कांदा, बटाटा, टोमॅटो कोथिंबीर, गरम मसाला, धने-जिर्याची पूड इत्यादी हाताशीच असणारं साहित्य... हे पाककृतीत घालायचा क्रम थोऽडा बदलला की चवीतही काय मस्त फरक पडतो.
अशीच वेगळ्या चवीची आणि पटापट होणारी छोट्या मद्रासी सांबार कांद्यांची ही कलेजी.
साहित्य -
सांबार कांदे - वीस ते पंचवीस (साधारण २०० ग्रॅम)
मोठा टोमॅटो - एक
उकडलेले बटाटे - दोन
मूठभर स्वच्छ धुऊन बारीक चिरलेली कोथिंबीर
फेटलेली साय - अर्धी वाटी
तूप - दोन मोठे चमचे
मसाले -
गरम मसाला - एक चमचा
धने पूड अर्धा चमचा -
जिरं पूड - एक चमचा
कांदा लसूण मसाला - अर्धा चमचा
गोडा मसाला - पाव चमचा
मीठ, साखर चवीप्रमाणे
क्रमवार पाककृती -
१. सांबार कांदे स्वच्छ धुऊन, सोलून घ्या.
२. टोमॅटो बारीक चिरून घ्या.
३. उकडलेले बटाटे सोलून तुकडे करून घ्या.
४. एका वाटीत सगळे मसाले एकत्र करून घ्या.
५. कढईत तूप तापत ठेवा. ते गरम झालं की त्यात वाटीत एकत्र केलेले सगळे मसाले घाला, थोडं परतून त्यात चिरलेली कोथिंबीर घाला.
६. कोथिंबीर थोडीशी तळली गेली की त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला, त्यात पाव वाटी पाणी घालून कढईवर झाकण ठेवून द्या. गॅस बारीक असू द्या.
७. टोमॅटो शिजून त्याचा रस आटत आल्यावर त्यात सोललेले कांदे घाला. नीट परतून पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवून द्या.
८. कांदे पारदर्शक झाले की त्यात उकडलेले बटाटे आणि चवीप्रमाणे मीठ, साखर घालून नीट एकत्र करून घ्या. त्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या.
९. आता फेटलेली साय घालून कलेजी व्यवस्थित परता. गॅस बारीक असू द्या, झाकण न ठेवता परतत परतत कलेजी छान खरपूस होऊ द्या.
फेटलेली साय घातल्यामुळे मसाल्यांची चव खुलून येते आणि उग्रपणा कमी होतो. कोरडी ग्रेव्ही असलेली ही भाजी गरम फुलके / पोळ्या / पराठे यांच्याबरोबर मस्त लागते. सोबत सुधारस किंवा गोडाचा शिरा, गाजर-टोमॅटोची किंवा कोबीची कोशिंबीर वाढली की भरलेलं ताट एकदम रसना तृप्त करतं.
या पाककृतीत बदलायचे घटक -
१. बटाटा
२. टोमॅटो
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!!
पाककृती क्रमांक ३ हवंय ना
पाककृती क्रमांक ३ हवंय ना संयोजक ?
इंटरेस्टिंग.मस्त रेसिपी. ही सुद्धा आधी मूळ पद्धतीने करुन बघणार.
रेसिपीचे जनक मंजूडी ( लिहिण्याची पद्धत आणि शेवटचा फोटो ) वाटतेय पण 'कलेजी' मुळे जागूही असू शकेल
मलाही जागूच वाटतेय! जमणेबल
मलाही जागूच वाटतेय!
जमणेबल पणवाटय्तेय
हुर्रर्र... प्राण गेला तरी
हुर्रर्र... प्राण गेला तरी आमची जागू कांद्या बटाट्यांना कलेजी म्हणणार नाही.
जागुच श्रावण स्पेशल हो !
जागुच श्रावण स्पेशल हो !
कांदे ते पण त्या गोडचट
कांदे ते पण त्या गोडचट मद्रासी कांद्यांना कलेजी हे नाव... लाहौल विलाकुवत.
शेवटचा फोटो पाहिल्यावर "आता हे सर्व अंड्यामध्ये भरा आनी कापून खायला द्या" हे वाक्य लिहायचं राहिल्यासारखं वाटलं
कांदे ते पण त्या गोडचट
कांदे ते पण त्या गोडचट मद्रासी कांद्यांना कलेजी हे नाव... लाहौल विलाकुवत.
शेवटचा फोटो पाहिल्यावर "आता हे सर्व अंड्यामध्ये भरा आनी कापून खायला द्या" हे वाक्य लिहायचं राहिल्यासारखं वाटलं
+१०००००००
फोटो खुप टेम्प्टींग आलाय.. नक्की करुन पाहिन. मी जे पदार्थ रेप्लेस करु इच्छिते ते इथे स्पर्धेत चालणारे नाहीत पण मला धावतील:);)
छानच कृती. मद्रासी कांद्याचा
छानच कृती. मद्रासी कांद्याचा वेगळाच उपयोग केलाय.
फेटलेली साय अमेरिकेत मिळत
फेटलेली साय अमेरिकेत मिळत नाही, मिळत असली तरी अजिबात आवडत नाही. त्याऐवजी फ्रेश क्रीम चालेल का?
मस्त
मस्त
कांद्याची रेसेपी.. स्पॉन्सर
कांद्याची रेसेपी.. स्पॉन्सर शोधावे लागतील करून बघायला
स्पॉन्सर >>>>
स्पॉन्सर >>>>
मनीष, नाही. मद्रासीकांदे
मनीष, नाही. मद्रासीकांदे अद्याप स्वस्त आहेत. आमच्या गावात तरी वीस रूपये अर्धा किलो आहेत. अर्धा किलोमध्ये बुट्टीभर कांदे येतात. (महिनाभराच्या सांबाराला आरामात पुरतात)
ह्यात कलेजी कुठाय ?
ह्यात कलेजी कुठाय ?
मला नंदिनीवर संशय येतो आहे.
मला नंदिनीवर संशय येतो आहे.
बोकडाच्या करंज्या सर्रास
बोकडाच्या करंज्या सर्रास मिळतात तेव्हा आम्ही नाही म्हणत लाहौल विलाकुवत वगैरे... शाकाहारी असणं हल्ली पाप झालं आहे
ही रेसिपी बटाटाप्रेमी सिंडीची असेल असं वाटलं होतं पण तिने इथे प्रश्न विचारला त्यामुळे आता मी डौटात...
भारी रेस्पि! खरंतर अदलाबदली
भारी रेस्पि!
खरंतर अदलाबदली पेक्षा 'ही रेसिपी कोणाची' अशी स्पर्धा पण भन्नाट रंगली असती असं वाटायला लागलंय
तो रस्सा कांद्याचा फोटो
तो रस्सा कांद्याचा फोटो क्लाSSSस आहे. तिथेच साय/क्रीम टाकून भाजी संपवता येणार नाही का?
मी कधीपासून यात कलेजी शोधतेय.
मी कधीपासून यात कलेजी शोधतेय.
कांदे भारतात महाग असल्याने ते बदलायचा पर्याय चांगला आहे
पण नेमेके कांदेच बदलायचे
पण नेमेके कांदेच बदलायचे नाहीयेत ना वेका.
कांद्यांपेक्षा कलेजी स्वस्त
कांद्यांपेक्षा कलेजी स्वस्त असेल बहुतेक
ओह हो यार ते मी चुकीचं
ओह हो यार ते मी चुकीचं वाचलं..उप्स.. मग हे बरोबर नाही संयोजक. खरं कांद्याला पर्याय अशा स्पर्धांद्वारे शोधता आला तर भारत नाही निदान महाराष्ट्र दुवा देईल.
श्री
असेल.
उगाच कलेजी नाव कशाला?
उगाच कलेजी नाव कशाला? शाकाहारी मेनूला ते पण. आणि ते हि गणपती उत्सवात.
कांदा बटाटयाची भाजी म्हणायचे ना.
आवडली. अशीच करून बघणार.
आवडली. अशीच करून बघणार.
Jagutai ch ti
Jagutai ch ti
जागूची नाहीये ही रेसिपी.
जागूची नाहीये ही रेसिपी. जागू गोडा मसाला वापरणार नाही आणि खायला सोबत सुधारस तर अजिबात घेणार नाही.
सुधारस म्हणजे कुणा पुणेकराचं
सुधारस म्हणजे कुणा पुणेकराचं काम दिसतंय.
रसना तृप्त करण्यातला एक
रसना तृप्त करण्यातला एक पदार्थ >>> सुधारस? काहिही हं संयोजक!
रच्याकने, सांबार कांदे म्हणजे शॅलट्स का?
हा पदार्थ आणि बदलूनचा करुन बघणार.
दिनेशदापण असू शकतात रेशिपी
दिनेशदापण असू शकतात रेशिपी लिहिणारे. त्यांची काही नावे आहेत confused करणारी, भाजूक तुकड्या आणि खांडोळी.
>>>रच्याकने, सांबार कांदे
>>>रच्याकने, सांबार कांदे म्हणजे शॅलट्स का?<<
नाही, पर्ल अनियन.
Pages