तेचबूक!

तेचबूक! - मोगली

Submitted by सोनू. on 19 September, 2015 - 06:56

मोगलीचं स्टेटस अपडेट.
(तेचबूक सर्वरवर जास्तं लोड येत असल्याने लाईक डिसलाईक ची सेवा काही काळापुरती बंद करण्यात आलेली आहे याची कृपया नोंद घ्यावी.)

Mogali.jpgमोगली फीलिंग लॉस्ट Sad नवीन पंजा बनवायला लाकूड शोधायला आलोय. कळतच नाहीय कोणते घेऊ ते. फ्रेंड्स, मदत!!!!!! (थंडी पण खूप लागतेय) अ‍ॅट आल्प्स जंगल

Alps.JPG

विषय: 

तेचबूक ! - राम

Submitted by आशिका on 19 September, 2015 - 06:21

श्रीरामावताराची क्षमा मागून

स्टेटस अपडेट - वाईफ किडनॅपड, फिलिंग सॅड अॅंड लोनली

सुपर लाईक बाय उर्मिला
रिप्लाय (राम) -उर्मिले, ताई हरवली तर तू लाईक देतेस?
रिप्लाय (उर्मिला) - भावोजी, तुम्ही आम्हा दोघांची अशीच ताटातूट केलीत, आता भोगा आपल्या कर्माची फळे
लाईक- लक्ष्मण

कैकयी - तरी सांगत होते टवळीला दागिने घालून जाऊ नकोस वनवासात. पण मी सासू आणि तीही सावत्र, मग कोण ऐकतेय?
लाईक - मंथरा
डिस्लाईक - कौसल्या आणि कैकयी

कौसल्या - रामा, आता तरी तुझे 'एकपत्नीव्रत' सोड रे

विषय: 

तेचबूक! - माताजी भारद्वाज

Submitted by स्वप्ना_राज on 19 September, 2015 - 03:16

स्टेटस अपडेट :

माताजी भारद्वाज - हे मातारानी, सिमर और रोली (फिरसे) गायब हो गयी है. हमारी सारी जायदाद मुझसे धोखेसे दस्तखत करवाके (फिरसे) हथियाई गयी है. आप ये अन्याय होते हुए कैसे देख सकती है? Sad

एसीपी प्रद्यूमन - कही टेररिस्टस्ने सिमर और रोलीको किडनॅप तो नही किया है? माताजी, आप चिंता मत किजिये. हम जरुर उन्हे धुंड निकालेंगे. जरुर कुछ गडबड है दया, पता करो.

दया - सर, मेरी वाईफ कलर्स चॅनेल नही देखती. और उसे चॅनेल चेंज करनेको बोलना मेरे बसकी बात नही. आप अभिजीतसे कहो. उसकी अब तक शादी नही हुई है Wink

विषय: 

तेचबूक! - मधू मलुष्टे

Submitted by ललिता-प्रीति on 18 September, 2015 - 06:14

मधू मलुष्टे : बी.ए. कम्प्लीटेड, फायनली! फीलिंग ऑसम्म!

शेअर्ड बाय सुबक ठेंगणी
सुबक ठेंगणी, झंप्या दामले, सखाराम गटणे, हरितात्या, बावज्या धना बोहोरीकर आणि ६७ अदर लाईक धिस.

सुबक ठेंगणी : प्राऊड ऑफ यू Happy
मधू मलुष्टे अँड १२७ अदर लाईक धिस.
हरितात्या : पुराव्याने शाबित करा!
सुबक ठेंगणी : दाखवून टाक रे त्यांना बी.ए.चं सर्टिफिकेट...
मधु मलुष्टे अँड १२७ अदर लाईक धिस.

तेचबुक! स्टेटस गिर्‍या - आयफोन ६स

Submitted by केदार on 18 September, 2015 - 04:11

गिर्‍या स्टेटस : न्यु टॉय इन द टाऊन - आयफोन 6S. काल रात्रभर लाईनीत उभा राहून आयफोन ६S मिळवला. य्येस! #Iphone6S #Goodtimes #Firsttoget #Haapy #intheclouds

लाईक्स सत्या,सुन्या, मोहन, रावडी राठोड, दंबग मन्या, केतकी, रेवती,मेघना अ‍ॅन्ड २७ मोअर.

रावडी राठोड : अबे गिर्‍या, रात्रभर जागून, लाईनीत उभा राहून फोन घेतलास, त्यापेक्षा TEला तेवढा अभ्यास केला असतास तर पास झाला असतास. Proud
गिर्‍या : राठोड, इथे पास होण्याचे काय आहे? आज बघ मी अमेरिकेला आहे. BE न काढताच.आणि तू बसलास तिथेच.

तेचबूक! - रिद्धी-सिद्धी

Submitted by मामी on 17 September, 2015 - 03:54

स्टेटस अपडेट : रिद्धी-सिद्धी

एकदाची गणेशाची स्वारी आज त्याच्या वार्षिक टूरवर गेली. आता दहा दिवस मी पण मज्जा करणार. शॉपिंग, मैत्रिणींबरोबर भटकणं आणि कैलासावर स्कीइंग ..... यिप्पी!!!!

आता परत येतील तर स्वारीला पुन्हा डाएटिंग करायला लावलं पाहिजे. आता कुठे फोर पॅक्स दिसायला लागले होते तर गेला मोदक आणि मिठाई रिचवायला..... हम्म्म.

लाईक्स : ८४१७५८९८६९९५९७१७७१७४१८७८१५९८६९०९६०८९२७८१७८९४.......

कार्तिकेय : यो! वहिनी. धम्माल कर.
लाईक्स (१) : रिद्धी-सिद्धी

विषय: 
Subscribe to RSS - तेचबूक!