मायबोली गणेशोत्सव २०१५ - आमच्या घरचा गणपती

Submitted by संयोजक on 15 September, 2015 - 23:28

'पायी हळूहळू चाला | मुखाने मोरया बोला |'च्या गजरात तुमच्या घरी गणरायांचं आगमन झालं असेल. प्रतिष्ठापना, पहिल्या दिवशीचा नैवेद्य, अथर्वशीर्ष, आरत्या झाल्या की जेवणं आणि मग जsरा उसंत मिळत्येय न मिळत्येय तोवर संध्याकाळी दर्शनाला येणाऱ्या पाहुण्यांची लगबग.

यांतून मायबोलीकरांसाठी थोडा वेळ काढा आणि तुमच्या लाडक्या बाप्पाची, त्याच्यासाठी केलेल्या सजावटीची छायाचित्रं इकडे द्यायला विसरू नका. ही सजावट कशी केली, यावर्षी विशेष काय केलं हे सगळं आम्हांला वाचायला आवडेल.


IMG-20150910-WA0008.jpg

आपण आपल्या घरच्या गणपतीविषयी थोडक्यात माहिती आणि फोटो इथे, याच धाग्यावर प्रतिसादात देऊ शकता. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

11010575_1061733860505891_3439147173082319119_n.jpg

या वर्षीचा चॉईस माझ्या ५ वर्षाचा मुलाचा डेकोरेशनलाही तीन दिवस आधीच तयारी चालली होती.
गणपती बाप्पा मोरया

IMG_20150918_063258546.jpg

IMG_20150918_063322570.jpg

गणपती बाप्पा मोरया __/\__

सर्वांचे बाप्पा आणि सजावटी खूप सुंदर आहेत. प्राची तुमची थीम खूप आवडली आणि घरी बनवलेले बाप्पा खूप आवडले,

हे आमच्या घरचे गणपती बाप्पा.
ganpati bappa.jpg

माझी छोटी मुलगी राधा हिच्या आवडीने जय मल्हारचा आमचा गणपती बाप्पा आमच्याइथे विराजमान झाले.

मुलाच्या हट्टाखातर या वर्षी योग करणारे मूषक! सर्व मूर्त्या कुठलाही न रंग न वापरता साध्या मातीने केल्या आहेत.

12030543_899618730126733_2531321072925638938_o.jpg11802672_899618853460054_5193605742181239003_o.jpg12039046_899618910126715_7468529590943718937_o.jpg

सुरेख आहेत सजावटी!
पराग,सानुली! गणपती सुबक झालाय, चैतन्यचा गणपती अजुन दिसला नाहि.

काल गौरीसोबत माहेरच्या गणपतीचे विसर्जन झाले.
विसर्जनाच्या वेळी गणपतीला छोटी कुंची घालतात.
मी शिवलेली कुंची घातलेला आमचा बाप्पा :
IMG-20150921-WA0007 (Large).jpg

Pages