तेचबूक! - मधू मलुष्टे

Submitted by ललिता-प्रीति on 18 September, 2015 - 06:14

मधू मलुष्टे : बी.ए. कम्प्लीटेड, फायनली! फीलिंग ऑसम्म!

शेअर्ड बाय सुबक ठेंगणी
सुबक ठेंगणी, झंप्या दामले, सखाराम गटणे, हरितात्या, बावज्या धना बोहोरीकर आणि ६७ अदर लाईक धिस.

सुबक ठेंगणी : प्राऊड ऑफ यू Happy
मधू मलुष्टे अँड १२७ अदर लाईक धिस.
हरितात्या : पुराव्याने शाबित करा!
सुबक ठेंगणी : दाखवून टाक रे त्यांना बी.ए.चं सर्टिफिकेट...
मधु मलुष्टे अँड १२७ अदर लाईक धिस.
हरितात्या : तो पुरावा नव्हे. मधू मलुष्टे आणि सखाराम गटणे या दोन वेगळ्या व्यक्ती नव्हेत, एकच आहेत असं माझं कायमचं मत आहे! त्याबद्दल बोलतोय मी!
मधु मलुष्टे : यू सी, ही जाहीर बदनामी आहे, यू सी... Angry
सुबक ठेंगणी आणि सखाराम गटणे लाईक धिस.
झंप्या दामले : असेनात का! बी.ए. कम्प्लीटेड, फायनली! Wink
सुबक ठेंगणी लाईक्स धिस.
सखाराम गटणे : हरितात्या, माझे असे प्रांजळ मत आहे, की आपल्याला अजून प्राज्ञ परिक्षेची पातळी लक्षात आलेली नाही!
हरितात्या : मी बी.ए.च्या परिक्षेबद्दल बोलतोय. आणि तू जाहीर बदनामीचं वाक्य लाईक काय केलंयस? महाराज असते तर शिरच्छेद केला असता तुझा... Angry
झंप्या दामले लाईक्स धिस.
बावज्या धना बोहोरीकर : मधूशेट, ते बी.ए.च्या परिक्षेमंदी आक्षर चांगलं आसावं लागतंय की त्याबिगर पन चालून जातंय?
झंप्या दामले : आता काय फरक पडतो! बी.ए. कम्प्लीटेड, फायनली! Wink
सुबक ठेंगणी : अक्षर चांगलं असावं लागणारच. तिथे लेखनिक नसतो कुणी ’आक्षरास हासू नये’ असं लिहून घ्यायला... Proud
मधु मलुष्टे, झंप्या दामले अँड १२७ अदर लाईक धिस.
झंप्या दामले : अजून सख्याने हरितात्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलंच नाही!
बावज्या धना बोहोरीकर लाईक्स धिस.
सखाराम गटणे : सख्या हे संबोधन वापरण्याची अनुमती मी केवळ सेक्रेटरीसाहेबांना दिलेली आहे. इतर कुणीही माझ्या अनुमतीविना मला या नामाने हाक मारू शकत नाही.
सेक्रेटरी लाईक्स धिस.
सुबक ठेंगणी : मधू कुठे गायब झाला या सगळ्यात?
मधु मलुष्टे अँड १२७ अदर लाईक धिस.
हरितात्या : घाबरला महाराजांच्या शिरच्छेदाच्या शिक्षेला...
बावज्या धना बोहोरीकर : पर, शिर्छेद त सखारामचा व्हनाराय ना?
मधु मलुष्टे, सुबक ठेंगणी अँड १२७ अदर लाईक धिस.
मधु मलुष्टे : लोकांना फार पंचाईती पडलेल्या असतात, फार चौकश्या करतात, फार...
सुबक ठेंगणी लाईक्स धिस.
हरितात्या : अजूनही तिय्या साधता येतच नाही वाटतं!
झंप्या दामले : आता काय फरक पडतो! बी.ए. कम्प्लीटेड, फायनली!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ललितादेवी,

>> सुबक ठेंगणी : अक्षर चांगलं असावं लागणारच. तिथे लेखनिक नसतो कुणी ’आक्षरास हासू नये’
>> असं लिहून घ्यायला...

हा खास तुमच्या शैलीतला विनोद वाटतो. Lol अजून येऊ द्या.

आ.न.,
-गा.पै.

Lol मस्त.
सकाळी वाचल्यावर विचार करताना इतर १२७ पात्र घालून डोक्यात स्टेटस यायला सुरुवात झालेली. पण इतकंच गोड वाटतंय, बाकीचं वाचकांवर सोडून दिलेलं.

सही! Happy

Pages