तेवढीच बॅच खराब निघाली होती. माझी खवा खरेदी मोस्टली ब्रिजवासीकडून होते कारण तो जवळ पडतो.

मंजू, अजून काही साधा व गुलाबजामचा खवा मिळणारी ठिकाणं असतील तर सांगून ठेव.

नालेसाठी घोडा करायची तयारी असेल तर त्या बदामाबरोबर काजू, पिस्ते, खसखस असलं काय काय भिजवून, वाटून थंडाई करता येईल. जय जय शिव शंकर...काटा लागे ना कंकर...

Pages