चित्रातल्या गोष्टी स्पर्धा प्रवेशिका क्र. १ : दिसते तसे नसते - slarti

Submitted by संयोजक on 25 August, 2009 - 11:42

चित्र क्रमांक २

LL2.jpg
दिसते तसे नसते

भीम : दुश्या, हे चालणार नाही, सांगून ठेवतोय.
दु:शासन : अरे हट ! तुला खेळता येत नाही तर रडू नकोस. रड्या लेकाचा !
भीम (दुश्याची गचांडी धरायला पुढे जात) : दुश्या, आता फार झालं हां. घालू का ही गदा डोक्यात ?

तेवढ्यात दुर्योधन येतो आणि मध्ये पडतो.

दुर्योधन : अरे अरे, काय चालले आहे ?
दु:शासनाच्या मागे उभ्या असलेल्या बाई : आम्ही कुठेच चाललो नाहीये. कधीपासून उभेच आहोत.
दुर्योधन : कोण ? अर्जुन का ? बंधो, ही साडी कशाला बरे नेसली आहेस ?
दु:शासन : बघ दुर्योधना, आता तूच सांग. आम्ही इस्टॉपपार्टी खेळत होतो. हा अर्ज्या साडी नेसून लपला. भीमावर राज्य होतं. त्याने याला पाहिलं आणि म्हणाला, दु:शला इस्टॉप. Biggrin म्हणून आम्ही ओरडलो, अंडंऽऽऽ. तर भीम्या उखडला. म्हणे आम्ही चिडीचा डाव खेळतोय.

भीम परत दु:शासनाची गचांडी धरायला जातो. दुर्योधन परत मध्ये पडतो आणि भीमाला अडवतो.

दु:शासन : हीहीही ! ही आयडीया या अर्ज्याचीच बरं का. कस्ला गेटप केलाय ! ती साडी आणि पुरूषी चेहरा पाहून मलाही आधी क्षणभर वाटलं की दु:शलाच आली. पण दुर्या, तू कसं काय एका झटक्यात ओळखलंस ?
दुर्योधन : ते अवघड नाही. अर्जुन जेव्हापासून आर्यावर्त फिरून आलाय तेव्हापासून फार फालतू कोट्या करायला लागलाय. कुठल्या शहरात उचलली ही सवय देव जाणे ! परवा मी काकीला भेटायला गेलो होतो. तिची खोली वरच्या मजल्यावर आहे ना, तर जिना चढावा लागतो. हासुद्धा तिथे होता. मी वर आल्यावर एकदम ओरडला, जसवंत आला ! काकी सांगत होत्या, आजकाल जिना चढणार्‍या प्रत्येकाला हा जसवंत म्हणतो. काय बोलायचं ! आणि दु:शासना, इस्टॉपपार्टी नाही रे, लपंडाव म्हण किंवा लपाछपीसुद्धा चालेल... आणि तुला किती वेळा सांगितलंय की इस्टॉप म्हणू नये, स्टॉप म्हणायचं.
भीम : दुर्या, तू सांग बरं का या दोघांना... हे चिटींग आहे. (दातओठ खात) अर्ज्या, ही तुझीच आयडीया ? थांब बघतोच तुला आता. साडीच फेडतो तुझी, मग बघतो कसा जाशील घरी.
दु:शासन : हेहेहे ! काहीच उपयोग नाही. परवा तुमच्या मामाच्या साडीदुकानाची नवीन शाखा उघडली ना, ती जागा मिळवून देण्यात अर्जुनाने खूप मदत केली. तिथे मोठी वस्ती होती, ती सगळी अर्जुनाने जाळून टाकली. तेव्हा तुमच्या मामाने खूश होऊन अर्जुनाला खूप साड्या दिल्या आहेत. तू एक फेडशील तर अर्जुन दुसरी नेसेल. हेहेहे.
दुर्योधन : वा वा ! अर्जुना, चांगले केलेस हो बंधो. अशीच मदत करावी. ही र(खोकतो)शियायी शाखा ना ?
अर्जुन : हो. तो सध्या तिथेच आहे. त्यामुळे इथे अगदी सुन्नी सुन्नी वाटतंय Proud (चेहर्‍यावर भाव - ढेकर दिल्यावर बरे वाटते तो... इतरांच्या चेहर्‍यावर भाव - त्या ढेकराचा वास आल्यावर येणारा तो).
दुर्योधन : दु:शासन, अर्जुन, तुम्ही तुमच्या भावालाच असे फसवावे हे बरोबर नाही. तुमच्यात ऐक्य असले पाहिजे.
अर्जुन ('दिवाळी आली दिवाळी आली' या आनंदात निथळत) : काहीतरीच. जिथे भीम, तिथे ऐक्य झालेले कधी पाहिले आहे का ?!
भीम (आता अर्जुनाची गचांडी धरायला जात) : दुर्या, ह्याला आवर हां ! सांगून ठेवतोय. हा आजकाल अती करतो. मी आणि द्रौपदी बुद्धीबळ खेळत असताना हा उगीचच त्या खोलीत काहीतरी शोधाशोध करण्याच्या बहाण्याने आवाज करत होता. म्हणे, माझे धनुष्य या खोलीत विसरलेय, ते शोधतोय. एखादे दिवशी याचा निकाल लावेन तेव्हा कळेल.

निकाल हा शब्द ऐकताच अर्जुन काहीतरी बोलायला तोंड उघडणार असतो, पण दुर्योधनच त्याला नजरेने दाबतो.

दु:शासन : पण दुर्या, तू आणखी किती दिवस या धर्मराज मोडात असणारेस ?
दुर्योधन : बंधो, आता हेच माझे नित्यरूप. मला साक्षात्कार झाला, मला गुरूमंत्र मिळाला. गुरूची लीला अगाध आहे. ('ही लीला कोण ?' या अर्जुनाच्या कुजबुजत्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतो.) काही दिवसांपूर्वी मला स्वप्न पडले त्यात मी कलीयुगात गेलोय असे दिसले. तिथे मला एक पीर भेटला. त्याने माझ्या सर्व त्रासावर उपाय सांगितला. तुम्हाला ऐकायचाय ?

'हो', 'सांग, सांग' चा गलका होतो.

दुर्योधन : आपण फार 'हे माझं, ते माझं' असं करतो. त्यावरून भांडाभांडी करतो. कुठलीही साधी गोष्ट मनाला फार लावून घेतो. त्यावर कुंदनशा नावाच्या त्या पीराने एकच मंत्र सांगितला... कधीही अशी परिस्थिती आली की म्हणायचं... जाने भी दो यारो !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहीतरीच. जिथे भीम, तिथे ऐक्य झालेले कधी पाहिले आहे का ?! >> लोल कवाडे अन आंबेडकराला द्या रे हे कोणी.

म्हणे, माझे धनुष्य या खोलीत विसरलेय >>> Rofl

जबरी.

आयला??? हे नेमक काय हे? (च्यामारी या लिम्बोटल्याच्या...... गुगल क्रोम वर टायपिन्ग म्हणजे दिव्य होतय Sad )
अरे हा प्रकार काय हे कोण सान्गेल का? बरा वाटतोय

जबरी... तात्कालिक संदर्भ घेऊन दिलेल्या पिचक्या फारच भारी..
मला एकदम विच्छा माझी पुरी करा आणि गाढवाचं लगीन ह्यांची आठवण झाली...