मायबोली गणेशोत्सव २०१५ - आमच्या घरचा गणपती

Submitted by संयोजक on 15 September, 2015 - 23:28

'पायी हळूहळू चाला | मुखाने मोरया बोला |'च्या गजरात तुमच्या घरी गणरायांचं आगमन झालं असेल. प्रतिष्ठापना, पहिल्या दिवशीचा नैवेद्य, अथर्वशीर्ष, आरत्या झाल्या की जेवणं आणि मग जsरा उसंत मिळत्येय न मिळत्येय तोवर संध्याकाळी दर्शनाला येणाऱ्या पाहुण्यांची लगबग.

यांतून मायबोलीकरांसाठी थोडा वेळ काढा आणि तुमच्या लाडक्या बाप्पाची, त्याच्यासाठी केलेल्या सजावटीची छायाचित्रं इकडे द्यायला विसरू नका. ही सजावट कशी केली, यावर्षी विशेष काय केलं हे सगळं आम्हांला वाचायला आवडेल.


IMG-20150910-WA0008.jpg

आपण आपल्या घरच्या गणपतीविषयी थोडक्यात माहिती आणि फोटो इथे, याच धाग्यावर प्रतिसादात देऊ शकता. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा आमच्या इथल्या घरचा गणपती.

मुर्ती घरी केली. सगळी फुलंही घरचीच. बाकी सजावट करायला फारसा वेळ नाही झाला. आज ऑफिस असल्याने जेवढा स्वैपाक झाला होता त्याचा नैवेद्य दाखवला. (वाटीत गुलाबजाम आहेत. नाहितर वाटायचं काय पोळी भाजीचा नैवेद्य दाखवलाय. Wink )

ही पुजा करण्याच्या आधी तयार मुर्ती.

हितेश सुंदर मूर्ती. आता जास्तच मिस होईल गणपती.
पराग, सही जमलेत बाप्पा आणि फुलं मस्त. पोळी भाजी गुजा मस्त बेत.

तिन्ही बाप्पा मस्त!
पराग .. सुंदर बनली आहे मुर्ती _/\_
हिम्सकुल.. आजोबांनी काढलेली रांगोळी ना? डोळे किती रोखुन बघतायत .. मस्त! Happy

image_35.jpgimage_33.jpgimage_34.jpg

हा आमच्या सोसायटीचा बाप्पा.
सहसा सजावटीच साहित्य रिसायकल करतो आम्ही. यंदा ह्या साड्या आणून केलेली सजावट.
वर्गणी अन ह्या साड्या नंतर गरजू ना द्यायचा मानस आहे.

IMG_4229.jpg

g1.jpg

आमच्या घरचा बाप्पा..!
सजावटीसाठी पुरेसा वेळ मिळाला नसला तरी हाताशी येईल तसं वापरत गेलो.

हा आमच्या घरचा बाप्पा. गेली नऊ वर्षे आम्ही ही पंचचधातूची मूर्ती पुजत आलो आहोत. पुजेची छोटी मूर्तीही पंचधातूचीच. विसर्जनाचा विधी लहान मूर्तीवर केला जातो.

हा पुजेआधीचा बाप्पा
Ganpati1.jpg

आणि हा पुजेनंतरचा
Ganpati2.jpg

हा आमच्या ऑफिसमधला बाप्पा.
ह्या वर्षी लालबागच्या राजाची प्रतिकॄति.

SEEPCO_053_MA.jpgSEEPCO_053_MA_01.jpgSEEPCO_060_MA.jpgSEEPCO_059_MA.jpg

_प्राची_, तुमची थीम फार आवडली. मस्त.

प्राजक्ता, पालखी सुरेख दिसतेय.

सगळ्यांच्या घरचे देव, आरासी सुंदर आहेत.

सगळेच बाप्पा सुंदर!
हा आमचा घरी केलेला बाप्पा. मागच्या वर्षी विसर्जन केलेल्या मूर्तीचीच माती वापरलीय. रंग गेरूचा. आणि सजावटीची बहुसंख्य फुलं घरच्या बागेतली.

Pages