'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.४ : चिझी स्पॅगेटी स्टॅक

Submitted by सावली on 26 September, 2015 - 08:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) ( कुसकुस बदलून) स्पॅगेटी
२) १ कप पालकाची कोवळी पाने
३) कोथिंबीर + मिरचीची चटणी
४) (हरिसा पेस्ट - बदलून) - टोमॅटो सॉस
५) रोस्टेड कॅप्सिकम स्ट्रिप्स - लाल / पिवळ्या किंवा दोन्ही (आवडीनुसार)
६) थोड्या ड्राईड क्रॅनबेरीज किंवा बेदाणे ( वापरले नाहीत)
७) काकडीचे पातळ काप
८) १ टीस्पून ऑलिव्ह ऑइल (ऑऑ)
९) बारीक कुटलेली मिरी चवीनुसार
१०) मीठ चवीनुसार

(टँगी योगर्ट सॉस - बदलून)
१) किसलेले चीझ
२) बारीक कुटलेली मिरी

क्रमवार पाककृती: 

१ लिटर पाण्यात मीठ ऑऑ टाकून स्पॅघेटी उकडून घेतली

- कॅप्सिकम ओवनमध्ये रोस्ट करा किंवा गॅसवर भाजा. सालं काढून रोस्टेड कॅप्सिकमचे लांब तुकडे करुन घ्या, पालकाची पाने धुऊन ब्लांच* करून घ्या.

- शिजलेल्या स्पॅघेटीचे दोन वाटे करा.
एकात टोमॅटो सॉस घालून मिक्स करा आणि
दुसर्‍या वाट्यात हिरवी चटणी + १/२ टे स्पून ऑऑ घालून मिक्स करा. चवीनुसार मीठ-मिरी घालून नीट मिक्स करून घ्या.

- काचेच्या दोन बोल्सना आतून क्लिंग फिल्म (प्लॅस्टिक रॅप) लावून घ्या.

- बोलमध्ये आधी
टोमॅटो सॉस + स्पॅघेटी, त्यावर पालकाची पाने,
त्यावर कॅप्सिकम स्ट्रिप्स
किसलेले चीझ + मिरीपूड
मग हिरवी चटणी+ स्पॅघेटी,
काकडीचे काप
परत किसलेले चीझ + मिरीपूड
असे थर लावा.

- क्लिंग रॅपची टोके जुळवून बोल बंद करा आणि बोल्स थोडा वेळ फ्रिझरमध्ये ठेवा (२०-३० मिनिटे).
- सर्व्ह करताना बोलमधून हलकेच क्लिंग रॅपसकट स्टॅक बाहेर काढा आणि स्टॅक प्लेटवर उपडा करा.
- सजवून खायला द्या

वाढणी/प्रमाण: 
२ मुलांना
अधिक टिपा: 

- स्पॅघेटी अजुन जास्त वेळ फ्रिज मधे ठेवायला हवी होती म्हणजे नीट सेट झाली असती. माझी जरा कमी सेट झाली होती.
- ह्युमन ट्रायल घेतली आणि घरातल्या चूझी ह्युमन्सना रेसिपी आवडलेली आहे Wink
- मुळ रेसिपीमधे कुसकुस हा पास्त्याचा एक प्रकार आहे असे वाचल्यामुळे सरळ स्पॅघेटी घालून करुन पाहिले.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users