'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.४ : स्पायसी सॅलड स्टॅक बदलून Rice stuffed peppers

Submitted by sonalisl on 28 September, 2015 - 17:14

मूळ पदार्थ : http://www.maayboli.com/node/55567

बदललेले घटक :
पर्ल कुसकुस : बासमती तांदूळ
हरिसा / लाल मिरचीचा ठेचा : Puliogare Powder
दही : तेलावर परतलेले पनीर

लागणारा वेळ
: ४० मिनिटे.

साहित्य :
१) १ कप बासमती तांदूळ
२) १ कप पालकाची कोवळी पाने
३) कोथिंबीर + मिरची
४) Puliogare Powder
५) ३ कॅप्सिकम - लाल / पिवळ्या किंवा दोन्ही (आवडीनुसार)
६) थोड्या ड्राईड क्रॅनबेरीज किंवा बेदाणे (ऐच्छिक).....नाही घेतले
७) काकडीचे पातळ काप.......जाड काप घेतले Happy
८) ३-४ टीस्पून ऑलिव्ह ऑइल (ऑऑ)
९) बारीक कुटलेली मिरी चवीनुसार
१०) मीठ चवीनुसार
११) पनीर
१२) वाळलेला किंवा ताजा पुदिना
१३) लिंबाचा रस चवीनुसार
१४) टोस्टेड अक्रोड / बदामाचे काप (सजावटीकरता)

कृती :

१) भात करुन घ्यावा. २ भागात विभागावा.
२) पालक, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिर्ची, लिंबाचा रस आणि मीठ एकत्र वाटून घ्यावे.
३) पॅन मधे तेल गरम करून हिरवे वाटण घालावे व त्यात भात घालून सगळे नीट मिळून येईपर्यंत परतणे. त्यावर पनीर व थोडी मीरपूड घालावी.
४) दुस-या पॅन मधे तेल तापवून त्यात Puliogare Powder घालून उरलेला भात घालावा. सगळे नीट मिळून येईपर्यंत परतणे.
५) कॅप्सिकमला वरच्या बाजूने कापून, तेलाचा हात लावून गॅसवर भाजून घ्याव्यात.
६) आता एका कॅप्सिकममधे हिरवा भात भरावा. दुसरीत लाल भात भरुन त्यावर बदामाच्या कापाची सजावट करावी. तिसरीत काकडीचे उभे काप ठेवावे.......आणि मग....... टाऽऽऽडा!!! Happy हे असे दिसेल.....

photo.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users