मायबोली गणेशोत्सव २०१५ - श्रेयनामावली

Submitted by संयोजक on 29 September, 2015 - 23:40

Slide1.PNGPresentation5.png

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! छानच.
पाकृबद्दल सगळ्यांचे सगळेच अंदाज बरोबर ठरले.
माबोकर आता लेखनाच्या/फोटोच्या स्टाईलपासून घरातील पळी-वाट्या-प्लेटांसकट एकमेकांना ओळखतात याची गंमत वाटली.
Happy

सर्व संयोजकांचे व पडद्यामागच्या कलाकारांचे अभिनंदन. यावर्षी कमी वेळात दणक्यात कार्यक्रम झाले. त्यात संयोजक मंडळाने इतर सभासदांना केलेल्या विनंत्यांना मान देऊन पडद्यामागुन सहभाग करणार्‍या सर्वांचे विशेष कौतुक. Happy

फास्टात सुफल संपूर्ण केलेल्या संयोजनाबद्दल अभिनंदन!
पुढच्या वर्षी लवकर या..
(आयमीन संयोजक मंडळाची लवकर घोषणा करा Wink Light 1 )

सर्व संयोजक आणि पडद्यामागच्या मायबोलीकरांचे अभिनंदन !
पाकृबद्दल सगळ्यांचे सगळेच अंदाज बरोबर ठरले.>>> तेच आधी चेक केले!! ----मी पण
माझा पण अंदाज बरोब्बर आला

गणेशोत्सव एकदम जोरात झाला. सर्वांचे अभिनंदन. पण हे वरचे कलर डोळ्याला काही सुखदायक नाहीत हां. Proud

त्यावरून आठवले. आरोग्य मध्ये दिमा असतील असे वाटत होते कारण ते सारखे पुपुवर, संयोजक मेल पाठवला,मिळाला का? असे लिहित होते. दिमा, तुमचे गणोबा मस्त होते.

मायबोलीकर एकमेकांना किती ओळखून आहेत हे पाककृती वरून कळले Lol माझ्या डिश वरून सगळ्यांनी ओळखले. म्हणजे सगळे घरातल्या वस्तूंसकट एकमेकांना ओळखतात Lol

ओट्सचे मोदक ही रेसिपी मी एका पुस्तकात वाचून केली. करताना शंका होती की मोदक वळले जातील की नाही. पण गणपतीबाप्पांनी आपला आवडीचा खाऊ करवून घेतला. गणपती बाप्पा मोरया.

बाकी छान झाला गणेशोत्सव. सगळ्या पडद्यामागच्या कलाकारांचे व संयोजकांचे अभिनंदन.

छान झाला गणेशोत्सव. संयोजकांचे मनापासून अभिनंदन पडद्यामागच्या कलाकारांचे मनापासुन आभार

सर्व संयोजकांचे अभिनंदन. अतिशय कमी वेळात फार सुंदर आयोजन केले तुम्ही लोकांनी. पडद्यामागच्या कलाकारांचे आभार
व गणेशोत्सवात सहभागि उत्साही मायबोलीकरांचेही अभिनंदन.

मस्त मस्त!! सगळेच नियोजन आवडले! खेळात मजा आली. एकंदरीतच मस्त वातावरण असते माबोवर संपूर्ण गणेशोत्सवात; त्यामधे संयोजकाचा आणि त्यांना मदत करणार्‍या सगळ्यांचाच मोठा वाटा आहे. पूनःश्च अभिनंदन!

छान झाला गणेशोत्सव...
सर्वांचे आभार आणि संयोजकांचे अभिनंदन...
मी त्यातही रोमातच जास्त होते नेट प्रॉब्लेम मुळे पण प्रतिसाद देणे जमले नाही हरेकावर तरी रोज वाचत मात्र होती..

गणेशोत्सव छान आयोजित करून पार पाडल्याबद्दल सर्व संयोजकांचे आणि पडद्यामागच्या मायबोलीकरांचे अभिनंदन आणि आभार!

सगळ्यांनी अगदी घरचे कार्य समजून केले.. खरे तर आभाराची गरजच नव्हती..

त्या डाळ आणि गाजर वड्या मी एमिरेट्सच्या, लुआंडा ते दुबई या फ्लाईटवर चाखल्या होत्या. त्यांनी त्या आटीव दूधातून सर्व्ह केल्या होत्या. त्यामूळे श्रेय एमिरेटसचे.

छान झाला गणेशोत्सव. संयोजकांचे अभिनंदन...
घरी गणपती बाप्पा येतात त्यामुळे मी सुट्टीवर असते. इच्छा असूनही भाग घेता येत नाही. गणेशोत्सवात सहभागी झालेल्या उत्साही मायबोलीकरांचेही अभिनंदन. Happy

संयोजकांचे अभिनंदन. मुदत कमी मिळुनही कार्यक्रम छान पार पाडला. पडद्यामागील सर्व मदतनीसांचेही अभिनंदन. >>> +१

Pages