तेचबुक! स्टेटस गिर्‍या - आयफोन ६स

Submitted by केदार on 18 September, 2015 - 04:11

गिर्‍या स्टेटस : न्यु टॉय इन द टाऊन - आयफोन 6S. काल रात्रभर लाईनीत उभा राहून आयफोन ६S मिळवला. य्येस! #Iphone6S #Goodtimes #Firsttoget #Haapy #intheclouds

लाईक्स सत्या,सुन्या, मोहन, रावडी राठोड, दंबग मन्या, केतकी, रेवती,मेघना अ‍ॅन्ड २७ मोअर.

रावडी राठोड : अबे गिर्‍या, रात्रभर जागून, लाईनीत उभा राहून फोन घेतलास, त्यापेक्षा TEला तेवढा अभ्यास केला असतास तर पास झाला असतास. Proud
गिर्‍या : राठोड, इथे पास होण्याचे काय आहे? आज बघ मी अमेरिकेला आहे. BE न काढताच.आणि तू बसलास तिथेच.
केतकी अ‍ॅट १:१० पिएम : हो. इथे आहेस रे. पण Uber चा ड्रायव्हर म्हणून. Proud ( लाईक्स रावडी राठोड, दंबग मन्या, रेवती,मेघना ) -
गिर्‍या अ‍ॅट १:१० पिएम : आता घरातले भांडण तू इथेही आणतेस का?
केतकी एडीटेड अ‍ॅट १:१३ (संपूर्ण लाईन गायब आणि त्याजागी केवळ अशी टिकली Happy
गिर्‍या : एडीटेड अ‍ॅट १:१४ (संपूर्ण लाईन गायब आणि त्याजागी केवळ अशी टिकली Happy

मन्या: तुला केवढ्याला मिळाला?
गिर्‍या : $१९९ ला
मन्या : सही बे. इथे ६५,००० ला आहे, आणि तुला १३,००० ला?
डिंकी Sad अ‍ॅट १:१२ ) गिर्‍या तिकडे इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासला कमीत आय फोन मिळतो का रे? Proud
लाईक्स रावडी राठोड, दंबग मन्या, रेवती,मेघना

सुन्या : आयफोन मध्ये काय पडलंय एवढ? अ‍ॅन्ड्रॉईड वापर. This phone is piece of shit ! सगळं काही प्रोप्रायटरी असतं अ‍ॅपलवाल्यांमध्ये. बॅड पिपल. नो डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ. भंगार फोन #applesucks
तात्या : आर यु क्रेझी? तू आयफोन हातात तरी घेऊन बघीतला आहेस का?
सुन्या : यु सीम टू बी अनावेअर ऑफ द बेनिफिट्स ऑफ अ‍ॅन्ड्रॉईड!
तात्या : अरे भाऊ आधी मराठी सरळ मराठी मध्ये टाईप कर. इंग्रजीतून नको सांगू.
सुहास : अ‍ॅन्ड्रॉईड रॉक्स
शमी : काय रॉक्स? अ‍ॅन्ड्रॉइड इज अ रॉक !
युजर १ : अबकड
युजर २ : एबीसिडी
ही रॅन्ट चालूच आहे.
नम्रता : मी अ‍ॅपल डेव्हलपर आहे, आय कॅन टेल यु ऑल द बेनिफिट्स ऑफ IOS ९
मन्या : किंमत कमी करायला सांगा.
सुन्या : नाही तर काय. अ‍ॅन्ड्रॉइड बघा कशी समाजवादी रचना आहे. ३००० रू च्या फोनवर पण अ‍ॅन्ड्रॉइड. यु गाईज आर सो कॅपिटलिस्टिक मेंटॅलिटी. भंगार फोन #applesucks
नम्रता : अहो तो टॅग तुम्ही आधीही वापरला आहे. म्हणूनच तर मी इथे लिहिले. आता आणखी चार लोकं येतील. भोआकफ.
तात्या : भोआकफ. - म्हणजे तुम्ही मायबोलीवरच्या दिसत आहात. काय आयडी आहे तुमचा.
नम्रता : हो तात्या. सही, तात्या तुम्ही पण माबोकर का? वी गाईज रॉक !

रेवती : वॉव जबरी, मी अमेरिकेत राहिले असते तर मी ही घेतला असता, पण इथे भारतात ६५,००० ला आहे.
लाईक्स : सत्या, डिंकी, पिंकी, आयेशा, गिर्‍या, मन्या
गिर्‍या : भारतात कशाला गेलीस मग परत? इथेच राहायचे की ! लाईक्स : रेवती
सत्या : सरळ सांग की ६५००० ला परवडत नाही म्हणून.
रेवती : अरेच्चा, आता ह्यात परवडणे काय आले? आय फोनला ६५,००० कोण शहाणा घालेल?
मेघना : माझ्या नवर्‍याने घेतलाय ! ( ६ लाईक्स)
डिकी : आय अ‍ॅग्री. ६५,००० मध्ये ५ मोटो जी येतात.
मेघना : कैच्याकाय. म्हणे ५ मोटो जी. काहीही हं डिंकी ! उद्या ७००० च्या फोनला म्हणशील, अर्धा मोटो जी येतो.
जान्हवी ( मेघना ची मैत्रीन) : मेघना "काहीही हं" वर माझा प्रताधिकार आहे.
श्री : वॉव ६५,००० किंमत आहे का? मग आयफोन मला ही हवाय.
जान्हवी : काहीही हं श्री ! लाईक्स १७६३०३२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

(संपूर्ण लाईन गायब आणि त्याजागी केवळ अशी टिकली स्मित)
>> हे भारी आहे!

सुन्या : यु सीम टू बी अनावेअर ऑफ द बेनिफिट्स ऑफ आयफोन.
>> इथे काहीतरी गडबड झालीय का?