तेचबूक! - मधू मलुष्टे

Submitted by ललिता-प्रीति on 18 September, 2015 - 06:14

मधू मलुष्टे : बी.ए. कम्प्लीटेड, फायनली! फीलिंग ऑसम्म!

शेअर्ड बाय सुबक ठेंगणी
सुबक ठेंगणी, झंप्या दामले, सखाराम गटणे, हरितात्या, बावज्या धना बोहोरीकर आणि ६७ अदर लाईक धिस.

सुबक ठेंगणी : प्राऊड ऑफ यू Happy
मधू मलुष्टे अँड १२७ अदर लाईक धिस.
हरितात्या : पुराव्याने शाबित करा!
सुबक ठेंगणी : दाखवून टाक रे त्यांना बी.ए.चं सर्टिफिकेट...
मधु मलुष्टे अँड १२७ अदर लाईक धिस.
हरितात्या : तो पुरावा नव्हे. मधू मलुष्टे आणि सखाराम गटणे या दोन वेगळ्या व्यक्ती नव्हेत, एकच आहेत असं माझं कायमचं मत आहे! त्याबद्दल बोलतोय मी!
मधु मलुष्टे : यू सी, ही जाहीर बदनामी आहे, यू सी... Angry
सुबक ठेंगणी आणि सखाराम गटणे लाईक धिस.
झंप्या दामले : असेनात का! बी.ए. कम्प्लीटेड, फायनली! Wink
सुबक ठेंगणी लाईक्स धिस.
सखाराम गटणे : हरितात्या, माझे असे प्रांजळ मत आहे, की आपल्याला अजून प्राज्ञ परिक्षेची पातळी लक्षात आलेली नाही!
हरितात्या : मी बी.ए.च्या परिक्षेबद्दल बोलतोय. आणि तू जाहीर बदनामीचं वाक्य लाईक काय केलंयस? महाराज असते तर शिरच्छेद केला असता तुझा... Angry
झंप्या दामले लाईक्स धिस.
बावज्या धना बोहोरीकर : मधूशेट, ते बी.ए.च्या परिक्षेमंदी आक्षर चांगलं आसावं लागतंय की त्याबिगर पन चालून जातंय?
झंप्या दामले : आता काय फरक पडतो! बी.ए. कम्प्लीटेड, फायनली! Wink
सुबक ठेंगणी : अक्षर चांगलं असावं लागणारच. तिथे लेखनिक नसतो कुणी ’आक्षरास हासू नये’ असं लिहून घ्यायला... Proud
मधु मलुष्टे, झंप्या दामले अँड १२७ अदर लाईक धिस.
झंप्या दामले : अजून सख्याने हरितात्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलंच नाही!
बावज्या धना बोहोरीकर लाईक्स धिस.
सखाराम गटणे : सख्या हे संबोधन वापरण्याची अनुमती मी केवळ सेक्रेटरीसाहेबांना दिलेली आहे. इतर कुणीही माझ्या अनुमतीविना मला या नामाने हाक मारू शकत नाही.
सेक्रेटरी लाईक्स धिस.
सुबक ठेंगणी : मधू कुठे गायब झाला या सगळ्यात?
मधु मलुष्टे अँड १२७ अदर लाईक धिस.
हरितात्या : घाबरला महाराजांच्या शिरच्छेदाच्या शिक्षेला...
बावज्या धना बोहोरीकर : पर, शिर्छेद त सखारामचा व्हनाराय ना?
मधु मलुष्टे, सुबक ठेंगणी अँड १२७ अदर लाईक धिस.
मधु मलुष्टे : लोकांना फार पंचाईती पडलेल्या असतात, फार चौकश्या करतात, फार...
सुबक ठेंगणी लाईक्स धिस.
हरितात्या : अजूनही तिय्या साधता येतच नाही वाटतं!
झंप्या दामले : आता काय फरक पडतो! बी.ए. कम्प्लीटेड, फायनली!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाईक्स : पी. यल्. (असं नक्की असते)

म्हाराजांच्या टायमाला असा लिवल असत तर कमीत कमी पोपच्या दरबारातली सरदार तरी नक्की झाली असतीस Wink

ललिता-प्रीति,
मस्तच लिहलयस.... मुळात पुलंच्या या वल्ली तेचबुकासाठी वापरण्याची कल्पनाच खुप भारी आहे

बाय द वे, ही १२७ ची काही स्टोरी आहे काय?

मस्त मस्त मस्त लिहिलंयस.

पण इतक्यात आटोपतं का घेतलंस?
बरेचसे यशस्वी कलाकार मिस झालेत.
त्यांना ही तेचबूक वर नव्याने जिवंत झालेलं पहायला आणि वाचायला आवडलं असतं.

पु ल ..........................

आपल्या प्रवेशिकेच्या जाहिरात करू शकता असं संयोजकांनी सांगितलंय. त्यामुळे धागा वर आणण्यासाठी... Proud

वाचा आणि मत द्या.

मामी, सगळ्या वाहत्या धाग्यांवर संयोजकांनी पोस्ट टाकली आहे. त्यात शेवटी तसं म्हटलं आहे.

बाय द वे, ही १२७ ची काही स्टोरी आहे काय? >>>

काही नाही. असाच आपला एक आकडा.
'पोरींनी फेसबूकवर काहीही लिहिलं तरी त्याला लगेच खंडीभर लाईक्स येतात' या अर्थाचे फॉर्वर्डस येत असतात, त्यावरून केलं आहे ते. ते १२७ जण सुबक ठेंगणीच्या प्रत्येक कमेंटला लाईक करतात. Lol

Pages