उंदीरमामाची टोपी हरवली
रामराम मंडळी! काय सगळे एकदम खूश ना? 'ताशाचा आवाज तररारा आला न् गणपती माझा नाचत आला'! तुम्हांला जितकी आतुरता असते बाप्पांना भेटायची तितकीच प्रतीक्षा बाप्पाही करत असतात मायबोलीवर अवतरण्याची! मी म्हटलं, "काय गणराज! तुम्हांला मायबोलीशिवाय चैन पडत नाही? हल्ली तर बघावं त्या बाफावर राजकीय मुद्द्यांवरुन लोक हमरीतुमरीवर येत असतात. काही लोक तर म्हणतात वातावरण गढूळ का कायसं झालंय".( टवकारलेत ना कान? मी उंदीरमामा, तुमच्या इथल्या गप्पाही असेच कान टवकारून ऐकत असतो.) तर एक मिश्कील हसू गालावर आणत बाप्पा मला सांगतात कसे - "अरे, ती वादावादी काय खरी नव्हे! खरी मायबोली तर या सगळ्याच्या पलीकडे आहे. गेली १४ वर्षे येतोयस माझ्याबरोबर इथे? इथले काही महत्त्वाचे, प्रसिद्ध धागे वाचलेस का? कितीतरी नवीन ज्ञानवर्धक आणि मनोरंजक माहिती मिळेल. नुसतं या भांडणांवर जाऊ नकोस, शोधलंस तर कित्तीतरी छान छान धागे सापडतील. कधीतरी बुद्धीला खाऊ मिळावा यासाठी धडपड कर!" आता प्रतिष्ठापना झाली आणि म्हटलं लगेच वाचायला चालू करू. एक मस्त धागा सापडला, तो वाचून होतोय तर आमच्या मालकांची हाक आली, आलो लगेच पळतपळत, पण... माझी टोपी पडली की हो तिकडेच कुठेतरी गडबडीत! हो, तीच ती! 'राजा भिकारी, माझी टोपी चोरली'वाली जगप्रसिद्ध टोपी माझी! आता मी काय करु? मला त्या धाग्याचं नाव, नंबर काही सांगता येणार नाही, पण तिथं काय चर्चा चालू होती ते मी आठवेल तसं सांगेन. तेवढ्यावर अस्सल मायबोलीकर मला ती टोपी शोधून देऊ शकतील का?
नियम -
१. ही स्पर्धा नाही खेळ आहे.
२. उंदीरमामाची टोपी मायबोलीच्या एका धाग्यावर पडली आहे. ती शोधून द्यायची म्हणजेच त्या धाग्याचे नाव, लिंक द्यायची.
३. उंदीरमामा तुम्हांला त्या धाग्याविषयी काही खुणा, हिंट्स् देतील. थोड्या थोड्या वेळाने एक अशा प्रत्येक धाग्यासाठी पाच खुणा मिळतील.
४. पहिली खूण मिळताच मायबोलीकर शोधाशोध सुरू करून उत्तर देऊ शकतात. पण 'झब्बू'सारखंच, एक आयडी सलग उत्तरासाठी सलग दोन पोस्ट टाकू शकणार नाही.
५. उंदीरमामांसाठी मायबोली म्हणजे जणू परदेश आहे. त्यामुळे त्यांना जसं आठवेल तसे ते खुणा सांगतील. त्यांनी सांगितलेल्या खुणा कधीकधी दिशाभूल करणार्याही असू शकतील बरं!
पहिली टोपी
१. आज एक मस्त धागा वाचत होतो, पण तिकडे गेल्यावर मला जरा घाबरायलाच झालं. सगळेजण श्वास रोखून होते!
२. काटकोनांत निसर्ग कसा काय असेल?
३. सगळा खेळ वेगाशी आणि जीवाशी हो!
उत्तर - http://www.maayboli.com/node/9310
विजेती - मृदुला
दुसरी टोपी
१. डोक्याचा भयानक गुंता झाला. तांत्रिक भानगडींनी डोकं भंजाळलं.
२. वर-खाली, उघड-बंद काय-काय बोलणं चालू होतं - काही समजेना!
उत्तर - http://www.maayboli.com/node/13661
विजेती - विनिता.झक्कास
तिसरी टोपी
१. वरवर वाचलं. अगम्य, क्लिष्ट काहीतरी भलत्याच भाषेतलं!
२. मुख्य स्त्रोतच माहीत नाही, पण केली शेवटी लोकांनी मदत.
३. जमलं सुरेख होतं पण अंकांनी फसगत केली सर्वांची.
४. काय एकेक भेटी!
५. एकात उपहास, दुज्यात कल्पनाविलास!
उत्तर - http://www.maayboli.com/node/7713
विजेती - श्रद्धा
चौथी टोपी
१. सुरीने कापा आणि मेणाने चिकटवायला सांगत होते कुणीतरी.
उत्तर - http://www.maayboli.com/node/46736
विजेती - मामी
पाचवी टोपी
१.काल असाच हिंडत हिंडत कुठेतरी पोचलो तर तिथं इतकी मोठी लोकं एकत्र जमली होती. म्हणजे नुसती वयानं नाही हां.. त्यांचं नाव खूप वेळा ऐकलंय सगळीकडे अशी लोकं. मुसलमानांबद्दल काहीतरी बोलत होते तिथे.
२. तिथे तर कुणी प्रसिध्द नृत्यांगना नाचतही होत्या.
उत्तर - http://www.maayboli.com/node/26679
विजेती - अल्पना
सहावी टोपी
१. एक बाई चिडून वर्तमानपत्रात लेख लिहायला निघाल्या होत्या तिथे!
२. बिचारी छोटी मुलं रडताना बघून मी तर गलबलूनच गेलो.
3. बऱ्याचश्या आया आणि काही बाबा लोक तिथे जमले होते. फारच टेन्शनमध्ये दिसत होते.
४. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है.
उत्तर - http://www.maayboli.com/node/20222
विजेती - राजसी
सातवी टोपी
१. केवढी ती चर्चा! नुसती धुमाळी माजलेली.हे का ते, ते का आणखी काही? प्रत्येकजण पुराव्यासहित आपापली मते मांडत होता.
२. या 'वड्या'चं तेल वांग्यावर काढायला उरतच नाही!
उत्तर - http://www.maayboli.com/node/427337
विजेती - वेका
आठवी टोपी
१.अतिशय मुद्देसूद माहिती लिहीली होती तिथे. पण हे सारं तसं खर्चिक बरं का!
२. महत्त्वाचे मुद्दे ठळक करायची स्टाईल आवडली आपल्याला.
३. पुढे काहीही नवीन आलं तरी त्याच्या मागे जुने तुम्हीच.
उत्तर - http://www.maayboli.com/node/17057
विजेती - राजसी
नववी टोपी
१. सुरुवात, चढ-उतार आणि शेवट सगळचं कसं सुरेख!
२. भांडण ही होतं इथे पण शब्दांत नाही..
३. हा भोपळा काही टुणूक टुणूक जात नाही!
४. बॉलिवूडच्या फेमस त्रयींचा बंधु आहे. पण...
५. नाव घेतानाही कानाला हात लावावा अशी ही माणसं नि त्यांची तपश्चर्या..
उत्तर - http://www.maayboli.com/node/51724
विजेती - मैत्रेयी
दहावी टोपी
१. दोन बायकांचीच गोष्ट ती, एखाद्या सिरीअलसारखी!
२. मन मोठं असलं की सगळं काही सामावता येतं, हे घरच्या सर्वांसाठीच बरं का!
३. झाडूने केली गंमत!
४. गोष्ट ती मायबोलीतूनच, पण जरा गोड, रांगडा लहेजा!
उत्तर - http://www.maayboli.com/node/29872
विजेती - कविन
हा हलकटपणाचा कहर आहे
हा हलकटपणाचा कहर आहे नंदिनी....................:P
झाले ५ आता कुणीतरी लिहिणार
झाले ५ आता
कुणीतरी लिहिणार लिहिणार क्लू
नंदिनी...
नंदिनी...
मामा खुष हुआ!! नवीन क्लू
मामा खुष हुआ!! नवीन क्लू आला!!
हा का?
हा का?
http://www.maayboli.com/node/50503 - मुलांच्या दांडगाईने वागण्याबाबत इतर मुले, इतर पालक आणि शाळा ह्यांनी काय करावे?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/48958 मुले सांभाळणार्या आयाकडून बाळावर अत्याचार - पियू
??
http://www.maayboli.com/node/45936 मुलं - काही नोंदी - मितान ??
मितानचा गॅदरिंगवरचा धागा? <<<
मितानचा गॅदरिंगवरचा धागा? <<< naahee!! wrong number laalagalaa
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/7805?page=1 मला हा रैनाचा धागा आठवत होता, पण यात वर्तमानपत्रात लेख लिहायचा संदर्भ आहे की नाही आठवत नाही.
रैना की सावली कोणाचा तरी अभ्यासासंबंधी धागा होता तो असावा का?
खुणा फक्त मूळ लेखातल्या
खुणा फक्त मूळ लेखातल्या नाहीत, प्रतिसादांतल्याही असाव्यात. कारण सगळी चर्चाच वाचली ना मामांनी!
वर्तमानपत्रात लेख << यावरून
वर्तमानपत्रात लेख << यावरून मला वंदना बर्वेंचे लेख आठवत आहेत. पण त्यात लहान मुलं रडताना कधी दिसली नाहीत.
द्या पुढचा क्लू द्या नाहीतर हिंट द्या.
उंदीरमामांनी पुढला क्लू दिलाय
उंदीरमामांनी पुढला क्लू दिलाय बघा बरं!
तो क्लू नाही, नर्सरी र्हाईम
तो क्लू नाही, नर्सरी र्हाईम आहे मामा!!
कसं व्हायचं तुमचं. तरीच त्या टोप्या हरवताय सारख्या.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/20222
This bb
एकद्म चोकस राजसी. गुड जॉब. या
एकद्म चोकस राजसी. गुड जॉब. या टोपीच्या निमित्ताने बाल-संगोपनातले कितीतरी धागे वाचले.
उंदीरमामाची टोपी सापडली.
उंदीरमामाची टोपी सापडली.
राजसी, अभिनंदन! हे घ्या तुमचे बक्षिस :
धांदरट उंदीरमामा परत कुठेतरी
धांदरट उंदीरमामा परत कुठेतरी टोपी विसरून आलेत! पण काहीच क्लू आठवत नाहीयेत म्हणतायत. चला, त्यांना क्लू आठवावे म्हणून आपण गणपती बाप्पाची नावं घेऊया. बाप्पाची १२ वेगवेगळी नावं लिहा बरं, मग बघूया मामांना आठवतय का!
एकदंत गणेश गजानन विघ्नेश वक्र
एकदंत
गणेश
गजानन
विघ्नेश
वक्रतुंड
विनायक
कृष्णपिंगाक्ष
गजवक्र
लंबोदर
विघ्नराजेन्द्र
भालचंद्र
गणपती
है शाब्बास! मामांनी दिला
है शाब्बास! मामांनी दिला क्लू पुढल्या टोपीचा!
हा काय क्ल्यू झाला? राजकारण,
हा काय क्ल्यू झाला? राजकारण, धर्म, जात, स्त्री पुरूष समानता, जिप्स्याच्या लहान मुलांच्या फोटोंवरून प्रताधिकार नियम, टिनाचा वर्हाड स्पेशल असे अगणित धागे आहेत की रणधुमाळीचे
१. केवढी ती चर्चा! नुसती
१. केवढी ती चर्चा! नुसती धुमाळी माजलेली.हे का ते, ते का आणखी काही? प्रत्येकजण पुराव्यासहित आपापली मते मांडत होता. >> कमीतकमी ७४६८ धागे बसतील की हो ह्या क्लू मध्ये.
रणधुमाळी चालू असतांना तिथे जायचंच कश्याला. ते टोपी शोधण्यापेक्षा सगळ्यांनी वर्गणी करून अडीच डझन नव्या टोप्या घेऊन द्या मामांना म्हणजे दिवसाला चार हरवल्या तरी शोधाशोधीची ऊठाठेव नको.
हो ना ! हा क्लू बर्याआआआअच
हो ना ! हा क्लू बर्याआआआअच बाफांना लागू पडेल.
तरीसुद्धा हा एक प्रयत्न : http://www.maayboli.com/node/6028
इतीहास, नामांतर हे ही
इतीहास, नामांतर हे ही त्यातलेच
हाच धागा. ५५५८४.
हाच धागा. ५५५८४.
हाच धागा. ५५५८४.
हाच धागा. ५५५८४.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/18221
वेदकालीन संस्कृती
बरं बरं, त्या गडबडगोंधळातून
बरं बरं, त्या गडबडगोंधळातून बाहेर पडल्यावर मामांना पुढची खूण आठवलीये बघा!
अंजीर बर्फी? कुठला तरी
अंजीर बर्फी? कुठला तरी पाकृचा धागा आहे हा. वड्या किंवा वडे.
श्रावणघेवडा का काय? पण
श्रावणघेवडा का काय? पण रणधुमाळी झाली होती का इतकी?
http://www.maayboli.com/node/42733
धन्यवाद वेका. ही कृती बघून
धन्यवाद वेका. ही कृती बघून भाजी खावीशी वाटू लागल्येय. आता परवा घरी जाताना चांगली पिशवीभर भाजी घेऊन जाणारे. पण... कुठेली घेऊ नक्की? आणि भाजीवालीला काय दे म्हणून सांगू??
तुम्ही टोपी तर दिलीत शोधून, आता तेवढं भाजीचं नाव पण सांगा ना.
हे घ्या तुमचं बक्षीस,
अय्यो सिंडरेलाचं गिफ्ट मला
अय्यो सिंडरेलाचं गिफ्ट मला मिळालं का काय ठ्यांक्स हं उंदीरमामा.
श्रावणघेवड्याची सुकी भाजी (उपीटाच्या फोडणीसहित) घ्या खा हीच भाजी आज.
Pages