उंदीरमामाची टोपी हरवली
रामराम मंडळी! काय सगळे एकदम खूश ना? 'ताशाचा आवाज तररारा आला न् गणपती माझा नाचत आला'! तुम्हांला जितकी आतुरता असते बाप्पांना भेटायची तितकीच प्रतीक्षा बाप्पाही करत असतात मायबोलीवर अवतरण्याची! मी म्हटलं, "काय गणराज! तुम्हांला मायबोलीशिवाय चैन पडत नाही? हल्ली तर बघावं त्या बाफावर राजकीय मुद्द्यांवरुन लोक हमरीतुमरीवर येत असतात. काही लोक तर म्हणतात वातावरण गढूळ का कायसं झालंय".( टवकारलेत ना कान? मी उंदीरमामा, तुमच्या इथल्या गप्पाही असेच कान टवकारून ऐकत असतो.) तर एक मिश्कील हसू गालावर आणत बाप्पा मला सांगतात कसे - "अरे, ती वादावादी काय खरी नव्हे! खरी मायबोली तर या सगळ्याच्या पलीकडे आहे. गेली १४ वर्षे येतोयस माझ्याबरोबर इथे? इथले काही महत्त्वाचे, प्रसिद्ध धागे वाचलेस का? कितीतरी नवीन ज्ञानवर्धक आणि मनोरंजक माहिती मिळेल. नुसतं या भांडणांवर जाऊ नकोस, शोधलंस तर कित्तीतरी छान छान धागे सापडतील. कधीतरी बुद्धीला खाऊ मिळावा यासाठी धडपड कर!" आता प्रतिष्ठापना झाली आणि म्हटलं लगेच वाचायला चालू करू. एक मस्त धागा सापडला, तो वाचून होतोय तर आमच्या मालकांची हाक आली, आलो लगेच पळतपळत, पण... माझी टोपी पडली की हो तिकडेच कुठेतरी गडबडीत! हो, तीच ती! 'राजा भिकारी, माझी टोपी चोरली'वाली जगप्रसिद्ध टोपी माझी! आता मी काय करु? मला त्या धाग्याचं नाव, नंबर काही सांगता येणार नाही, पण तिथं काय चर्चा चालू होती ते मी आठवेल तसं सांगेन. तेवढ्यावर अस्सल मायबोलीकर मला ती टोपी शोधून देऊ शकतील का?
नियम -
१. ही स्पर्धा नाही खेळ आहे.
२. उंदीरमामाची टोपी मायबोलीच्या एका धाग्यावर पडली आहे. ती शोधून द्यायची म्हणजेच त्या धाग्याचे नाव, लिंक द्यायची.
३. उंदीरमामा तुम्हांला त्या धाग्याविषयी काही खुणा, हिंट्स् देतील. थोड्या थोड्या वेळाने एक अशा प्रत्येक धाग्यासाठी पाच खुणा मिळतील.
४. पहिली खूण मिळताच मायबोलीकर शोधाशोध सुरू करून उत्तर देऊ शकतात. पण 'झब्बू'सारखंच, एक आयडी सलग उत्तरासाठी सलग दोन पोस्ट टाकू शकणार नाही.
५. उंदीरमामांसाठी मायबोली म्हणजे जणू परदेश आहे. त्यामुळे त्यांना जसं आठवेल तसे ते खुणा सांगतील. त्यांनी सांगितलेल्या खुणा कधीकधी दिशाभूल करणार्याही असू शकतील बरं!
पहिली टोपी
१. आज एक मस्त धागा वाचत होतो, पण तिकडे गेल्यावर मला जरा घाबरायलाच झालं. सगळेजण श्वास रोखून होते!
२. काटकोनांत निसर्ग कसा काय असेल?
३. सगळा खेळ वेगाशी आणि जीवाशी हो!
उत्तर - http://www.maayboli.com/node/9310
विजेती - मृदुला
दुसरी टोपी
१. डोक्याचा भयानक गुंता झाला. तांत्रिक भानगडींनी डोकं भंजाळलं.
२. वर-खाली, उघड-बंद काय-काय बोलणं चालू होतं - काही समजेना!
उत्तर - http://www.maayboli.com/node/13661
विजेती - विनिता.झक्कास
तिसरी टोपी
१. वरवर वाचलं. अगम्य, क्लिष्ट काहीतरी भलत्याच भाषेतलं!
२. मुख्य स्त्रोतच माहीत नाही, पण केली शेवटी लोकांनी मदत.
३. जमलं सुरेख होतं पण अंकांनी फसगत केली सर्वांची.
४. काय एकेक भेटी!
५. एकात उपहास, दुज्यात कल्पनाविलास!
उत्तर - http://www.maayboli.com/node/7713
विजेती - श्रद्धा
चौथी टोपी
१. सुरीने कापा आणि मेणाने चिकटवायला सांगत होते कुणीतरी.
उत्तर - http://www.maayboli.com/node/46736
विजेती - मामी
पाचवी टोपी
१.काल असाच हिंडत हिंडत कुठेतरी पोचलो तर तिथं इतकी मोठी लोकं एकत्र जमली होती. म्हणजे नुसती वयानं नाही हां.. त्यांचं नाव खूप वेळा ऐकलंय सगळीकडे अशी लोकं. मुसलमानांबद्दल काहीतरी बोलत होते तिथे.
२. तिथे तर कुणी प्रसिध्द नृत्यांगना नाचतही होत्या.
उत्तर - http://www.maayboli.com/node/26679
विजेती - अल्पना
सहावी टोपी
१. एक बाई चिडून वर्तमानपत्रात लेख लिहायला निघाल्या होत्या तिथे!
२. बिचारी छोटी मुलं रडताना बघून मी तर गलबलूनच गेलो.
3. बऱ्याचश्या आया आणि काही बाबा लोक तिथे जमले होते. फारच टेन्शनमध्ये दिसत होते.
४. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है.
उत्तर - http://www.maayboli.com/node/20222
विजेती - राजसी
सातवी टोपी
१. केवढी ती चर्चा! नुसती धुमाळी माजलेली.हे का ते, ते का आणखी काही? प्रत्येकजण पुराव्यासहित आपापली मते मांडत होता.
२. या 'वड्या'चं तेल वांग्यावर काढायला उरतच नाही!
उत्तर - http://www.maayboli.com/node/427337
विजेती - वेका
आठवी टोपी
१.अतिशय मुद्देसूद माहिती लिहीली होती तिथे. पण हे सारं तसं खर्चिक बरं का!
२. महत्त्वाचे मुद्दे ठळक करायची स्टाईल आवडली आपल्याला.
३. पुढे काहीही नवीन आलं तरी त्याच्या मागे जुने तुम्हीच.
उत्तर - http://www.maayboli.com/node/17057
विजेती - राजसी
नववी टोपी
१. सुरुवात, चढ-उतार आणि शेवट सगळचं कसं सुरेख!
२. भांडण ही होतं इथे पण शब्दांत नाही..
३. हा भोपळा काही टुणूक टुणूक जात नाही!
४. बॉलिवूडच्या फेमस त्रयींचा बंधु आहे. पण...
५. नाव घेतानाही कानाला हात लावावा अशी ही माणसं नि त्यांची तपश्चर्या..
उत्तर - http://www.maayboli.com/node/51724
विजेती - मैत्रेयी
दहावी टोपी
१. दोन बायकांचीच गोष्ट ती, एखाद्या सिरीअलसारखी!
२. मन मोठं असलं की सगळं काही सामावता येतं, हे घरच्या सर्वांसाठीच बरं का!
३. झाडूने केली गंमत!
४. गोष्ट ती मायबोलीतूनच, पण जरा गोड, रांगडा लहेजा!
उत्तर - http://www.maayboli.com/node/29872
विजेती - कविन
डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून
डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम - डॉ. अभिराम दीक्षित
http://www.maayboli.com/node/54691
हा असावा का?
छत्रपती शिवाजी, औरंगजेब,
छत्रपती शिवाजी, औरंगजेब, माफीनामा आणि अब्दूल कलाम रोड - केदार - http://www.maayboli.com/node/55391
जुना व्ही अॅंड सी का"? तिथे
जुना व्ही अॅंड सी का"? तिथे एकेकाळी बरीच बडीबडी मंडळी लिहायची.
पुढचा क्लू मागुयात का लोकहो?
पुढचा क्लू मागुयात का लोकहो?
मामा: वास्को द गामा असतो तर
मामा:
वास्को द गामा असतो तर मीच नसती का शोधली टोपी
चतुर मायबोलीकरांना चकवायला कामी येते युक्ती सोपी!
पुढचा क्ल्यू हवा असेल तर तीन जणांनी लिहा- "गणपती बाप्पा मोरया! आता तरी टोपी सापडू द्या!" तरच सांगेन मी नवी खूण.
गणपती बाप्पा मोरया! आता तरी
गणपती बाप्पा मोरया! आता तरी टोपी सापडू द्या!
गणपती बाप्पा मोरया! आता तरी
गणपती बाप्पा मोरया! आता तरी टोपी सापडू द्या!
गणपती बाप्पा मोरया! आता तरी
गणपती बाप्पा मोरया! आता तरी टोपी सापडू द्या!
मामा: अहो ताई, तुम्ही तीन
मामा: अहो ताई, तुम्ही तीन 'जण' आहात काय?!
काल दुपारी आयडेंटीटी चित्रपट
काल दुपारी आयडेंटीटी चित्रपट पाहिल्याचा परिणाम.
गणपती बाप्पा मोरया! आता तरी
गणपती बाप्पा मोरया! आता तरी टोपी सापडू द्या!
गणपती बाप्पा मोरया! आता तरी
गणपती बाप्पा मोरया! आता तरी टोपी सापडू द्या!
गणपती बाप्पा मोरया आता तरी
गणपती बाप्पा मोरया आता तरी टोपी सापडू द्या.
गणपती बाप्पा मोरया! आता तरी
गणपती बाप्पा मोरया! आता तरी टोपी सापडू द्या!
मामा: शाब्बास! पुढची खूण
मामा: शाब्बास! पुढची खूण संयोजकांच्या कानात सांगितली आहे बघा वर!
शर्मिलाचा मुस्लिम फिल्म्सवरचा
शर्मिलाचा मुस्लिम फिल्म्सवरचा लेख का? पाकिझा?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/34781?page=2 नंदिनी ही त्याची लिंक, मलाही तोच वाटतोय
ओ उंदीरमामा, आम्हा नव्या
ओ उंदीरमामा,
आम्हा नव्या लोकांना माहीतच नाहीयेत हे बाफ
तुमचा उद्धेश तोच असला तरी आम्हाला मज्जेत खेळता येत नाहीये
एक दोन वर्षांमधल्या धाग्यांवर पण जा की
क्लू पटापटा द्या. म्हणजे
क्लू पटापटा द्या. म्हणजे मज्जा येईल. अगदी हॉट कोल्ड सांगितलेत तरी चालेल.
रीया, तुला माबोवर येऊन एक दोन वर्षं झाली?
ही कल्पना फारच मस्त आहे
ही कल्पना फारच मस्त आहे संयोजक पण पूर्ण धागा वाचून काढल्यावर मला क्लूज फार कठीण वाटले.
माझा अभ्यास कमीच आहे तसाही.
नंदिनी,तुम्ही जवळपासच आहात
नंदिनी,तुम्ही जवळपासच आहात टोपीच्या!
खेळात अवघड, सोपे, जुने, नवे सगळे धागे आहेत. तुम्ही प्रयत्न नक्की करा.
नंदिनी, पाकिजा नाही.
नंदिनी, पाकिजा नाही. शर्मिलाचाच सिनेमा-सिनेमा मध्ये मुस्लिम सोशल्स म्हणून लेख आहे तो असणार.
http://www.maayboli.com/node/26679
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/52863
अल्पना - तुमचे उत्तर थोडे फार
अल्पना - तुमचे उत्तर थोडे फार मला पण बरोबर वाटत आहे
बहोत खूब अल्पना! आणि तुम्हाला
बहोत खूब अल्पना! आणि तुम्हाला सिनेमाला जाण्यासाठी मिळतोय हा मस्त गॉगल!
अल्पना - congrats !!!
अल्पना - congrats !!!
नंदिनी, कविन आता हा गॉगल कसा
नंदिनी, कविन आता हा गॉगल कसा शेयर करायचा?
अल्पना - दिवस ठरवून वापरा,
अल्पना - दिवस ठरवून वापरा, तुकडे करून वाटून नका घेवू
मामा : सलग पाचव्यांदा दिली
मामा :
सलग पाचव्यांदा दिली शोधून माझी टोपी
चतुर चाणाक्ष किती मायबोलीकर पोरी!
नंदिनी, ३ वर्ष ३२ आठवडे
नंदिनी, ३ वर्ष ३२ आठवडे
Pages